Thursday, January 21, 2010

अमराठी टॅक्सीवाल्यांना राजची 'धमकी'

आमच्या मनातले बोललात राज साहेब, ह्या कच खाऊ मुख्यमत्र्यांना महाराष्ट्राची आणि पर्यायाने मराठी माणसांची ताकत दाखवायलाच हवी । अशोक रावन वर कोणाचं दडपण आले जेणे करून त्यानीं हा निर्णय चोवीस तासात फिरवला ? आम्हाला कळाले पाहिजे


मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
मुंबई व उपनगरात नव्याने देण्यात येणारे टॅक्सी परवाने मराठी मुलांनाच मिळायला हवेत। नाहीतर एकही नवी टॅक्सी रस्त्यावर फिरू देणार नाही, अशी स्पष्ट ' धमकी ' महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री अशोक चव्हाण व राज्य सरकारला दिली.

मुंबई व उपनगरात दरवर्षी ४५०० नवे टॅक्सी परवाने देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला। १५ वर्षे महाराष्ट्रात वास्तव्य आणि मराठी लिहिता, वाचता व बोलता येणा-यांनाच टॅक्सी परवाने दिले जातील, असे सरकारने स्पष्ट केले होते. परंतु २४ तास उलटण्याच्या आतच मुख्यमंत्री चव्हाण यांनी पलटी मारली. मराठीसोबतच हिंदी किंवा गुजरातीपैकी एक भाषा येणे पुरेशी असल्याची सारवासारव मुख्यमंत्र्यांनी आज केली. दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडून दट्ट्या आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मराठी टॅक्सीवाल्यांचा निर्णय फिरवल्याची चर्चा आहे.

मुख्यमंत्र्यांच्या या ‘ घूमजाव ’ मुळे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आयताच मुद्दा सापडला असून, त्यांनी आज मुख्यमंत्र्यांना चांगलेच फैलावर घेतले। बुळचट व लाचार अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांची संभावना करत राज ठाकरे म्हणाले की, स्वकर्तृत्वाने अशोक चव्हाण मुख्यमंत्री झालेले नाहीत. कुणीतरी बसवलेले हे मुख्यमंत्री आहेत. एकतर निर्णय घेण्याची यांची क्षमता नाही. आणि घेतलाच निर्णय तर त्यांची अमलबजावणी करण्याची यांची हिंमत नाही. दिल्लीवरून दट्ट्या आल्यानंतर लाचार मुख्यमंत्र्यांनी लगेचच मराठी मुलांना टॅक्सी परवाने देण्याचा निर्णय बदलला. संपूर्ण कॅबिनेटने घेतलेला हा निर्णय मुख्यमंत्री एकट्याने कसा फिरवू शकतात ? स्वाभिमान नावाची काही गोष्ट आहे की नाही ? याबाबत इतर मंत्र्यांची काय मते आहेत, हे जरा समजून घ्या. असली लाचारी करण्यापेक्षा दक्षिणेतल्या राज्यातील मुख्यमंत्र्यांकडे पार्ट टाइम जॉब करा... स्वाभिमान, भाषा, प्रदेश काय असते ते त्यांना समजेल, असा टोला राज यांनी हाणला.

सरकारचा काय निर्णय व्हायचा तो होईल। परंतु आमचा निर्णय झालेला आहे. ४५०० नवे परवाने मराठी मुलांनाच मिळायला हवेत. नाहीतर एकही नवी टॅक्सी रस्त्यावर फिरू देणार नाही... ज्यांना ही धमकी समजायची असेल त्यांनी ती खुशाल धमकी समजावी, अशी गर्जना राज ठाकरे यांनी केली. एवढेच नाही, तर याआधी दिलेले टॅक्सी-रिक्षा परवानेही तपासून बघावे लागतील. यांना भाषा, शहर, पत्ता काहीही माहिती नसताता टॅक्सी-रिक्षा चालवण्याची परवानगी मिळतेच कशी ? असा सवाल ठाकरे यांनी केला.

2 comments:

  1. यापेक्षा टॅक्सीचे परवाने ज्या कायद्यानुसार दिले जातात त्या कायद्याची अंमलबजावणी कठोरपणे करण्यात यावी असा आग्रह धरणे मराठीच्या विकासाला अधिक उपयुक्त ठरेल.

    ReplyDelete
  2. marathi manus nehmich tumchya pathishi aahe.
    jay maharashtra.

    ReplyDelete