Tuesday, May 31, 2011

शिव सेनेच्या रोजगार योजनेचा वडा

खालील बातमी प्रहार ह्या वृत्तपत्राच्या सौजन्याने ........


दादरच्या नामांतराला राज ठाकरेंचा विरोध

खालील बातमी स्टार माझा च्या सौजन्याने .......................


दादर स्टेशनचे नाव चैतभूमी करावे, हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोध केला आहे. थोर पुरूषांच्या नावाचं गलिच्छ राजकारण राष्ट्रवादीने करू नये, राष्ट्रवादीमध्ये खुमखुमी असेल तर त्यांनी चलनी नोटेवर महात्मा गांधी ऐवजी बाबासाहेबांचा फोटो आणण्यासाठी आग्रही असावे, असा टोलाही यावेळी लगावला.
राष्ट्रपुरूषांना आपण इतकं छोटे का करतो, एखाद्या गल्लीला, रस्त्याला किंवा रेल्वे स्टेशला नाव देऊन त्या व्यक्तीचं महात्म्य आपण कमी का करतो. बाबासाहेबांसारखे इतके मोठे व्यक्तीमत्व आणि त्याचे नाव दादर स्टेशनला देणे ही दुर्दैवाची गोष्ट आहे. असे प्रकार माझ्या आजोबांच्या (प्रबोधनकार ठाकरे) बाबत झाले तर त्यालाही माझा विरोध असेल, असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. आज राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.

महाराष्ट्रातील राजकारणी परदेशात जातात, त्यांनी लिंकन मेमोरिअल पाहिले आहे का. अशा प्रकारचे काम छत्रपती शिवाजी महाराज किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत झाले आहे का? दिसला रस्ता दिले नाव आणि घातला वाद, हेच घाणेरडे राजकारण इथं सुरू आहे.

राष्ट्रवादीला इतकी खुमखुमी असेल तर त्यांनी चलनी नोटांवर महात्मा गांधींचा फोटो आहे, तेथेच किमान पाचशेच्या नोटेवर बाबासाहेबांचा फोटो आणण्यासाठी प्रयत्न करावा. महाराष्ट्रात राष्ट्रवादीची सत्ता आहे. ते केंद्रातही सत्ते सामिल आहेत. त्यावेळी राष्ट्रवादीच्या खासदारांनी ही मागणी करावी, असे आव्हान राज ठाकरे यांनी यावेळी केले.

व्हीटी स्टेशनचे नाव छत्रपती शिवाजी टर्मिनस झाले. पण तेथे काय सुविधा आहे. मराठवाडा विद्यापीठाचे नाव बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ झाले. पण काय तेथील शिक्षणपद्धती बदलली काय? राष्ट्रवादीचं आरपीआयशी बिघडलं तर हे फालतू राजकारण ते करीत आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या कोणत्याही नामांतराला माझ्या पक्षाचा विरोध आहे. माझी भूमिका स्पष्ट आहे, यात कुठल्याही महापुरूषाचा संबंध येत नाही. अशा प्रकारे राजकारण करण्याची भूमिका घाणेरडी असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केल.

आंबेडकरांनी काय लिहून ठेवले, ते आचरणात आणण्यापेक्षा नामांतर करण्याचे घाणेरडे राजकारण केले जात आहे. रामदास आठवलेंचं काय तर आम्हांला सत्तेचा वाटा मिळाला नाही म्हणून आम्ही इकडे आलो आहोत. पण, मूळ प्रश्न आहे. दलित बांधव आहे तिथेच आहे. माझ्या मागे दलित बांधव आहे. त्यामुळे माझा व्यक्तीला विरोध नाही, तर राजकारण करणाऱ्या प्रवृत्तीला विरोध आहे.

Monday, May 30, 2011

यांचे पिच कोणते?

खालील लेख लोकसत्ता च्या सौजन्याने ............................



शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याला ‘नको त्या पिचवरून खेळू नकोस’, असा सल्लावजा इशारा दिला आहे. माणसाने आपली पट्टी आणि धावपट्टी (पिच) दोन्हीही सोडू नये. तेव्हा ठाकरे यांचे म्हणणे बरोबरच आहे. त्यावर सचिन जे काही म्हणायचे ते म्हणेल, पण या निमित्ताने ठाकरे यांनाही ‘तुमचे पिच नक्की कोणते’, असा प्रश्न विचारण्यास हरकत नाही. १९९० च्या दशकापर्यंत ठाकरे हे मराठीच्या पिचवर खेळले. तुफान बॅटिंग केली त्यांनी. दोनचार घरांच्या काचा आणि काहींची डोकी फुटली, पण मराठीची प्रगती काही झाली नाही. सेनानेत्यांची मात्र झाली. मराठी उलट घसरणीला लागली. त्यांच्या सेनेचे मुख्यालय ज्या शिवाजी पार्क येथे आहे, खुद्द तेथेही मराठी शाळा बंद पडण्याची नामुष्की आलेली आहे. मुंबईच्या महानगर पालिकेत गेली जवळपास दोन दशके सेनेचीच सत्ता आहे आणि बंद पडणाऱ्या शाळाही नगरपालिकेच्याच आहेत. त्या वाचाव्यात यासाठी सेनेने काही केल्याचे ऐकिवात नाही. मुंबईतले खराब रस्ते पेवर ब्लॉकच्या साहय़ाने बुजवण्याचे अनोखे तंत्रज्ञान मुंबई महापालिकेने शोधून काढले आहे. मराठी शाळा वाचविण्यासाठीही असे एखादे पेव्हर ब्लॉक तंत्रज्ञान सेनेने बाळासाहेबांच्या आदेशानुसार शोधून काढले असते, तर बरे झाले असते, पण तसे झाले नाही. कदाचित भाषेच्या पेवर ब्लॉकमध्ये परतावा जास्त नसल्याने त्यांच्या पक्षाने यात लक्ष घातले नसावे. असो. मुद्दा अर्थातच तो नाही, तर सेनेच्या पिचचा आहे. रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणाला रंग चढेपर्यंत सेना मराठीच्याच पिचवर खेळली. त्यावर अजूनही त्यांचीच मालकी आहे, असा त्यांचा दावा आहे, पण स्वत: बाळासाहेबांनी मुलाखत दिली ती मात्र इंग्रजी वाहिनीला, तीसुद्धा इंग्रजीत. ही मुलाखतही त्यांनी मराठी दूरचित्रवाणी वाहिनीला दिली असती, तर आपल्या पिचशी इमान राखले, असे म्हणता आले असते; पण आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांत घालून मराठी टिकवण्याचे आव्हान केले जाण्याच्या काळात, अशी अपेक्षाही करणे चूक आहे. ठाकरे यांचे नातू कविता करतात, त्याही इंग्रजीत. तेव्हा त्यालाही त्या मराठीत कर, असे ठाकरे आजोबांनी सांगायला हवे होते. कदाचित मराठीप्रेमी सेनानेत्याला- पत्रकाराला त्या कवितांचा अनुवाद करून मातोo्रीप्रति निष्ठा व्यक्त करण्याची संधी मिळावी, या उदात्त हेतूने त्या कविता इंग्रजीत लिहिल्या गेल्या असतील, पण मुद्दा अर्थातच तो नाही, तर खुद्द सेनेनेच पिच कसे सोडले, हा आहे. रामजन्मभूमी वादाला तोंड फुटल्यानंतर सेना हिंदुत्वाच्या पिचवरून खेळू लागली, त्या वेळी मराठीचे पिच सुटल्याची आठवण सेनाप्रमुखांनी कार्याध्यक्षांना करून द्यायला हवी होती. दरम्यान सेनेकडून सुटलेले मराठीचे पिच सेनाप्रमुखांच्या पुतण्यानेच बळकावले. ते लक्षात आल्यावर सेनेने पुन्हा मराठीच्या पिचवर यायचा प्रयत्न सुरू केला आहे, पण या गडबडीत सेना धावचीतच होते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. तेव्हा पक्षप्रमुख म्हणून बाळासाहेबांनाच पुन्हा बॅट हाती धरून मैदानात यावे लागले. आता हे पिच नक्की कोणाचे? बाळासाहेबांच्या सेनेचे की त्यांच्या पुतण्याच्या मनसेचे, यावर सुरू असलेली धाव अद्याप पूर्ण झालेली नाही. तेव्हा तो निर्णय लागायचाय. दरम्यान सेना ‘मराठी’ आणि ‘हिंदुत्व’ या दोन्ही पिचेसवर खेळू लागली आहे. त्यामुळे गोची झाली आहे ती सेनेचा भिडू असलेल्या भाजपची. मुळात भाजपचे अध्यक्ष नितीनभाऊ गडकरी यांना धावपळ तशी कमीच जमते. गडी बैठकीचा. दोन घास खावे-खिलवावेत या वृत्तीचा. त्यामुळे सेनेची ही दोन पिचवरची कसरत त्यांना काही झेपणारी नाही. या मराठीच्या पिचवर खेळणाऱ्याला जवळ करावे तर हिंदी भाषक दूर जातात. त्यांना जवळ आणायचा प्रयत्न करावा तर ही कथित मराठीप्रेमी सेना आड येते, अशी त्यांची अडचण. त्यामुळे सेनेने एकाच कोणत्या तरी पिचवर खेळावे, असे भाजपलाही वाटू लागले आहे. सेनेनेच आपला हात सोडला तर बरे, असे भाजपवाले खासगीत बोलतात. घटस्फोटाचे पातक त्यांना आपल्या माथी नको असावे, पण त्यांना हेही माहीत आहे की, घटस्फोट व्हायचाच असेल तर तो आता होणार नाही. पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालावर आपला संसार अवलंबून आहे, याची जाणीव त्यांना आहेच. त्यामुळे ते काही स्वत:हून दुसऱ्या पिचवर जाण्याच्या मन:स्थितीत नाहीत.याच मुलाखतीत सेनाप्रमुखांनी राजकारणात कोणीही कायमचा मित्र अथवा शत्रू नसतो, असे चिरंतन सत्य नमूद केले. वास्तविक त्याची गरज नव्हती. सेनेचे आतापर्यंतचे राजकारण पाहिले तरी याची जाणीव होईल. विश्वनाथ प्रताप सिंग, जॉर्ज फर्नाडिस, शरद जोशी अशा अनेकांच्या वेगवेगळय़ा पिचेसवर सेना आतापर्यंत खेळून गेली आहे. वसंतराव नाईक मुख्यमंत्री असतानाच्या काळात तर या पक्षाचे ‘वसंतसेना’ असे टोपणनावच पडले होते. त्यामुळे राजकारणातल्या घरोब्यांना काळाची, विचारांची मर्यादा नसते, याची मराठीजनांना जाणीव आहेच. सेनाप्रमुखांनी ती नव्याने करून दिल्यामुळे झालीच तर भाजपचीच पंचाईत होईल. त्याही पक्षात गोंधळलेल्या सेनेबरोबरचा संग चालू ठेवायचा का, असा प्रश्न एकमेकांतच विचारला जात आहे. त्याचे उत्तर नागपूरहून अद्याप आले नसल्याने भाजप नेत्यांचीही पंचाईत होत असावी बहुधा. तसे ते आले नाही तर या जुन्याजाणत्या भिडूला घेऊनच त्यांना पुढच्या वर्षांच्या महानगरपालिकांच्या निवडणुका लढवण्याची वेळ येणार आहे. यामुळेही भाजपच्या पोटात गोळा आला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भाजपलाही नवा भिडू नको आहे, असे नाही. मध्यंतरी काही भाजप नेत्यांनी मातोo्रीच्याच पिचवर तयार झालेले राज ठाकरे यांच्याकडे पाहून नेत्रपल्लवी केली, पण त्यांनी काही प्रतिसाद दिला नाही. दुसरीकडे सेनाही नवनव्या भिडूच्या शोधात होतीच. आता त्यांना रामदास आठवले हेही भिडू म्हणून हवे आहेत. इतके दिवस राष्ट्रवादीच्या पिचवर उभे राहून मंत्रीपदाची बॅटिंग वगैरे करायला मिळेल, या आशेवर असलेल्या रामदास आठवले यांना शरद पवार यांनी हिंग लावून विचारले नाही. राष्ट्रवादीच्या संघातून खेळताना त्यांच्या वाटय़ाला ‘राखीव’ खेळाडूचीच भूमिका आली. बॅटिंग करायला काही मिळाली नाही. शेवटी ते तरी किती दिवस मैदानात पाणी घेऊन जाणार? त्यामुळे दलितांवर राष्ट्रवादीने अन्याय केल्याचे तुणतुणे वाजवत तेही दुसऱ्या कोणत्या तरी पिचच्या शोधातच होते. त्यांना नव्या भिडूच्या शोधात असलेले सेनावाले दिसले. रामदासजींनी लगेच उडी मारून पिचवर धाव घेतली. साडेतीन टक्केवाल्यांची उपमा द्यायची तर एकादशीकडे महाशिवरात्र जावी तसेच हे झाले म्हणायचे. नवे पिच सापडल्याच्या आनंदात सगळेच असताना या प्रश्नावरही सेनेने किती कोलांटउडय़ा मारल्या होत्या तेही सगळे विसरले. दशकभरापूर्वीच कोणत्याही परिस्थितीत नामांतर होऊ देणार नाही, असे म्हणणारे सेनाप्रमुख अचानक रामदासप्रेमी कसे झाले? हे पिच कसे काय बदलले गेले? याचेही उत्तर सेनेने दिले असते तर बरे झाले असते. या मुलाखतीत ठाकरे असेही म्हणाले की, सचिन खिशातले काढून काही देत नाही. आपल्या बॅटचा, टी-शर्टचा लिलाव करून तो पैसे मिळवतो आणि ते तो दान करतो, असे त्यांचे म्हणणे आहे. सचिनने कसे पैसे द्यावेत आणि द्यावेत की नाही, हा त्याचा प्रश्न झाला, पण सेनाप्रमुखांना जवळच्या असणाऱ्या लतादीदी मंगेशकर तरी काय आपल्या पदरचे पैसे देतात काय? आपल्या वडिलांच्या नावे रुग्णालय उभारण्यासाठी त्यांनी गाणे म्हणूनच पैसे कमावले. तेव्हा त्यांची कृती ही दानशूरतेची आहे, असे म्हणावे काय? इतरांना पिच सोडू नये, असा सल्ला दिल्यामुळे हे मुद्दे उपस्थित झाले, इतकेच.

दादर स्थानकाचे नामांतर - स्वार्थी राजकारणी खेळी

स्वताच्या स्वार्थी राजकारणा करिता दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारी आणि त्यातून खरं म्हणजे काहीही साध्य न होणारी अशी ही नामांतराची खेळी आहे. हा निव्वळ मुर्खपणा आहे. आता ह्याला विरोध केला म्हणून कोणी आमची दलित विरोधी अशी संभावना करतील पण त्यात काही तथ्य नाही. एखाद्या स्थानकाचं नाव बदललं म्हणून एखाद्या समाजाचा विकास होणार नाही. आपण असल्या बुरसट कल्पनाच्या जेवढ्या लवकर बाहेर येऊ तेवढंच आपल्या प्रगती करता बर आहे. दलित समाज ह्याचा जरूर विचार करेल अशी आशा बाळगतो.

खालील बातमी लोकसत्ता च्या सौजन्याने .....

नामांतराला विरोधच- राज ठाकरे
आपला कोणत्याही नामांतराला विरोधच आहे. ब्रिटिशांनी ठेवलेली नावे बदलण्यास आपला विरोध नाही. त्यामुळे व्ही.टी.चे नामांतर छत्रपती शिवाजी टर्मिनस करण्यात आले ते योग्य आहे. मात्र सातत्याने अशा प्रकारे नामांतर करण्याचा काहीच उपयोग नाही. त्यामधून काहीच निष्पन्न होत नाही. केवळ राजकीय स्वार्थासाठी महापुरुषांची नावे विविध ठिकाणांना देण्यात काहीच अर्थ नाही, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

Thursday, May 26, 2011

महापौरांची दुकानदारी ‘स्टार माझा’मुळे बंद

खालील बातमी स्टार माझा च्या सौजन्याने .......



बीएमसी शाळांची महापौर श्रद्धा जाधव यांनी केलेली दुकानदारी स्टार माझानं दाखवल्यानंतर प्रशासनाला जाग आली. आता महापौरांकडून ही शाळा काढून घेण्यात आली आणि या शाळेच्या गैरवापरावर लगाम घालण्याचे आदेश देण्यात आलेत. विशेष म्हणजे शाळेतले सगळे डेकोरेशनचे सामान बीएमसीने ताब्यात घेतले आहे.
मुंबईच्या महापौरांकडून बीएमसीची जी.डी.आंबेकर शाळा महापौरांनी शैक्षणिक उपक्रमासाठी घेतली होती. पण या शाळेत श्रद्धा जाधव यांच्या पतीने डेकोरेशनच्या बिझनेसचं सामानं भरलं. स्टार माझानं याचा पर्दाफाश केल्यानंतर आता बीएमसीने ही शाळा महापौरांच्या ताब्यातून काढून घेण्याचे आदेश दिले आहे.
श्रद्धा जाधव यांच्या सासऱ्याच्या नावावर असलेल्या ट्रस्टला ही शाळा देण्यात आली होती. मात्र गेल्या पाच वर्षात शाळेत एकदाही वर्ग भरला नाही. आता बीएमसीच्या कारवाईनंतर सेकंड ऑक्टोबर या शाळेकडे आंबेकर शाळेचं नियंत्रण असणार आहे.

मराठी शाळा जगल्या पाहिजेत असा गळा काढणाऱ्या शिवसेनेच्या घरातच अंधार आहे. कारण स्वत: महापौरांनीच मराठी शाळेचे गोडाऊन केले आहे. शिवसेना मराठीच्या नावाखाली फक्त राजकारण करते का असा प्रश्न सर्वसामान्य विचारत आहेत. बीएमसीच्या कारवाईनंतर तरी आंबेकर शाळेत वर्ग भरतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

महापौरांच्या मनमानी कारभाराची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे मनसेची तक्रार

खालील लेख लोकसत्ता च्या सौजन्याने ......



कल्याण-डोंबिवली पालिकेचा चालू वर्षीचा ठेका देताना पीठासीन अधिकारी म्हणून महापौर वैजयंती गुजर यांनी मनमानी केली आहे. शासनाची जकातविषयक असलेली मार्गदर्शक तत्त्वे दुर्लक्षित केली आहेत. जकात ठेका वाढून द्यावा, अशी मागणी काही नगरसेवकांनी महासभेत करूनही पीठासीन अधिकाऱ्यांनी सर्वानुमते हा ठराव मंजूर असे म्हणून सभागृहाची दिशाभूल केली आहे. जकात ठेका देताना पालिकेचे सुमारे २५ कोटींचे नुकसान करण्यात आले आहे. त्यामुळे महापौरांच्या मनमानी कारभाराची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी मनसेच्या विधी विभागाचे प्रमुख अ‍ॅड. सुहास तेलंग यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक यांच्याकडे केली आहे.
मंदी, जवाहरलाल नेहरू अभियानातील कामे आणि नैसर्गिक वाढीतून पालिकेला एकूण सुमारे १४७ कोटींहून अधिक जकातीच्या माध्यमातून महसूल मिळाला असता. पण शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा विचार न करता केवळ एका विशिष्ट जकात वसुली ठेकेदाराला सहानुभुती दाखविण्यासाठी मनमानी करून महासभेतील मताचा विचार न करता पीठासीन अधिकाऱ्यांनी पालिकेचे आर्थिक नुकसान केले आहे. जकात ठेका देताना पारदर्शक व्यवहार व्हावा यासाठी शासनाने मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत. त्याचाही विचार करण्यात आला नाही. पंधरा टक्के नैसर्गिक वाढ गृहीत धरून १२३ कोटींचा ठेका देण्यात येणार आहे. मनसेचे नगरसेवक मंदार हळबे, मनोज घरत, काँग्रेसचे नवीन सिंग, आघाडीचे बाळ हरदास या सर्वानी १४० कोटींहून अधिक रकमेचा जकात ठेका देण्याची मागणी महासभेत केली, पण ती डावलण्यात आली, असे अ‍ॅड. तेलंग निवेदनात म्हटले आहे.
पालिकेचे आर्थिक नुकसान केल्याने या प्रकरणाची चौकशी करून पीठासीन अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी अ‍ॅड. तेलंग यांनी केली आहे.
गेल्या दहा वर्षांत जकात ठेका हा नेहमीच कळीचा आणि वादाचा विषय झाला आहे. यापूर्वी माजी नगरसेवक स्व. नंदकिशोर जोशी, त्यानंतर माजी नगरसेविका स्टेला मोराईस जकात या विषयावर पालिकेला सळो की पळो करून सोडत असत. आता त्याच पावलावर पाऊल ठेवून मनसेने, काँग्रेस आघाडीतील काही नगरसेवकांनी प्रशासनाला जकात विषयावर दे माय धरणी ठाय करून सोडण्याचा निर्णय घेतला आहे. बाळ हरदास यांनी याप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी केली आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे ठेकेदारांना आपल्या केबिनपर्यंत पोहोचू देत नसल्याने जकात ठेकेदाराची चांगलीच गोची होणार असल्याची पालिकेत चर्चा आहे.
महापौर वैजयंती गुजर यांनी मात्र जे कायद्याने करता येते तेच महासभेने केले आहे. कोणतीही मनमानी याप्रकरणी झालेली नाही. शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा आधार घेऊन ठेका देण्याचा ठराव करण्यात आला आहे. या ठरावावर सर्व पदाधिकाऱ्यांच्या सह्य़ा आहेत. त्यामुळे मनमानी करण्याचा प्रश्नच येत नाही. पालिकेच्या हिताचा विचार करून घेतलेल्या निर्णयासाठी आपण कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहोत, असे म्हटले आहे.

Saturday, May 7, 2011

गडकरी, तुम्ही सुद्धा ????

आज सकाळी गडकरी, आठवलेंना भेटले तेव्हा पत्रकारांनी त्यांना राज पुरोहित प्रकरणी विचारणा केली तेव्हा ते म्हणाले नो कॉमेंट्स ....... गडकरी, तुमच्या कडून हि अपेक्षा नव्हती. आम्ही तुम्हाला एक कर्तबगार नेता मानतो आणि तुमचं युती सरकार असताना केलेलं योगदान विसरू शकत नाही पण तुम्ही ह्या विषयावर न बोलून तुम्ही आमचा भ्रम निरास केला. तुम्ही आमच्या मनातून उतरलात, राव.

हि जनता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात असू द्या.

जय महाराष्ट्र !!!

Friday, May 6, 2011

राज पुरोहितांच्या अकलेचे दिवाळे

हा माकड काय काय बोलला, बघा !!!

काल स्टार माझा वर बोलताना ह्याला लाज पण वाटली नाही ... सारखं म्हणत होता मला काही माहित नाही .. कोण मुलगी .. कुठला वी डी ओ ... मला कोणी तरी सांगितलं म्हणून मी हा विषय बोललो ... मी असं बोललोच नाही ....

नालायका हा तर धडधडीत पुरावा आहे ... तू तर छाती ठोकून सांगतो आहेस कि असं काही झालंच नाही ... षडयंत्र आहे ... आणि तू तर असं देखील बरळ लास कि रेड लाईट एरिया मधील बाई देखील पुरुषाला लघु शंका करताना पाहणार नाही .....

अरे गाढवा काय बोलतो ते तरी कळतय का तुला .... एक तर अंकिता नि ह्या घाणेरड्या लोकांची पोल खोलली आणि तू त्या शूर मुलीचं अभिनंदन करायचं सोडून फालतू बडबड केली .... माहित नव्हतं तर गप्पं बसायचं होतं. आम्ही तुला असच थोडी सोडणार .......

आता बघुया गडकरी महाशय काय करताय ते .............................

सगळे बी जे पी वाले मुग गिळून बसले आहेत, अरे बाहेर या आणि निषेध तरी करा (तुमच्या कडून कानफटात मारायची अपेक्षा आम्ही करत नाही)


खालील वी डी ओ स्टार माझा च्या सौजन्याने .....



Thursday, May 5, 2011

जिगरबाज मुलीवर पुरोहितांचे शिंतोडे

खालील लेख म टा च्या सौजन्याने .........




तांब्यात लघुशंका करणा-या ठाण्यातील पाणीपुरीवाल्याचे शुटिंग करून खळबळ उडवून देणा-या अंकिता राणे या जिगरबाज मुलीचे कौतुक करायचे सोडून, मुंबई भाजपचे अध्यक्ष राज पुरोहित यांनी तिच्या चारित्र्यावरच शिंतोडे उडवले आहेत. हे करताना तिला शरम नाही का वाटली, असा सवाल करून फेरीवाल्यांच्या टाळ्या मिळवणा-या पुरोहित यांच्या बेतालपणावर मनसेने जोरदार हल्ला चढवला आहे.

मुंबईतील आझाद मैदानावर झालेल्या फेरीवाल्यांच्या सभेत राज पुरोहित यांनी अकलेचे तारे तोडले. ठाण्यातील पाणीपुरीवाल्याच्या घटनेचा संदर्भ देत ते म्हणाले, की' चांगली मुलगी एवढ्या मोठ्या माणसाला लघुशंका करताना पाहिल का ? या मुलीने नुसते पाहिले नाही, तर त्याचे शुटिंगही केले. हे करताना तिला शरम नाही का वाटली? यावरूनच तिच्या चारित्र्याची कल्पना येते. हे शुटिंग म्हणजे मुंबईत मेहनत करणा-यांविरुद्धचा डाव आहे. '

ठाण्यातील पाणीपुरीवाल्या भय्याचा व्हिडिओ पाहिल्यानंतर केवळ शहरातच नव्हे, तर देशभर पाणीपुरीवाल्यांविरोधात वातावरण तयार झाले. त्यांच्या स्वच्छतेविषयी चर्चा होऊ लागली. मनसेसारख्या राजकीय पक्षांनी तर त्याविरोधात आंदोलनही उभारले. पण मुंबईत असलेले बहुसंख्य पाणीपुरीवाले हे उत्तर भारतीय असल्याने, त्याचा राजकीय फायदा घेण्यासाठीही प्रयत्न सुरू झाला.

काँग्रेसचे खासदार संजय निरुपम यांनी तर पाणीपुरीवाल्यांसाठी कार्यशाळा आयोजित केली. त्यांनी असे केल्यानंतर भाजपने आपली पोळी भाजून घेण्यासाठी पुढले पाऊल उचलले आणि थेट अंकिता राणेच्या चारित्र्यावरच हल्ला केला. भर सभेत राज पुरोहित यांनी केलेल्या या हल्ल्यामुळे पाणीपुरीवाल्यांच्या टाळ्या पडल्या असल्या तरी मनसेने मात्र अंकिताची बाजू उचलून धरत, पुरोहित यांच्याविरूद्ध लाखोल्या व्हायला सुरुवात केली आहे.

अंकिता राणे हिनेही पुरोहित यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला असून, त्याविरोधात तक्रारही नोंदवली आहे. भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षाच्या मुंबई अध्यक्षाने असे बोलावे हा प्रकार निंदनीय असून, त्याबद्दल पुरोहित यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणीही तिने केली आहे.

मनसेच्या महिला विभागाच्या अध्यक्षा शालिनी ठाकरे यांनी तर पुरोहित यांना तात्काळ अटक करा अशी मागणी केली आहे. त्या म्हणाल्या, की आज एकीकडे या देशात स्त्रियांना राजकीय आरक्षण दिलं जात आहे , तर दुसरीकडे राज पुरोहित यांच्यासारखे राजकीय नेते स्त्रियांच्या अब्रूचे धिंडवडे काढत आहेत. पुरोहित यांची वक्तव्ये सर्वच महिलांना संतापजनक वाटत असून त्यांना त्यांच्या या गुन्ह्यासाठी तत्काळ अटक व्हायलाच हवी.

Wednesday, May 4, 2011

पुरोहित, लाज वाटली पाहिजे तुम्हाला !

आजचा नवाकाळ वाचा म्हणजे पुरोहितांनी काय अकलेचे तारे तोडलेत ते कळेल. पुरोहित (मुंबई भाजपा चे अध्यक्ष्य आहेत हे महाशय) फेरीवाला संघटनेच्या कार्यक्रमात बोलताना म्हणाले कि पुरुष लघुशंका करताना कुठलीही महिला तिकडे बघत नाही आणि अंकिता राणे ने तर त्याचा चित्रीकरण केला म्हणजे त्या मुलीचा चारित्र्य बघा. एक तर तो भैया राजरोसपणे हा नालायकपणा करत होता , त्याला दोष देण्या ऐवजी तो अंकिता ला दोष देतो हा निर्लज्ज पण नाही काय ????? ह्या माकडाला त्या पाणी पुरी वाल्याकडून पाणी पुरी खाऊ घातली पाहिजे. आता हा तर येईलच आमच्या तडाख्यात ......

आपला विनोद

Monday, May 2, 2011

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

तमाम महाराष्ट्रवासियांना "मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा" तर्फे महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा .....