दादर स्टेशनचे नाव चैतभूमी करावे, हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोध केला आहे. थोर पुरूषांच्या नावाचं गलिच्छ राजकारण राष्ट्रवादीने करू नये, राष्ट्रवादीमध्ये खुमखुमी असेल तर त्यांनी चलनी नोटेवर महात्मा गांधी ऐवजी बाबासाहेबांचा फोटो आणण्यासाठी आग्रही असावे, असा टोलाही यावेळी लगावला.
राष्ट्रपुरूषांना आपण इतकं छोटे का करतो, एखाद्या गल्लीला, रस्त्याला किंवा रेल्वे स्टेशला नाव देऊन त्या व्यक्तीचं महात्म्य आपण कमी का करतो. बाबासाहेबांसारखे इतके मोठे व्यक्तीमत्व आणि त्याचे नाव दादर स्टेशनला देणे ही दुर्दैवाची गोष्ट आहे. असे प्रकार माझ्या आजोबांच्या (प्रबोधनकार ठाकरे) बाबत झाले तर त्यालाही माझा विरोध असेल, असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. आज राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.

महाराष्ट्रातील राजकारणी परदेशात जातात, त्यांनी लिंकन मेमोरिअल पाहिले आहे का. अशा प्रकारचे काम छत्रपती शिवाजी महाराज किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत झाले आहे का? दिसला रस्ता दिले नाव आणि घातला वाद, हेच घाणेरडे राजकारण इथं सुरू आहे.
राष्ट्रवादीला इतकी खुमखुमी असेल तर त्यांनी चलनी नोटांवर महात्मा गांधींचा फोटो आहे, तेथेच किमान पाचशेच्या नोटेवर बाबासाहेबांचा फोटो आणण्यासाठी प्रयत्न करावा. महाराष्ट्रात राष्ट्रवादीची सत्ता आहे. ते केंद्रातही सत्ते सामिल आहेत. त्यावेळी राष्ट्रवादीच्या खासदारांनी ही मागणी करावी, असे आव्हान राज ठाकरे यांनी यावेळी केले.
व्हीटी स्टेशनचे नाव छत्रपती शिवाजी टर्मिनस झाले. पण तेथे काय सुविधा आहे. मराठवाडा विद्यापीठाचे नाव बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ झाले. पण काय तेथील शिक्षणपद्धती बदलली काय? राष्ट्रवादीचं आरपीआयशी बिघडलं तर हे फालतू राजकारण ते करीत आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या कोणत्याही नामांतराला माझ्या पक्षाचा विरोध आहे. माझी भूमिका स्पष्ट आहे, यात कुठल्याही महापुरूषाचा संबंध येत नाही. अशा प्रकारे राजकारण करण्याची भूमिका घाणेरडी असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केल.
आंबेडकरांनी काय लिहून ठेवले, ते आचरणात आणण्यापेक्षा नामांतर करण्याचे घाणेरडे राजकारण केले जात आहे. रामदास आठवलेंचं काय तर आम्हांला सत्तेचा वाटा मिळाला नाही म्हणून आम्ही इकडे आलो आहोत. पण, मूळ प्रश्न आहे. दलित बांधव आहे तिथेच आहे. माझ्या मागे दलित बांधव आहे. त्यामुळे माझा व्यक्तीला विरोध नाही, तर राजकारण करणाऱ्या प्रवृत्तीला विरोध आहे.
No comments:
Post a Comment