स्वताच्या स्वार्थी राजकारणा करिता दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारी आणि त्यातून खरं म्हणजे काहीही साध्य न होणारी अशी ही नामांतराची खेळी आहे. हा निव्वळ मुर्खपणा आहे. आता ह्याला विरोध केला म्हणून कोणी आमची दलित विरोधी अशी संभावना करतील पण त्यात काही तथ्य नाही. एखाद्या स्थानकाचं नाव बदललं म्हणून एखाद्या समाजाचा विकास होणार नाही. आपण असल्या बुरसट कल्पनाच्या जेवढ्या लवकर बाहेर येऊ तेवढंच आपल्या प्रगती करता बर आहे. दलित समाज ह्याचा जरूर विचार करेल अशी आशा बाळगतो.
खालील बातमी लोकसत्ता च्या सौजन्याने .....
नामांतराला विरोधच- राज ठाकरे
आपला कोणत्याही नामांतराला विरोधच आहे. ब्रिटिशांनी ठेवलेली नावे बदलण्यास आपला विरोध नाही. त्यामुळे व्ही.टी.चे नामांतर छत्रपती शिवाजी टर्मिनस करण्यात आले ते योग्य आहे. मात्र सातत्याने अशा प्रकारे नामांतर करण्याचा काहीच उपयोग नाही. त्यामधून काहीच निष्पन्न होत नाही. केवळ राजकीय स्वार्थासाठी महापुरुषांची नावे विविध ठिकाणांना देण्यात काहीच अर्थ नाही, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
No comments:
Post a Comment