Friday, February 18, 2011

फडके मैदानात मुक्तीचे वारे

कल्याण मधील मनसेचे आमदार श्री प्रकाश भोईर ह्यांच्या आमदार निधीतून फडके मैदानाचा काया पालट होणार आहे ... अतिशय स्तुत्य उपक्रम ......

खालील बातमी म टा च्या सौजन्याने ..................



कल्याणमधील आधारवाडी येथील आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके मैदानाचा घास घेऊन तिथे मॉल उभारण्याचा प्रस्ताव अखेर बारगळला आहे. मैदानात मॉल होऊ नये यासाठी अनेकांनी विरोध दर्शविल्याने मागील तीन वर्षांपासून त्याचे काम सुरू होऊ शकले नव्हते. अखेर आमदारनिधीतून या मैदानाचा विकास होणार असून येत्या आठवडाभरात शहरातील मान्यवरांच्या उपस्थितीत या मैदान विकासाच्या कामाचा शुभारंभ होत आहे.

शहरातील मैदानांची संख्या घटणारी संख्या पाहता नव्याने मैदाने करण्याची नितांत आवश्यकता आहे. मात्र केडीएमसीने त्याउलट भूमिका घेत डोंबिवली व कल्याणमधील मैदानेच मॉलसाठी देऊन टाकली. सामान्य जनतेने या प्रकल्पांना तीव्र विरोध केला. डोंबिवलीतील मॉल थोपवणे कोणालाही शक्य झाले नसले तरी कल्याणमधील वासुदेव बळवंत फडके मैदानातील मॉलचे काम सुरू झाले नव्हते. अखेर हा मॉलचा प्रस्तावच गुंडाळला जाणार असून या मैदानाचा कायापालट आमदारांच्या विकासनिधीतून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आमदार प्रकाश भोईर यांनी कामाची सुरुवात करण्यासाठी १० लाख रुपये निधी देताच शहरातील अन्य दानशूर व्यक्ती आणि मैदानाच्या पाठीराख्यांनी त्यांना या प्रकल्पात निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन दिले आहे. येत्या आठवडाभरात शहरातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मैदानाच्या विकासाच्या कामाचा शुभारंभ होणार असल्याचे भोईर यांनी सांगितले. सध्या या मैदानात पाणीपुरवठ्याच्या भल्यामोठ्या पाइपने अडथळा निर्माण केला असून ट्रक आणि अन्य वाहनांसाठी ती पाकिर्ंगची जागा ठरली आहे. ही अवस्था तातडीने पालटावी यासाठी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Wednesday, February 16, 2011

'युती'च्या भांडणात 'मनसे'ला कशाला ओढता? - राज

खालील लेख म टा च्या सौजन्याने .......................


मुंडे काहीतरी बोलतात, त्यावर बाळासाहेब उत्तर देतात, यात आमचा काय संबंध ? आम्ही गेलोय का सेना-भाजपला सांगायला की आम्हाला घ्या म्हणून ... तुम्हा दोघांच्या भांडणात आम्हाला का ओढता ?अशा शब्दात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेले दोन दिवस चाललेल्या ' राज ' कारणावरून आपले हात झटकले.

मनसेशी युतीचा विचार होऊ शकतो या गोपीनाथ मुंडे यांच्या विधानाचे सर्वत्र पडसाद उमटले. शिवसेना-भाजप युतीत 'तिसरा' कुणीही येऊ शकतो, चमत्कार घडू शकतो, असे मुंडे म्हणाले होते. त्यावर बाळासाहेबांनी मुंडे आणि राज या दोघांचाही चांगलाच समाचार घेतला होता.

मुंडे यांनी या आधीही अशा प्रकारची विधाने केली होती. पण आम्हाला याची आवश्यकता नाही. लोक मनसेच्या पाठीशी आहेत. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीसह मागील अनेक निवडणुकीत हे सिद्ध झालेय. त्यामुळे आम्ही कशाला कोणाकडे जाऊ ? आमचे ' एकला चलो रे ' सुरूच राहील, असे राज यांनी ठणकावून सांगितले.

मंगळवारी शिवसेनेच्या मुखपत्रात बाळासाहेबांनी महाराष्ट्रातील प्रश्नांवर शिवसेना-भाजप युती हाच रामबाण उपाय असून दुस-या कुठल्याही उपायाची गरज नाही, असे बजावले होते. उगाच तिसरा 'झंडू बाम'ही खिशात ठेवून फिरण्याची गरज नाही. ही तिस-या 'बाम'ची बाटली सध्या तुम्ही तुमच्या खिशातच ठेवा, असा टोलाही त्यांनी लगावला होता.

त्या संदर्भात राज यांनी ठाकरे शैलीत पलटवार केला असून ते म्हणाले की, हे पाहा ती त्यांची डोकेदुखी आहे. त्यांचे डोके दुखतंय तर कोणी कोणाच्या डोक्याला बाम चोळायचा ते त्यांनी ठरवावे.

Tuesday, February 15, 2011

कल्याणपाठोपाठ डोंबिवलीचे मच्छिमार्केटही सुधारणार!

खालील बातमी म टा च्या सौजन्याने



दुरवस्थेच्या फे-यात अडकलेला कल्याणमधील मच्छी माकेर्टचा कायापालट करण्यासाठी राज्य मत्स्योद्योग महामंडळाने एक कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले असतानाच, आता डोंबिवली पश्चिमेकडील स्टेशन परिसरातील मच्छिमार्केटचाही पुनर्विकास केला जाणार आहे. यासंबंधीचा प्रस्ताव २८ फेब्रुवारीला होणाऱ्या महासभेत सादर होत आहे.

डोंबिवली पश्चिमेला स्टेशन परिसरात असणाऱ्या या मच्छिमाकेर्टमध्ये साध्या प्राथमिक दर्जाच्या सुविधांचाही अभाव असल्याने त्याला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. या स्थितीकडे मनसेचे नगरसेवक अमित सुलाखे यांनी पालिका प्रशासनाचे लक्ष वेधत माकेर्टचा पुनविर्कास करण्याची मागणी आयुक्त रामनाथ सोनवणे यांच्याकडे केली होती. त्यानुसार पालिका आयुक्तांनी गेल्या शनिवारी मच्छिमाकेर्टची पाहणी केली.

मच्छिमाकेर्टची दुरवस्था पाहता त्याचा पुनविर्कास करण्याची आवश्यकता असल्याचेे प्रशासनानेही मान्य केले. सोनवणे यांच्या आदेशानुसार पालिकेच्या बांधकाम विभागातफेर् सुधारणेचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. मच्छिमाकेर्टची जागा सुमारे एक हजार चौरस मीटर असून या माकेर्टचा पुनविर्कास करताना तळमजल्यावर मच्छी आणि मटण माकेर्ट असेल. तर पहिल्या मजल्यावर एक हॉल तयार करण्यात येणार आहे. यात कँटीन आणि मच्छिविक्रेत्यांसाठी गोदामाची सोय उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे. या प्रकल्पावर सुमारे एक कोटी ६९ लाखंाचा खर्च अपेक्षित असून त्यांसदर्भातील प्रस्ताव पुढील महासभेपुढे ठेवण्यात येत असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

मनसे 'फॉर्मा'त.. रेल्वेसाठी ट्रकभर अर्ज

खालील बातमी म टा च्या सौजन्याने .......





' रेल्वे इंजिन ' अशी निवडणूक निशाणी असलेल्या राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रेल्वे भरती मोहिमेत जोरदार मुसंडी मारली असून, आतापर्यंत मनसेकडे १ लाख ३८ हजार फॉर्मस् जमा झाले आहेत. राज्याच्या कानाकोप-यातून आलेल्या मराठी तरूणांच्या फॉर्मसचे गठ्ठे ' राजगडा ' वरून ट्रकमध्ये भरून रेल्वे ऑफिसमध्ये आज पाठवण्यात आले.

मनसेच्या माहीम येथील मुख्यालयात आतापर्यंत १ लाख ३८ हजार ११७ फॉर्मस् जमा झाले आहेत. ट्रकमध्ये भरून हे अर्ज रेल्वे भरती बोर्डाकडे पाठवण्यात येणार आहेत, अशी माहिती मनसेचे माहीमचे आमदार नितीन सरदेसाई यांनी आज दिली. या मोहीमेतून मनसेला किती फायदा होणार यापेक्षा राज्यातील मराठी तरूणांना किती फायदा होणार, हे जास्त महत्त्वाचे आहे. काही उमेदवारांनी डायरेक्ट अर्ज भरले आहेत, अजूनही अर्ज दाखल होत आहेत. साधारणपणे ५ लाखापर्यंत प्रतिसाद मिळेल, असे त्यांनी सांगितले.

यापूर्वी रेल्वेच्या परीक्षा व्हायच्या तेव्हा मराठी तरूणांना कळायचेच नाही. रेल्वे भरतीच्या जाहिराती मराठी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होत नव्हत्या. परंतु यावेळच्या भरतीच्या निमित्ताने मनसेने मोठी जनजागृती केली. योग्यवेळी मराठी तरूणांना कळवले. त्यामुळे आता भरतीमध्येही १०० टक्के मराठी माणसाला स्थान मिळेल, अशी अपेक्षा आ. सरदेसाई यांनी व्यक्त केली. मनसे फक्त आंदोलने न करता, निगेटिव काम न करता, रेल्वे भरतीसाठी मदत करण्याचे काम करत आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मनसेने राबवलेली ही मोहीम महत्त्वाची मानली जात आहे.

आधी राडा, आता मार्गदर्शन
दोन वर्षांपूर्वी रेल्वे भरतीसाठी उत्तर प्रदेश - बिहारमधून कल्याणमध्ये आलेल्या परीक्षार्थींना फटकावून मोठा ‘राडा’ करणा-या मनसेने आता मराठी तरुणांना रेल्वेत नोकरी लावण्यासाठी जोरदार मोहीम उघडली आहे. येत्या १५ फेब्रुवारीला रेल्वे भरती परीक्षेचा अर्ज भरा, असं आवाहन आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी तरुणांना केलं आणि राज्यभरातील कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचा आदेश दिला. त्यानुसार राज्यभरात मराठी तरूणांना मनसेच्या वतीने फॉर्म वाटप करण्यात आले. रेल्वे भरतीसंबंधी राज्यातील मराठी तरुणांना सविस्तर माहिती व्हावी, अर्ज भरताना त्यांना कुठल्याही अडचणी येऊ नयेत, सर्व निकषांची त्यांनी योग्य पूर्तता करावी, या उद्देशाने मनसेने राज्यव्यापी मोहीम हाती घेतली. होर्डिंग्ज आणि माहितीपुस्तिकेच्या माध्यमातून मनसे कार्यकर्त्यांनी इच्छुक तरुणांना रेल्वे भरतीसंबंधी मार्गदर्शन करणार आहेत.

रेल्वेतील नोक-यांमध्ये मराठी तरुणांना डावललं जातं, हा मुद्दा राज ठाकरे यांनी शिवसेनेत असतानाच उचलला होता. मनसेच्या स्थापनेनंतरही त्यांनी तो लावून धरला आणि त्यासाठी मनसैनिकांनी कल्याण रेल्वे स्टेशनवर ‘ राडा ’ ही केला. त्यावरून बरेच वाद झाले. राज यांची ही पद्धत योग्य नसल्याची टीका झाली आणि विधायक मार्गाने काहीतरी करा, असे टोमणे त्यांना मारण्यात आले. त्याला राज आणि मनसेनं आपल्या या कृतीतून उत्तर दिलं आहे.

राष्ट्रवादीच्या सरचिटणीसाने रचला गोळीबाराचा बनाव

काय आबा .... आता पाठवणार का बनकर ला कोठडीत???

खालील बातमी म टा च्या सौजन्याने


काही अज्ञात व्यक्तींनी आपल्यावर गोळीबार केल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस मिलिंद बनकर यांनी कोपरी पोलीस स्टेशनात दाखल केली असली तरी तो गोळीबार झालाच नव्हता, अशी माहिती पोलीस तपासातून पुढे येत आहे. बनकर यांना पोटावरील जखम ही गोळीबारामुळे झालेली नाही, असेही तपासात निष्पन्न झाले आहे. दरोड्याचा गुन्हा दाखल झालेले बनकर अटक टाळण्यासाठी हॉस्पिटलातच दाखल आहेत.

गेल्या आठवड्यात आनंदनगर चेक नाका येथील एका पीयूसी चालकाला मारहाण करून त्याच्याकडील पाच हजार रुपये लुटण्याचा आणि त्याची गाडी पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मिलिंद बनकर यांच्या विरोधात कोपरी पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल झाला आहे. बनकर हप्ता मागण्यासाठी आले होते. पैसे दिले नाही म्हणून त्यांनी मारहाण आणि गाडी पेटविण्याचा प्रयत्न केल्याची तक्रारदार सुनीलकुमार संतू प्रसाद यांनी केली आहे. हा प्रकार झाल्यानंतर मिलिंद बनकर सकाळी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. बनकर यांच्या पोटालाच जखम झाली असून ती जखम गोळीबारामुळे झाल्याची तक्रार बनकर यांनी पोलिसांकडे केली होती. मात्र, पोलिसांच्या तपासणी अहवालात ही जखम गोळीबाराची नाही, असे निष्पन्न झाले आहे. तसेच, गोळीबार झाल्याचे सांगणाऱ्या बनकर यांचा शर्ट जसाच्या तसा आहे. शर्टला न लागताच ती गोळी बनकर यांच्या पोटाला कशी चाटून गेली असा सवालही एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने उपस्थित केला आहे.

दरोड्याच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी बनकर यांची धडपड सुरू असून सोमवारी कोर्टाने त्याबाबतचे कोणतेही निदेर्श पोलिसांना दिलेले नाहीत. बनकर हॉस्पिटलात दाखल असल्याने त्यांना अटक करता येत नसल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय पवार यांनी सांगितले. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका बड्या नेत्याच्या दबावामुळे बनकर यांच्यावर कारवाई होत नसल्याची चर्चा शहरात आहे.

मनसेचा ठाणे मनपावर धडक मोर्चा

प्रशासनाने परिवहन सेवेतील चोऱ्या थांबवाव्या मग गरज पडेल तर भाववाढ करावी ..... सरळ भाववाढ म्हणजे "जखम डोक्याला आणि औषध पायाला" असा प्रकार आहे ......

खालील बातमी म टा च्या सौजन्याने .......



ठाणे महापालिकेच्या परिवहन उपक्रमाने प्रवासी भाड्यात केलेल्या प्रस्तावित भाडेवाढीला विरोध दर्शवत मनसेच्या रस्ते आस्थापना विभागातफेर् सोमवारी महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. भाडेवाढ रद्द न झाल्यास कोर्टात जाण्याचा इशाराही या वेळी देण्यात आला. परिवहन उपक्रमातील भ्रष्ट व गैर कारभारामुळे महापालिकेने वारंवार अनुदान दिल्यानंतरही उपक्रमाला भाडेवाढीची आवश्यकता भासत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

ठाणे महापालिकेच्या परिवहन उपक्रमात किमान १ रुपयापासून ते किमान साडेचार रुपये भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव सन २०११-१२ साठीच्या बजेटमध्ये ठेवण्यात आला आहे. या भाडेवाढीला विरोध दर्शविण्यासाठी मनसेच्या रस्ते व आस्थापना विभागातफेर् सोमवारी महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मनसेचे रस्ते आस्थापना विभागाचे उपजिल्हा संघटक अॅड. समीर देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे पूवेर्कडील कोपरी बसस्थानक येथून जांभळी नाका, दगडी शाळामागेर् महापालिका मुख्यालयावर हा मोर्चा धडकला.

परिवहन उपक्रमातील गैर व्यवस्थापनामुळे आतापर्यंत ५८ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. तो वर्षागणिक वाढत आहे. उपक्रमाचा कारभार सुरळीत रहावा यासाठी पालिकेकडे ११ कोटी रुपयांचे अनुदान मागण्यात आले आहे. त्यानंतरही तोटा भरून निघावा यासाठी परिवहन सेवेत भाडेवाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या भाडेवाढीतून अंदाजे २६ कोटींचे उत्पन्न अपेक्षित असून वाढ न झाल्यास उपक्रमाचा डोलारा कोसळण्याची भीती प्रशासनाने व्यक्त केली आहे.

या भाडेवाढीला विरोध करताना मनसेच्या शिष्टमंडळाने परिवहन सेवेच्या बसेस पूर्ण क्षमतेने चालविल्या जात नसल्याचा आरोप केला. लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली नवे बसमार्ग सुरू करून ते तोट्यात चालविण्यापेक्षा प्रवाशांच्या गरजेनुसार फायद्यात चालणाऱ्या मार्गांवरच सेवा द्यावी, अशी मागणी अॅड. देशपांडे यांनी पालिका आयुक्त आर. राजीव यांच्याकडे केली. तसेच, अनेक बसेसवरचा इलेक्ट्रॉनिक फलक बंद पडल्याने प्रवाशांना बस नेमकी कोठे जाणार आहे, हे समजत नाही याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. पालिकेने कारभारात सुधारणा न केल्यास भाडेवाढीची गरजच भासणार नाही, असा दावा या वेळी आंदोलकांनी केला.

आयुक्तांचे आव्हान

भाडेवाढीची आवश्यकता नाही, असा मनसेचा दावा असला तरी तो पालिका आयुक्तांना मान्य नाही. त्यामुळे मनसेच्या शिष्टमंडळाने भाडेवाढ न करता उपक्रमाचा गाडा चालू शकेल, असे बजेट सादर करावे असे आव्हान आयुक्तांनी दिल्याचे अॅड. देशपांडे यांनी सांगितले. आयुक्तांचे आव्हान आपण स्वीकारल्याचे त्यांनी आंदोलनानंतर जाहीर केले. मात्र त्याआधी परिवहन उपक्रमातील गळती रोखण्यासाठी त्यांनी पावले उचलावीत, असा आग्रह मनसेतफेर् धरण्यात आला आहे.

Wednesday, February 9, 2011

रेल्वे भरतीसाठी मनसेच्या प्रचारतंत्राने शिवसेना अस्वस्थ!

खालील बातमी लोकसत्ता च्या सौजन्याने ....................



‘ आता नीट लक्ष द्या..नंतर सांगू नका मला माहीत नव्हतं,’ असे आवाहन करणारी होर्डिग्ज सध्या महाराष्ट्रात जागोजागी लागली असून ही होर्डिग्ज मराठी बेरोजगार तरुणांचे लक्ष वेधून घेत. मध्ये व पश्चिम रेल्वेने ‘ग्रुप डी’मधील सुमारे १० हजार पदे भरण्यासाठी जाहिरात दिली असून या पदांसाठी मराठी तरुणांनी मोठय़ा प्रमाणावर अर्ज करावेत यासाठी मनसेने जोरदार प्रचारतंत्र अवलंबिले आहे. राज ठाकरे यांचे अथवा कोणाचेही छायचित्र नसलेले परंतु नेमक्या शब्दात भावना व्यक्त करणाऱ्या होर्डिग्जमुळे शिवसेनेत अस्वस्थता निर्माण झाली आहे. रेल्वेभारतीसाठी शिवसेनेनेही आवाहन केले आहे. परीक्षांची तयारी करण्यासाठी प्रशिक्षणवर्ग घेतले जाणार आहते. मात्र राज यांच्या ‘मीडिया मॅनेजमेंट’ व जाहिरात कौशल्याचा ‘सामना’ कसा करावा असा प्रश्न सेनेच्या नेत्यांपुढे उभा राहीला आहे.
राज्यातील सर्व रेल्वे स्थानके, बस तसेच एसटी स्थानके, रेल्वे तसेच बाजारपेठ परिसरासह हमरस्त्यांवरील मोक्याच्या जागांवर मनसेच्या रेल्वे भरतीचे आवाहन करणारे प्रसिद्धी फलक साऱ्यांचेच लक्ष वेधून घेत आहेत. आधुनिक प्रचार तंत्राचा कल्पक वापर करताना जी प्रभावी शब्दयोजना केली आहे त्यामुळे मनसेबाबत तरुणांच्या त्यातही बेरोजगारांची मोठी सहानुभूती निर्माण होईल व याचा फायदा आगामी पालिका निवडणुकीत त्यांना मिळू शकतो, अशी भीती सेनेच्या नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
मराठी तरुणांऐवजी दाक्षिणात्यांना नोकरीत प्राधन्य मिळत असल्यामुळे शिवसेनेच्या स्थापनेच्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी ‘बजाव पुंगी, हटाव लुंगी’ असा नारा दिला होता. त्याने प्रचंड परिणाम साधला जाऊन बँका, विमानसेवा, पंचतारांकित हॉटेल्स आदी ठिकाणी मराठी माणूस नोकरीत दिसू लागला. शिवसेनेच्या लोकाधिकार समितीचे लढवय्ये नेते सुधीर जोशी व गजानन कीर्तीकर यांनी प्रत्येक शासकीय अथवा खासगी आस्थापनांमध्ये मराठी माणूस ऐंशी टक्के दिसला पाहिजे यासाठी पाठपुरावा केला होता. आजही लोकाधिकार समितीच्या माध्यमातून शिवसेनाभवन तसेच जागोजागी बँक, रेल्वे, तसेच शासकीय सेवांच्या भरतीसाठी पाठपुरवा केला जातो. एवढेच नव्हे तर प्रत्येक भरतीच्यावेळी प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिरे घेतली जातात. प्रमुख्याने राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून मनसेची स्थापना केल्यानंतर तरुणांचा मिळणारा प्रतिसाद तसेच नोकर भरतीत शंभर टक्के मराठी तरुणांचीच भरती करण्याचे आवाहन केल्यापासून शिवसेनेने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनापासून नोकर भरतीसाठीची आंदोलने तीव्र करण्यास सुरूवात केली. मात्र प्रचारतंत्रात वाकबगार असलेल्या राज ठाकरे यांनी रेल्वे भरतीच्यानिमित्ताने जे प्रचारतंत्र अवलंबिले आहे त्यामुळे पुन्हा एकदा मनसे जोरात चर्चेला आली.
वस्तुत: मनसेप्रमाणेच शिवसेनेनेही रेल्वे भरतीसाठी अर्ज करण्याचे आवाहन केले आहे तसेच परीक्षा मार्गदर्शन केंद्रही जागोजागी सुरू करण्यात येणार आहेत. मात्र जाहिरात फलकांचा आकार, त्यावरील मजकूर तसेच नेत्यांच्या फोटोपासून अन्य फाफटपसाऱ्याला फाटा देत बेरोजगार तरुणांची व त्यांच्या कुटुंबियांची नेमकी नस पकडणारा मजकूर मनसेने रेल्वे भरतीसाठी तयार केलेल्या होर्डिग्जवर दिसतो. याबाबतीत शिवसेना खूपच मागे असून सध्या सेनेच्या प्रत्येक होर्डिगवर शिवसेनाप्रमुख, कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि युवानेते आदित्य ठाकरे यांचे छायाचित्र लावण्याचीच चढाओढ सुरू आहे. या छायाचित्रांच्या भाऊगर्दीत कामाचा उद्देशच हरवून जात असल्याची भावना सेनेच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केली.
मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकसह राज्यात पुढील वर्षी दहा महापालिकांच्या निवडणुका होत असून यासाठी तरुण व बेरोजगार तरुणांना आपल्याकडे वळविण्यासाठी सेना-मनसेत चढाओढ लागली असून ‘रेल्वे भरती’ ही यासाठी सुवर्णसंधी असल्यामुळे दोन्ही पक्षांनी मराठी तरुणांच्या भरतीसाठी जोरदार मोहीम हाती घेतली आहे. मात्र प्रसिद्धीतंत्रामध्ये मनसेने बाजी मारली असून काम करूनही प्रसिद्धीतंत्रात कमी पडत असल्यामुळे सेनेमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

Monday, February 7, 2011

कल्याणच्या विकासासाठी ‘राज’कारण

खालील लेख म टा च्या सौजन्याने .................


कल्याण-डोंबिवलीच्या महानगरपालिका निवडणुकीवेळीवचकनामा’ जाहीर करणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता तिथल्या सत्ताधा-यांवर वचक ठेवायला सज्ज झाली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज कडोंमपाचे आयुक्त रामनाथ सोनावणे यांची भेट घेऊन शहराचा विकास आराखडा त्यांना सादर केला. त्यानुसार काम होतं की नाही, याकडे आता त्यांचे सैनिक आपल्या स्टाइलने लक्ष ठेवतील.

कल्याण-डोंबिवलीच्या निवडणुकीत मनसेनं जोरदार मुसंडी मारली होती. पहिल्यांदाच इथल्या निवडणूक रिंगणात उतरलेल्या राज यांच्यावर जनतेनं विश्वास दाखवला होता. तो विश्वास सार्थ ठरवण्याच्या दृष्टीनंच मनसे कामाला लागल्याचे संकेत आज मिळाले. राज यांनी थेट महापालिका आयुक्तांची भेट घेऊन शहराच्या विकासासंबंधी महत्त्वाच्या सूचना केल्या आणि एक आराखडाही त्यांना दिला.

रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसवणं आधी बंद करा, असं राज यांनी ठणकावून सांगितलंय. पेव्हर ब्लॉक बनवणारी एक टोळीच आहे. नगरसेवकांना पैसे देऊन ते ही कामं काढतात. काही दिवसांतच हे रस्ते खराब होतात आणि तेच त्यांना हवं असतं. हे प्रकार टाळण्यासाठी संपूर्ण शहराचं काँक्रिटीकरण करावे, अशी

राज ठाकरे सक्रिय; शिवसेना अस्वस्थ

खालील लेख म टा च्या सौजन्याने ......................


केडीएमसीची निवडणूक आटोपल्यानंतर उलटलेल्या तीन महिन्यांत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आतापर्यंत पाच वेळा कल्याण-डोंबिवलीत आले असून आता त्यांनी कल्याण डोंबिवलीच्या विकासाच्या ब्लू प्रिंटसाठी पुढाकार घेतला आहे. महापालिकेत मनसे सत्तेवर नसली तरी राज यांनी घेतलेल्या या पुढाकाराने पालिकेत सत्तेवर असणा-या शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे. निवडणूक जिंकल्यानंतर एकदाही शिवसेनेच्या नेत्यांना कल्याण डोंबिवलीत येण्यासाठी वेळच मिळाला नसून विकासकामांबाबत चर्चादेखील झाली नसल्याने ही अस्वस्थता वाढू लागली आहे.

केडीएमसीच्या निवडणुकीचा निकाल मागील वर्षी १ नोव्हेंबर रोजी लागला. त्यानंतर चारच दिवसांनी दिवाळी पहाटच्या निमित्ताने तरुणांना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे डोंबिवलीतील फडके रोडवर आले. महापौरपदाची निवडणूक आठवड्यावर आली असतांना या निवडणुकीत मनसेचे नगरसेवक तटस्थ भूमिका घेतील, हे जाहीर करण्यासाठी ठाकरे पुन्हा डोंबिवलीत आले. त्यानंतर, डोंबिवलीतील सर्वाधिक लोकप्रियउत्सव च्या उद्धाटनासाठीही त्यांनी शहराला भेट दिली. मागील आठवड्यात सोमवारी नगरसेवकांच्या बैठकीसाठी पुन्हा डोंबिवलीत, तर शनिवारी महापालिका आयुक्तांच्या भेटीसाठी ते कल्याणात आले होते.

वास्तविक निवडणुका आटोपल्यावर राजकीय नेत्यांना तेथील मतदारांचा विसर पडतो असा अनुभव आहे. पण राज ठाकरे यांनी तो खोटा ठरवला असून गेल्या तीन महिन्यात निरनिराळया कारणांसाठी ते डोंबिवली- कल्याणात येत आहेत. तसेच आता त्यांनी या शहरांच्या विकासासाठी ब्ल्यू प्रिंट तयार करण्याची जबाबदारी स्थानिक आर्किटेक्टवर सोपवली आहे. ही ब्ल्यू प्रिंट तयार झाली की ती प्रशासनापुढे ठेवण्यासाठीही आपण येणार असल्याचे ठाकरे यांनी जाहीर केले आहे.

मात्र या घटनाक्रमांमुळे सत्ताधारी शिवसेनेत अस्वस्थता वाढू लागली आहे. महापौरपदाची निवडणूक झाल्यानंतर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे सीकेपी संस्थेच्या कार्यक्रमाच्या उद्धाटनाव्यतिरिक्त कल्याण-डोंबिवलीकडे फिरकलेले नाहीत. सत्ता असल्याने येथील विकासकामे मार्गी लावण्यासाठी त्यांनी नगरसेवक किंवा पालिका प्रशासनाची बैठक घेणे अपेक्षित होते. पण अशी बैठक सोडाच, त्यांनी स्वत:च जाहीर केलेल्या कोअर कमिटीचाही अद्याप पत्ता नाही. केडीएमसीचे अनेक प्रश्न एमएमआरडीए आणि रेल्वे विभागाकडे प्रलंबित आहेत. ते सोडवण्याच्या स्थानिक पदाधिकारी व नगरसेवकांच्या प्रयत्नांना उद्धव यांची साथ मिळाली तर ते सहज सुटू शकतात. पण निवडणुकीनंतर नेतृत्वाकडून कल्याण डोंबिवलीकरांना वा-यावर सोडण्यात आल्याने मतदारांच्या प्रश्नांना काय उत्तरे दयावीत, असा प्रश्न सेना नगरसेवकांना पडला आहे.

फेरीवाल्यांविरोधात मनसे रस्त्यावर

खालील लेख म टा च्या सौजन्याने ...................



डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसरातून हुसकावलेल्या फेरीवाल्यांनी शनिवारी विष्णूनगर परिसरावर कब्जा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मनसेचे नगरसेवक अमित सुलाखे यांनी कार्यकर्त्यांसह या भागात धडक देत फेरीवाल्यांना पिटाळले. या आंदोलनामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.

केडीएमसीने डोंबिवली स्टेशन परिसरातील दीनदयाळ रोड आणि घनश्याम गुप्ते रोडवर बसणाऱ्या फेरीवाल्यांवर महानगरपालिका गेले काही दिवस सातत्याने कारवाई करत आहे. त्यामुळे हा परिसर फेरीवालामुक्त झाला आहे. मात्र, हे फेरीवाले विष्णूनगर पोस्ट ऑफिस परिसरात व्यवसाय करू लागले होते. या रस्त्यांवरील रहदारीचे प्रमाण जास्त असून फेरीवाल्यांच्या भाज्यांच्या गोण्या आणि टोपल्यांमुळे तिथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. फेरीवाले रात्री घरी जाताना सर्व कचरा रस्त्यावरच सोडून देतात. यामुळे दुर्गंधी निर्माण होत होती. त्यामुळे हैराण झालेल्या स्थानिकांनी या फेरीवाल्यांना हटविण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेत स्थानिक नगरसेवक अमित सुलाखे यांनी शनिवारी आपल्या कार्यर्कत्यांसह येथे धडक दिली. फेरिवाल्यांनी हुसकावून लावताना बाचाबाची आणि धक्काबुक्की झाली. यामुळे या परिसरात सुमारे तासभर तणाव होता.

परिस्थिती चिघळू नये म्हणून विष्णुनगर पोलील आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून सोमवारी या विषयावरील निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर मनसेचे कार्यकतेर् माघारी फिरले. या फेरीवाल्यांसाठी माकेर्ट उभारणी अत्यावश्यक असून स्टेशनजवळील मच्छीमाकेर्टचा पुनविर्कास करताना तिथे या फेरीवाल्यांसाठीही जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सुलाखे यांनी केली आहे.

Wednesday, February 2, 2011

रेल्वे भरतीसाठी मराठी मुलांना मदत करा:राज ठाकरे

खालील बातमी स्टार माझा च्या सौजन्याने .....................



रेल्वे भरतीमध्ये मराठी मुलांना डावलले जाते त्यामुळेच येत्या १५ फेब्रुवारी रोजी रेल्वे भरतीसाठी जे अर्ज भरले जाणार आहेत त्यामध्ये मराठी मुलांना मदत करा असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले.

रेल्वे भरतीमध्ये आता मराठी मुलांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ढाल मिळणार आहे. राज्यभरातल्या मराठी मुलांना रेल्वे परीक्षाला बसण्यासाठी मनसे आता प्रोत्साहन देणार आहे. त्यासाठी आज मनसेची मार्गदर्शक पुस्तिका प्रकाशित करण्यात आली. दादरच्या रविंद्र नाट्यमंदिरात राज ठाकरे यांनी राज्यभरातल्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेऊन हे रणशिंग फुंकले. ज्या रेल्वे भरतीच्या प्रकरणानंतर मनसेने मुंबई शहरात राडा केला आता तोच मुद्दा घेऊन मनसे पुन्हा एकदा आक्रमक होत आहे.

बिहारी नेत्यांमुळे रेल्वे भरतीमध्ये याआधी तणाव निर्माण झाल्याचा आरोप राज यांनी केला. १५ फेब्रुवारी रोजी रेल्वे भरतीसाठी अर्ज भरले जाणार आहेत. रेल्वे भरतीसाठी अर्ज भरण्याचा रेटा लावा असे राज यांनी सांगितले. अर्ज भरण्यासाठी मराठी मुलांना सर्व प्रकारे मदत करावी असे राज यांनी सांगितले.

ही पुस्तिका मनसेच्या वतीने राज्यातील सर्व मुलांना देण्यात येणार आहे. या पुस्तिकेमध्ये रेल्वे भरतीमध्ये अर्ज कसा भरायचा याची माहिती दिली आहे. याच बरोबर मनसेच्या वतीने राज्यातील सर्व मनसेच्या शाखाच्या बाहेर, चित्रपटगृहाबाहेर आणि बसस्थानकाबाहेर भरती संदर्भातील होर्डिंग लावण्याचे आदेश राज ठाकरे यांनी सर्व कार्यकर्त्यांना दिले आहेत. हे होर्डिंग सहा,सात,आठ फेब्रुवारीपर्यंत असतील त्यानंतर ते काढून टाकले पाहिजेत अशी सूचना राज यांनी केली.

मराठी माणसाला ज्या ज्या ठिकाणी संधी आहे. त्या त्या ठिकाणी ती संधी त्याला मिळवून देण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी मदत केली पाहिजे असे राज यांनी सांगितले.


Tuesday, February 1, 2011

'हरवलेला' महाराष्ट्र!

म टा मधील प्रताप आसबेंचा एक चांगला लेख .........................


प्रताप आसबे
महाराष्ट्र टाईम्स

गौरवशाली, सहिष्णु, सर्वसमावेशक, प्रागतिक विचारांची ध्वजा घेऊन खऱ्या अर्थाने प्रगती करणारा महाराष्ट्र कधीच इतिहासजमा झाला आहे. त्यामुळे 'त्या' महाराष्ट्राचे दाखले देण्याची आता गरजच नाही!
................

महाराष्ट्राची अधोगती कोणी रोखू शकेल, असा अंधूक विश्वास बाळगण्यातही आता अर्थ राहिलेला नाही; कारण आता आणखी काय अधोगती व्हायची राहिली आहे? असा प्रश्न कुणालाही पडेल. एका अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्याला जिवंत जाळले आहे. उद्या अशाच रीतीच्या आणखी बातम्या यायला लागल्या, तर हा प्रकारही आमच्या अंगवळणी पडेल. तेव्हा या बातम्या हळूहळू पहिल्या पानावरून आतल्या पानात जातील. कुणाच्या तोंडाला काळं फासलं, कुणाची धिंड काढली, तर कधीकाळी मोठमोठाल्ल्या बातम्या यायच्या. आता त्या बातम्याच होत नाहीत. आजवर इतक्याजणांना काळं फासलं, इतक्यांची धिंड निघाली; त्यामुळे त्यातले नावीन्यच हरवले.

या महाराष्ट्राला वाळू माफियांची दंडेली नवी नाही. त्यांनी कुणावर ट्रक घातले, कुणाला डंपरने उडविले, या बातम्यांचा जीव त्या त्या दिवसापुरता असतो; कारण वाळूचे नाते अन्न, वस्त्र, निवारा या तीन मानवी मूलभूत गरजांशी आहे. वाळू नसेल तर घरं कशी उभी राहणार? बांधकामाचा खर्च कमी झाला, तर घरंही स्वस्त होणार. पण गौण खनिज म्हणून सरकार त्याचीही रॉयल्टी घेते. मग घरं महाग होणार नाहीत तर काय? म्हणून काही समाजसेवक सरकारचा आदेश धाब्यावर बसवून राजरोसपणे वाळू घेऊन जातात. कुणी त्यांना अडविण्याचा वेडेपणा करतो, तेव्हा ते तथाकथित समाजसेवक त्या प्रतिक्रांतिकारांना धडा शिकवतात. अशा घटना सरकारच्या नजरेतून क्षुल्लकच असतात. त्यामुळेच 'वाळूत मुतलं ना फेस ना पाणी', अशी एक समर्पक म्हण आधीच रूढ झालीय. ती उगीच नाही.

दुधातली भेसळ अशीच अंगवळणी पडली आहे. १०० लिटरमध्ये २० लिटर पाणी, म्हणजे काहीच नाही. दुधातली भेसळ लोकांनी गृहीतच धरलीय. त्यातून रोज राजरोसपणे लाखो रुपये नेते आणि पदाधिकाऱ्यांना समाजसेवेसाठी मिळत असतात. महात्मा गांधी म्हणायचे म्हणे की, महाराष्ट्र म्हणजे कार्यर्कत्यांचे मोहोळ आहे. राष्ट्रपित्याच्या या वाणीचा पुनर्पत्यय धवलक्रांतीने घडविला. नवसमाज घडविण्यासाठी गावागावात स्वच्छ, शुभ्र, धवल वेशातील 'कर्तबगार आणि उपक्रमशील' कार्यर्कत्यांचे जथ्थे उभे राहिले. स्वत:च्या आथिर्क पायावर उभे झालेल्या या स्वाभिमानी कार्यर्कत्यांनीच जवळपास प्रत्येक राजकीय पक्षाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. एकेकाळी पाव्हणेरावळे आले तर गावात चहाला दूध मिळायचे नाही. त्या महाराष्ट्रात दुधाचा महापूर आला. या धवलक्रांतीची सुरुवात कुठे झाली, हा मोठा संशोधनाचा विषय आहे. पण कदाचित याचा 'पायलट प्रोजेक्ट' कोल्हापुरात सुरू झाला असावा. डेअरीमधून टँकर भरण्याआधीच प्रमाणबद्धपणे त्यात पाणी मिसळले जाऊ लागले. पाण्याचे प्रमाण आणि त्यातून उभा राहणारा पैसा याचा हिशेब चोख होता. म्हणूनच सहकारातील त्याच्या वाटपावरून कधी कलागती झाल्या नाहीत. दुधात स्वच्छ पाणीच मिसळले जात असल्याने ते आरोग्यदायीच म्हटले पाहिजे. त्या तुलनेत पिशव्यांत इंजेक्शनने पाणी भरणे हे आरोग्याला घातक. त्यांच्यावर वेळोवेळी छापे घालून पोलिस आपले कर्तव्य पार पाडतात, हा केवढा मोठा दिलासा! पण आता नुसत्या पाण्यावर कसं भागणार? त्यामुळे रासायनिक दुधाचे उपक्रमशील प्रयोगही आता सुरू झाले आहेत. त्याला अद्याप राजाश्ाय मिळणे बाकी आहे; पण तोही यथावकाश मिळेल.

पेट्रोल आणि डिझेलमध्ये होणाऱ्या भेसळीचा इतिहास तर आणखीनच रोमहर्षक आहे; कारण तिनेतर आमच्या देशातील औद्योगिक क्रांतीलाच हातभार लावला आहे. या भेसळीच्या जिवावर आम्ही प्रगतीची उंचउंच शिखरे पादाक्रांत केली. त्यातून हजारो, लाखो लोकांना रोजगार मिळाला. बाजारात पैसा आला. शेअर बाजार वधारला. बांधकाम व्यवसायात बरकत आली. मुंबई-पुण्याची स्कायलाईन बदलली. देशाचा जीडीपी डबल डिजिटमध्ये पोहोचला. भारतीय उद्योगपतींची नावे फोर्ब्सच्या यादीत झळकायला लागली.

पेट्रोल, डिझेल, नाफ्ता, केरोसिन हे सगळे पेट्रोलियम पदार्थाचे उपपदार्थ. रॉकेलच्या चिमणीने तर गरिबांच्या घरातला अंधारही दूर होतो. हे सूत्र लक्षात घेऊन गरिबी आणि बेरोजगारी हटविण्यासाठी पेट्रोल, डिझेलमध्ये रॉकेल आणि नाफ्ता मिसळण्याचा कल्पक शोध आम्हीच लावला. त्यामुळे नवं काही घडविण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असणाऱ्यांनी पेट्रोलियम पदार्थातील भेसळीचा नव्या मुंबईतील हा 'आदर्श' डोळ्यासमोर ठेवून राज्यभर ठिकठिकाणी पावलं टाकली. धुळ्यामध्ये पेट्रोलियम पदार्थांचे डेपो उभे राहिल्यावर आख्ख्या खानदेशात शेकडो बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. पेट्रोलपंप मालकांची हालाखी दूर झाली. टँकरवाल्यांच्या हातात चार पैसे खेळू लागले. आडरानात येऊन पडलेले तेलकंपन्यांचे अधिकारी कर्मचारी, तुटपुंज्या पगाराच्या विवंचनेत जगणारे पोलिस, पुरवठा आणि महसूल खात्यातील कर्मचाऱ्यांचे बंगले उभे राहू लागले. राजकीय कार्यकतेर्, नेते आणि एकूणच राजकीय पक्षांना झळाळी प्राप्त झाली. सत्तेच्या दरबारात त्यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली. त्यातल्या अतिउपक्रमशील नेत्यांना पक्षात आणि कायदेमंडळात कर्तृत्त्व गाजविण्याची संधी मिळू लागली. त्यांच्या होतकरू कार्यर्कत्यांनी नगरपालिका आणि महापालिका ताब्यात घेतल्या. झपाट्याने विकासाकडे झेपावणाऱ्या उत्तर महाराष्ट्रात पोस्टिंग मिळावी यासाठी लाखो रुपयांच्या उलाढाली व्हायला लागल्या. या स्पर्धापरीक्षेत एसीबी, टँफिक या विभागांना तर कमालीचे महत्त्व प्राप्त झाले. विकासाची गंगा पुण्या-मुंबईपुरती मर्यादित न राहता ती अविकसित आणि ग्रामीण भागात गेल्याने अर्थव्यवस्थेचे विकेंदीकरण झाले. इतके सकारात्मक परिवर्तन होत असेल तर कोणते सरकार कशाला या परिवर्तनाच्या आड येईल? त्यामुळे मेहेंदळे बाईंचा अहवाल धूळखात पडणे, अगदीच साहजिक होते.

विकासाचा रथ अशा सुसाट वेगाने धावायला लागल्यानंतर कुठंतरी अपघात होणार. वाटेत आडवे येणाऱ्यावर हिंस्त्र हल्ले होणार. त्यात यशवंत सोनावणे हा अधिकारी जिवंतपणे जाळला गेला. याची देही याची डोळा हा अघोरी प्रकार पाहायला मिळाल्याने अवघा महाराष्ट्र हादरून गेला. प्रजासत्ताक दिन झाकोळून गेला. शासन-प्रशासन भेदरून गेले. झोपी गेलेल्या विरोधी पक्षांची सदसद्विवेकबुद्धी जागी झाली. आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. हे खपवून घेणार नाही, स्वस्थ बसणार नाही, अद्दल घडवू, अशा राणाभीमदेवी थाटात घोषणा झाल्या. राज्यर्कत्यांच्या फर्मानामुळे पोलिस, पुरवठा आणि महसूल खात्यातील कर्मचाऱ्यांची झोप उडाली. त्यांनी राज्यभर छापे घातले. लाखो लिटर भेसळीचे तेल ताब्यात घेतले. सोनवणे कुटुंबीयांना २५ लाखांची मदत जाहीर झाली. तपास सीबीआयकडे सोपवायची तयारीही दाखविली गेली. आता राहिले काय? नाही म्हणायला विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात परस्परांची लक्तरे काढली जातील, चांबडी लोळविण्याची भाषा होईल, महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचे दाखले दिले जातील, सुसंस्कृततेची कोडकौतुके होतील. यात कुणी यशवंतरावांची आठवण काढेल. कुणी एसेम आणि डांग्यांची महती सांगेल. त्यांच्या सचोटीचे राग आळवले जातील. पण हा गौरवशाली महाराष्ट्र हा कधीच इतिहासजमा झालेला आहे. थांबलेला भेसळयुक्त विकासाचा रथ महिन्या-दोन महिन्यांत पुन्हा भरधाव वेगाने दौडायला लागेल. त्यामुळे 'त्या महाराष्ट्राचे' दाखले देण्याची गरज नाही. कारण तोच हा महाराष्ट्र आहे, यावर आता शेंबडं पोरही विश्वास ठेवणार नाही