Monday, November 30, 2009

महाराष्ट्र गीत

मित्रहो सदर करीत आहे महाराष्ट्र गीत
हे गीत एकतानां अंगावर काटा उभा राहतो की नाही? तुमचे काय मत आहे?


जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
जय जय महाराष्ट्र माझा ...

भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्‍या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा

काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढ़ळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

Sunday, November 29, 2009

निकृष्ट तूरडाळीच्या वाटपाविरोधात मनसेची गोदामावर धडक

सकाळ वृत्तसेवा
Saturday, November 28, 2009 AT 11:45 PM (IST)

कल्याण - कल्याण परिसरातील शिधावाटप केंद्रातून निकृष्ट दर्जाच्या तूरडाळीचे वितरण केल्याच्या तक्रारी कल्याण (प.) मनसेचे आमदार प्रकाश भोईर यांच्याकडे आल्या होत्या. आज सकाळी मनसे आमदार भोईर यांनी कल्याण आधारवाडी येथील फूड कार्पोरेशन ऑफ इंडियाच्या अन्नधान्याच्या गोदामावर धडक देऊन तूरडाळीची पाहणी केली. त्यातून निकृष्ट तूरडाळ पुरविण्यात येत असल्याचे उघड झाले. आमदारांच्या पाहणी मोहिमेची पुरवठा उपसंचालकांना दखल घ्यावी लागली. कल्याण परिसरातील शिधावाटपाच्या दुकानात तूरडाळीचे वाटप केले जाते. एक किलोसाठी ५५ रुपये मोजावे लागतात. साखर घेतल्याशिवाय तूरडाळ दिली जाणार नाही, अशी सक्ती केली जाते. शिधावाटप दुकानातून दिली जाणारी तूरडाळ निकृष्ट दर्जाची असल्याच्या तक्रारी आमदार भोईर यांच्याकडे आल्या होत्या. डाळीचा पुरवठा नेमका कोठून केला जातो, याची माहिती घेऊन आमदारांनी आधारवाडी येथील फूड कार्पोरेशन ऑफ इंडिया अन्नपुरवठा गोदामास मनसेच्या कार्यकर्त्यांसह धडक दिली. या वेळी गोदाम निरीक्षकाने गोदाम पाहण्यास मज्जाव केला. भोईर यांनी शिधावाटप अधिकारी सावंत यांच्याशी संपर्क साधला. त्या वेळी आमदारांना तूरडाळीचा दर्जा पाहण्याचा अधिकार असल्याचे सावंत यांनी सांगितले. आमदारांनी तूरडाळीची पाहणी केल्यावर ती निकृष्ट दर्जाची आढळले. हा प्रकार सुरू असताना पुरवठा उप-संचालक घटनास्थळी पोहचले. त्यांनी अनेक गोण्यातील तूरडाळ आमदारांनी दाखविली. काही गोण्यांत चांगली; तर काहींमध्ये निकृष्ट दर्जाची तूरडाळ आढळली. गोदामात १६ गोण्या तूरडाळ शिल्लक आहे. पाच गाड्या गेल्यावर केवळ तीन गाड्यांची नोंद केली जाते, असा आरोप आमदार भोईर यांनी केला. तूरडाळीचा पुरवठा हा सरकारी कंत्राटदाराकडून केला जातो. चांगली डाळच वितरित केली जाईल. निकृष्ट दर्जाची वितरित केलेली डाळ परत घेतली जाईल, असे आश्‍वासन अधिकाऱ्यांनी दिले. मात्र यात सुधारणा दिसून आली नाही, तर सरकारी गोदामे फोडण्याचे आंदोलन करण्याचा इशाराही भोईर यांनी दिला आहे.

Friday, November 27, 2009

'२६/११'च्या आठवणीने गहिवरली

मुंबई

26 Nov 2009, 1554 hrs IST

मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
मुंबईकरांच्या मनात ' २६ / ११ ' च्या काळ्याकुट्ट आठवणींनी घर केलंय... दहशतवादी हल्ल्यातील १६६ बळींच्या आठवणीने मुंबईकरांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या... शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मेणबत्ती पेटवताना गहिवरून आले ... परंतु मुंबईचं आणि मुंबईकरांचं स्पिरीट कायम असल्याचा प्रत्यय आज पावलापावलावर दिसला। २६ / ११ च्या आठवणींनी गहिवरलेली मुंबई त्याच निमित्ताने एकवटल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले. २६ नोव्हेंबर २००८ च्या काळरात्री दहशतवादी हल्ल्याने हादरलेल्या मुंबईच्या काळजाचा ठोका चुकला... पण काही मिनिटांसाठीच ! तीन-चार तासातच मायानगरी मुंबई पुन्हा धावू लागली... घड्याळाच्या काट्यासारखी ! आज त्या दहशतवादी हल्ल्याला एक वर्ष पूर्ण होतेय. या हल्ल्यात बळी पडलेल्या १६६ मुंबईकरांना आदरांजली वाहण्यासाठी मुंबईकर रस्त्यावर उतरले. ‘ हिंसाचार संपवा, कसाबला फाशी द्या॥ ’ असे फलक त्यांनी हातात धरले होते. दहशतवादाच्या निषेधार्थ आज एनसीपीए ते गिरगाव चौपाटी अशी परेड मुंबई पोलिसांनी काढली. पोलिस कमांडो, फोर्स वनचे कमांडो, त्यांची अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, आधुनिक संपर्क यंत्रणांनी सुसज्ज वाहने अशी मुंबई पोलिसांची सज्जता या परेडमध्ये पाहायला मिळाली. दहशतवादाशी दोन हात करण्यास मुंबई सज्ज असल्याचा थेट उलटा मेसेज यानिमित्ताने दहशतवाद्यांना पाठवण्यात आला. मुख्यमंत्री अशोक चव्हाण, उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होते. दहशतवाद्यांच्या हल्ल्याचे लक्ष्य ठरलेल्या छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) स्टेशनमध्ये हजारो मध्य रेल्वे प्रवाशांनी २६ नोव्हेंबरच्या हल्ल्यात बळी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांची आठवण म्हणून मध्य रेल्वेने स्मृती स्तंभच उभारला आहे. सेंट झेवियर्स कॉलेजच्या ज्या गल्लीत हेमंत करकरे, अशोक कामटे व विजय साळस्कर यांना वीरमरण आले, त्याठिकाणी अनेक मुंबईकरांनी मेणबत्त्या पेटवून व पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली. मनसेच्या वतीने याठिकाणी शहीद पोलिसांचे कटआऊटस लावण्यात आले आहेत. त्याशिवाय काँग्रेसच्या वतीने शहीदांना श्रद्धांजली वाहणारे बॅनर्सही उभारण्यात आले आहेत. हॉटेल ताज, हॉटेल ट्रायडंट व नरिमन हाऊस या दहशतवादी हल्ल्यांच्या ठिकाणीही अनेकांनी भेटी देऊन बळींच्या आठवणींना श्रद्धांजली वाहिली. संसदेच्या दोन्ही सभागृहात तसेच कानपूर येथे सुरू असलेल्या भारत-श्रीलंका टेस्ट सामन्याचा खेळ सुरू होण्यापूर्वी २६ नोव्हेंबर हल्ल्यातील बळींना आदरांजली अर्पण करण्यात आली.

Thursday, November 26, 2009

वेडात मराठे वीर दौडले सात


म्यानातून उसळे तलवारीची पात
वेडात मराठे वीर दौडले सात

ते फिरता बाजूस डोळे, किंचित ओले
सरदार सहा सरसावुनि उठले शेले
रिकबीत टाकले पाय, झेलले भाले
उसळले धुळीचे मेघ सात निमिषात

आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना
अपमान बुजविण्या सात अर्पुनी माना
छावणीत शिरले थेट भेट गनिमांना
कोसळल्या उल्का जळत सात दर्यात

खालून आग, वर आग, आग बाजूंनी
समशेर उसळली सहस्त्र क्रुर इमानी
गदीर्त लोपले सात जीव ते मानी
खग सात जळाले अभिमानी वणव्यात

दगडावर दिसतील अजूनि तेथल्या टाचा
ओढयात तरंगे अजूनि रंग रक्ताचा
क्षितिजावर उठतो अजूनि मेघ मातीचा
अद्याप विराणी कुणी वार्‍यावर गात

कुसुमाग्रज

इंग्रजी भाषेत शिक्षण घेणं गैर आहे काय?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जेव्हापासून मराठी साठी आंदोलन छेड्ले आहे तेव्हापासून त्यांचे विरोधक हा मुद्दा नेहमीच पुढे आणतात की मनसे कार्यकर्त्यांचे मुले ही इंग्रजी माध्यमात शिकतात तर त्यानीं मराठीचा आग्रहा धरणे कितपत योग्या आहे?

सर्वप्रथम मी हे नमूद करू ईच्छितो की मनसे चा कुठल्याही भाषेला विरोध नाही तर मराठी भाषेसाठी आग्रहा आहे। इंग्रजी ही जगात सर्वत्र वापरली जाणारी भाषा आहे आणि त्यावर आपण प्रभुत्व मिळवणे ही काळाची गरज आहे। आपल्याला जर जागतिक बाजारपेठेत वर्चस्व गाजवायच असेल तर इंग्रजी भाषा येण अत्यंत गरजेच आहे. माझ्या मते तुम्ही कुठल्या भाषेत शिक्षण घेता ते महत्वाचा नाही तर तुमची तुमच्या मातृ भाषे बद्दल असलेली तळमळ किवा आवड महत्वाची आहे. आमच्या घरात आम्ही जर आमच्या मुलांवर चांगले संस्कार केले तर त्यानीं कुठल्या भाषेत शिक्षण घेत्ल ते महत्वाचे नाही.

हा मुद्दा अयोग्य आहे आणि त्याला काही अर्थ नाही. तुमचे काय मत आहे?

Sunday, November 22, 2009

हल्ला आणि पराभव

म. टा. खास प्रतिनिधी मुंबई
22 Nov 2009, 0148 hrs IST
आयबीएनवरचा हल्ला हे शिवसेनेचं निव्वळ फ्रस्ट्रेशन आहे. राडेबाजी करून आपला गमावलेला केडर बेस गोळा करण्याचा हा प्रयत्न आहे. पण हा तितकाच वेगळ्या वाटेवरून चालण्याचा प्रयत्न करणाऱ्या उद्धव ठाकरेंचा पराभवही आहे. ................. सचिन परब

ऐन रणांगणात रथाचं चाक जमिनीत गेलेल्या कर्णाचं वर्णन 'हसवणूक'मधल्या एका लेखात करताना पुलंना हायवेवर गाडी पंक्चर झालेला ड्रायव्हर आठवला होता. आता पुलं असते तर त्यांना नक्कीच उद्धव ठाकरे आठवले असते. मोठ्या जोशात पाच वर्षं उंच झंेडा ठेवून दौडत आणलेल्या त्यांच्या रथाचं चाक ऐन निवडणुकीत जमिनीत जातंच जातं. गेल्या दोन विधानसभांच्या निवडणुकांत ते घडलंय. या विधानसभेला तर त्यांची धाव जोरदारच होती. उत्तम स्ट्रॅटेजी होती. प्रश्न घेऊन मैदानात उतरले होते. सरकारविरोधी असंतोष त्यांच्याकडे जमा होतोय असं वाटत होतं. लोकसभेत त्याची चुणूक दाखवूनही दिली होती. मैदानातला प्रचार चांगला होताच. इनकमिंग सुरू होतं. बाळासाहेबांची मुलाखत गाजत होती. पण युती आणि तिकिटवाटपावरून मिठाचा खडा पडला. त्याचवेळी राज ठाकरंेनी उसळी मारली. अचानक पहिल्या नंबरचा पक्ष बनण्याची इच्छा बाळगणारा हा पक्ष बावचळला. निकालाच्या सकाळपर्यंत उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गोतावळ्यांना युतीची सत्ता येईल, याची खात्री होती. पण गलितगात्र भाजपपेक्षाही कमी जागा मिळाल्या. मुंबईतली दाणादाण अपेक्षितच होती. पण बाकीच्या महाराष्ट्रातही सुपडा साफ झाला. मुंबई-नाशिक पट्ट्यात मनसेने पाडलेल्या सीट जरी जिंकून आल्या असत्या तरी सत्ता येण्याची सुतराम शक्यता नव्हती. उद्धव यांच्यासाठी तो खूप मोठा धक्का होता. कालपरवापर्यंत विदर्भ मराठवाड्यात झालेल्या लाखांच्या सभांना अर्थ उरला नव्हता. शिवसंवादात हाकेला ओ देणाऱ्या शेतकऱ्यांनीच त्यांना उघडं पाडलं होतं. असं असलं तरीही या सगळ्यावरची त्यांची प्रतिक्रिया निव्वळ अगम्य होती. उघड मैदानात येऊन पराभव मान्य करण्यापेक्षा ते तांेड लपवत राहिले. पत्रकार परिषदेत फक्त गांेधळ आणि फ्रस्ट्रेशनच दिसलं. त्यात मराठी माणसाला दोष देण्याचा मूर्खपणा केला. निकालांमधल्या पॉझिटिव्ह गोष्टी शोधून नव्या लढ्याचं रणशिंग फुंकण्याची ती वेळ होती. पण राज यांच्या जयजयकाराने हिरमुसल्या 'मातोश्री'मध्ये काळोखातला प्रकाश पकडण्याची हिंमतच राहिली नव्हती. प्रचाराच्या शेवटी बाळासाहेबांची सभा न घेण्याची हिंमत उद्धव ठाकरंेनी दाखवली होती. पण पराभवाने ते स्पिरिट कुठच्या कुठे हवेत उडून गेलं. निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही होडिर्ंग लावून मतदारांचे आभार मानण्याचा नवीन ट्रेण्ड आहे. तो आता उपचार उरला असला तरी त्यामागची मूळ भावना चांगली आहे. उद्धव आपल्या वागण्यातून असं होडिर्ंग कधी उभारणार? उद्धव यांचं नेतृत्व मान्य करून लाखो मतदारांनी ४४ आमदार निवडून दिले. त्यांच्या अपेक्षांना वाऱ्यावर सोडण्यात कोणता शहाणपणा आहे ? खरं तर मुंबई, ठाण्यातल्या शिवसैनिकांनी पेटून उठून चांगली फाइट दिली. लोकसभेपेक्षा सेनेचा परफॉर्मन्स नक्कीच उजवा होता. माहीम, भांडूप, मागाठाणे अशा उमेदवार चुकलेल्या ठिकाणी फज्जा उडणं स्वाभाविक होतं. पण शिवडीसारख्या मतदारसंघात बाळा नांदगावकरांना दगडू सकपाळांनी फोडलेला घाम खूप काही सांगणारा होता. तिथे काँग्रेसचा उमेदवार कमजोर होता म्हणून, नाहीतर वेगळा निकाल दिसला असता. अनेक मतदारसंघात लोकसभेतली आघाडीची वीस पंचवीस हजारांची लीड सेनेने दहा हजारांच्या आत आणली, हे शिवसैनिकांचं श्रेय आहे. अंधेरीत सुरेश शेट्टी किंवा अणुशक्तीनगरमध्ये नवाब मलिक अशा बलदंड उमेदवारांना लोकांची कामं करणाऱ्या नगरसेवकांनी घाबरवून सोडलं. त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप कोण देणार? आणि उद्धव राहतात त्या वांदे पूर्व मतदारसंघात तर बाळा सावंत यांनी झगझगीत प्रकाश दाखवून दिलाय. आणखी काय हवं? शेतकऱ्यांच्या जिवावर उद्धव ठाकरंेनी यल्गार केला खरा. पण त्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्यातली प्रस्थापितांना साथ देण्याची मानसिकता समजून घेतली होती का? इथे आणखी मशागत करण्याची आता त्यांची तयारी आहे का? गेल्या निवडणुकीत शून्य रुपये वीजबिलं पाठवून शिंदे सरकारनं लोडशेडिंगच्या मुद्यातली हवा काढून घेतली होती. यावेळी पीकविमा, कर्जमाफी, कापूस एकाधिकारातली बाकी आणि नुकसानभरपाई देऊन शेतकऱ्यांमधला असंतोष दूर करायचा अशोक चव्हाणांचा प्लॅनही यशस्वी झाला. एका शेतकऱ्याच्या खात्यावर एका वर्षात लाख रुपये जमा झाल्याचेही विक्रम घडले. पण शिवसंवाद साधणाऱ्या सेनेकडे त्याला प्रत्युत्तर नव्हतं. सेनेच्या आंदोलनांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवून दिली. पण त्याचं श्रेय त्यांना घेता आलं नाही. ते कर्जमाफीतल्या त्रुटी सांगत राहिले. त्याऐवजी शिवाजी पार्कवर सेनेचा मोठा मेळावा भरला असता, तर चित्र वेगळं झालं असतं. तेव्हाचं वातावरण असं होतं की शिवाजी पार्क सहज भरलं असतं. उद्धव ठाकरेही एकहाती पार्क गाजवू शकतात, हे सिद्ध झालं असतं. पण असं घडलं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नावाने आता खडे फोडण्यात अर्थ नाही. शिवाय नेते अँटिएस्टॅब्लिशमेण्टचे नारे देणारे आणि उमेदवार तीन चार टर्मचे एस्टॅब्लिश आमदार, असा आंतविर्रोध अनेक ठिकाणी होताच. त्यामुळे गुलाबराव पाटील किंवा गावंडे कोमेजले त्यात आश्चर्य नव्हतंच. सेना नेतृत्वाची यातून काही शिकण्याची तयारी आहे का? हा प्रश्न आहे. उद्धव यांनी द्वेषाच्या आधारावरच्या हुकुमशाही पक्षाची पुनर्रचना नव्या जमान्याला अनुसरून करण्याचा प्रयत्न केला होता. शिवशक्ती-भीमशक्तीने प्रबोधनकारांच्या वारशाची आठवण करून दिली होती. 'मी मुंबईकर' तर सेनेसाठी क्रांतीच होती. शेतकऱ्यांसाठी मुंबई ठाण्यातल्या शिवसैनिकांना कामाला लावण्यात मिळवलेलं यश हेदेखील तितकंच महत्त्वाचं. राज्याची सत्ता मिळवण्यात मराठी अस्मिता आणि हिंदुत्व पुरत नाही, हे वारंवार सिद्ध झालेलं असताना मुद्दे घेऊन बेरजेचं राजकारण करण्याला पर्याय नाही. हा नवा मार्ग उद्धव ठाकरे यांची नवी शिवसेना घडवत होता. पण त्या मार्गावर उद्धव ठाकरे यांचा विश्वास उरलेला नाही. बाळासाहेबांच्या सावलीतून स्वत:वर विश्वास उरलेला नाही. त्याहीपेक्षा वाईट म्हणजे ज्या लोकांसाठी त्यांना काम करायचंय त्या लोकांवर आणि साहेबांसाठी राबणाऱ्या शिवसैनिकांवर त्यांचा विश्वास उरलेला नाही. आयबीएन लोकमतवर झालेल्या हल्ल्याचा अर्थ तेवढाच आहे.

रेल्वे परीक्षा मराठीतही

रेल्वे परीक्षा मराठीतही

22 Nov 2009, 0216 hrs IST

म. टा. खास प्रतिनिधी मुंबई
महाराष्ट्रात, विशेत: मुंबईत सध्या 'मराठी विरुद्ध हिंदी' वाद उफाळून आला असतानाच रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी मुंबईत 'जय महाराष्ट्र-जय मुंबई'चे नारे देत राज्यातील भूमिपुत्रांना दिलासा देणारे निर्णय जाहीर केले. 'परप्रांतियांचे लोंढे' धडकू नयेत यासाठी रल्वे भरती परीक्षा देशभरात एकाच वेळी घेण्यात येणार असून महाराष्ट्रात ही परीक्षा मराठीतूनही होईल, असे बॅनजीर् यांनी जाहीर केले. 'तमाम मुंबईकरांना माझा नमस्कार...' अशीच भाषणाची सुरुवात करत बॅनजीर् यांनी मुंबई व मराठी भाषेवरील 'ममते'ची प्रचिती दिली. मुंबईवर शेरोशायरी करत आणि 'ऐ मेरे वतन के लोगो'च्या ओळी गात, २६/११च्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांची कुर्बानी वाया जाऊ देऊ नका, असे आवाहन ममतांनी केले आणि उपस्थित मुंबईकरांची मने जिंकून घेतली. रेल्वेमंत्री झाल्यावर ममता बॅनजीर् प्रथमच मुंबई दौऱ्यावर आल्या होत्या. यानिमित्ताने अंधेरीत आयोजित केलेल्या एका सोहळ्यात मुंबई-नागपूर दूरांतो एक्स्प्रेस, मुंबई-कारवार सुपरफास्ट एक्सप्रेस आणि पुणे-सोलापूर सुपरफास्ट इंटरसिटी एक्स्प्रेस या तीन नव्या गाड्या तसेच पंधरा डब्यांच्या लोकलला त्यांनी हिरवा कंदिल दाखवला। मराठीत सुरुवात करून नंतर हिंदीत बोलणाऱ्या ममता बॅनजीर्ंच्या भाषणात मुंबई, महाराष्ट्र आणि मराठी भाषेवरील प्रेमाचा सातत्याने उल्लेख येत होता। 'मुंबईतील सर्व प्रश्नांची आपल्याला कल्पना आहे। मराठी चांगले समजते पण बोलू शकत नाही। जय हिंद, जय महाराष्ट्रही बोलू शकते. त्यात कमीपणा नाही,' असे सांगत भाषणाचा समारोप त्यांनी खरोखरीच 'जय महाराष्ट्र-जय मुंबई' अशा अभिवादनाने केला. मुंबईवरील प्रेम व्यक्त करताना 'रोशनी चांद से होती है सितारो से नही... मोहब्बत मुंबई से होती है हजारो से नही' हा शेरही ऐकवला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री अशोक चव्हाण, उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, खासदार अनंत गीते, संजय निरूपम, आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी, आमदार राजहंससिंह आदी उपस्थित होते. अनाउन्समेंट्स... *आथिर्क दुर्बल परीक्षाथीर्ंना पोस्टल ऑर्डर माफ *२६/११ हल्ल्यातील शहिदांच्या स्मरणार्थ मुंबईत म्युझियम *म्युझियममध्ये लाइट अँड साऊंड शो *प. रेल्वेवर लोकलच्या ३५ जादा फेऱ्या *चर्चगेट-सीएसटी जमीनवरील किंवा भूमिगत रेल्वेमार्गाची चाचपणी *दिल्ली-मुंबई राजधानी एक्स्प्रेस अंधेरीतही थांबणार *रेल्वेच्या जागेत मुंबई, पुण्यात ऑटोमोबाइल हब

मुंबई शेअर बाजाराची आता मराठी वेबसाईट

सकाळ वृत्तसेवा
Sunday, November 22, 2009 AT 12:00 AM (IST)
Tags: mumbai, share market, website
मुंबई - मुंबई शेअर बाजाराची वेबसाईट आठ दिवसांत मराठी भाषेतही देण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज दिला. त्यानंतर शेअर बाजाराच्या संचालकांनी ही वेबसाईट 15 दिवसांत मराठीतून करण्याचे आश्‍वासन दिले आहे.मुंबई शेअर बाजारने नुकतीच आपली वेबसाईट लॉंच केली. ही वेबसाईट इंग्रजी, गुजराती व हिंदी भाषांमध्ये आहे. मात्र मराठी भाषेला डावलण्यात आले आहे. यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष अरविंद गावडे यांनी आज सेबीचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषकुमार चौहान यांची भेट घेतली आणि आठ दिवसांत शेअर बाजाराची वेबसाईट मराठीतून सुरू करण्याची आग्रही मागणी केली. वेबसाईट मराठीत सुरू न केल्यास मनसे आपला हिसका दाखविल, असा इशारा गावडे यांनी चौहान यांनी दिला. त्यावर चौहान यांनी मनसेच्या शिष्टमंडळाचे निवेदन स्वीकारीत त्यांची मागणी मान्य केली. येत्या 15 दिवसांत वेबसाईट मराठीतून सुरू करण्याचे आश्‍वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले.

मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा

हा माझा पहिलाच प्रयत्न आहे ब्लॉग निर्माण करायचा आणि त्यावर स्वताचे मत माडंण्याचा