सकाळ वृत्तसेवा
Sunday, November 22, 2009 AT 12:00 AM (IST)
Tags: mumbai, share market, website
मुंबई - मुंबई शेअर बाजाराची वेबसाईट आठ दिवसांत मराठी भाषेतही देण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज दिला. त्यानंतर शेअर बाजाराच्या संचालकांनी ही वेबसाईट 15 दिवसांत मराठीतून करण्याचे आश्वासन दिले आहे.मुंबई शेअर बाजारने नुकतीच आपली वेबसाईट लॉंच केली. ही वेबसाईट इंग्रजी, गुजराती व हिंदी भाषांमध्ये आहे. मात्र मराठी भाषेला डावलण्यात आले आहे. यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष अरविंद गावडे यांनी आज सेबीचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषकुमार चौहान यांची भेट घेतली आणि आठ दिवसांत शेअर बाजाराची वेबसाईट मराठीतून सुरू करण्याची आग्रही मागणी केली. वेबसाईट मराठीत सुरू न केल्यास मनसे आपला हिसका दाखविल, असा इशारा गावडे यांनी चौहान यांनी दिला. त्यावर चौहान यांनी मनसेच्या शिष्टमंडळाचे निवेदन स्वीकारीत त्यांची मागणी मान्य केली. येत्या 15 दिवसांत वेबसाईट मराठीतून सुरू करण्याचे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment