कल्याण-डोंबिवलीच्या महानगरपालिका निवडणुकीवेळी‘ वचकनामा’ जाहीर करणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता तिथल्या सत्ताधा-यांवर वचक ठेवायला सज्ज झाली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज कडोंमपाचे आयुक्त रामनाथ सोनावणे यांची भेट घेऊन शहराचा विकास आराखडा त्यांना सादर केला. त्यानुसार काम होतं की नाही, याकडे आता त्यांचे सैनिक आपल्या स्टाइलने लक्ष ठेवतील.
कल्याण-डोंबिवलीच्या निवडणुकीत मनसेनं जोरदार मुसंडी मारली होती. पहिल्यांदाच इथल्या निवडणूक रिंगणात उतरलेल्या राज यांच्यावर जनतेनं विश्वास दाखवला होता. तो विश्वास सार्थ ठरवण्याच्या दृष्टीनंच मनसे कामाला लागल्याचे संकेत आज मिळाले. राज यांनी थेट महापालिका आयुक्तांची भेट घेऊन शहराच्या विकासासंबंधी महत्त्वाच्या सूचना केल्या आणि एक आराखडाही त्यांना दिला.
रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसवणं आधी बंद करा, असं राज यांनी ठणकावून सांगितलंय. पेव्हर ब्लॉक बनवणारी एक टोळीच आहे. नगरसेवकांना पैसे देऊन ते ही कामं काढतात. काही दिवसांतच हे रस्ते खराब होतात आणि तेच त्यांना हवं असतं. हे प्रकार टाळण्यासाठी संपूर्ण शहराचं काँक्रिटीकरण करावे, अशी

No comments:
Post a Comment