म टा च्या सौजन्याने
गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मराठी चित्रपटांचा झेंडा मानाने लहरत असतानाच राष्ट्रीय पुरस्कारांच्या यादीतही मराठी
चित्रपटांना मानाचा मुजरा मिळावा हा केवळ योगायोग नाही। गेल्या काही वर्षांपासून मराठी सिनेमाने कात टाकली आहे. चाकोरीबाहेर जाऊन वेगळे विषय वेगळ्या पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न मराठी सिनेमाने सुरू केला आहे. त्याचेच फळ म्हणून राष्ट्रीय पुरस्कारांत जोगवा आणि गंध या मराठी चित्रपटांनी मानाचे स्थान पटकावले आहे. उपेन्द लिमये यांना उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाल्याने अभिनयाच्या क्षेत्रात मराठी कलावंतांचे श्रेष्ठत्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. अजय-अतुल हे आज भारतीय चित्रपट संगीताच्या क्षेत्रात गाजणारे नाव आहे. मराठीच नव्हे तर अन्य भाषांतील चित्रपटही त्यांच्या संगीताने गाजत आहेत. त्यांना सवोर्त्कृष्ट संगीतकार म्हणून मिळालेल्या पुरस्कारामुळे आता त्यांची हिंदी चित्रपटसृष्टीतही दखल घेतली जाईल यात काही शंका नाही. हरिहरन हे हिंदी चित्रसृष्टीतले नामवंत गायक पण यावेळचा सवोर्त्कृष्ट गायकाचा पुरस्कार त्यांना जोगवा या मराठी चित्रपटातील गाण्यासाठी मिळावा हे संगीत क्षेत्रावर मराठीचे सध्या असलेले वर्चस्व स्पष्ट करणारे आहे. यावषीर् मराठीत अत्यंत वेगवेगळ्या विषयांवरचे, पेक्षकांना विचार करायला लावणारे अनेक चित्रपट निघाले. त्यामुळे मराठीत मोठ्या ताकदीेचे अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक, संगीतकार आहेत हे दिसून आले आहे. यातल्या काही मंडळींना हिंदी चित्रपटसृष्टीही खुणावू लागली आहे.

Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment