म टा च्या सौजन्याने
7 Jan 2010, 0116 hrs IST
आशिष पाठक
विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बाजी मारत कल्याण पश्चिम व कल्याण ग्रामीण अशा दोन जागा अगदी सहज काबीज केल्या. त्यामुळे आता महापालिकेवर मनसेचा झेंडा फडकवायचाच या बुलंद इराद्याने मैदानात उतरलेल्या मनसैनिकांना थेट राज ठाकरे यांची जाहीर सभा होत असल्याने आणखी बळ मिळाले आहे. विशेष म्हणजे या सभेने मनसेच्या प्रचाराचा नारळ फुटणार असल्याने मनसैनिक जोमाने कामाला लागले आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या चौथ्या सार्वत्रिक निवडणुकीचे वेध लागत असताना, आयाराम गयारामच्या चचेर्ला सुरूवात झाली आहे. दीड महिन्यापूवीर् भाजपचे कल्याण मतदारसंघाचे माजी आमदार हरिश्चंद पाटील यांनी पक्षाचा राजीनामा दिला. त्यानंतर ते लगेचच समर्थकांसह दुसऱ्या कोणत्या तरी पक्षात प्रवेश करतील अशी अटकळ होती. पक्षाचे राष्ट्रीय नेते गोपीनाथ मुंडे यांचे खंदे समर्थक असलेल्या आमदारकीची उमेदवारी मिळवण्यात अपयश आले असले, तरी शहरातील राजकीय वाऱ्याची दिशा पाटील यांनी ओळखली आहे. यापुढील निवडणुकीत मनसे कल्याण-डोंबिवलीत जोरदार मुसंडी मारणार हे पाहून त्यांनी या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांच्यासोबत कल्याणचे जिल्हाध्यक्ष व ज्येष्ठ नगरसेवक दिनेश तावडे व अन्य काही महत्त्वाचे कार्यकतेर् होते. माजी आमदार पक्षात येत असल्याने त्यांना तातडीने पक्षात प्रवेश दिला जाण्याची अपेक्षा असताना प्रत्यक्षात तसे घडले नाही. प्रवेश देताना राज ठाकरे यांनी डोंबिवलीत यावे आणि जाहीरपणे प्रवेश द्यावा अशी गळ या कार्यर्कत्यांकडून घालण्यात आली. त्यामुळे प्रवेश रखडला. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी नुकतीच आटोपल्याने राज ठाकरे यांनी कोठेही जाहीर सभा न घेण्याचे ठरवले. जानेवारी महिन्यात ते राज्याच्या दैाऱ्यावर निघाले असून, फेब्रुवारी महिन्यात पहिल्या आठवड्यात डोंबिवलीत जाहीर सभा घेणार आहेत. त्यामुळे या सभेत भाजपमधून येणाऱ्यांना मनसेत प्रवेश दिला जाईल अशी शक्यता आहे. डोंबिवलीत रवींद चव्हाण यांनी मनसेचे कडवे आव्हान मोडून काढले असले, तरी त्यांना भाजपच्या छुप्या विरोधाला तोंड द्यावे लागले. भाजपच्या विचारसरणीवर दृढ विश्वास असणाऱ्या सामान्य डोंबिवलीकरांमुळे ते विधानसभेवर निवडून येऊ शकले. परंतु, महापालिका निवडणुकीत पुन्हा याची पुनरावृत्ती होऊ शकेल याची खात्री कोणीच देऊ शकत नाही. डोंबिवलीत भाजपची लोकप्रियता घसरणीला लागली आहे हे निविर्वाद सत्य आहे. पक्षाचे नगरसेवक खाजगीत उघडपणे त्याची कबुलीही देतात. एकमेकांचे पाय खेचण्यात या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या मनोवृत्तीमुळे कार्यकतेर् मात्र सैरभैर आहेत. त्यांना निश्चित अशी दिशा देऊ शकणारा एकही नेता नाही. एकीकडे भाजपची प्रकृती खालावत असताना मनसे मात्र तगडा पक्ष म्हणून उदयाला येत आहे. त्यात दोन आमदार प्रचारात उतरणार असल्याचा फायदा मनसैनिकांना मिळेलच. मागील निवडणुकीच्या निकालावर नजर फिरवली तरी हे सहज लक्षात येते की डोंबिवलीकरांनी वर्षांनुवर्ष राजकारणात असणाऱ्या बड्या नेत्यांऐवजी तरुण चेहऱ्यांना निवडून दिले. त्यामुळे यंदाही तेच घडणार हे स्पष्ट आहे. भाजपसारखीच परिस्थिती शिवसेनेची आहे. सेनेचे डोंबिवलीतील नगरसेवक राजेश चूडनाईक यांनी मनसेत प्रवेश करण्याचे आधीच जाहीर केले आहे. ते राज ठाकरे यांच्या सभेत शिवसेनेला सोडचिठ्ठी देतील. त्यांच्यासह डोंबिवलीतील सेनेचे २ नगरसेवक मनसेच्या संपर्कात आहेत. महापालिका निवडणूक नऊ महिन्यांवर आली असताना राजीनामा देऊन पोटनिवडणूक लढवण्याऐवजी कागदावर सेनेतच पण मनाने मनसेत राहणे ते पसंत करतील हे उघड आहे. खिंडार फक्त डोंबिवलीतच नाही तर कल्याण, अंबरनाथ व उल्हासनगरातही पडू शकते. कल्याणात प्रकाश भोईर यांच्यासारखा फारसा परिचित नसलेला पण धडाडीचा कार्यकर्ता सहज आमदार झाला. भोईर यांच्या यशामुळे इतर पक्षांचे कार्यकतेर् मनसेकडे आकषिर्त झाले असून या पक्षाच्या लाटेवर स्वार होत आपण नगरसेवक होऊ शकतो असे त्यांना वाटू लागले आहे. त्यामुळे कार्यकतेर् मोठ्या प्रमाणावर मनसेत प्रवेश करतीलच शिवाय कल्याणातील काही नगरसेवकही मनसेच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत. केडीएमसीच्या निवडणुकीआधी अंबरनाथ नगरपरिषदेची निवडणूक होत आहे. त्यासाठीची आचारसंहिता कदाचित फेबुवारी महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात जारी होईल. हातात फारसा वेळ नसल्याने मनसेचा झेंडा हातात घेण्यासाठी इच्छुक असलेले नगरसेवक डोंबिवलीतील सभेत काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकांनी २००९ मध्ये बरीच धामधूम होती. २०१० मध्ये नवी मुंबई व कल्याण डोंबिवली या महापालिका आणि अंबरनाथ व बदलापूर या नगरपरिषदांच्या निवडणूका होत आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे या मनसेच्या तोफेच्या बारांमुळे येथील राजकीय वातावरण खऱ्या अर्थाने तापू लागणार हे निश्चित.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment