Wednesday, January 6, 2010

‘झेंडा’वर मनसेचा आक्षेप, तरीही फडकणार!

मित्रानो, आत्ताच म टा मधे ही बातमी वाचली आणि लगेचच ब्लॉग वर टाका वीशी वाटली। अवधूत गुप्ते ची शिवसेने शी असलेली ज़वळीक सगळ्याना ठाउकच आहे आणि आम्हाला नाही वाटत की तो मनसे ला ह्या चित्रपटातुन काही न्याय देइल । राज साहेबानी सांगितल्या प्रमाने जर त्यांच्या वर टिका करून कोणी मराठी दिग्दर्शकाचा चित्रपट चालत असेल तर ठीक आहे आणि आम्हाला त्यावर आक्षेप नाही कारण प्रेक्षकच ठरवतील कोणाचा झेंडा खाद्यां वर घ्यायचा । काय बरोबर की नाही ?
विनोद शिरसाठ


मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
ठाकरे घराण्याच्या राजकारणावर भाष्य करणारा आणि त्यांच्या व्यक्तीरेखांशी साम्य असणारा अवधूत गुप्तेचा ‘ झेंडा ’ या चित्रपटातील दोन दृश्यांबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्षेप घेतला आहे. अवधूतच्या या चित्रपटाचे खास स्क्रिनिंग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी करण्यात आले होते. त्यावेळी मनसेच्या नेत्यांनी ‘ झेंडा ’ चे रंग तपासले. त्यात मनसेसाठी यातील काही रंग भडक असल्याचे त्यांच्या लक्षात आले. ‘ झेंडा ’ ला क्लीन चिट मिळण्यासाठी मुंबईच्या फेमस थिएटरमध्ये बुधवारी शो आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मनसेचे चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर, सरचिटणीस शालिनी ठाकरे, संदीप देशपांडे, गजानन राणे, शशांक नागणेकर, गिरीष धारकर उपस्थित होते. चित्रपट पाहिल्यानंतर खोपकर यांनी राज ठाकरे यांच्याशी संपर्क साधला. त्यावर माझी बदनामी करून जर मराठी दिग्दर्शकाचा चित्रपट चालत असेल तर मला आनंदच आहे, असे राज ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले. केवळ आक्षेप नोंदवून चित्रपट प्रदर्शनाला हिरवा कंदील दाखवला. मनसेने ज्या दोन सीन बद्दल आक्षेप घेतला आहे, त्यातील एका सीनमध्ये राज ठाकरेंच्या व्यक्तिरेखेशी साधर्म्य असलेला कलाकार गड्याला आपल्या कपातील उरलेला चहा देतो. तसेच दुस-या सीनमध्ये इफ्तार पार्टीत जाऊन तो कलाकार टोपी घातलो तसेच हुक्का पितो. हे दोन्ही चुकीचे सीन्स दाखवून राज ठाकरेंची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. हा चित्रपट एकांगी आहे, एका पक्षाला झुकते माप दिले आहे, असे अमेय खोपकर यांनी सांगितले. राज ठाकरेंच्या रुपाने महाराष्ट्राला महानायक मिळालेला आहे. महाराष्ट्र टाइम्सच्या सर्वेत हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे एखादा चित्रपट राज ठाकरेंची प्रतिमा मलिन करू शकत नाही, असेही खोपकर यांनी स्पष्ट केले. या संदर्भातील आक्षेप आम्ही अवधूत गुप्ते याच्याकडे नोंदविला आहे. त्यांनी पुढील कारवाई करायची आहे. चित्रपटाचे प्रिन्ट सर्व थिएटरमध्ये पोहचले असल्याने राज ठाकरे मराठी माणसाला नुकसान होवू नये असे कोणतेही काम न करण्याचे आदेश दिले आहेत, असेही खोपकर यांनी सांगितले.

6 comments:

  1. "आम्हाला नाही वाटत की तो मनसे ला ह्या चित्रपटातुन काही न्याय देइल"

    चित्रपट मनोरंजनासाठी असतो... एखाद्या राजकिय पक्षाला न्याय देण्यासाठी किंवा कुणाची प्रतिमा मलिन करण्यासाठी नव्हेच...

    ReplyDelete
  2. varachya pratikriyeshi agadi sahamat ahe

    ReplyDelete
  3. मान्य आहे की कोणताही चित्रपट हा कोणत्याही पोलिटिकल पक्षा ला न्याय देन्या करता किव प्रतिमा मलिन करण्या करता नाही । पण अवधूत ने नेमका हाच विषय का निवडावा आणि त्यात मनसे साधर्म्य असलेल्या पक्षाला खलनायकी रंग द्यावा हा काही योगायोग नाही । चित्रपट हे लोक प्रिय माध्यम आहे आणि त्या द्वारे जर कोणी चुकीचा सन्देश देत असेल तर त्यावर मत व्यक्त करने गरजेचं आहे आणि त्यात काहीच चुक नाही असं माझं मत आहे।
    विनोद शिरसाठ

    ReplyDelete
  4. मान्य आहे की कोणताही चित्रपट हा कोणत्याही पोलिटिकल पक्षा ला न्याय देन्या करता किवां प्रतिमा मलिन करण्या करता नाही । पण अवधूत ने नेमका हाच विषय का निवडावा आणि त्यात मनसे साधर्म्य असलेल्या पक्षाला खलनायकी रंग द्यावा हा काही योगायोग नाही । चित्रपट हे लोक प्रिय माध्यम आहे आणि त्या द्वारे जर कोणी चुकीचा सन्देश देत असेल तर त्यावर मत व्यक्त करने गरजेचं आहे आणि त्यात काहीच चुक नाही असं माझं मत आहे।
    विनोद शिरसाठ

    ReplyDelete
  5. kare sangayache tar halli thoda drama kelyashivay kuthaleech goshta lokanparyant jat nahi.moviechi hawa tar tayar zali ! avadhootcha 'zenda'tar phadakala! guptesaheb aage badho...!

    ReplyDelete
  6. avdhutchya besur (junya ganyanchi virkuti) ganyan pramanech manse chya babtit sur chukla tari pahila prayatna mhanun baki chitrapat changla hota.

    ReplyDelete