अवधूत गुप्ते नी "कोणाच्या" तरी सांगण्या वरून हात दाखवून अवलक्षण केले आहे । त्याला कोणाचा उद्धार करायचा आहे ते सर्व श्रुत आहे । आम्ही काय ह्याला दूध खुळे वाट्लो की काय ? आणि हो पिक्चर काढून जर लोक मागे येत असतील तर मग संपलच सगळं , काय?
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
राज ठाकरे यांनी ' झेंडा 'सिनेमाच्या प्रदर्शनाला कोणताही विरोध केला नसतानाही मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यात वंदना थिएटरमध्ये झेंडा सिनेमाचा विरोध सुरू केला आहे। सिनेमाचा पहिला शो संपण्याच्या सुमारास कार्यकर्त्यांनी थिएटर बाहेर आंदोलन सुरू केले.
सिनेमात शेवटच्या दृश्यात एका नेत्याला अटक करण्याचा आदेश दिल्याचे दाखवण्यात आले आहे। या दृश्याबाबत मनसेच्या चित्रपट विभागाच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. सिनेमा काल्पनिक कथेवर आधारित असल्याचा बनाव रचून राज ठाकरे यांच्यासारख्या दिसणा-या कलाकाराला व्हिलन करण्यात आले आहे. शेवटच्या दृश्यात या नेत्याला अटक करण्याचा आदेश देत अप्रत्यक्षपणे राज यांचीच बदनामी करण्यात आल्याचा आरोप मनसेने केला आहे.
मनसेच्या चित्रपट विभागाचे प्रमुख अमेय खोपकर यांनी ‘ झेंडा ’ तील दृश्यांमुळे भावना दुखावल्याने कार्यकर्त्यांनी सिनेमाला विरोध सुरू केल्याचे सांगितले।
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment