Tuesday, December 15, 2009

रक्त पुरवठा नाही म्हणून मुंडकं छाटायचं? : राज

मित्रानो, महाराष्ट्रा पासून विदर्भ वेगळा करण्यास आमचा विरोध आहे। मान्य आहे की आपल्या सर्व राजकार्न्यानीं स्वता च्या भागाचा विकास केला आणि विदर्भ , मराठ्वाड्या सारखा भाग दुर्लक्षित ठेवला, पण त्याचा अर्थ असा नाही की आपण आपला भूभाग तोडून नवं राज्य स्थापन कराव । हा सत्ताधारी पक्षाचा इच्छा शक्तीचा प्रश्न आहे, जर त्यान्च्या मनात विदार्भाचा विकास करायचे असेल तर तो होणार पण त्याना जर काहीच करायचे नसेल तर मग मात्र तुम्ही त्याना सत्तेतुन खाली खेचन्या शिवाय कही करू शकत नाही। महाराष्ट्रा नव निर्माण सेनेने आपले मत ह्या बाबतीत आधीच नक्की केलेले आहे की ते सर्व महाराष्ट्राच विकास करू इछितात आणि राज साहेबांचे खालील मत हे त्यावर शिक्का मोर्तबच करतं ।

15 Dec 2009, 1728 hrs IST
मटा ऑनलाइन वृत्त ।

नागपूर मेंदूला रक्त पुरवठा होत नसेल तर काही धडापासून मुंडकं छाटले जात नाही, असाच प्रकार स्वतंत्र विदर्भाची मागणी करून केला जात आहे। त्यामुळे संयुक्त महाराष्ट्राला पन्नास वर्षे पूर्ण होत असताना महाराष्ट्राच्या विभाजनाची गोष्ट उभी राहते, ही दुदैवी बाब असल्याचे सांगून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतंत्र विदर्भाला विरोध केला आहे।

महाराष्ट्रापासून विदर्भ स्वतंत्र झाला तर विदर्भाचे प्रश्न सुटणार नाही. विदर्भासाठी काँक्रिट प्लॅन आखला पाहिजे. त्यानंतर विदर्भाचा खरा विकास होई शकेल. विदर्भातील खासदार विलास मुत्तेमवार यांनी स्वतंत्र विदर्भाची मागणी केली. या राज्यात गेल्या ५० वर्षांपासून काँग्रेसचे राज्य होते. त्यांनीच विदर्भावर अन्याय केला. मुत्तेमवार हे आपल्या पक्षातील नेत्यांना सवाल का विचारत नाही. त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून स्वतंत्र विदर्भाची मागणी करावी, अशी खोचक सूचना राज ठाकरे यांनी केली. विदर्भातील नेत्यांशी आणि विविध क्षेत्रातील लोकांशी चर्चा केली. त्यांचा राग मी समजू शकतो. परंतु, काँग्रेसच्या नेत्यांचा हेतु बद्दल मला शंका वाटते. रागावर उपाय असतो हेतूवर उपाय नसतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले. विदर्भातील ५० आमदार आणि ७ खासदारांनी वेगळ्या विदर्भाची मागणी केली असली तरी हा खूप संवेदनशील विषय आहे. यासाठी मग सार्वत्रिक जनमत चाचणी घ्यावी, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली. महाराष्ट्र हा माझा मतदारसंघ आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचा विकास हे माझे स्वप्न आहे. शरद पवार हे चार वेळा मुख्यमंत्री झाले. त्यांनी केवळ बारामतीचा केला. त्यांनी इतर महाराष्ट्राकडे दुर्लक्ष केले. बारामतीसारखा विकास हा संपूर्ण महाराष्ट्राचा व्हावा, असे कधी शरद पवारांना वाटले नाही. आता विदर्भाचा विकास व्हावयाचा असेल तर डॉक्टर बदलायला हवे, असेही त्यांनी सांगितले.

2 comments:

  1. अहो मनसैनिक, रक्तस्राव नव्हे रक्तपुरवठा म्हणा. जखमेतून जे रक्त बाहेर येतं त्याला रक्तस्त्राव म्हणतात. आतल्या आत होतो तो पुरवठा किंवा अभिसरण.

    ReplyDelete
  2. Tumhi mhantay te barobar aahe Sadhak, Actually ha mathala mi Maharashtra Times madhun ghetla aani tasach post kela .... nantar lakshat aale ki to chuckicha aahe aani nantarchya news madhe Rakta puravatha chach artha abhipret aahe mhanun mathala change nahi kela .... Dhanyawad ... lagechach badalto ..

    ReplyDelete