Sunday, December 6, 2009

म. टा. लेख : मुंबई हे महाराष्ट्रीयांचेच घर

मित्रानो आज महाराष्ट्र टाइम्स मधे बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तकावर आधारित "मुंबई हे महाराष्ट्रीयांचेच घर" हा लेख प्रसिद्ध झाला आहे। हा लेख खालील पत्त्यावर देखिल मिळू शकतो http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5306204.cms

माझ्या मते मुंबई ह्या शहराची खरी हद्द ही कर्जत कसार्या पर्यन्त आहे कारन आज ह्या शहरात खरं काम करणारा मानुस सुबर्बन शहरातून येतो। मला कळत नाही की आपण कल्याण आणि डोम्बिवली सारखी शहर मुंबई मधे नाही असं कसं म्हनू शकतो ? जर आपण मुंबई ची सीमा वाढवली तर हा प्रश्न आपोआप निकाली निघेल, असं माझं स्पष्ट मत आहे। मुंबई हा महाराष्ट्राचा एक अविभाज्य घटक आहे आणि राहणार। त्याकडे जर कोणी वाकड्या नजरेने पाहिले तर महाराष्ट्रातला एकून एक तरुण पेटून उठल्याशीवाय राहणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे।

जय हिंद जय महाराष्ट्र
म। टा। (दिनांक ०६/११/२००९ )

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या 'थॉट्स ऑन लिंग्विस्टिक्स स्टेट' या पुस्तकात महाराष्ट्राच्या चार मराठी भाषक राज्यांची मांडणी केली होती। त्यांचे निकटचे सहकारी वि.तु. जाधव यांनी या पुस्तकाचा मराठी अनुवाद प्रसिद्ध केला. डॉ. बाबासाहेबांनी २३ डिसेंबर १९५५ रोजी औरंगाबादमध्ये लिहिलेली प्रस्तावना त्यात समाविष्ट होती. हे पुस्तक नंतर दुर्मीळ झाल्याने मोठ्या परिश्रमाने संजय कोचरेकर यांनी ते पुनर्मुद्रित केले. पँथर प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या या पुस्तकातील हा काही अंश. .......

मुंबई शहराच्या लोकसंख्येमध्ये महाराष्ट्रीय बहुसंख्य नाहीत असा एक युक्तीवाद नेहमी पुढे केला जातो। खरे पाहता मुंबई शहरातील महाराष्ट्रीय संख्या पुरेशी बहुसंख्य आहे. मराठी लोकसंख्या चांगली ४८ टक्के आहे.

१९४१च्या खानेसुमारीप्रमाणे मुंबई शहाराचे क्षेत्र ३० चौरस मैल आहे. मुंबई शहरामध्ये मराठी भाषिकांची संख्या ५० टक्क्यांहून कमी आहे हे खरे, पण ही एकच गोष्ट काही निर्णायक नाही. याखेरीज आणखी दोन महत्त्वाच्या बाबींचा विचार झाला पाहिजे. त्यातील एक बाब अशी की, मुंबई शहरामध्ये महाराष्ट्रीय जरी अल्पसंख्याक आहेत तरी त्यामुळे मुंबईवरील महाराष्ट्राचा हक्क कोणीही नाकबूल करणार नाही। इतकेच नव्हे तर गुजरात प्रदेश कॉंग्रेस समितीच्या एका भाषणात प्रत्यक्ष मुरारजी देसाई यांनी मुंबई महाराष्ट्राचाच भाग आहे ही वस्तुस्थिती कबूल केली आहे. दुसरी बाब ही की, भारताच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या लोकांची रीघ लागली आहे. कोणी रोजगारासाठी आले आहेत. तर कोणी व्यापारात फायदा मिळविण्यासाठी आले आहेत. अशा लोकांचा मुंबईतील लोकसंख्येत समावेश करणे अनिष्टच ! अशा लोकांना मुंबई हे काही आपले घर आहे असे वाटत नाही. ते मुंबई शहराचे कायमचे नागरिक नव्हेत. रोजगार करतात, काही दिवस येथे राहतात आणि इतरत्र आपल्या प्रांतात जातात. मुंबई हे महाराष्ट्रीयांचेच घर आहे आणि इतर कुणाचेही नाही. मुंबई शहरात बहुसंख्य कोण आहेत हा निर्णय घेताना महाराष्ट्रीयेतरांना जमेस धरणे तर्कदुष्ट आणि अन्यायकारक आहे.

मुंबई शहरामध्ये परप्रांतांतून येणा-या लोकांच्या आयातीवर निर्बंध टाकणारा कोणताही स्थानिक कायदा नसल्याने महाराष्ट्रीयेतरांची संख्या येथे वाढली हे यांनी लक्षात घेतलेले दिसत नाही। मुंबई राज्यात अशा त-हेचा निर्बंधक कायदा असता तर परप्रांतीयांना मुंबईचा दरवाजा बंद झाला असता. साहजिक मुंबई शहरात महाराष्ट्रीयच बहुसंख्यांक राहिले असते. दुसरी एक गोष्ट यांनी लक्षात घेतलेली दिसत नाही ती ही की, परप्रांतीयांचा आणि परदेशीयांचा लोंढा लागला याचे मुख्य कारण म्हणजे मुंबई शहर हे पश्चिम किनाऱ्यावरील अत्यंत महत्त्वाचे बंदर होय. युरोपला मदास कलकत्यापेक्षा मुंबईच अधिक जवळची आणि याच कारणामुळे हिंदुस्थानातील कुठल्याही भागात राहणारे लोक आपली घरे सोडून मुंबईत येतात. मुंबईत नोकऱ्या मिळणेही सोपे जाते. दुसरीकडे ते शक्य नाही.

खरे पाहू गेले असता मुंबईच्या प्रश्नाकडे याहून भिन्न दृष्टीने पाहिले पाहिजे। गेली दोन शतके बाहेरून मुंबईत लोक येऊ लागले आहेत. इतके असूनही मुंबई शहरातील महाराष्ट्रीय लोकसंख्या ४८ टक्क्यांहून कमी झालेली नाही. दोनशे वर्षांच्या एवढ्या कालावधीत महाराष्ट्रीय लोकसंख्या एकंदर लोकसंख्येच्या मानाने अविच्छिन्न राहिली आहे.

मुंबईच काही बहुरंगी शहर नाही। कलकत्ता आणि मद्रास ही देखील मुंबईप्रमाणेच बहुरंगी आहेत. जर कलकत्ता पश्चिम बंगालमध्ये राहू शकते आणि मद्रास मद्रास राज्यातून काढून टाकता येत नाही तर मग महाराष्ट्रातच मुंबई रहायला एवढे आकांडतांडव का? प्रत्येक महाराष्ट्रीय हाच प्रश्न विचारत आहे. या प्रश्नाला माझ्याकडे तरी काही उत्तर नाही. मात्र या समस्येमुळे एक शंका मनात उद्भवते ती ही की, महाराष्ट्रीय राज्य करण्यास असमर्थ आहोत असे कॉंग्रेस श्रेष्ठींना वाटत असावे. मराठी बाण्याचा हा अपमान आहे. आणि हा अपमान हे कधीही सहन करणार नाहीत.

महाराष्ट्रीयेतरांच्या भांडवलावर मुंबई शहर उभारले गले असे म्हटले जाते. असेलही कदाचित! परंतु मद्रास हे काय मद्रासी भांडवलाने बांधले गेले आहे? आणि निव्वळ बंगाली भांडवलावर कलकत्ता निर्माण झाले? युरोपियन देशांचे भांडवल येथे गुंतवले गेले नसते तर ही शहरे स्मशानावत् राहिली असती. पण जेव्हा महाराष्ट्रीय मुंबईवर हक्क सांगतात तेव्हा हा भांडवलशाही युक्तीवाद पुढे का केला जातो? मुंबई शहरासाठी जर महाराष्ट्रीयांनी श्रम केले नसते मुंबई वैभवशाली दिसली नसती. मुंबईची नाडी महाराष्ट्रात आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. मुंबईस लागणारी वीज महाराष्ट्रातून निर्माण होते. पाण्याचा पुरवठाही महाराष्ट्रातून होतो. उद्योगधंद्यासाठी कामगारांचा पुरवठा महाराष्ट्र करतो. महाराष्ट्राच्या मनात आले तर मुंबई शहराचे मोहेंजोदारो उर्फ मृतनगरी व्हायला क्षणाचाही विलंब लागणार नाही.

1 comment:

  1. Thats not the fault of Marathi (language). Offcourse Marathi is our mother tongue and we should respect it. Its the problem with how Marathi man from so called Western Maharashtra treats another Marathi man of undeveloped region of Maharashtra. If you look at the history of Maharashtra post 1947, politicians from Western Maharashtra exploited Vidarbha for their region's development thats the reasons economic, agriculture, irrigation backlog of Vidarbha is increasing day-by-day. Thats the total exploitation of Vidarbha. If any one attacks our Marathi language I will condemn but the issues raised by Raj Thakrey related to outsiders and non-marathis are useless. Firstly, We should learn how to treat fellow Marathi manoos from underdeveloped / undeveloped backward regions of Maharashtra otherwise farmers / sons of farmers who committed suicide may join Naxalite movement.

    ReplyDelete