Wednesday, December 23, 2009

शिशिर शिंदे यांचे निलंबन शपथेपुरते रद्द

23 Dec 2009, 1119 hrs IST

म। टा. विशेष प्रतिनिधी ।

नागपूर मनसे नेते शिशिर शिंदे यांचे निलंबन शपथ घेण्यापुरते रद्द करण्यात आले आहे. बुधवारी विधानसभेत संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी एक निवेदन वाचून ही माहिती दिली. शिंदे विधानसभा अध्यक्षांच्या दालनात सदस्यत्वाची शपथघेतील , त्यानंतर निलंबन पुन्हा लागू होणार आहे. विधानसभेच्या कारवाईमुळे आमदारकीचीनिवडणूक जिंकली असुनही निलंबन रद्द होईपर्यंत शिंदे यांना सभागृहात प्रवेश करता येणार नाही. समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी विधानसभेच्या सदस्यत्वाची शपथ हिंदीतून घेत होते. त्यावेळी मराठीतूनच शपथ घ्या असा आग्रह करत , मनसेच्या चारआमदारांनी आझमी यांना शपथ घेण्यापासून अडवण्याचा प्रयत्न केला होता. या संपूर्णघटनेचा निषेध करत विधानसभेच्या शिस्तपालन समितीने शिशिर शिंदेसह मनसेच्या चार आमदारांवर निलंबनाची कारवाई केली होती. मात्र निलंबित झालेल्यांपैकी शिंदे यांनी आमदारकीची शपथ घेतली नसल्याचे मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले होते. या पार्श्वभूमीवर फक्त शपथ घेण्यापुरती शिशिर शिंदे यांच्यावरील निलंबनाची कारवाई रद्द करण्यात आली आहे. दरम्यान , शिस्तपालन समितीने केलेल्या कारवाईमुळे मनसेच्या निलंबित झालेल्या आमदारांना विधीमंडळाच्या परिसरात प्रवेश करण्यासच मनाई करण्यात आली आहे. फक्त शिंदे यांना शपथ घेण्यापुरती सूट देण्यात आली असून ते विधानसभाध्यक्षांच्या दालनात शपथ घेऊन लगेच विधीमंडळ परिसरातून बाहेर पडणार असल्याचे समजते.

No comments:

Post a Comment