Thursday, December 24, 2009

शिवसेनेच्या दबावापोटी भाजपने सोडली मनसेची साथ

मित्रानो, आज सकाळीच पुन्यनगरी मधे बातमी वाचली की मनसे विधानसभेत स्वताचा गट स्थापन करनार आहे। बरे झाले, जर शिवसेना आणि त्यांच्या दबावामुळे भाजपा मनसे ला कुठल्याही चर्चे करता बोलवत नसतील तर स्वताचा गट स्थापन करने गरजेचं होतं । जर सर्व विरोधी पक्ष एकत्र राहिले असले तर चांगलेच झाले असते पण काय करणार , शिवसेनेच्या आड्मुठ्या धोरनामुळे ते होणं शक्य नाही। मनसे ने स्वताचा गट स्थापन करून जनतेचे प्रश्न तडीस न्यावे हीच विनंती। तुमच्या सोबत शेयर करीत आहे ह्या संदर्भातील सकाळ मधील बातमी।

सकाळ वृत्तसेवा
Thursday, December 24, 2009 AT 12:30 AM (IST)
Tags: maharashtra, politcs, vidhansabha
मंगेश इंदापवार नागपूर - हिवाळी अधिवेशनाच्या प्रारंभी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली सर्व विरोधी पक्ष एक असल्याचे चित्र निर्माण करण्यात आले होते. मात्र, मनसेची उपस्थिती शिवसेनेला खटकली आणि अधिवेशनाचे सूप वाजले तेव्हा मनसे एका कोपऱ्यात दिसली. विरोधी पक्षामधील पडलेली ही फूट आघाडी सरकारच्या पथ्यावर पडली.विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रपरिषदेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते बाळ नांदगावकर उपस्थित होते. खडसे यांनीच नांदगावकर यांना विरोधी गटात आमंत्रित केले होते. परंतु, भाजपच्या या पुढाकारावर शिवसेनेच्या नेत्यांनी तीव्र आक्षेप घेतला. बाळ नांदगावकरांना पत्रपरिषदेत बोलण्याची संधी देताच शिवसेना नेते दिवाकर रावते हे तेथून उठून गेले. तेव्हाच विरोधी पक्षात पडलेल्या फुटीचे संकेत मिळाले. भाजप शिवसेना युतीला प्रमुख विरोधी पक्ष मानण्यात येत असताना त्यात मनसे आणि शेकाप यांना स्थान नाही, अशी कठोर भूमिका शिवसेनेच्या नेत्यांनी घेतल्याचे अंतर्गत गोटातून सांगण्यात आले. तसेच मनसेच्या चार आमदारांचे निलंबन मागे घेण्याच्या मुद्‌द्‌यावरही शिवसेनेकडून असहकाराची भूमिका घेण्यात आली. त्यामुळेच अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांची ही एकजूट अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी दिसून आली नाही. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी अखेरच्या दिवशी घेतलेल्या पत्रपरिषदेत मनसेचे प्रतिनिधी उपस्थित नव्हते. तेव्हा शिवसेनेच्या दबावापुढे भाजप झुकली, अशीच चर्चा राजकीय गोटात सुरू झाली. त्यासंदर्भात मनसेचे गटनेते बाळ नांदगावकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, विरोधी पक्ष म्हणून मनसेला भाजप व सेना युतीने विश्‍वासात घेतले नाही. संपूर्ण अधिवेशनात मनसे स्वतंत्र विरोधी पक्ष म्हणून वागला. प्रमुख विरोधी पक्षांनी सोबत घेतले नसले तरीही मनसेला आपली भूमिका मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. आम्ही प्रमुख विरोधी पक्षामागे असेच फरपटत जाणार काय, असा सवाल त्यांनी केला. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी आम्हाला आमंत्रित केले होते. त्यामुळे तेथे गेलो होतो. परंतु, शिवसेनेच्या नेत्यांनी त्यावर आक्षेप घेतला होता. त्यामुळे अखेरच्या दिवशी भाजपकडून कोणतेही निमंत्रण आले नाही. आम्ही विरोधी पक्षात आहोत, त्यामुळे आम्हालादेखील भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. तेव्हा सोबत घेतले नाही तरीही मनसे भूमिका मांडणार आहे, असे बाळ नांदगावकर यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment