Wednesday, April 27, 2011

अणुऊर्जा हा भावनेचा नव्हे,वैज्ञानिक विषय ; जपानी राजदूतांचे मत

खालील लेख लोकसत्ता च्या सौजन्याने



अणुऊर्जा हवी की नको हा भावनेचा नव्हे तर वैज्ञानिक निकषांवर अभ्यास करून निर्णय घेण्याचा विषय आहे. असे असूनही अणुऊर्जेच्या सुरक्षिततेविषयी लोकांच्या मनात शंका असतानाही या ऊर्जास्रोताची कुठे आणि किती प्रमाणात कास धरायची या निर्णयाचा विषय असून तो त्याच पातळीवर घेतला जायला हवा, असे ठाम प्रातिपादन जपानचे भारतातील राजदूत अकिताका सैकी यांनी आज येथे केले. ‘ऑब्झव्‍‌र्हर रीसर्च फौंडेशन’ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात जपानने अलीकडेच ओढवलेल्या भूकंप व त्सुनामीच्या दुहेरी महआपत्तीचा मुकाबला कसा केला यावर राजदूत सैकी बोलत होते. ते म्हणाले की, जपानमध्ये एकूण वीज निर्मीतीत २९ टक्के वाटा अणुऊर्जेचा आहे. यासाठी देशभरात समुद्रकिनारी एकूण ५४ अणूऊर्जा प्रकल्प कार्यरत आहेत. एकूण वीजनिर्मीतीमध्ये अणुऊर्जेचा वाट सध्याच्या २९ टक्क्यांरून २०१४ पर्यंत ३७ व २०१९ पर्यंत ४१ टक्क्यांवर नेण्याच्या योजना असताना फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्पात या महाआपत्तीमुळे आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. फुकुशिमाच्या सहाही अणुभट्टय़ा बंद पडल्याने देशातील वीजनिर्मितीत १० टक्क्यांची तूट आली आहे. ही तूट कशी भरून काढायची यावर तूर्तास तरी कोणतेही उत्तर नाही. फुकुशिमाचा प्रकल्प चालविणाऱ्या टोकियो इलेक्ट्रिक कंपनीने या सहाही अणुभट्टया कायमचा निर्णय घेतला आहे. हे काम दोन टप्प्यांमध्ये येत्या वर्षभरात पूर्ण केले जाईल, असे त्यांनी सांगितले.
राजदूत सैकी म्हणाले की, एवढी आपत्ती ओढवली तरी अणुऊर्जा अजिबात नकोच असे म्हणणाऱ्या जपानी नागरिकांची संख्या ५० टक्क्यांहून कमी असल्याचे एका जाज्या जनमतपाहणीत आढळून आले आहे. लोकांना अणुऊर्जा नको असे नाही तर त्यांना या ऊर्जास्रोताच्या सुरक्षिततेविषयी काळजी आहे. ताज्या घटनांनंतर या काळजीत कहीशी वाढ झाली आहे. जपान सरकारनेही याची दखल घेतली असून लोकांना अशा धोक्याशी मुकाबला करण्यासाठी वाऱ्यावर सोडले जाऊ शकत नाही या भावनेतून अणुऊर्जा प्रकल्पांच्या सुरक्षेचा फेराआढावा घेण्याचे ठरविले आहे. याचा अर्थ जपान अणुऊजेचा वापर सोडून देणार असे नाही. तसे करणे जपानला परवडणारेही नाही कारण देशाची ऊर्जेची गरज भागविण्यास अन्य ऊर्जासाधने पुरेशी नाहीत व या साधनांचा अणुऊर्जेएवढय़ा मोठया प्रमाणावर वापर करणे जपानला परवडणारेही नाही. याच संदर्भात त्यांनी अणुऊर्जा हा भावनेचा नव्हे तर वैज्ञानिक विषय असल्याचा उल्लेख केला.
प्रसारमाध्यमांमुळे निर्माण झालेले काही गैरसमज दूर करताना जपानचे राजदूत म्हणाले की, फुकुशिमा येथील अणुभट्टय़ा वितळून जाण्याचा धोका आहे किंवा तेथील किरणोत्सर्गाचे प्रमाण चेर्नोबिलच्या बरोबरीला गेले आहे, हे म्हणणे बरोबर नाही. अणुभट्टय़ांच्या २० किमी परिघात किरणोत्सर्ग जास्त असून ते क्षेत्र प्रतिबंधित म्हणून घोषित केले गेले आहे. फुकुशिमाच्या अणुभट्टय़ा भूकंपाचा धोका लक्षात घेऊन बनविण्यात आल्या होत्या परंतु एवढय़ा प्रचंड उंचीच्या त्सुनामी लाटांची मात्र त्याचे आरेखन करताना कल्पना केली गेली नव्हती. तरीही त्सुनामीने अणुभट्टीला काही झालेले नाही. तिच्या शीतकरण यंत्रणेस वीज पुरवठा करणारी पर्यायी यंत्रणा त्सुनामीमुळे बंद पडल्याने अडचण आली आहे. जपानमधील सर्वच अणुभट्टय़ा समुद्राच्या किनारीच आहेत कारण पाण्याची मोठी गरज लक्षात घेता त्यांच्यासाठी तेच ठिकाण त्यांच्यासाठी आदर्श ठरते. पण फुकुशिमाचा अनुभव लक्षात घेता यापुढे अणुभट्टय़ा उंच डोंगरावर उभारणे मात्र चुकीचे ठरेल शीतकरण यंत्रणेसाठी पर्यायी वीज पुरवठा यंत्रणा हवी तर दूर डोंगरावर उभारणे हा त्यावर एक उपाय असू शकतो.जैतापूर प्रकल्पासाठी सर्व अणुभट्टय़ा परदेशातून आयात केल्या जाणार आहेत. याचा अप्रत्यक्ष संदर्भ देऊन राजदूत सैकी यांना असा प्रश्न केला गेला की, तुमच्या अणुभट्टयाही अशाच आयात केलेल्या असत्या तर ताज्या आपत्तीनंतर आपण तरीही अणुऊर्जेचा असाच आग्रह धरला असता का? यावर ते उत्तरले की, आम्ही आम्हाला लागणाऱ्या सर्व अणुभट्टय़ा देशातच बनवितो. आमच्या अणुभट्टय़ांच्या सेरक्षेचा दर्जा अत्यंत उच्च आहे. तरीही विदेशात कोणी आमच्याहून सरस अणुभट्टय़ा बनवीत असेल तर त्यांचा अभ्यास करण्याची आमची तयारी आहे. आमच्या अनुभवावरून सर्र्वानीच शिकावे, असे आम्हाला वाटते.


Friday, April 15, 2011

अंबाबाईच्या गाभा-यात स्त्रियांना प्रवेश

खालील लेख म टा च्या सौजन्याने


कोल्हापूरच्या अंबाबाईच्या देवळात एका विशिष्ट दिवशी सूर्यप्रकाश आत शिरतो आणि किरणोत्सव होतो... पण त्याहून अनोखा असा किरणोत्सव उद्या होईल... शतकानुशतकांचा अंधार सरेल... कारण अखेर न्याय झाला... पुरुषांप्रमाणेच महिलांनाही अंबाबाईच्या पूजेचा मान मिळाला. आज झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

गेले काही दिवस राजकीय आदोंलनाचा विषय बनलेल्या या विषयावर निर्णय घेण्यासाठी आजा गृहराज्यमंत्र्याच्या बैठक बोलावली होती. त्यात ही अनिष्ट प्रथा मोडीत काढण्यात आली आणि हा निर्णय घेण्यात आला. उद्यापासून या निर्णयाची अंमलबाजावणीही होईल.

या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, पुरुषांना गाभा-यात जिथंपर्यंत प्रवेश दिला जातो तिथपर्यंत महिलांना प्रवेश देण्यात येणार असा निर्णय घेण्यात आला. तसेच मंदिरात सकाळी देवीच्या अभिषेकालाही महिलांना उपस्थित राहता येईल. महिलांच्या हातून अभिषेकही करता येईल. तसेच सकाळी १० ते ११ : ३० यावेळात महिलांना गाभा-यात प्रवेश देण्यात येणार आहे.

गेल्या दोन दिवसांपासून भाजप आणि मनसेच्या महिला कार्यंकर्त्यांनी महालक्ष्मी मंदिरातील गाभा-यात शिरून देवीची ओटी भरली. परंतु या वेळी मंदिराचे पुजारी आणि महिला कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली होती. तर सनातन प्रभात सारख्या पुराणमतवादी धर्मांध संघटनांनी देखील याला विरोध दर्शवला होता. मात्र हा वाद अधिक चिघळू नये म्हणून गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावली.

कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरातील गाभा-यात महिलांना प्रवेश दिला जावा , या मागणीसाठी अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि शालिनी ओकयांनी २००० मध्ये उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता. त्यामुळे हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे असे सांगून महिलांना डावलले जात होते. मनसे आमदार राम कदम यांनी विधानसभेत हा मुद्दा उचलून धरला. त्यानंतर भाजपच्या नेत्या नीता केळकर यांच्या नेतृत्वाखाली दहा एक महिलांनी बुधवारी गाभारात प्रवेश केला होता. तर गुरुवारी राम कदम यांच्या नेतृत्वाखाली चाळीस महिलांनी गाभा-यात शिरून या प्रथेला मोडीत काढले. त्यानंतर हा वाद अधिक चिघळू नये म्हणून आज बोलावलेल्या बैठकीमध्ये महिलांना प्रवेश देण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

या निर्णयानंतर दर्शनार्थी महिलांनी आनंद व्यक्त केला असून उशीरा का होईना पण सरकारला जाग आली अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

महालक्ष्मीची 'मनसे' पूजा

खालील लेख लोकमत च्या सौजन्याने ......



कोल्हापूर, दि. १४ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे निमित्त साधत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी शेकडो वर्षांची परंपरा मोडत, आज थेट करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला. याचा आनंद जयघोष करत लाडू वाटून आणि फटाके वाजवत व्यक्त करण्यात आला.आ. कदम व अॅड. स्वाती शिदे यांनी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करून देवीची पूजा केली. साडी-चोळी व ओटी भरली. त्यांनी गाभाऱ्यात प्रवेश करताच कार्यकर्त्यांनी मनसेच्या आणि शिवछत्रपतींच्या नावाचा जयघोष केला. तसेच मंदिर परिसरात लाडू वाटून आणि फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

आज तातडीची बैठक
करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिराच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश देण्यासंदर्भात पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार उद्या (शुक्रवार) जिल्हाधिकाऱ्यांनी श्रीपूजक पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक आयोजित केली आहे

गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांचे आवाहन
महालक्ष्मी मंदिराच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेशासंदर्भात गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी लक्ष घातले असून, याविषयी सर्वमान्य तोडगा निघण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. या प्रश्नावर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे व जिल्हा प्रशासनाने हा प्रश्न सामंजस्याने सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

श्रीपूजकाचा आत्मदहनाचा इशारा
आ. कदम यांना महालक्ष्मीच्या गाभाऱ्यात प्रवेश करताना श्रीपूजकांनी सोवळे नेसून प्रवेश करण्याची विनंती केली. आमदारांना अडविल्यामुळे सोबतच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध होत असल्याचे समजून गोंधळ घालत ढकला-ढकली केली. हा गोंधळ अधिकच वाढल्याने आम्ही आत्मदहन करू, असा इशारा श्रीपूजक नितीन मुनिश्वर यांनी दिला. सांगलीचे माजी आमदार नितीन शिदे यांनी, आम्हीही हिदू आहोत. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश मिळाला नाही तर आम्हीही आत्मदहन करू, असा प्रतिइशारा दिला. यामुळे तणाव अधिकच वाढला.

Thursday, April 14, 2011

पाणीपुरीवाल्यांना मनसेचा 'प्रसाद'

खालील लेख म टा च्या सौजन्याने .....


लोट्यामध्ये लघवी करून नंतर तोच लोटा पाणीपुरी बनवण्यासाठी वापरणा-या ठाण्यातील पाणीपुरीवाल्या भय्याचे किळसवाणे वर्तन उजेडात आल्यानंतर, मुंबई-ठाण्यातील तमाम पाणीपुरीवाल्या भय्यांवर आज मनसेचा कोप झाला. मनसेच्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेत दादर, हुतात्मा चौक, ऑपेरा हाऊस भागात पाणीपुरीवाल्या भय्यांना बेदम मारहाण केली तसेच त्यांचे पाणीपुरीचे साहित्य भररस्त्यात फेकून दिले.

ठाण्यातील नौपाडा भागातील भास्कर कॉलनीत राजदेव लखन चौहान नावाचा भय्या पाणीपुरीचा स्टॉल लावत असे. आपल्याकडील लोट्यामध्येच तो उभ्या जागीच लघवी करत असे. नंतर त्याच लोट्यात पाणी घेऊन तो पाणीपुरी तयार करत असे. काही ग्राहक तर त्याच लोट्यातून पाणीही पित असत. शेजारच्या बिल्डिंगमध्ये राहणा-या अंकिता राणे नावाच्या १९ वर्षीय विद्यार्थिनीने भय्याचा हा किळसवाणा प्रकार घरातून पाहिला. तिने मोबाईलमधून या किळसवाण्या प्रकाराचे शुटिंग केले. टीव्ही वाहिन्या आणि वृत्तपत्रांमध्ये या स्टिंग ऑपरेशनचा पर्दाफाश झाल्यानंतर चौहानला पोलिसांनी अटक केली.

मात्र ठाण्यातील या एका भय्याच्या चुकीची शिक्षा मुंबई-ठाण्यातील तमाम पाणीपुरीवाल्या भय्यांना मिळत आहे. पाणीपुरीवाले भय्ये पुरीशी स्वच्छता बाळगत नसल्याचे कारण देत, राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज दादर, हुतात्मा चौक, ऑपेरा हाऊस भागात भय्यांविरूद्ध मोहीमच सुरू केली. पाणीपुरीवाल्या भय्यांचे स्टॉल्स फेकून देण्यात आले. स्टॉल्समधील सामान रस्त्यावर फेकून देण्यात आले. एवढेच नव्हे तर पाणीपुरीवाल्या भय्यांना बेदम चोपही देण्यात आला. या प्रकारानंतर मुंबईच्या अनेक भागातील पाणीपुरीवाल्या भय्यांनी स्टॉल न लावताच पोबारा केला आहे.

हार्दिक शुभेच्छा

भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा तर्फे हार्दिक शुभेच्छा ......

Wednesday, April 13, 2011

'वह्या'रुपी शुभेच्छा

सुंदर कल्पना ...... पुष्पगुच्छ फेकले जातात ... वह्या गरीब विद्यार्थ्यांमध्ये वाटल्या तरी जाऊ शकतात .....

खालील लेख म टा च्या सौजन्याने ................


राजकीय पुढाऱ्यांचा वाढदिवस म्हणजे पुष्पगुच्छ, पुष्पहारांचा ढीग, फटाक्यांची जोरदार आतषबाजी, मिठाई, पेढ्यांच्या बॉक्सचा ढिगारा आणि मतदारसंघामध्ये होर्डिंग्ज आणि फ्लेक्सचा मारा...अशी सर्वच राजकीय पक्षात परिस्थिती असताना गृह राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी मात्र त्यांच्या वाढदिवसादिवशी या सर्व शोबाजीला बगल दिली. पुष्पहार व पुष्पगुच्छ आणण्याऐवजी वह्या आणण्याचे आवाहन केल्याने सुमारे साडेपाच लाखांहून अधिक वह्या जमा झाल्या असून त्या गरीब विद्यार्थ्यांना वाटण्यात येणार आहे.

वाढदिवसाच्या निमित्ताने राजकीय पुढारी गल्लीपासून दिल्लीपर्यंत चमकण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावत असतात. मात्र सतेज पाटील यांनी ही सर्व प्रथा बंद करण्यासाठी २००७ साली त्यांच्या चाहत्यांना तसेच समर्थकांना वाढदिवसानिमित्त कोणीही पुष्पगुच्छ, पुष्पहार वा मिठाई आणू नये, असे सांगतानाच शुभेच्छा द्यायच्याच असतील तर त्या वह्यांच्या माध्यमातून द्या, असे आवाहन केले होते. या आवाहनाला दरवषीर् भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

कोल्हापूरमध्येच आपला वाढदिवस साजरा करणाऱ्या सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या चार वर्षांत १६ लाख २७ हजार ५६० वह्या शुभेच्छारुपात आल्या आहेत. जिल्ह्यातील ३८० महापालिका शाळांमधील ३ लाख ८० हजार ८९१ विद्यार्थ्यांना आतापर्यंत त्यांचे वाटप झाले आहे. यंदाच्या वाढदिवसाला साडेपाच लाख वह्या आल्या असून आतापर्यंत सुमारे एक कोटी रुपयांच्या वह्या जमा झाल्या आहेत. प्रत्येक नेत्याने आपल्या वाढदिवसानिमित्त अशाप्रकारचा एखादा सामाजिक उपक्रम राबविला तर महाराष्ट्राला विधायक वळणावर नेणारी एक मोठी चळवळ उभी राहील, असे मत सतेज पाटील यांनी व्यक्त केले.

Wednesday, April 6, 2011

दे घुमाके .....

मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा तर्फे भारतीय संघाचे हार्दिक अभिनंदन .................................


अण्णांचा 'आवाज' देशभर

भ्रष्टाचार विरोधी लढ्यात अण्णा आम्ही तुमच्याच सोबत ............................

खालील लेख म टा च्या सौजन्याने .....



पंतप्रधानांच्या आवाहनाला नकार देत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मंगळवारपासून दिल्लीत भ्रष्टाचारविरोधाचे बिगूल वाजवत आमरण उपोषणास सुरुवात केली. लोकपाल विधेयकाचा मसुदा तयार करण्यासाठी तयार झालेल्या समितीवर सामान्य जनतेतूनच ५० टक्के सदस्य नेमावे, या मागणीसाठी अण्णांनी दिल्लीत सुरू केलेली ही लढाई देशाच्या अनेक भागांत व राजकीय-सामाजिक क्षितिजावरही पोहोचल्याने केंद सरकारवर मोठा दबाव आला आहे.

भ्रष्टाचारी राजकारणी-सरकारी अधिकारी-न्यायाधीश यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी तयार होत असलेल्या जन लोकपाल विधेयकाचा मसुदा ठरवण्यासाठी नेमलेल्या समितीतील ५० टक्के सदस्य देशातील सामाजिक कार्यकतेर् व विचारवंतांमधून नियुक्त करावेत, ही अण्णांची प्रमुख मागणी आहे. त्यासाठी मध्यंतरी त्यांनी पंतप्रधानांचीही भेट घेतली होती. मात्र पंतप्रधानांच्या सूचनेवरून या विधेयकासाठी नेमलेल्या मंत्रिगटाशी चर्चा करूनही या मागणीबाबत नकारात्मक सूरच निघाला. त्यामुळेच अण्णांनी थेट दिल्लीत धडक दिली. अण्णांच्या आंदोलनाला सर्वस्तरातून पाठिंबा मिळू लागल्याने हादरलेल्या पंतप्रधान कार्यालयाने सोमवारी रात्री पत्रक काढून त्यांना उपोषणापासून परावृत्त करण्याचा प्रयत्नही करून पाहिला. पण आपल्या लढ्यावर ठाम असलेल्या अण्णांनी आता माघार नाही, असा निर्धार करीत सकाळी असंख्य कार्यर्कत्यांसह 'राजघाट'वरील महात्मा गांधींच्या समाधीजवळ 'इन्कलाब झिंदाबाद'चा नारा दिला. नंतर खुल्या जीपमधून इंडिया गेट गाठत त्यांनी उपोषणास सुरुवात केली.

देशभर वादळ

अण्णांच्या या आंदोलनाला अवघ्या महाराष्ट्राने पाठिंबा दिलाच; पण दिल्लीसह बेंगळुरू, चेन्नई, मोरादाबाद येथेही निदर्शने झाली. भाजपने अण्णांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन करतानाच केंद सरकारलाही हा मुद्दा प्रतिष्ठेचा करू नये, अशी सूचना केली. युनायटेड जनता दलाचे अध्यक्ष शरद यादवही अण्णांच्या समर्थनार्थ पुढे आले.

हा लढा थांबणार नाही

पंतप्रधान म्हणतात, मी तुमचा आदर करतो. मग गेल्या महिनाभरात आमचे एकदाही म्हणणे का ऐकून घेतले नाही? हा लढा आता थांबणार नाही. मसुदा तयार करण्यासाठी सरकार व जनता यांचे ५०-५० टक्के सदस्य हवेतच!