Friday, February 26, 2010

राज साहेबांचे तमाम मराठी जनतेला मराठी भाषा दिना निमित्त पत्र

मित्रानो, राज साहेबांचे पत्र खालील लिंक वर मिळू शकेल

https://www.manase.org/Marathi%20din%20CTC.pdf

जय हिंद जय महाराष्ट्र

२७ फेब्रुवरी- मराठी भाषा दिन

मनसे च्या संकेत स्थळाच्या सौजन्याने .....
कृपया अधिक माहिती साठी ह्या संकेत स्थळाला भेट दया ,
https://www.manase.org/mbdivas/index.html

कवी कुसुमाग्रज उर्फ वि।वा.शिरवाडकर यांचा जन्मदिवस म्हणजेच मराठी भाषा दिवस !

कुसुमाग्रजांना मराठी साहित्यातील योगदानाबद्दल १९८८-८९ मध्ये भारतातील सर्वोच्च असा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला। असा बहुमान मिळवणारे-वि.स.खांडेकर यांच्यानंतरचे -ते दुसरे मराठी साहित्यिक होत. कुसुमाग्रज मुंबई येथे आयोजित पहिल्या जागतिक मराठी परिषदेचे (१९८९) अध्यक्ष होते. या परिषदेच्या अध्यक्षपदावरून बोलताना कुसुमाग्रजांनी मराठी भाषेच्या चिंताजनक स्थितीविषयी आणि शासनाच्या अनास्थेविषयी भाष्य केले होते. ज्ञानपीठ पुरस्कार स्वीकारतानाही त्यांनी मराठी भाषेविषयीचे विचार व्यक्त केले होते. ‘माय मराठी मरते इकडे, परकीचे पद चेपू नका’, ‘भाषा मरता देशही मरतो, संस्कृतिचाही दिवा विझे; गुलामभाषिक होऊनी अपुल्या प्रगतीचे शिर कापू नका’ या त्यांच्या काव्यपंक्तींतून त्यांचे मराठी-प्रेम दिसून येते.कुसुमाग्रजांचे साहित्यातील योगदान व त्यांचे भाषा-प्रेम यांचा विचार करता जागतिक मराठी परिषदेच्या वतीने त्यांचा जन्मदिवस (२७ फेब्रुवरी) ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा करण्यात येऊ लागला. मराठीविषयीचा अभिमान, भाषा-अभ्यास-संशोधन-संरक्षण व भाषाविकास या घटकांबद्दलची जाणीवजागृती हा यामागचा उद्देश !काही वर्षे काही सांस्कृतिक संस्थाच हा दिवस साजरा करत होत्या. आता या निमित्त उपक्रम-कार्यक्रम करणार्‍या संस्था-व्यक्तींची संख्या वाढत आहे. प्रत्येक मराठी माणसाने या सोहळ्यात-कार्यक्रम-उपक्रमात यथाशक्ति सहभागी झालेच पाहिजे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही ‘हा’ दिवस दिमाखात साजरा करण्याचे ठरवले आहे.

राज आंदोलनाचे ‘सिंचन’ राज्यभर

म टा च्या सौजन्याने


मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई

राज्यातील प्रत्येक सिंचन जमीन भूमीपूत्र मराठी माणसाच्या मालकी हक्काची असावी, महाराष्ट्रात या अगोदर ज्या परप्रांतीयांनी जमीन खरेदी केली आहे, त्यात एका मराठी माणसाला भागीदार म्हणून घेण्याचीही अट हवी, तसा कायदा राज्य सरकारने करावा, अशीही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका पत्रात केली आहे। ही मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी या पत्रात दिला आहे.

मराठी भाषा दिनानिमित्त राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पत्रात हे आवाहन करण्यात आले आहे। महाराष्ट्र म्हणजे मराठी हे समीकरण करून टाकणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक सिंचन जमीन ही मराठी मालकीची हवी असा आमचा आग्र आहे.मराठी माणसाने प्रत्येक मराठी सण हा जल्लोषात साजरा केला पाहिजे. २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा दिन असून हा दिवस दिवाळीप्रमाणे साजरा केला पाहीजे, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी माणसाला केले आहे.

मनसेचं आंदोलन संपलेलं नाही , याचे स्पष्ट संकेत देत त्यांनी आंदोलन पुन्हा सुरु होण्याचा इशारा दिला। आंदोलनाच्या दुस-या टप्प्यात मराठी भाषेविषयी आग्रह केला जाणार आहे , असे राज ठाकरेंनी यात म्हटले आहे. तसेच या पत्रात पुन्हा एकदापरप्रातियांना त्यांनी लक्ष्य केले आहे.

तसेच सिंचनाखाली येणारी प्रत्येक जमीन मराठी माणसाच्या मालकीची हवी, तसा राज्य सरकारने कायदा करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली। महाराष्ट्रात या अगोदर ज्या परप्रांतीयांनी जमीन खरेदी केली आहे, त्यात एका मराठी माणसाला भागीदार म्हणून घेण्याचीही अट या हवी अशीही मागणी केली आहे. तसे न झाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी या पत्रात दिला आहे.

राजला मारायचीय सचिनला मिठी

म टा च्या सौजन्याने


मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई

डोळ्याची पारणे फिटतात म्हणजे काय याचा प्रत्यय सचिनची बुधवारी खेळलेली खेळी आहे। वन डे क्रिकेटमध्ये २०० धावा करणारा तो या पृथ्वीतलावरील पहिला व्यक्ती होण्याचा मान मिळविल्याने मला खूप आनंद झाला आहे, त्यामुळे त्याला कडकडून मिठी मारावीशी वाटते, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सचिनच्या द्विशतकी खेळीनंतर व्यक्त केली.

क्रिकेटचा देव आणि जुना मित्र असलेल्या सचिन तेंडुलकरबरोबर राज ठाकरे यांनी वांद्रेच्या एमआयजी क्लबवर अनेकदा क्रिकेट खेळले आहे। सचिनचे कौतुक करायला शब्द अपुरे पडतात. स्वतःचे रेकॉर्ड करून ते मोडून पुन्हा नविन रेकॉर्ड फक्त सचिनच करू शकतो. भावी पिढीला हे रेकॉर्ड मोडणे कठीण आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

एमआयजी क्लबवर सचिनबरोबर क्रिकेट खेळताना तो आपल्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घ्यायचा, पण त्यांने घेतलेला हा समाचार खूप हवा हवासा आणि प्रेक्षणीय वाटायचा. त्याचं ते टाइमिंग, शॉर्ट सिलेक्शन इतक देखणं असायचं की आपल्याला सर्व काही विसरायला व्हायचं, असं राज ठाकरे यांनी यापूर्वी मटा ऑनलाइनला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितलं होतं.

Tuesday, February 23, 2010

ही थट्टा आता थांबवा! - प्रताप आसबे

खरच, शिवजयंती चा गोंधळ थाबंवायला हवा म्हणजे सर्व मराठी जनता एकत्र शिवजयंती साजरी करू शकतील । तुमचा काय विचार आहे?

म टा च्या सौजन्याने
23 Feb 2010, 0035 hrs IST
प्रताप आसबे
शिवजयंतीच्या संदर्भातला फाल्गुनवाद आणि वैशाखवाद आता थांबलाच पाहिजे... .......

मराठी माणूस, मराठी अस्मिता यावरुन सध्या रणकंदन चालू आहे। मराठी माणूस मराठी अस्मितेने नखशिखांत पेटून उठला आहे. आख्ख्या देशाने या पेटलेल्या मराठी माणसाचा धसका घेतला आहे. पूवीर् बंगालमध्येतर म्हणे मुलांना झोपविण्यासाठी 'मराठे आले... मराठे आले', अशी भीती आई तान्हुल्यांना घालायची, अशी आमची ख्याती. पण दुदैर्वाची गोष्ट अशी की, या मराठी माणसाला महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती नेमक्या कोणत्या दिवशी साजरी करावी हे अजून ठरविता आलेले नाही. राज्यशासन, काँग्रेस, राष्ट्रवादी काँगेस यांनी १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी केली. त्यात शिवसेना सहभागी नव्हती. आता नेहमीप्रमाणे वैशाखात तिथीनुसार ते वेगळी शिवजयंती साजरी करतील. गेली १० वषेर् महाराष्ट्रात हेच चालू आहे. दोन वेगवेगळ्या दिवशी जयंती साजरी केल्यामुळे आपण मराठीच नव्हे तर एकूण जनमानसात संभ्रम निर्माण करतो आहोत, याचेही भान नाही.

या दोन शिवजयंत्यांमुळे एक शासकीय तर दुसरी बिगर शासकीय, अशी वर्गवारी लोकांनी करून टाकली आहे। ज्याच्यापासून मराठी माणसाला प्रेरणा मिळाली, महाराष्ट्राला स्वत:ची ओळख निर्माण झाली आणि मराठी अस्मितेला धुमारे फुटले त्या शिवरायांच्या जयंतीबद्दलही मराठी माणसांचे एकमत होत नाही, हे वास्तव आहे. मग मराठी माणूस आणि मराठी अस्मिता याला खराच काही अर्थ आहे की हे सगळेच थोतांड आहे, असा प्रश्न पडतो. कारण आता शिवजयंती कोणत्या तारखेला साजरी करायची हा विषयही राजकारणाचा झाला आहे. मराठी माणसे, मराठी नेते आणि महाराष्ट्रातील राजकीय पक्ष यांच्यातील दुभंगही आता आमच्या नजरेला खुपेनासा झाला आहे, हे विशेष

शिवाजी महाराजांची जयंती नेमक्या कोणत्या तिथीला आणि तारखेला येते, याबद्दल इतिहासकारांत गेली जवळपास १०० वषेर् वाद आहे। या वादातून मार्ग काढून शिवजयंतीची तारीख निश्वित करण्यासाठी वसंतराव नाईक यांच्या काळात १९६६ साली इतिहासकारांची एक समिती नेमली होती. तिच्यात दत्तो वामन पोतदार, ग. ह. खरे, न. र. फाटक, बाबासाहेब पुरंदरे यांच्यासह सात सदस्य होते. पण समितीचे एकमत झाले नाही. सरकारनेही निर्णय घेतला नाही आणि या वादात न पडता प्रथेप्रमाणे तिथीनुसार शके १६२७चा जन्म गृहीत धरून शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय केला. साहाजिकच वर्षातून दोनदा आणि तीनदा शिवजयंती साजरी होऊ लागली. अप्रत्यक्षपणे ही शिवजयंतीची थट्टाच होती. विधिमंडळात चर्चा होऊनही हा प्रकार थांबत नव्हता. युतीचे शासन असताना २३ एप्रिल १९९९ रोजी भाजपच्या सदस्या रेखा खेडेकर यांनी शिवजयंतीच्या तारखेचा वाद मिटविण्यासाठी सरकारकडे आग्रह धरला. त्यासाठी अशासकीय ठराव मांडला. मधल्या काळात शिवरायांच्या जन्मतारखेबद्दल अनेकांनी संशोधन केले होते. त्यामुळे अलीकडच्या काळात इतिहासकारांत थोडीफार एकवाक्यता आहे. त्या इतिहासकारांचे दाखले देत १९ फेब्रुवारी १६३०चा जन्म असल्याचे सांगून १९ फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करावी, अशी सूचना त्यांनी केली होती. तिला शिवसेनासदस्य चंदकांत पडवळ, रवींद गायकवाड, काँगेसमधून इतिहासाचे प्राध्यापक सुहेल लोखंडवाला, माणिकराव ठाकरे आणि भाजपच्या रूपलेखा ढोेरे यांनी पाठिंबा दिला होता. मुख्यमंत्रीपदी नारायण राणे होते. तत्कालीन सांस्कृतिक कार्यमंत्री प्रमोद नवलकर यांनी चचेर्ला उत्तर दिले होते. नवलकरांनी टिळकांपासून आढावा घेत न. र. फाटक दत्तो वामन पोतदार यांच्या वादाचे दाखले देत महाराष्ट्रात 'फाल्गुनवाद आणि वैशाखवाद' असे दोन गट पडल्याचे नमूद केले होते. पण तो वादासाठी वाद होता, असे मत व्यक्त करीत आता बहुतांशी इतिहासकार १९ फेब्रुवारी १६३० या तारखेवर सहमत असल्याचे सांगितले होते. त्यात सेतु माधवराव पगडी, बाबासाहेब पुरंदरे, गजानन भास्कर मेहेंदळे, इतिहास संशोधक मंडळ आणि मधुकर अष्टीकर यांचे दाखले त्यांनी दिले होते. नवलकरांच्या शब्दात : 'या वादावर आणखी एक समिती नेमण्यात अर्थ नाही कारण तो कालापव्यय ठरेल. वादात पडायचे नाही, हा (आधीच्या शासनाचा १९८९ सालचा) निर्णय मी मानणार नाही. हा शासनाचा पलायनवाद होतो. केव्हा ना केव्हा तरी या वादावर पडदा पडला पाहिजे. हा वाद चिघळत ठेवायचा आणि लोकांच्या भावनांशी खेळायचे ही शासनाची निश्वितच भूमिका नाही. सभागृहाच्या भावनांची मी नोंद घेतली आहे. इतिहासकारांचे संदर्भ लक्षात घेऊन, मेहेंदळेंशी चर्चा करून जुलैच्या अधिवेशनात किंवा त्यापूवीर्ही शासन यावर अंतिम निर्णय घेईल. १६२७चा आग्रह धरणाऱ्या इतिहासकारांपैकी फारच थोडे आज शिल्लक आहेत. ज्यांचा हट्ट आहे, त्यांच्याशीही मी बोलेन. समितीचा आग्रह न धरता श्ाीमती खेडेकर यांनी ठराव मागे घ्यावा, अशी मी विनंती करतो.' श्ाीमती खेडेकर यांनी अशासकीय ठराव मागे घेतला. या सबंध चचेर्वरून असे स्पष्ट होते की १९ फेबुवारी रोजी शिवजयंती साजरी करण्याची युती शासनाची मानसिकता होती.

पण या प्रश्नावर युती शासनाचा औपचारिक निर्णय झाला नाही; कारण पाच वर्षांचा आपला कार्यकाल संपण्यापूवीर्च शिवसेना-भाजप युतीने विधानसभा बरखास्त केली आणि विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका घेतल्या। हा जुगार त्यांच्या अंगाशी आला आणि राज्यात विलासराव देशमुखांच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेवर आले. काँग्रेस-राष्ट्रवादी काँगेसच्या आघाडीच्या सरकारने सत्तेवर येताच युती शासनाने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली. तेव्हा सांस्कृतिक कार्यमंत्री रामकृष्ण मोरे होते. राज्यपालांनी १३ मार्च २००० रोजी केलेल्या अभिभाषणात फाल्गुन वद्य तृतीया, शके १५५१ म्हणजेच १९ फेब्रुवारी १६३० ही शिवाजी महाराजांची जन्मतारीख शासनाने स्वीकारली असून आता यापुढे प्रतिवषीर् १९ फेब्रुवारी रोजीच शिवजयंती साजरी केली जाईल, असे सांगितले होते.

बहुतांशी इतिहासकार, सगळे राजकीय पक्ष, विधिमंडळातील दोन्ही बाजूचे सदस्य यांची सहमती असल्याने सरकारने निर्णय घेतला। या निर्णयानंतर वादावर पडदा पडायला हवा होता. पण तसे झाले नाही. शिवसेनेने घुमजाव करून सरकारचा निर्णय धुडकावून लावला. सत्ता हातची निसटल्याने शिवसेनेत वैशाख वणवा पेटला होता. सेनेने वैशाखाचा आग्रह धरला. नवलकरांनी फाल्गुन वैशाख वादाचा उल्लेख करून भावनेशी खेळायची आमची भूमिका नाही, असे सांगितले होते. पण सत्तेतून पायउतार झाल्यावर सेनेने तेच राजकारण केले. फाल्गुनवादाच्या विरोधात वैशाख वादाची कास धरली. सेनेने पलटी खाल्ल्यावर 'जाणत्या' इतिहास-कारांनीही मिठाची गुळणी धरली. साहाजिकच क्षूद राजकारणासाठी फाल्गुन वैशाखात शिवरायांच्या जयंतीची ओढाताण होत राहिली. मराठी अस्मितेच्या नावाने कुणी कितीही गमजा माराव्यात; पण मराठी माणूस अजूनही फाल्गुनवाद आणि वैशाखवाद या गटातटातच विभागला आहे. महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचीही थट्टा चालली आहे, हे नाकारता येणार नाही.

Monday, February 22, 2010

राज ठाकरे यांना जामीन मंजूर

म टा च्या सौजन्याने

मटा ऑनलाइन वृत्त । चोपडा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना चोपडा कोर्टाने जामीन मंजूर केला। उत्तर भारतीयांविरोधातील आंदोलनात चोपड्यात राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचा मनसे कार्यकर्त्यांनी पुतळा जाळल्या प्रकरणी हा जामीन मंजूर झाला आहे.

चोपड्यातील शिवाजी चौकात २३ ऑक्टोबर रोजी लालू प्रसाद यादव यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला होता। त्यावेळी राज ठाकरे यांच्यासह १३ जणांविरोधात चोपड्यातील पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात प्रमुख आरोपी म्हणून राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. इतर कार्यकर्ते कोर्टात हजर झाले होते. परंतु राज ठाकरे कोर्टात हजर न झाल्याने त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी झाले होते. आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास राज ठाकरे हेलिकॉप्टरने चोपड्याला आले. ते ११च्या सुमारास कोर्टासमोर हजर झाले. त्यावेळी राजाराम भावलाल पाटील यांनी साडे ७ हजार रुपयांचा जातमुचलका भरून राज ठाकरे यांना जामीन मंजूर करून घेतला.

प्रथम सत्र न्यायदंडाधिकारी न्या। उबाळे यांनी हा जामीन मंजूर केला. दरम्यान, राज ठाकरे चोपडा शहरात येणार म्हणून रस्त्याच्या दुतर्फा कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. तसेच त्यांच्या स्वागताचे फलकही ठिकठिकाणी लागले होते. राज ठाकरे यांची एक झलक पाहण्यासाठी तरुणांनी राज ठाकरे यांचे वास्तव असलेल्या ठिकाणी एकच गर्दी केली होती. या गर्दीत चेंगराचेंगरी होवून दोन विद्यार्थी जखमी झाले.

Wednesday, February 17, 2010

प्रदूषणकारी प्रकल्प कोकणाच्या माथी नको! - राज ठाकरे

म टा च्या सौजन्याने

- म। टा. वृत्तसेवा , चिपळूण
कोकणाच्या निसर्गसंपन्न भूमीत प्रदूषणकारी प्रकल्प नकोतच, असे सांगत 'माडवन अणुऊर्जा प्रकल्पसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने घेतल्या जात आहेत, ही काय मोगलाई आहे का?' असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला। राज ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर असून मंगळवारी ते राजापूरमध्ये होते.

कोणताही प्रकल्प उभारताना त्याबाबतचे तोटे स्पष्ट करणे आणि स्थानिक जनतेच्या शंकांचे निरसन करणे, हे सरकारचे काम आहे। जागा संपादित करताना शेतकऱ्यांना विश्वासात घेणे आणि त्यांची संमती घेणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. अणुउजेर्सारखे विनाशकारी प्रकल्प कोकणाच्या माथ्यावर मारले जात असतील, तर मनसे स्वस्थ बसणार नाही, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.

Thursday, February 11, 2010

'माय नेम..' च्या वादात मनसे नाही

सकाळ च्या सौजन्याने


सकाळ वृत्तसेवा
Thursday, February 11, 2010 AT 12:33 PM (IST)

मुंबई - 'माय नेम इज खान' या चित्रपटावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन करणार नाही किंवा चालू असलेल्या आंदोलनाच्या आगीत तेल ओतण्याचाही प्रयत्न करणार नाही। तथापि, हा शाहरुख खानचा स्टंट असेल, तर त्याच्या चित्रपटाला विरोध करून आंदोलन करणा-या पक्षाचाही स्टंट असू शकेल, असे 'मनसे'चे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी आज (गुरूवार) शिवसेनेचे नाव न घेता त्या पक्षावर शरसंधान केले. 'मनसे'ची भूमिका स्पष्ट करण्यासाठी त्यांनी आज खास पत्रकार परिषद आयोजित केली होती.

राज ठाकरे म्हणाले, की अमिताभ बच्चन यांचेही काही पाकिस्तानी कलाकारांशी जवळचे संबंध आहेत। 'टाइम्स ऑफ इंडिया' या दैनिकातर्फे चालू असलेल्या 'अमन की आशा' या कार्यक्रमात, बच्चन यांनी एक कविताही सादर केली होती. या प्रसंगी व्यासपीठावर पाकिस्तानचे कलाकार झियासुद्दिन हे देखिल उपस्थित होते. जर बच्चन चालतात मग पाकिस्तानी खेळाडूंबद्दल केवळ एकच विधान करणा-या अभिनेता शाहरुख खान याच्याविरुद्ध आगपाखड का केली जात आहे? अमिताभ बच्चन यांचे बाळासाहेब ठाकरे यांच्याशी असलेले संबंध जगजाहीर आहेत. जर शाहरुखवर माफी मागण्याबाबत दडपण आणण्यात येत असेल, तर बच्चन यांनाही माफी मागायला लावली पाहिजे.

ऑस्ट्रेलियातील भारतीयांवर हल्ले होत असल्यामुळे, अमिताभ बच्चन यांनी त्या देशाचा एक पुरस्कार नाकारला होता, याचाही आवर्जून उल्लेख करताना, राज ठाकरे यांनी या श्रेष्ठ कलाकाराचा गौरवही केला।

Tuesday, February 9, 2010

महाराष्ट्र माझा...प्रदूषणातही अव्वल !!

सकाळ च्या सौजन्याने ....
ही बातमी खालील लिंक वर देखिल मिळु शकेल
http://epaper.esakal.com/esakal/20100209/4649157733148341462.htm
आणि अहवाल ह्या लिंक वर मिळु शकेल
http://www.cpcb.nic.in/upload/NewItems/NewItem_153_Foreword.pdf
सरकारने आता लोकांच्या प्रश्ना कड़े बघावे ... जर शहरात एवढी लोकसंख्या वाढणार असेल तर अशे प्रश्न उभे राहणारच आणि अशे प्रश्न सोडवणे ही सरकारची प्राथमिकता असली पाहिजे .... नाही तर आपल्या अशोक रावांचे सर्वोच्च प्राधान्य आहे पर प्रन्तियाना सरक्षण



सकाळ वृत्तसेवा
Tuesday, February 09, 2010 AT 11:18 AM (IST)
प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल: राज्यातील ८४ शहरांत जलस्वच्छतेचा प्रश्‍न ऐरणीवर
विलक्षण वेगाने होणाऱ्या नागरीकरणामुळे महाराष्ट्रातील ८४ शहरे आणि निमशहरांमध्ये स्वच्छतेचा आणि पर्यायाने सांडपाण्याचा प्रश्‍न आ वासून उभा राहिला आहे। केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने गेल्या पंधरवड्यात प्रसिद्ध केलेल्या तपशीलवार पाहणी अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. यातील तब्बल ७० टक्के सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदी, नाले, तलाव, समुद्रात सोडून देण्यात येत असल्याचा निष्कर्ष या अहवालात काढण्यात आला आहे!
सर्वाधिक सांडपाणी महाराष्ट्रात
देशात सर्वाधिक शहरीकरण झालेली लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रातील शहरे-निमशहरांना (वर्ग १ - एक लाखापेक्षा अधिक लोकसंख्येची शहरे आणि वर्ग २ - पन्नास हजार ते एक लाखापर्यंतच्या लोकसंख्येची निमशहरे) रोज १२,७५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो। पाणीपुरवठ्याचे हे प्रमाणही देशात सर्वाधिक आहे. या पुरवठ्यातून दररोज तयार होणाऱ्या १०,२७२ दशलक्ष लिटर सांडपाण्याची व्यवस्था मात्र महाराष्ट्रात नाही, असे अहवालातून पुढे आले आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्र सांडपाणी तयार करण्यातही देशात अव्वल आहे! महाराष्ट्राखालोखाल उत्तर प्रदेश (३८५१ दशलक्ष लिटर), पश्‍चिम बंगाल (२५२५ दशलक्ष लिटर) आणि कर्नाटक (२०२३ दशलक्ष लिटर) या राज्यांत सर्वाधिक सांडपाणी तयार होते. या राज्यांमधील परिस्थितीही महाराष्ट्रापेक्षा वेगळी नाही. या तीनही राज्यांमध्ये मिळून सरासरी ३० टक्के सांडपाण्यावरच प्रक्रिया केली जाते.
किनारपट्टीची स्थिती
महाराष्ट्राच्या किनारपट्टीय प्रदेशातील भिवंडी, मुंबई, पनवेल आणि विरार ही चार शहरे वर्ग १ मध्ये येतात। या शहरांमधून दरडोई १६२ लिटर सांडपाणी दररोज तयार होते. वर्ग २ दर्जाची रत्नागिरी आणि वसई शहरे दरडोई दररोज सरासरी ७२ लिटर सांडपाणी तयार करतात. त्याची विल्हेवाट लावण्याची सक्षम यंत्रणा मात्र या शहरांमध्ये नाही. परिणामी, समुद्रात खोलवर अथवा खाडीत हे सांडपाणी सोडले जाते, असे अहवालातून समोर आले आहे.
पुण्याची मुंबईवर मात
महाराष्ट्रातील वर्ग १ आणि वर्ग २ मधील ८४ शहरे-निमशहरांमध्ये मिळून फक्त चाळीस टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येते। अजिबात प्रक्रिया न केलेले तब्बल साठ टक्के म्हणजे ६०१८ दशलक्ष लिटर सांडपाणी जसेच्या तसे सोडून देण्यात येते. मुंबई आणि पुणे या महानगरांमध्येही तयार होणाऱ्या सर्वच सांडपाण्यावर प्रक्रिया होत नाही. मुंबईत ८० टक्के, पुण्यात ६४, नाशिकमध्ये ४७, तर नागपूरमध्ये २६ टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. त्यातही, बृहन्मुंबईमध्ये पुण्याच्या चौपट पाणीपुरवठा होत असूनही, सांडपाणी तयार करण्यात मात्र पुण्याने मुंबईला मागे टाकले आहे! महाराष्ट्रातील या महानगरांच्या तुलनेत हैदराबाद, अहमदाबाद, बडोदा, लुधियाना, चेन्नई येथे जवळपास 100 टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया करून मगच ते पाणी पुढे सोडण्यात येते, असे अहवालात नमूद केले आहे.
अहवालातील काही ठळक निष्कर्ष -
- देशांतील महानगरांमध्ये (दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या) रोज १५,६४४ दशलक्ष लिटर सांडपाणी तयार होते। त्यांपैकी ८०४० दशलक्ष लिटर पाण्यावर (५१ टक्के) प्रक्रिया केली जाते.
- देशांतील तब्बल ९३ टक्के सांडपाणी वर्ग १ दर्जाची शहरे तयार करतात। त्यांपैकी ६८ टक्के सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता सोडून दिले जाते. महाराष्ट्रातील अशा शहरांची संख्या आहे ५०.
- देशांतील वर्ग २ दर्जाच्या शहारांमध्ये तब्बल ९२ टक्के सांडपाणी विनाप्रक्रिया सोडून दिले जाते। महाराष्ट्रात वर्ग २ मध्ये तब्बल ३४ निमशहरे समाविष्ट आहेत.
- वर्ग १ आणि २ दर्जाची महाराष्ट्राहून अधिक शहरे उत्तर प्रदेश (१०७), उत्तर प्रदेश (९९) आणि पश्‍चिम बंगाल (८७) मध्ये आहेत। तथापि, या तीनही राज्यांमधील शहरे-निमशहरे मिळून जेवढे सांडपाणी रोज तयार करतात, तेवढे एकट्या महाराष्ट्रात तयार होते.
शिफारशी:
- सांडपाणी व्यवस्था उभा करण्याकडे महापालिकांनी अत्यंत तातडीने पावले उचलली पाहिजेत।
- अशा व्यवस्थेअभावी जलस्रोत निकामी होत आहेत, याकडे महापालिका व नगरपालिकांनी जबाबदारीने पाहिले पाहिजे।
- सांडपाणी आणि त्यावरील प्रक्रियेची यंत्रणा यातील दरी सातत्याने वाढते आहे। त्यामुळे शहरांमधील प्रदूषण वाढते आहे. ही दरी भरून काढण्यासाठी प्राधान्याने कार्यक्रम हाती घेतले पाहिजेत.
- सांडपाण्याच्या पुनर्वापरावर भर दिला पाहिजे।
- शंभर टक्के सांडपाण्यावर किमान प्रक्रिया करणारी यंत्रणा प्रत्येक शहरे-निमशहरांनी तत्काळ उभी केली पाहिजे।
- प्रमुख जलस्रोत असलेल्या नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी तत्काळ कृती आराखडा तयार केला पाहिजे।

Friday, February 5, 2010

निरुपम, बंद करा तुमची बकबक

परवा निरुपम ची टी वी वर पत्रकार परिषद् बघितली । काय काय बरळतो हा माणुस बघून विश्वासच बसत नाही, म्हणे राज साहेबानी राष्ट्र द्रोह केला आहे, त्यानीँ वेगळ्या महाराष्ट्राची मागणी केली आहे । ह्यानी आधी भाषण बघीतलं तरी का, राज साहेब म्हणाले की हे असच जर चालू राहिला तर कुठल्या मराठी तरुनामधे जर वेगळ्या महाराष्ट्राचे विचार आले तर त्याला हे सर्व नेते जबाबदार असतील । कालपासून ह्या वाक्याचा एवढा विपर्यास केला आहे की सांगता सोय नाही । कालच NDTV वर कार्यक्रम बघत होतो आणि त्यानीँ पण आज तक प्रमाणे ह्या वाकया भोवती आपला कार्यक्रम सदर केला । कोणी संपूर्ण भाषण ऐकलं नाही , कोणाला कशाचा पत्ता नाही आपली उचलली जीभ लवली टाळ्याला । त्यांच्या भाषणात राज साहेबानी सांगितलं की सर्व शहर ही भारतातच आहेत आणि भारताचिच आहेत पण भाषावार प्रान्त रचने नुसार मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि मुंबई वर महाराष्ट्राचा अधिकार आहे मग त्यात काय चुकलं? ह्या सर्व वहिन्यानीँ आणि भैया निरुपम नि डोम्बीवलीतील अति विराट सभा बघितली असती तर ह्यांची बोबडीच वळाली असती । आम्हा कर्यकर्त्याना देखिल आत शिरायला भेटलं नाही आणि आम्ही भाषण गेट वर उभ राहून ऐकलं । ह्या निरुपम नि अजुन अकलेचे तारे तोडले, म्हणे भैयाना टँक्सी चालवन्यासाठी कायद्यात बदल करा । आम्ही काय हातात बांगड्या भरल्या आहेत काय? बदल करून तर दाखवा , हा उभा महाराष्ट्र त्याला विरोध केल्या शिवाय राहणार नाही ..... तेव्हा निरुपम तुमची बकबक बंद करा ...............

Wednesday, February 3, 2010

स्टार माझा वरील संदीप रामदासीचां ब्लॉग

मित्रानो , स्टार माझा वर संदीप रामादासीचां एक चांगला ब्लॉग वाचला त्याच नाव आहे "नशीबवान राहुल गांधी " । हा ब्लॉग खालील लिंक वर बघता येइल ।
http://www.starmajha.com/MajhaBlog.aspx?BlogID=1473

Tuesday, February 2, 2010

वा अशोकराव, चांगले पांग फेडलेत महाराष्ट्राचे ......

अशोकराव, फार चांगले पांग फेडत आहात तुम्ही आमचे, ह्याच करता तुम्हाला महाराष्ट्राचे मुख्य मत्रीपद दिले गेले ? जर पर प्रातिंयानां सरक्षण देण्याकरता तुमच सरकार सर्वोच्च प्राधान्य देणार आहे तर मग सामान्य लोकांच्या प्रश्नाचं काय? महागाई , सुरक्षा , रस्ते , इस्पितळ , मुलभुत सोई सुविधा , पानी प्रश्न ह्यांना कधी प्राधान्य देणार? एक लक्षात ठेवा तुम्हाला महाराष्ट्राचे मुख्य मंत्रिपद दिलेले आहे ते इथील लोकांचे प्रश्न सोडवन्या करीता , ते काम तुम्ही कधी करणार आणि त्याला प्राधान्य कधी देणार? हा सर्व प्रकार अतिशय घ्रुनास्पद होत चालला आहे आणि तुम्ही लोक मराठी जनतेच्या सहनशिलतेचा अंत बघत आहात, हे नक्की।

मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्रात येणा-या परप्रांतियांच्या रक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज (मंगळवारी) मुंबईत केली. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेमुळे मराठी अस्मितेचे राजकारण करणा-या शिवसेना-मनसेला आक्रमक होण्याची आणखी एक संधी मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. सोमवारी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहार दौ-यावर गेलेल्या राहुल गांधी यांनी मिडियाशी बोलताना २६ / ११च्या हल्ल्यातून बिहारींनी मुंबईला वाचवले, असे विधान केले होते. त्यांच्या या विधानाचा शिवसेना-मनसे या प्रादेशिक पक्षांकडून जाहीर विरोध करण्यात आला. सुरक्षा पथके देश रक्षणासाठी आहेत, त्यांचा प्रादेशिक अस्मितेशी संबंध जोडणे देशहिताचे नाही, असे म्हणणा-या शिवसेनेने बिहारींचे लांगुलचालन करणा-या राहुल गांधींवर टीका केली होती. राहुलने शहिदांचा अपमान केला असे सेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर आज (मंगळवारी) मुंबईत मुख्यमंत्र्यांना राज्यातल्या उत्तर भारतीयांच्या संरक्षणासंदर्भात एक प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकार परप्रांतियांच्या रक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देईल, असे जाहीर केले आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी मिडियाशी बोलताना ज्यांना मराठी लिहिता , बोलताआणि वाचता येते अशांना नवे टॅक्सी परवाने देण्याची घोषणा केली होती . त्यांच्या यावक्तव्याचा उत्तर भारतीय नेत्यांनी विरोध केला आणि २४ तासांच्या आतमुख्यमंत्र्यांनी घूमजाव केले होते . त्या पाठापोठ आता परप्रांतियांच्या रक्षणालाप्राधान्य देण्याची भाषा मुख्यमंत्र्यांनी केली आहे .

राहुल, हा तर महाराष्ट्राचा अपमान

काल रात्रीच्या बातम्या बघितल्या आणि नंतर आज सकाळचे वर्त्तमान पत्र वाचली आणि आमचं तर डोकच फ़िरलं। आम्हाला राहुल गांधीन बद्दल आणि त्यांच्या प्रगल्भते बद्दल आशा होती पण त्यानीं ती पर धुळीला मिळवली । त्यांच्या म्हणन्या प्रमाने मराठी माणुस मुंबई च रक्षण करू शकत नाही आणि आम्हाला यु पी , बिहारच्या लोकांची मदत घ्यावी लगते । हा तर २६/११ च्या लढ्यात शहीद झालेल्या लोकांचा अपमान आहे , ह्या लढ्यात असख्यं स्थानिक लोकानी प्रशासनास मदत केली त्यांचा अपमान आहे आणि हा उभय महाराष्ट्राचा अपमान आहे। त्यांनी जर इतिहास तपासून पहिला तर त्यांना कळेल की ह्या महाराष्ट्राने आणि सह्याद्रिने दिल्लीचे तख्त राखले आहे आणि परकीय आक्रमनाला आपल्या पराक्रमाने परतवून लावले आहे । जर NSG कमांडो चा बेसच दिल्लीला आहे आणि राज्य स्तरावर जर अशी यंत्रणा नाही तर महाराष्ट्रातील पोलिसानां किवां राज्य शासनाला दिल्लीची मदत घ्यावीच लागणार त्यात प्रांतवाद आला कुठे? हे तर केंद्र शासनाचा अपयश आहे की त्यानी राज्य स्तरावर अशी यंत्रणा उभी नाही केली आणि केंद्रात , राज्यात तर ह्यांचच सरकार आहे । राहुल गांधीनी उभ्या महाराष्ट्राचा अपमान केला आहे हे निच्छित आणि हे आम्ही विसरणार नाही ।

म टा च्या सौजन्याने
2 Feb 2010, 0115 hrs IST
२६/११च्या दहशतवाद्यांना कंठस्नान कुणी घातले? बिहार, यूपीच्या एनएसजी कमांडोंनी! - राहुल

शिवसेना व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यातील वादाने 'मराठी मुंबई'चा मुद्दा नव्याने ऐरणीवर आला असताना काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी त्यात उडी घेतली। '२६/११ रोजी मुंबईवर भीषण हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना कंठस्नान कुणी घातले? बिहार, उत्तर प्रदेशच्या एनएसजी कमांडोंनी. त्यामुळे दहशतवाद्यांशी लढायचे तर बिहारींना मुंबईतच राहू दे' असे धक्कादायक उद्गार राहुल यांनी बिहारमध्ये काढले.

एनएसयूआयच्या सदस्यांशी राहुल यांनी सोमवारी येथे संवाद साधला। त्यादरम्यान मुंबई व मराठीचा मुद्दा उपस्थित झाला असता राहुल गांधींची गाडी अचानक २६/११वर घसरली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे सातत्याने बिहारींना मुंबईतून हाकलून द्या, अशी भाषा करीत असतात. मुंबईवरील हल्ल्याचेवेळी छातीचा कोट करून बिहार, उत्तर प्रदेश व देशाच्या इतर राज्यांतील एनएसजी कमांडोंनी मुंबईला, मुंबईकरांना वाचवले. त्यावेळी 'बिहारींना हाकला' अशी मागणी राज यांनी केली नाही, असे उद्गार राहुल यांनी काढले. बिहारमध्ये या वषीर् विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या डोळ्यांसमोर ठेवून राहुल यांनी हे वक्तव्य केल्याचे मानले जात असले तरी मुंबई-महाराष्ट्रात त्याचे तीव्र पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत......... ......

आथिर्क राजधानी कुणाची? उत्तरांना जोर

मराठी मुंबईच्या मुद्द्यावर सोमवारी राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत होत्या। 'मुंबई सगळ्यांची आहे. मुंबईतील उत्तर प्रदेशींना संघाचे स्वयंसेवक संरक्षण देतील' या संघाच्या पवित्र्याचा शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'संघाने मुंबईची उठाठेव करू नये' असे सांगत चांगलाच समाचार घेतला; तर 'जन्माने मराठी असलेल्यांनाच महाराष्ट्रात नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळाले पाहिजे' असे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी बजावले. भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांनी, देशाच्या कोनाकोपऱ्यात राहणाऱ्या प्रत्येक भारतीय नागरिकाला देशभरात कोठेही जाण्याची मुभा आहे. भाजप आणि शिवसेनेत काही मुद्द्यांवर मतभेद असू शकतात, अशी भूमिका घेतली. समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी संघाच्या या मुद्द्यावरील भूमिकेला मात्र पाठिंबा दिला. मुंबईत राहण्याचा, काम करण्याचा प्रत्येक भारतीयाला अधिकार आहे, अशी भूमिका गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी मांडली. तर मराठीच्या मुद्द्यावर शिवसेना आणि मनसेने कायदा हातात घेऊ नये, असा इशारा मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिला.