Friday, February 26, 2010

राज आंदोलनाचे ‘सिंचन’ राज्यभर

म टा च्या सौजन्याने


मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई

राज्यातील प्रत्येक सिंचन जमीन भूमीपूत्र मराठी माणसाच्या मालकी हक्काची असावी, महाराष्ट्रात या अगोदर ज्या परप्रांतीयांनी जमीन खरेदी केली आहे, त्यात एका मराठी माणसाला भागीदार म्हणून घेण्याचीही अट हवी, तसा कायदा राज्य सरकारने करावा, अशीही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका पत्रात केली आहे। ही मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी या पत्रात दिला आहे.

मराठी भाषा दिनानिमित्त राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पत्रात हे आवाहन करण्यात आले आहे। महाराष्ट्र म्हणजे मराठी हे समीकरण करून टाकणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक सिंचन जमीन ही मराठी मालकीची हवी असा आमचा आग्र आहे.मराठी माणसाने प्रत्येक मराठी सण हा जल्लोषात साजरा केला पाहिजे. २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा दिन असून हा दिवस दिवाळीप्रमाणे साजरा केला पाहीजे, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी माणसाला केले आहे.

मनसेचं आंदोलन संपलेलं नाही , याचे स्पष्ट संकेत देत त्यांनी आंदोलन पुन्हा सुरु होण्याचा इशारा दिला। आंदोलनाच्या दुस-या टप्प्यात मराठी भाषेविषयी आग्रह केला जाणार आहे , असे राज ठाकरेंनी यात म्हटले आहे. तसेच या पत्रात पुन्हा एकदापरप्रातियांना त्यांनी लक्ष्य केले आहे.

तसेच सिंचनाखाली येणारी प्रत्येक जमीन मराठी माणसाच्या मालकीची हवी, तसा राज्य सरकारने कायदा करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली। महाराष्ट्रात या अगोदर ज्या परप्रांतीयांनी जमीन खरेदी केली आहे, त्यात एका मराठी माणसाला भागीदार म्हणून घेण्याचीही अट या हवी अशीही मागणी केली आहे. तसे न झाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी या पत्रात दिला आहे.

No comments:

Post a Comment