Wednesday, February 17, 2010

प्रदूषणकारी प्रकल्प कोकणाच्या माथी नको! - राज ठाकरे

म टा च्या सौजन्याने

- म। टा. वृत्तसेवा , चिपळूण
कोकणाच्या निसर्गसंपन्न भूमीत प्रदूषणकारी प्रकल्प नकोतच, असे सांगत 'माडवन अणुऊर्जा प्रकल्पसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने घेतल्या जात आहेत, ही काय मोगलाई आहे का?' असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला। राज ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर असून मंगळवारी ते राजापूरमध्ये होते.

कोणताही प्रकल्प उभारताना त्याबाबतचे तोटे स्पष्ट करणे आणि स्थानिक जनतेच्या शंकांचे निरसन करणे, हे सरकारचे काम आहे। जागा संपादित करताना शेतकऱ्यांना विश्वासात घेणे आणि त्यांची संमती घेणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. अणुउजेर्सारखे विनाशकारी प्रकल्प कोकणाच्या माथ्यावर मारले जात असतील, तर मनसे स्वस्थ बसणार नाही, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.

No comments:

Post a Comment