Monday, March 28, 2011

प्रशांत देशमुख - शिव आख्यान

काल कल्याण मध्ये मनसे व साई युवक मंडळा तर्फे शिव गाथा हा कार्यक्रम आयोजित केला होता त्यात "प्रशांत देशमुख" व घुमकर सर ह्यांचे शिव चरित्रावरील व्याख्यान ऐकले ... अतिशय सुंदर व्याख्यान होते ...

मला यु ट्यूब वर प्रशांत देशमुख ह्यांच्या वाख्यानाचा एक व डी ओ सापडला .... एकदा ऐकून पहा (साऊंड इतका चांगला नाही पण एकदा ऐकायला हरकत नाही)



Friday, March 25, 2011

शिव जयंती !!!








ह्या वर्षी मी आमच्या बिल्डिंग मध्ये (मोहन प्राईड - कल्याण ) येथे शिव जयंती निमित्त कार्यक्रम ठेवला होता. त्यामध्ये शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याची पूजा करण्यात आली होती व संध्याकाळी आमच्याच बिल्डिंग मधील श्री सुधांशु नाईक ह्यांचे "प्रताप गडावरील युद्ध" ह्या विषयावर व्याख्यान ठेवले होते.

कार्यक्रमास श्रीयुत काका मांडले (जिल्हा अध्यक्ष), आमदार प्रकाश भोईर (कल्याण पश्चिमेचे आमदार), विभागाध्यक्ष राजन शितोळे, उप शहर अध्यक्ष स्वप्नील सातवे, शाखा अध्यक्ष गणेश चौधरी / शेखर चाळके व तमाम मनसे कार्यकर्त्यांनी भेट दिली.

हे आमचं प्रथम वर्ष आणि बिल्डिंग मध्ये देखील त्या निमित्ताने उच्छाहाचे वातावरण होते. सर्व लोकांना कार्यक्रम आवडला व पुढील वर्षी अधिक जोमाने शिव जयंती सर्वानी मिळून साजरी करण्याचे ठरवले.

शिव जयंती चे काही फोटो इथे देत आहे .....


Monday, March 21, 2011

शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा !!!













मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा तर्फे महाराजांना मानाचा मुजरा


निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू
अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी

नरपती, हयपती, गजपती, गडपती, भूपती, जळपती
पुरंदर आणि शक्ती, पृष्ठभागी

यशवंत, किर्तीवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत
पुण्यवंत, नीतिवंत, जाणता राजा

आचारशील, विचारशील, दानशील, धर्मशील
सर्वज्ञपणे सुशील, सकळांठायी

धीर उदार गभीर, शूर क्रियेसी तत्पर
सावधपणे नृपवर, तुच्छ केले

देव धर्म गोब्राम्हण, कारवाया संरक्षण
हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केली

या भूमंडळीचे ठायी, धर्मरक्षी ऐसा नाही
महाराष्ट्र धर्म राहिला, तुम्हा कारणे

कित्येक दृष्ट संहारिला, कित्येकासी धाक सुटला
कित्येकास आश्रय जाहला, शिवकल्याण राजा


Tuesday, March 15, 2011

भीती दूर कोण करणार?

प्रताप आसबे चां म टा मधील लेख .........................



जपानमधील महाभयंकर भूकंप, प्रलयंकारी त्सुनामीमुळे एकापाठोपाठ एक सुरक्षा यंत्रणा कोलमडून पडत फुकूशिमा अणुभट्टीत झालेल्या स्फोटामुळे अणुऊर्जा प्रकल्पाच्या अपघाताची भीती पुन्हा उफाळून आली आहे. ती अनाठायी आहे, असे म्हणता येणार नाही. प्रकल्पामुळे होणारा किरणोत्सर्ग आणि भूकंपप्रवण क्षेत्रामुळे संभाव्य अपघाताची भीती यामुळे आधीच जैतापूर प्रकल्पाला मोठ्याप्रमाणात विरोधाला तोंड द्यावे लागत आहे. आता प्रगत जपानमधील अणुऊर्जा प्रकल्पात अपघात झाल्यानंतर जैतापूरचा विरोध अधिक धारदार होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाला साधारणत: तीन बाजूने विरोध होत आहे. ऐहिक सुखासाठी उद्याचा विचार न करता नैसगिर्क साधनसंपत्ती ओरबाडणाऱ्या अधाशीवृत्तीच्या विरोधात पर्यवरणवादी नेहमीच उभे असतात. तसे ते यावेळीही आहेत. त्यात प्रमामुख्याने गांधीवादी, डावे आणि पर्यावरणवादी यांचा समावेश असतो. असे असले तरी समस्त गांधीवादी, समस्त डावे हे प्रत्येकवेळी विरोधात असतील, असे नाही. शिवाय, राष्ट्रीय प्रकल्पाच्या नावाने जबरदस्तीने जमिनी घेऊन प्रकल्पग्रस्तांना वाऱ्यावर सोडल्याची शेकडो उदाहरणे आहेत. कोयनेचे रडगाणे अजून चालूच आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांतील एक मोठा वर्ग विकासप्रकल्पांच्या विरोधात कायमच असतो. तसा तो यावेळीही आहे. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावेळी प्रकल्पाच्या विरोधात शिवसेनेनेही शस्त्रे परजली आहेत.

राष्ट्रीय प्रकल्प म्हणून केंद्र आणि राज्यातील विद्यमान सरकारने जैतापूरचा प्रकल्प प्रतिष्ठेचा केला आहे. देशात युपीएऐवजी एनडीएचे सरकार असते तरी त्यांच्यादृष्टीने प्रकल्पाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला नसता; कारण प्रकल्पाच्या विरोधात इतका गदारोळ उठलेला असतानाही आणि आघाडीतील मित्रपक्षाने विरोधाचा पवित्रा घेतलेला असतानाही भाजपची प्रकल्पाला पाठिंबा देण्याचीच भूमिका आहे. मधल्या काळात शिवसेनेची भूमिका काहीशी नरमाईची होती. पण आता जपानमधील अपघातामुळे सेनेचा विरोधही अधिक धारदार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जैतापूर प्रकल्पाच्या माध्यमातून कोकणात पुन्हा एन्रॉनच्या आंदोलनाचा प्रत्यय येणार, असे दिसते आहे. त्यामुळे 'हिस्ट्री रिपीटस्' असे म्हणतात ते काही खोटं नाही. तेव्हा एन्रॉन, काँग्रेस आणि शरद पवार यांच्या विरोधात वेगवेगळ्या एनजीओ, डावे पक्ष, भाजप मागोमाग शिवसेना आणि स्थानिक जनता असा चित्तथरारक संघर्ष होता. प्रकल्पाच्या गरम पाण्यामुळे मासे मरतील. कोलंबी, कुर्ल्या, चिम्मोऱ्या गायब होतील. मच्छिमार देशोधडीला लागतील. आंब्याकाजूचे मोहर गळतील. कलमं वठतील. निसर्गरम्य कोकण उजाड होईल. या भीतीने कोकणी माणूस आणि कोकणाची अस्मिता पेटून उठली होती. एन्रॉनच्या बाजूचे आणि विरोधातले यांच्यातील हा संघर्ष इतका विलक्षण होता की कोण हरले आणि कोण जिंकले, असा प्रश्न निर्माण झाला. कारण संघर्षाच्या प्रत्येक टप्प्यावर कुणी ना कुणी पराभूत होत गेले. यात पहिला बळी काँग्रेसचा गेला. शिवसेना-भाजपची युती सत्तेवर आली तसा प्रकल्प थंडावला. पण बघता बघता नियतीने कथानकाला अशीकाही कलाटणी दिली की, विचारता सोय नाही. रेबेका मार्क आली. ती आली. तिने पाहिले आणि बाळासाहेबांनाच जिंकले. मग काय? अटलजींच्या नेतृत्वाखाली एनडीएची बसयात्रा नुकतीच कुठे सुरू झाली होती. रेबेकाबाईंनी त्यांच्यावरही मोहिनी घातली. त्यामुळे एनडीए सरकारने अवघ्या १३ दिवसांच्या राजवटीत एन्रॉनला पुन्हा जिवंत करण्याचा निर्णय घेतला. प्रकल्पामुळे आंबे, काजू, मासे यांच्यावर विपरीत परिणाम झाला नाही.

पण सुमारे १० हजार मेगावॉटच्या जैतापूर प्रकल्पामुळे पुन्हा ती भीती निर्माण झाली. अणुऊजेर्च्या रिअॅक्टरमुळे किरणोत्सर्ग होणार. महाभयंकर क्षमतेच्या अणुभट्ट्यांत काही अपघात झाला तर कोकणचे चेनोर्बिल होणार, अशी भीती पसरली. जपानमधील ताज्या घटनांनी ती आणखीनच वाढली आहे. शिवाय, कूलिंग प्रक्रियेसाठी वापरलेल्या पाण्यामुळे मासे मरतील. त्यांच्या अनेक जाती-प्रजाती नष्ट होतील. आंब्याकाजूचे मोहोर गळतील. इतकेच काय पण किरणोत्सर्गामुळे कॅन्सरची लागण होणार. महिलांचे गर्भपात होतील. माणसे नपुंसक होतील. मानवी प्रजननच थांबेल. या भीतीने कोकणी माणूस अस्वस्थ झाला. कोकणात पुन्हा असंतोषाचा वणवा पेटला.

खरे म्हणजे, ९३८ हेक्टरवर उभ्या राहणाऱ्या या प्रकल्पात एकही गाव, एकही घर बाधित होत नाही. त्यातली ६०७ हेक्टर जमीन अगदी ओसाड आहे. २६२ हेक्टर जमीन वरकस आहे. तर ६८ हेक्टर जमिनीवर शेती होते. आंब्याची १५० कलमे त्यात आहेत. कूलिंग प्रक्रियेनंतरचे गरम पाणी समुदात बरेच आत जाऊन सोडण्यात येणार आहे. सर्वच्यासर्व सहा रिअॅक्टर चालू झाल्यानंतर, म्हणजे सन २०२५नंतर पाणी जिथे सोडले जाईल तिथे पाव किलोमीटरच्या परिघातील पाण्याचे तापमान समुदातील पाण्याच्या तापमानापेक्षा पाच सेल्सिअसने वाढणार आहे. त्यामुळे सागरी जीवसृष्टीवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही. भारतामध्ये यापूवीर् अस्तित्वात आलेल्या नरोरा, काक्रापार, कैगा आणि तारापूर येथील अणुऊर्जा प्रकल्पामुळे सागरी जीवसृष्टीवर कोणताही विपरीत परिणाम झालेला नाही. पण भूकंपप्रवण क्षेत्रामुळे अपघाताची भीती आहे. जैतापूरचा परिसर तिसऱ्या सेस्मिक झोनमध्ये येतो. जपान, तैवान हे सात, आठ आणि नऊ, अशा भयावह सेस्मिक झोनमध्ये आहेत. त्यामुळे भूकंप आणि त्यानंतर येणाऱ्या त्सुनामीचे तिथे प्रचंड धोके आहेत. तरीही जपानमध्ये ५४ अणुऊर्जा प्रकल्प आहेत. भारतातील नरोराचा प्रकल्प चौथ्या सेस्मिक झोनमध्ये येतो. तिसऱ्या सेस्मिक झोनमध्ये येणाऱ्या जैतापूरच्या ३९ कि.मी.च्या परिसरातील भूगर्भात 'अॅक्टिव्ह फॉल्ट' नाही, असे तज्ज्ञ म्हणतात. जपान आणि इतर देशांच्या तुलनेने भूकंपाचा धोका कमी आहे. पण तरीही भूकंप आणि त्सुनामीचे धोके लक्षात घेऊन प्रकल्पाची उभारणी करणे आवश्यक आहे. तशी ती घेतली जाणार असल्याचे अणुऊर्जा तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तसा विश्वास लोकांना देण्याची गरज आहे. प्रदूषण करणारी कोणतीही रसायने प्रकल्पातून सोडण्यात येणार नाहीत, असे त्यांचे म्हणणे आहे. याशिवाय, भारतात जिथे जिथे अणुऊजेर्चे प्रकल्प आहेत तिथे कुठेही माणसांच्या पौरुषत्वावर, महिलांच्या गर्भधारणेवर कोणतेही विपरीत परिणाम झालेले नाहीत. पण लोकांच्या मनात घर करून बसलेल्या या शंकांचे निरसन सरकारने नीट केलेले नाही. आजवर प्रकल्पाला जो काही विरोध झाला त्याला ही भीती कारणीभूत आहे.

संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीला एकरी १० लाख रु. असा विक्रमी दर देण्यात येणार आहे. प्रकल्पग्रस्तांतील कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी. नसेलतर पाच लाख रु. परित्यक्ता आणि घरदार नसलेल्यांना ५०० रु.चे पेन्शन. आरोग्यकेंद, शाळा, आयटीआय, विद्यार्थ्यांचा दहावी आणि बारावीच्या शिक्षणाचा खर्च, महिलांना स्वयंरोजगारासाठी साह्य, मच्छिमारांच्या पुनर्वसनासाठी जेटी, शीतगृह, मच्छिमारी नौका, जाळी, मुसा काझी जेटीतील गाळ काढण्यासाठी आथिर्क मदत, शिवाय, विजेच्या विक्रीतून होणाऱ्या फायद्यातील दोन टक्के रक्कम त्या परिसरातील विकासासाठी खर्च करण्यात येणार आहे. असे पुनर्वसनाचे अभूतपूर्व पॅकेज आहे. पण पुनर्वसनाचे कितीही मोठे पॅकेज दिले तरी मुळात लोकांच्या मनातली भीती दूर होत नाही, तोपर्यंत विरोध होतच राहणार. खरे म्हणजे, माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्यापासून अनेक शास्त्रज्ञांचा या प्रकल्पाला पाठिंबा आहे. तज्ज्ञांनी प्रकल्पाच्या संबंधात असलेली भीती आणि शंका निरर्थक ठरविल्या. पण त्यांचे म्हणणे समजेल उमजेल अशा भाषेत लोकांपर्यंत गेले नाही. तशात जपानमधील घटनांनी लोकांना प्रकल्पाबाबतचे भय आणि शंका वाढविल्या आहेत. प्रकल्पाच्या बाजूने आपली सगळी प्रतिष्ठा पणाला लावणारे एकमेव काँग्रेसनेते नारायण राणे. त्यामुळे सेना हातघाईवर आलेली आहे. यातील राजकारणाचा भाग बाजूला केला तरी लोकांच्या शंकांचे निरसन झालेले नाही, हेही तितकेच खरे आहे. तशात हद्दपारी आणि जिल्हाबंदीचे आदेश जारी झाले आहेत. पण त्यातून प्रश्न अधिकच चिघळेल. लोकांच्या मनातील भीती दूर करणे, हाच एकमेव उपाय आहे. हायकोर्टाने म्हटल्याप्रमाणे सरकारने तज्ज्ञांची एक समिती नेमावी. अनिल काकोडकरांनाच तिचे अध्यक्षपद द्यावे. या समितीत अणुतज्ज्ञांबरोबरच सागरी जीवसृष्टीचे तज्ज्ञ, शेतीतज्ज्ञ, प्रजनन क्षेत्रातले डॉक्टर, पर्यावरणतज्ज्ञ यांचा समावेश करावा. तिने राजकीय पक्षांचे नेते, स्थानिक आणि बाहेरचे विरोधक याच्यांशी समोरासमोर चर्चा करावी. भीतीचे निराकरण करावे. लोकांच्या सहमतीने हा प्रकल्प उभा करावा. त्याला पर्याय नाही.

Thursday, March 10, 2011

'बांद्रा ते कोकण…सारेच षड्यंत्र!'-राज

खालील लेख म टा च्या सौजन्याने .......



बांद्र्याच्या गरीबनगर झोपडपट्टीत लागलेल्या आगीचं प्रकरण दिसतं तितकं सोपं नाही. हे एक षड्यंत्र आहे. मराठी टक्का कमी करून परप्रांतियांना मुंबई-ठाण्यात घुसवण्याचं कारस्थान सुरू आहे. तिकडे, कोकणातही मराठी माणसाची हजारो एकर जमीन बळकावण्याचं काम चाललंय. त्यातून कोकणी माणसाला काय मिळणार आहे ? हे जे घडतंय, त्यावर बारीक लक्ष ठेवा. एकदा वेळ हातातून गेली की काहीच होणार नाही, असा सावधानतेचा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठीजनांना दिला.

मनसेच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त राज यांनी आज आपल्या सैनिकांना मार्गदर्शन केलं. त्यांच्या या भाषणात कुठलाही नवा विषय नव्हता. पण, जुन्या विषयांना नव्या संदर्भांची जोड देऊन राज यांनी सत्ताधा-यांवर टीकास्त्र सोडलं आणि मराठी चा गजर केला. तसंच, आपल्याला कुणाच्याही युती-बितीची गरज नाही, सगळ्या निवडणुका आपण एकटेच लढवणार आहोत, असं त्यांनी जाहीर करताच मनसैनिकांनी टाळ्यांचा कडकडाट करून त्यांना दाद दिली.

मी शारुक मांजरसुंभेकर या नाटकाचा दाखला देत राज यांनी आपल्या हक्काचा, मराठीचा मुद्दा उचलला. मुंबईत आलेला एक मराठी मुलगा कसा स्ट्रगल करतो, त्याच्या वाट्याला काय-काय येतं हे या नाटकात दाखवण्यात आलंय. आज महाराष्ट्रात मराठी माणसाची परिस्थिती वेगळी नाही, असं त्यांनी नमूद केलं. बांद्र्याच्या गरीबनगरची झोपडपट्टी जळली... त्यात गरीब किती हा मुद्दा नाही. पण मराठी माणसाला हद्दपार करून परप्रांतियांना मुंबईत घुसवण्याच्या कटाचाच हा एक भाग आहे, याकडे राज यांनी लक्ष वेधलं.

मुंबईत झोपडपट्ट्या बेसुमार वाढताहेत. मराठी माणसाला इथे जागा नाही, पण रिक्लेमेशनजवळ बांगलादेशी मुस्लिमांनी झोपडपट्टी उभी केली. त्यांच्या घरांना आग लागली, त्यात कुणीही जखमी झालं नाही, तरीही सरकारने त्यांना पक्की घरं बांधून दिली. गरीबनगरचंही तेच होईल. हे सगळं कारस्थान आहे, अशी भीती राज यांनी व्यक्त केली. दोन-तीन मजल्याच्या झोपडपट्ट्या उभ्या राहत आहेत, एकेक मजला वाढतच जातोय, घराशेजारी हे सगळं होतंय, पण महापालिकेचं त्याकडे लक्ष नाही, अशी टिप्पणी करत त्यांनी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंना टोमणा मारला.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची तर त्यांनी दिल्लीवाल्यांचे हुजरे , बट नॅचरल, अशा शब्दांत खिल्ली उडवली. ४०-४० वर्षं सरकारी नोकरी करणा-या कर्मचा-यांना तुम्ही नंतर घरातून काढून टाकणार, पोलिसांना काढून टाकणार आणि ज्यांचा काही संबंध नाही त्यांना ३०० स्वे. फुटाची घरं देणार, हा कुठला न्याय ?, असा सवालही त्यांनी केला.

एफएसआय वाढवून देण्याची अधिकृतपणे मागणी करणा-या सचिन तेंडुलकला नकार देणा-या सरकारलाही त्यांनी खडे बोल सुनावले.

जैतापूरला विरोध नाही, पण...

कोकणात उभ्या राहणा-या जैतापूर प्रकल्पाला आमचा विरोध नाही. मनसे प्रगतीच्या आड कधीच येणार नाही. राज्याचा विकास महत्त्वाचा आहे. पण सगळे ऊर्जेचे प्रकल्प निसर्गसंपन्न कोकणातच का ? , बाकीच्या जिल्ह्यात का नाहीत ?, हेही एक षड्यंत्रच आहे, असा आरोप राज यांनी केला. सत्ताधारी पुढा-यांनी कोकणात हजारो एकर जमिनी घेऊन ठेवल्यात... कृपाशंकर सिंह यांची तिथे ३०० एकर जमीन आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. पण या जमिनी विकून कोकणी माणसाला काय मिळणार आहे, हे सगळं कुणाच्या घशात जाणार आहे, कोकणाचा उत्कर्ष कुणासाठी होतोय, असे सूचक प्रश्नही त्यांनी उपस्थित केले. कुणालाही आपल्या जमिनी विकू नका, ही सुपीक जमीन गेली की तुमच्या वाट्याला परत काही येणार नाही, अशी विनंतीही त्यांनी कोकणी जनतेला केली.

स्थानिक जनतेवर अन्याय, अत्याचार करून जैतापूरचा विषय सुटणार नाही. सरकार फक्त स्थानिकांच्या जमिनी बळकावतंय, लोकांना प्रकल्पाची माहितीच नाही, असंही त्यांनी नमूद केलं. नारायण राणेंनी हा प्रकल्प होईपर्यंत शांत बसावं, उगाच विषयाला फाटे फोडू नयेत, असं आवाहनही त्यांनी केलं.

महाराष्ट्राचं हित करा !

मनसे कार्यकर्त्यांनी मराठी माणसाच्या, महाराष्ट्राच्या हिताचा विचार करावा, त्यादृष्टीने काम करावं, असा सल्ला राज यांनी दिला. पाच वर्षं झाली, सहा वर्षं झाली अशी बोटं मोजत बसण्यात काहीच अर्थ नाही. मला तिकीट मिळेल का, हा अत्यंत फालतू विचार आहे. गेल्या ४० वर्षांत कोण नगरसेवक निवडून गेले त्यांची नावं तरी आठवतात का तुम्हाला ? त्यापेक्षा असं काहीतरी करा की तुम्ही कायम लक्षात राहाल, असं मार्गदर्शन त्यांनी केली. कुठे काय गैर चाललंय त्याकडे लक्ष ठेवा, पक्षाला पुढे कसं न्यायचं ते मी बघेनच, अशी सूचनाही त्यांनी केली.

Wednesday, March 9, 2011

युतीचे ओझे वाहायचे नाही!

खालील लेख म टा च्या सौजन्याने ..........................



शिवसेनेत असताना बराच मनस्ताप भोगला आहे. त्यामुळे आता शिवसेना-भाजप यांच्या युतीत शिरण्यामध्ये मला काहीही स्वारस्य नाही. या दोघांचेच एकमेकांशी पटत नसून सतत भांडणे सुरू आहेत. त्यांच्या युतीमध्ये सहभागी होऊन मला डोक्यावर ओझे वाहायचे नाही, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या प्रस्तावाची खिल्ली उडवली. वयाच्या साठीला माझ्या हाती सत्ता सोपवू नका तर येत्या महापालिका निवडणुकीत मतदारांनी आपला कौल मनसेला द्यावा, असे आवाहन राज यांनी केले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेला उद्या बुधवारी ९ मार्च रोजी पाच वर्षे पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी गेल्या पाच वर्षातील पक्षाच्या वाटचालीचा लेखाजोखा मांडला. मनसेने गेल्या पाच वर्षात हाती घेतलेल्या सर्व विषयांना न्याय मिळवून दिला. झोपी गेलेल्या मराठी माणसाला खडबडून जागे करण्यात मनसेचा सिंहाचा वाटा आहे. मराठी बोलणाऱ्यांकडे आता आदराने पाहिले जात आहे. मराठीतून बोलणाऱ्यांपुढे आता रिक्षावाले नमतात. रेल्वेत मराठी तरुणांना नोकऱ्या मिळाव्यात यासाठी केलेल्या आंदोलनाला यश मिळत आहे. हे सर्व करताना माझ्यावर ८५ हून अधिक केसेस पोलिसांनी टाकल्या आहेत. मात्र यातून मराठी जनतेला स्वाभिमान, रोजगार, प्रगती यासर्व गोष्टी मिळणार असतील तर मी आणखी केसेस स्वत:च्या अंगावर घ्यायला तयार आहे, असे राज यांनी सांगितले.

पक्ष स्थापन करताना सर्व धमिर्यांचा पक्षात सहभाग होईल अशाच दृष्टीने मी झेंडा तयार केला होता. महाराष्ट्रातील मराठी मतदार मग तो मराठी असो मुस्लिम असो वा दलित अशा सगळ्यांनीच मनसेला भरभरून मते दिली आहेत. महाराष्ट्रातील विरोधी पक्ष आज सत्ताधाऱ्यांवर तुटून पडण्यापेक्षा आपआपसांतील मतभेदांमध्ये अडकला आहे. तर सत्ताधारी स्वत:ची मते वाढविण्यासाठी अनधिकृत झोपड्या कायम करण्यात गंुतले आहेत. वांदे रिक्लेमेशनजवळच्या झोपड्यांना काही महिन्यांपूवीर् आग लागली होती. त्यानंतर ती कायम झाली. आता गरीबनगरमधील झोपड्यांना आग लागून त्यात हजारो झोपड्या खाक झाल्या आहेत, विशेष म्हणजे, त्यात कोणालाही इजा झालेली नाही. या देखील झोपड्या कायम होतील आणि सत्ताधाऱ्यांच्या मतांच्या पेटीत भर पडणार आहे, असा आरोप यावेळी राज यांनी केला.

मनसेचे मुंबईत मोठ्या प्रमाणावर आमदार निवडून आल्यानंतर काही राजकीय पक्षांना आता मराठी मतदारांविषयी पुळका आला आहे. वास्तविक हा मराठी मतदारांविषयीचा कळवळा नसून मराठी मतदार देखील एकत्र येऊन एवढ्या आमदारांना निवडून देऊ शकतो हे त्यामागचे गणित आहे. मात्र मराठी मतदार हे सर्व न जाणण्याइतका भोळसट नाही. भविष्यात मनसे आणखी बरीच आंदोलने हाती घेणार आहे. मात्र नुसत्या आंदोलनाने बदल होत नाहीत, तर त्यासाठी सत्ता असावी लागते. माझ्या हातात सत्ता आल्यास महाराष्ट्राची प्रगती गुजरातसारखी करून दाखवेन. अर्थात ही सत्ता उमेदीच्या काळात मिळाली तरच त्याची चीज होईल. वयाच्या साठीमध्ये सत्ता मिळून त्याचा काय उपयोग? मराठी जनता शहाणी आहेच. येत्या महापालिका निवडणुकांमध्ये ती आपला कौल निश्चितच देईल, असा विश्वास राज यांनी व्यक्त केला.

मनसे चा पाचवा वर्धापनदिन

"मी माझा महाराष्ट्र माझा" तर्फे मनसे ला ५ व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा .....

Monday, March 7, 2011

सेनेचा ‘वालेकुम सलाम!’

खालील लेख लोकसत्ता च्या सौजन्याने ........................



वर्ल्ड कपच्या भारतीय संघातील गोलंदाज कमी पडत असल्याचे दिसत असल्यामुळे फलंदाजांची जबाबदारी वाढलेली आहे. शिवसेनेच्या बाबतही सध्या असेच काहीसे झालेले दिसते. शिवसेनाप्रमुखांची ठाकरी भाषेतील ‘गोलंदाजी’ प्रकृती अस्वास्थ्यामुळे यापुढे फारशी चालणार नसल्यामुळे संघटना बांधणीची ‘फलंदाजी’ भक्कम करण्यावर शिवसेना कार्याध्यक्ष भर देताना दिसत आहेत. मात्र हे करत असताना ‘मराठी’ आणि ‘हिंदुत्व’ या प्रमुख खेळाडूंना धक्का बसेल अशी भूमिका घेत ठाण्यात त्यांनी ‘शिवसेना-मुस्लिम महासंघा’ची स्थापना करून टाकली. या स्थापनेसाठी मुहूर्त निवडला तोही महाशिवरात्रीचा. आधी मराठीच्या मुद्यावर महापालिका काबीज करणाऱ्या बाळासाहेबांनी हिंदुत्वाच्या वारूवर स्वार होत महाराष्ट्राची सत्ता हस्तगत केली होती. आता ‘छोटे सरकारनी’ मुस्लिम मतांचे गणित जुळवायचे ठरवलेले दिसते. यापूर्वी त्यांनी ‘मी मुंबईकर’चा स्टांस घेऊन बॅटिंग करून पाहिली होती. मात्र त्यात ते धावचित झाले आणि ‘मी मुंबईकरां’ना डावाने पराभूत व्हावे लागले होते. आता ठाण्यातील ‘शिंदेशाही’ला हाताशी धरून मुस्लिम मतांसाठी ‘सेना-मुस्लिम संघा’ची स्थापना केली. सेना-मुस्लिम ऐक्य करायचे होते तर निदान ‘शिवसेना-मुस्लिम सेना’ असे ‘नवनिर्माण’ तरी करायचे होते, अशी भावना ठाण्यातील शिवसैनिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे आता यापुढे ‘जय महाराष्ट्र’प्रमाणे ‘वालेकुम सलाम’ही करायचा का, असा सवाल शिवसैनिकांकडूनच उपस्थित केला जाताना दिसतो. ठाण्यात पुढील वर्षी होणाऱ्या पालिका निवडणुकीत शिवसेनेचा विजय निश्चित मानला जात होता. ‘शिवसेना-मुस्लिम संघ’ स्थापन करून ‘मनसे’च्या ‘फतेह’चा मार्ग तर मोकळा केला, असे दबल्या आवाजात बोलले जात आहे.

Friday, March 4, 2011

शिवसेनेचा मुस्लीम महासंघ ..... आता बोला?

अतिशय हास्यास्पद प्रकार आहे हा. असो, आम्ही काय बोलणार? अश्या गोष्टी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन करायच्या नसतात ..... त्या तुमच्या तत्वात असल्या पाहिजेत.


खालील लेख म टा च्या सौजन्याने .....


दरवर्षी मुस्लीम मोहल्ल्यातला प्रचार फिरकापरस्त (धर्मांध) या शब्दाभोवती फिरतो. 'तीर कमान हमारे सिनेको छलनी करने आया है...', अशी आरोळी मुंबई-ठाण्यातल्या मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये ठोकून शिवसेनेच्या विरोधात प्रचार चालतो. मात्र, आजवर चार हात लांब राहिलेल्या मुस्लिमांना आकर्षित करण्यासाठी शिवसेनेने चक्क मुस्लिम महासंघाची स्थापना केली आहे.

ठाणे महापालिकेच्या निवडणुका वर्षभरावर येऊन ठेपल्या आहेत. मुंब्य्रात महापालिकेचे जवळपास १६ प्रभाग असून ठाणे शहरातील काही प्रभागांमध्येही मुस्लिमांचे वर्चस्व आहे. तिथल्या मतदारांना चुचकारण्यासाठी शिवसेनेने मुस्लिम महासंघाची स्थापना केल्याची चर्चा आहे.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आ. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा महासंघ ठाण्यात स्थापन झाला असून मुंब्य्रातील अन्वरकुमार कच्ची (३४) यांना या महासंघाचे अध्यक्षपद बहाल करण्यात आले आहे. महासंधाची स्थापना झाल्यानंतर शेकडो मुस्लिमांनी सदस्यत्व स्वीकारण्यास सुरुवात केली असून टेंभी नाका येथे झालेल्या एका छोटेखानी सोहळ्यात त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

' शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देशप्रेमी मुस्लिमांचा नेहमीच आदर केला असून शिवसेनेचा राग हा पाकधाजिर्ण्या मुस्लिमांवर आहे. साबिर शेख यांच्यासारख्या कट्टर शिवसैनिकाला बाळासाहेबांनी कॅबिनेट मंत्री केले होते. परंतु, स्वत:ला सेक्युलर म्हणविणाऱ्या पक्षांनी मुस्लिम बांधवांमध्ये नेहमीच शिवसेनेबाबत गैरसमज पसरविले. तेच गैरसमज दूर करून देशप्रेमी मुस्लिमांना ठाणे शहराच्या विकासात सामावून घेण्याचा आमचा प्रयत्न असून लवकरच मुंब्रा, हाजूरी, वागळे इस्टेट या भागात मुस्लिम बांधवांचे मेळावे घेणार आहोत', असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

' तथाकथित सेक्युलर पक्षांनी वर्षानुवषेर् मुस्लिमांची मते आपल्या पारड्यात पाडून घेतली. मात्र, त्यामोबदल्यात आमच्या समाजाला काहीही मिळाले नाही. या पक्षांनी आम्हाला नेहमीच दावणीला बांधून ठेवले. आमच्यातील असुरक्षिततेच्या भावनेचा त्यांनी गैरफायदाच घेतला', असा आरोप अन्वर कुमार यांनी केला आहे. काँग्रेस आघाडीच्या स्थानिक नेत्यांच्या दुर्लक्षामुळे मुंब्य्राची दुर्दशा झाली आहे.

आमच्या मुलांना आजही दजेर्दार शिक्षण मिळू शकत नाही. मोहल्ल्यांमध्ये मुलभूत सुविधांही दिल्या जात नाहीत. या पक्षांकडून आमचा भ्रमनिरास झाला असून ठाणे शहराप्रमाणे शिवसेना मुंब्य्राचाही विकास करेल, या आशेपोटी आम्ही शिवसेनेत दाखल झाल्याचे अन्वरकुमार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले.

Wednesday, March 2, 2011

जैतापूर, विरोध कशासाठी?

सध्या जैतापूर चा विषय गाजतोय ...... शिवसेना जैतापूर प्रकल्पाला विरोध का करीत आहे हे कळण्याच्या पलीकडचे आहे. सरकार ने प्रकल्पग्रस्तांचे पुनवर्सन नीट करावे ह्याबद्दल दुमत नाही पण सरसकट विकासा साठी आवश्यक असलेल्या प्रकल्पाला विरोध करणे हे माझ्या मते चुकीचे आहे.

काल आय बी न वर निखिल वागळेचां आजचा सवाल बघितला, त्यामध्ये प्रवीण गव्हाणकर आणि अमजद बोरकर ह्यांच्या कडे ह्या प्रकल्पाला विरोध करण्याकरीता कोणताही शास्त्रीय आधार नव्हता. परवा झालेल्या मुख्य मंत्रांच्या सभेत राजन साळवी ह्यांनी नारायण राणेंना विरोध केला म्हणून त्यानां मातोश्री वर बोलावून त्याचं अभिनंदन करण्यात आलं. ह्या सर्व घटना गंभीर आहेत. शिवसेनेने तज्ञांची समिती नेमुन स्वताची भूमिका ठरवणे सयुक्तिक होईल अन्यथा ज्या प्रमाणे एन्रॉन प्रकल्प समुद्रात बुडून वर आला त्याप्रमाणे जर शिवसेनेने त्यांची भूमिका नंतर बदलली तर त्यांच्या विश्वासाहार्तेला तडा जाईल. अर्थात आम्ही त्यांचे विरोधी पक्ष आहोत पण महाराष्ट्राच्या विकासाच्या आड ते जर येत असतील तर ते चुकीचे आहे हे सांगण्याकरिता हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

आपला

विनोद

'धावबाद' उमेदवारांची रेल्वेने घेतली दखल

खालील लेख म टा च्या सौजन्याने ................





मध्य रेल्वेच्या नोकरभरतीमधील धावण्याच्या स्पधेर्तील वेळ वाढवून देण्याबाबत मध्य रेल्वेने अनुकूलता दर्शवली असून भरतीमधील निकष बदलण्याचे अधिकार असलेल्या रेल्वे बोर्डाला याबाबत कळवण्यात येणार आहे. मंगळवारी कार्यर्कत्यांसह सीएसटीच्या मुख्यालयात धडकलेल्या मनसे शिष्टमंडळाला महाव्यवस्थापक कुलभूषण यांनी उमेदवारांच्या भावना रेल्वे बोर्डापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले.

मध्य रेल्वेच्या नोकरभरतीमधील धावण्याच्या स्पधेर्चे निकष बदलण्याच्या मागणीसाठी मनसे व मनसेच्या रेल्वे कामगार संघटनेने आमदार बाळा नांदगावकर व रेल्वे संघटनेचे अध्यक्ष अतुल सरपोतदार यांच्या नेतृत्वाखाली सीएसटीमधील मुख्यालयावर मंगळवारी मोर्चा काढला होता. मनसेचे असंख्य कार्यकतेर् दुपारी घोषणा देत मुख्यालयावर धडकले. त्यामुळे रेल्वे पोलिसांची एकच धावपळ उडाली. मसनेच्या शिष्टमंडळाने महाव्यवस्थापक कूलभूषण यांची भेट घेतली.

सध्या रेल्वेत सुरू असलेल्या भरतीमध्ये पुरुषांना १५०० मीटर अंतर सहा मिनिटांत तर महिलांना ४०० मीटर अंतर तीन मिनिटांत पार करण्याची अट आहे. २००७ सालातील या नोकरभरतीला आता सुरुवात झाल्याने उमेदवारांचे वय वाढले. त्यामुळे वेळ वाढवून देण्याची गरज असल्याचे महाव्यवस्थापक कूलभूषण यांनी मान्य केले. पण नियमात बदल करण्याचे अधिकार रेल्वे बोर्डाला असल्याने मनसेच्या पत्रासोबत त्यांचे पत्र दिल्लीला पाठवण्याचे आश्वासन कुलभूषण यांनी दिले. मात्र ही मागणी मान्य न झाल्यास आंदोलन पुकारण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. या शिष्टमंडळात रेल्वे संघटनेचे अजित मेहेर, काशिनाथ गायकवाड यांचा समावेश होता.