Wednesday, March 2, 2011

'धावबाद' उमेदवारांची रेल्वेने घेतली दखल

खालील लेख म टा च्या सौजन्याने ................





मध्य रेल्वेच्या नोकरभरतीमधील धावण्याच्या स्पधेर्तील वेळ वाढवून देण्याबाबत मध्य रेल्वेने अनुकूलता दर्शवली असून भरतीमधील निकष बदलण्याचे अधिकार असलेल्या रेल्वे बोर्डाला याबाबत कळवण्यात येणार आहे. मंगळवारी कार्यर्कत्यांसह सीएसटीच्या मुख्यालयात धडकलेल्या मनसे शिष्टमंडळाला महाव्यवस्थापक कुलभूषण यांनी उमेदवारांच्या भावना रेल्वे बोर्डापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले.

मध्य रेल्वेच्या नोकरभरतीमधील धावण्याच्या स्पधेर्चे निकष बदलण्याच्या मागणीसाठी मनसे व मनसेच्या रेल्वे कामगार संघटनेने आमदार बाळा नांदगावकर व रेल्वे संघटनेचे अध्यक्ष अतुल सरपोतदार यांच्या नेतृत्वाखाली सीएसटीमधील मुख्यालयावर मंगळवारी मोर्चा काढला होता. मनसेचे असंख्य कार्यकतेर् दुपारी घोषणा देत मुख्यालयावर धडकले. त्यामुळे रेल्वे पोलिसांची एकच धावपळ उडाली. मसनेच्या शिष्टमंडळाने महाव्यवस्थापक कूलभूषण यांची भेट घेतली.

सध्या रेल्वेत सुरू असलेल्या भरतीमध्ये पुरुषांना १५०० मीटर अंतर सहा मिनिटांत तर महिलांना ४०० मीटर अंतर तीन मिनिटांत पार करण्याची अट आहे. २००७ सालातील या नोकरभरतीला आता सुरुवात झाल्याने उमेदवारांचे वय वाढले. त्यामुळे वेळ वाढवून देण्याची गरज असल्याचे महाव्यवस्थापक कूलभूषण यांनी मान्य केले. पण नियमात बदल करण्याचे अधिकार रेल्वे बोर्डाला असल्याने मनसेच्या पत्रासोबत त्यांचे पत्र दिल्लीला पाठवण्याचे आश्वासन कुलभूषण यांनी दिले. मात्र ही मागणी मान्य न झाल्यास आंदोलन पुकारण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. या शिष्टमंडळात रेल्वे संघटनेचे अजित मेहेर, काशिनाथ गायकवाड यांचा समावेश होता.

No comments:

Post a Comment