Wednesday, March 2, 2011

जैतापूर, विरोध कशासाठी?

सध्या जैतापूर चा विषय गाजतोय ...... शिवसेना जैतापूर प्रकल्पाला विरोध का करीत आहे हे कळण्याच्या पलीकडचे आहे. सरकार ने प्रकल्पग्रस्तांचे पुनवर्सन नीट करावे ह्याबद्दल दुमत नाही पण सरसकट विकासा साठी आवश्यक असलेल्या प्रकल्पाला विरोध करणे हे माझ्या मते चुकीचे आहे.

काल आय बी न वर निखिल वागळेचां आजचा सवाल बघितला, त्यामध्ये प्रवीण गव्हाणकर आणि अमजद बोरकर ह्यांच्या कडे ह्या प्रकल्पाला विरोध करण्याकरीता कोणताही शास्त्रीय आधार नव्हता. परवा झालेल्या मुख्य मंत्रांच्या सभेत राजन साळवी ह्यांनी नारायण राणेंना विरोध केला म्हणून त्यानां मातोश्री वर बोलावून त्याचं अभिनंदन करण्यात आलं. ह्या सर्व घटना गंभीर आहेत. शिवसेनेने तज्ञांची समिती नेमुन स्वताची भूमिका ठरवणे सयुक्तिक होईल अन्यथा ज्या प्रमाणे एन्रॉन प्रकल्प समुद्रात बुडून वर आला त्याप्रमाणे जर शिवसेनेने त्यांची भूमिका नंतर बदलली तर त्यांच्या विश्वासाहार्तेला तडा जाईल. अर्थात आम्ही त्यांचे विरोधी पक्ष आहोत पण महाराष्ट्राच्या विकासाच्या आड ते जर येत असतील तर ते चुकीचे आहे हे सांगण्याकरिता हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

आपला

विनोद

9 comments:

  1. mazya mate ha prakalp hou naye karan prakalp grathana proper mahiti nahi ki anu urja hi kahi kokana khelnayachi gostha nahve

    ReplyDelete
  2. shetkarancchya jamini ghenar ani vikas karanar vikas manje nakki kay konacha vikas.jayacha shetivarcha chalata tyncha kay. Bakich lok lagech dusara nokari milavu shakatat pan shetkarancha kay.Tylach tar sheti yete. Darveles jamini ghyachaya vikasachaya navakhali.Bar tithalaya panayatil pranyancha kay.

    Maza Virodh Aahe

    ReplyDelete
  3. नारायण राणे यांच्या लुडबुडीमुळे प्रकरण चिघळले आहे. मुख्यमंत्र्यानी प्रकल्पग्रस्तांशी नारायण राणे याना वगळून थेट संवाद साधल्यास आंदोलनाला वेगळे वळण मिळेल.

    ReplyDelete
  4. खुप मोठ्या बाता करताय राव! शिवसेनाविरोध म्हणून तुमचे बोल ठिक आहेत. उध्दवसाहेबांनी घेतलेली भूमिका असल्याने तुमचा विरोध असणार असे गृहित धरूनत ते जात असणार... पण सल्ले देण्याऐवजी हा प्रकल्प योग्य कसा हे सांगितला असतात तर बरे वाटले असते. अर्थात फुकट सल्ले कास कोणीही देत असतो... असो तुमचे घर जैतापुरमध्ये असते तर तुमच्या भूमिकेचा सन्मान केला असता...

    ReplyDelete
  5. अमित ... हा प्रकल्प योग्य कसा ह्यावर बरेच लेख प्रदर्शित झालेले आहेत, ते लेख परत एकदा टाकेन माझ्या ब्लॉग वर. आमचं घर जैतापुरात नाही त्याला काय करणार, असतं तरी विरोध नक्कीच केला नसता एवढा मात्र निश्चित.

    आपला विनोद

    ReplyDelete
  6. aaj he rajkiya nete garibanchya jivaashi khelat ahe yaana disto to fakt paisa are asha praklpapeksha tya garib lokana sheti margdarshn dya aretyana ya prakalpadware nokryanche amish dakhau naka nahitar

    are tumhala tyachatun nighalela kachha maalachi vilevat kashi lavayachi te ajun mahit nahi tar tumhi deshacha vikas kasa karnar,,,,
    RUPESH JADHAV

    ReplyDelete
  7. तब्बल १०,००० मेगावॉट क्षमतेचा हा जगातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प असून, विदेशी सहकार्यातून साकारला जात असलेला देशातील पहिला प्रकल्प आहे.

    अणुऊर्जेबाबत साशंकतेने सर्वत्र सुरुवातीला स्थानिकांचा प्रकल्पांना विरोध होतच असतो. पण शंकांचे योग्य समाधान झाल्यावर आणि पुरेसा मोबदला हाती पडल्यावर सारे विरोधही मावळतो .
    सर्वात स्वच्छ ऊर्जेचा हा पर्याय .
    हा प्रकल्प नुसता कोकणाचेच नव्हे तर महाराष्ट्राचेही चित्र पालटून टाकणार.

    नेहा

    ReplyDelete
  8. तब्बल १०,००० मेगावॉट क्षमतेचा हा जगातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प असून, विदेशी सहकार्यातून साकारला जात असलेला देशातील पहिला प्रकल्प आहे.
    अणुऊर्जेबाबत साशंकतेने सर्वत्र सुरुवातीला स्थानिकांचा प्रकल्पांना विरोध होतच असतो. पण शंकांचे योग्य समाधान झाल्यावर आणि पुरेसा मोबदला हाती पडल्यावर सारे विरोधही मावळतो ,
    हा प्रकल्प नुसता कोकणाचेच नव्हे तर महाराष्ट्राचेही चित्र पालटून टाकणार.

    ReplyDelete
  9. तब्बल १०,००० मेगावॉट क्षमतेचा हा जगातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प असून, विदेशी सहकार्यातून साकारला जात असलेला देशातील पहिला प्रकल्प आहे.
    अणुऊर्जेबाबत साशंकतेने सर्वत्र सुरुवातीला स्थानिकांचा प्रकल्पांना विरोध होतच असतो. पण शंकांचे योग्य समाधान झाल्यावर आणि पुरेसा मोबदला हाती पडल्यावर सारे विरोधही मावळतो ,
    हा प्रकल्प नुसता कोकणाचेच नव्हे तर महाराष्ट्राचेही चित्र पालटून टाकणार.

    ReplyDelete