Wednesday, March 9, 2011

युतीचे ओझे वाहायचे नाही!

खालील लेख म टा च्या सौजन्याने ..........................



शिवसेनेत असताना बराच मनस्ताप भोगला आहे. त्यामुळे आता शिवसेना-भाजप यांच्या युतीत शिरण्यामध्ये मला काहीही स्वारस्य नाही. या दोघांचेच एकमेकांशी पटत नसून सतत भांडणे सुरू आहेत. त्यांच्या युतीमध्ये सहभागी होऊन मला डोक्यावर ओझे वाहायचे नाही, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या प्रस्तावाची खिल्ली उडवली. वयाच्या साठीला माझ्या हाती सत्ता सोपवू नका तर येत्या महापालिका निवडणुकीत मतदारांनी आपला कौल मनसेला द्यावा, असे आवाहन राज यांनी केले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेला उद्या बुधवारी ९ मार्च रोजी पाच वर्षे पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी गेल्या पाच वर्षातील पक्षाच्या वाटचालीचा लेखाजोखा मांडला. मनसेने गेल्या पाच वर्षात हाती घेतलेल्या सर्व विषयांना न्याय मिळवून दिला. झोपी गेलेल्या मराठी माणसाला खडबडून जागे करण्यात मनसेचा सिंहाचा वाटा आहे. मराठी बोलणाऱ्यांकडे आता आदराने पाहिले जात आहे. मराठीतून बोलणाऱ्यांपुढे आता रिक्षावाले नमतात. रेल्वेत मराठी तरुणांना नोकऱ्या मिळाव्यात यासाठी केलेल्या आंदोलनाला यश मिळत आहे. हे सर्व करताना माझ्यावर ८५ हून अधिक केसेस पोलिसांनी टाकल्या आहेत. मात्र यातून मराठी जनतेला स्वाभिमान, रोजगार, प्रगती यासर्व गोष्टी मिळणार असतील तर मी आणखी केसेस स्वत:च्या अंगावर घ्यायला तयार आहे, असे राज यांनी सांगितले.

पक्ष स्थापन करताना सर्व धमिर्यांचा पक्षात सहभाग होईल अशाच दृष्टीने मी झेंडा तयार केला होता. महाराष्ट्रातील मराठी मतदार मग तो मराठी असो मुस्लिम असो वा दलित अशा सगळ्यांनीच मनसेला भरभरून मते दिली आहेत. महाराष्ट्रातील विरोधी पक्ष आज सत्ताधाऱ्यांवर तुटून पडण्यापेक्षा आपआपसांतील मतभेदांमध्ये अडकला आहे. तर सत्ताधारी स्वत:ची मते वाढविण्यासाठी अनधिकृत झोपड्या कायम करण्यात गंुतले आहेत. वांदे रिक्लेमेशनजवळच्या झोपड्यांना काही महिन्यांपूवीर् आग लागली होती. त्यानंतर ती कायम झाली. आता गरीबनगरमधील झोपड्यांना आग लागून त्यात हजारो झोपड्या खाक झाल्या आहेत, विशेष म्हणजे, त्यात कोणालाही इजा झालेली नाही. या देखील झोपड्या कायम होतील आणि सत्ताधाऱ्यांच्या मतांच्या पेटीत भर पडणार आहे, असा आरोप यावेळी राज यांनी केला.

मनसेचे मुंबईत मोठ्या प्रमाणावर आमदार निवडून आल्यानंतर काही राजकीय पक्षांना आता मराठी मतदारांविषयी पुळका आला आहे. वास्तविक हा मराठी मतदारांविषयीचा कळवळा नसून मराठी मतदार देखील एकत्र येऊन एवढ्या आमदारांना निवडून देऊ शकतो हे त्यामागचे गणित आहे. मात्र मराठी मतदार हे सर्व न जाणण्याइतका भोळसट नाही. भविष्यात मनसे आणखी बरीच आंदोलने हाती घेणार आहे. मात्र नुसत्या आंदोलनाने बदल होत नाहीत, तर त्यासाठी सत्ता असावी लागते. माझ्या हातात सत्ता आल्यास महाराष्ट्राची प्रगती गुजरातसारखी करून दाखवेन. अर्थात ही सत्ता उमेदीच्या काळात मिळाली तरच त्याची चीज होईल. वयाच्या साठीमध्ये सत्ता मिळून त्याचा काय उपयोग? मराठी जनता शहाणी आहेच. येत्या महापालिका निवडणुकांमध्ये ती आपला कौल निश्चितच देईल, असा विश्वास राज यांनी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment