Friday, February 18, 2011

फडके मैदानात मुक्तीचे वारे

कल्याण मधील मनसेचे आमदार श्री प्रकाश भोईर ह्यांच्या आमदार निधीतून फडके मैदानाचा काया पालट होणार आहे ... अतिशय स्तुत्य उपक्रम ......

खालील बातमी म टा च्या सौजन्याने ..................



कल्याणमधील आधारवाडी येथील आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके मैदानाचा घास घेऊन तिथे मॉल उभारण्याचा प्रस्ताव अखेर बारगळला आहे. मैदानात मॉल होऊ नये यासाठी अनेकांनी विरोध दर्शविल्याने मागील तीन वर्षांपासून त्याचे काम सुरू होऊ शकले नव्हते. अखेर आमदारनिधीतून या मैदानाचा विकास होणार असून येत्या आठवडाभरात शहरातील मान्यवरांच्या उपस्थितीत या मैदान विकासाच्या कामाचा शुभारंभ होत आहे.

शहरातील मैदानांची संख्या घटणारी संख्या पाहता नव्याने मैदाने करण्याची नितांत आवश्यकता आहे. मात्र केडीएमसीने त्याउलट भूमिका घेत डोंबिवली व कल्याणमधील मैदानेच मॉलसाठी देऊन टाकली. सामान्य जनतेने या प्रकल्पांना तीव्र विरोध केला. डोंबिवलीतील मॉल थोपवणे कोणालाही शक्य झाले नसले तरी कल्याणमधील वासुदेव बळवंत फडके मैदानातील मॉलचे काम सुरू झाले नव्हते. अखेर हा मॉलचा प्रस्तावच गुंडाळला जाणार असून या मैदानाचा कायापालट आमदारांच्या विकासनिधीतून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आमदार प्रकाश भोईर यांनी कामाची सुरुवात करण्यासाठी १० लाख रुपये निधी देताच शहरातील अन्य दानशूर व्यक्ती आणि मैदानाच्या पाठीराख्यांनी त्यांना या प्रकल्पात निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन दिले आहे. येत्या आठवडाभरात शहरातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मैदानाच्या विकासाच्या कामाचा शुभारंभ होणार असल्याचे भोईर यांनी सांगितले. सध्या या मैदानात पाणीपुरवठ्याच्या भल्यामोठ्या पाइपने अडथळा निर्माण केला असून ट्रक आणि अन्य वाहनांसाठी ती पाकिर्ंगची जागा ठरली आहे. ही अवस्था तातडीने पालटावी यासाठी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

1 comment:

  1. आमदार श्री प्रकाश भोईर ह्यांच्या अभीनंदन.............

    ReplyDelete