Wednesday, February 2, 2011

रेल्वे भरतीसाठी मराठी मुलांना मदत करा:राज ठाकरे

खालील बातमी स्टार माझा च्या सौजन्याने .....................



रेल्वे भरतीमध्ये मराठी मुलांना डावलले जाते त्यामुळेच येत्या १५ फेब्रुवारी रोजी रेल्वे भरतीसाठी जे अर्ज भरले जाणार आहेत त्यामध्ये मराठी मुलांना मदत करा असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले.

रेल्वे भरतीमध्ये आता मराठी मुलांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ढाल मिळणार आहे. राज्यभरातल्या मराठी मुलांना रेल्वे परीक्षाला बसण्यासाठी मनसे आता प्रोत्साहन देणार आहे. त्यासाठी आज मनसेची मार्गदर्शक पुस्तिका प्रकाशित करण्यात आली. दादरच्या रविंद्र नाट्यमंदिरात राज ठाकरे यांनी राज्यभरातल्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेऊन हे रणशिंग फुंकले. ज्या रेल्वे भरतीच्या प्रकरणानंतर मनसेने मुंबई शहरात राडा केला आता तोच मुद्दा घेऊन मनसे पुन्हा एकदा आक्रमक होत आहे.

बिहारी नेत्यांमुळे रेल्वे भरतीमध्ये याआधी तणाव निर्माण झाल्याचा आरोप राज यांनी केला. १५ फेब्रुवारी रोजी रेल्वे भरतीसाठी अर्ज भरले जाणार आहेत. रेल्वे भरतीसाठी अर्ज भरण्याचा रेटा लावा असे राज यांनी सांगितले. अर्ज भरण्यासाठी मराठी मुलांना सर्व प्रकारे मदत करावी असे राज यांनी सांगितले.

ही पुस्तिका मनसेच्या वतीने राज्यातील सर्व मुलांना देण्यात येणार आहे. या पुस्तिकेमध्ये रेल्वे भरतीमध्ये अर्ज कसा भरायचा याची माहिती दिली आहे. याच बरोबर मनसेच्या वतीने राज्यातील सर्व मनसेच्या शाखाच्या बाहेर, चित्रपटगृहाबाहेर आणि बसस्थानकाबाहेर भरती संदर्भातील होर्डिंग लावण्याचे आदेश राज ठाकरे यांनी सर्व कार्यकर्त्यांना दिले आहेत. हे होर्डिंग सहा,सात,आठ फेब्रुवारीपर्यंत असतील त्यानंतर ते काढून टाकले पाहिजेत अशी सूचना राज यांनी केली.

मराठी माणसाला ज्या ज्या ठिकाणी संधी आहे. त्या त्या ठिकाणी ती संधी त्याला मिळवून देण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी मदत केली पाहिजे असे राज यांनी सांगितले.


No comments:

Post a Comment