Monday, February 7, 2011

फेरीवाल्यांविरोधात मनसे रस्त्यावर

खालील लेख म टा च्या सौजन्याने ...................



डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसरातून हुसकावलेल्या फेरीवाल्यांनी शनिवारी विष्णूनगर परिसरावर कब्जा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मनसेचे नगरसेवक अमित सुलाखे यांनी कार्यकर्त्यांसह या भागात धडक देत फेरीवाल्यांना पिटाळले. या आंदोलनामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.

केडीएमसीने डोंबिवली स्टेशन परिसरातील दीनदयाळ रोड आणि घनश्याम गुप्ते रोडवर बसणाऱ्या फेरीवाल्यांवर महानगरपालिका गेले काही दिवस सातत्याने कारवाई करत आहे. त्यामुळे हा परिसर फेरीवालामुक्त झाला आहे. मात्र, हे फेरीवाले विष्णूनगर पोस्ट ऑफिस परिसरात व्यवसाय करू लागले होते. या रस्त्यांवरील रहदारीचे प्रमाण जास्त असून फेरीवाल्यांच्या भाज्यांच्या गोण्या आणि टोपल्यांमुळे तिथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. फेरीवाले रात्री घरी जाताना सर्व कचरा रस्त्यावरच सोडून देतात. यामुळे दुर्गंधी निर्माण होत होती. त्यामुळे हैराण झालेल्या स्थानिकांनी या फेरीवाल्यांना हटविण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेत स्थानिक नगरसेवक अमित सुलाखे यांनी शनिवारी आपल्या कार्यर्कत्यांसह येथे धडक दिली. फेरिवाल्यांनी हुसकावून लावताना बाचाबाची आणि धक्काबुक्की झाली. यामुळे या परिसरात सुमारे तासभर तणाव होता.

परिस्थिती चिघळू नये म्हणून विष्णुनगर पोलील आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून सोमवारी या विषयावरील निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर मनसेचे कार्यकतेर् माघारी फिरले. या फेरीवाल्यांसाठी माकेर्ट उभारणी अत्यावश्यक असून स्टेशनजवळील मच्छीमाकेर्टचा पुनविर्कास करताना तिथे या फेरीवाल्यांसाठीही जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सुलाखे यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment