Wednesday, February 9, 2011

रेल्वे भरतीसाठी मनसेच्या प्रचारतंत्राने शिवसेना अस्वस्थ!

खालील बातमी लोकसत्ता च्या सौजन्याने ....................‘ आता नीट लक्ष द्या..नंतर सांगू नका मला माहीत नव्हतं,’ असे आवाहन करणारी होर्डिग्ज सध्या महाराष्ट्रात जागोजागी लागली असून ही होर्डिग्ज मराठी बेरोजगार तरुणांचे लक्ष वेधून घेत. मध्ये व पश्चिम रेल्वेने ‘ग्रुप डी’मधील सुमारे १० हजार पदे भरण्यासाठी जाहिरात दिली असून या पदांसाठी मराठी तरुणांनी मोठय़ा प्रमाणावर अर्ज करावेत यासाठी मनसेने जोरदार प्रचारतंत्र अवलंबिले आहे. राज ठाकरे यांचे अथवा कोणाचेही छायचित्र नसलेले परंतु नेमक्या शब्दात भावना व्यक्त करणाऱ्या होर्डिग्जमुळे शिवसेनेत अस्वस्थता निर्माण झाली आहे. रेल्वेभारतीसाठी शिवसेनेनेही आवाहन केले आहे. परीक्षांची तयारी करण्यासाठी प्रशिक्षणवर्ग घेतले जाणार आहते. मात्र राज यांच्या ‘मीडिया मॅनेजमेंट’ व जाहिरात कौशल्याचा ‘सामना’ कसा करावा असा प्रश्न सेनेच्या नेत्यांपुढे उभा राहीला आहे.
राज्यातील सर्व रेल्वे स्थानके, बस तसेच एसटी स्थानके, रेल्वे तसेच बाजारपेठ परिसरासह हमरस्त्यांवरील मोक्याच्या जागांवर मनसेच्या रेल्वे भरतीचे आवाहन करणारे प्रसिद्धी फलक साऱ्यांचेच लक्ष वेधून घेत आहेत. आधुनिक प्रचार तंत्राचा कल्पक वापर करताना जी प्रभावी शब्दयोजना केली आहे त्यामुळे मनसेबाबत तरुणांच्या त्यातही बेरोजगारांची मोठी सहानुभूती निर्माण होईल व याचा फायदा आगामी पालिका निवडणुकीत त्यांना मिळू शकतो, अशी भीती सेनेच्या नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
मराठी तरुणांऐवजी दाक्षिणात्यांना नोकरीत प्राधन्य मिळत असल्यामुळे शिवसेनेच्या स्थापनेच्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी ‘बजाव पुंगी, हटाव लुंगी’ असा नारा दिला होता. त्याने प्रचंड परिणाम साधला जाऊन बँका, विमानसेवा, पंचतारांकित हॉटेल्स आदी ठिकाणी मराठी माणूस नोकरीत दिसू लागला. शिवसेनेच्या लोकाधिकार समितीचे लढवय्ये नेते सुधीर जोशी व गजानन कीर्तीकर यांनी प्रत्येक शासकीय अथवा खासगी आस्थापनांमध्ये मराठी माणूस ऐंशी टक्के दिसला पाहिजे यासाठी पाठपुरावा केला होता. आजही लोकाधिकार समितीच्या माध्यमातून शिवसेनाभवन तसेच जागोजागी बँक, रेल्वे, तसेच शासकीय सेवांच्या भरतीसाठी पाठपुरवा केला जातो. एवढेच नव्हे तर प्रत्येक भरतीच्यावेळी प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिरे घेतली जातात. प्रमुख्याने राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून मनसेची स्थापना केल्यानंतर तरुणांचा मिळणारा प्रतिसाद तसेच नोकर भरतीत शंभर टक्के मराठी तरुणांचीच भरती करण्याचे आवाहन केल्यापासून शिवसेनेने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनापासून नोकर भरतीसाठीची आंदोलने तीव्र करण्यास सुरूवात केली. मात्र प्रचारतंत्रात वाकबगार असलेल्या राज ठाकरे यांनी रेल्वे भरतीच्यानिमित्ताने जे प्रचारतंत्र अवलंबिले आहे त्यामुळे पुन्हा एकदा मनसे जोरात चर्चेला आली.
वस्तुत: मनसेप्रमाणेच शिवसेनेनेही रेल्वे भरतीसाठी अर्ज करण्याचे आवाहन केले आहे तसेच परीक्षा मार्गदर्शन केंद्रही जागोजागी सुरू करण्यात येणार आहेत. मात्र जाहिरात फलकांचा आकार, त्यावरील मजकूर तसेच नेत्यांच्या फोटोपासून अन्य फाफटपसाऱ्याला फाटा देत बेरोजगार तरुणांची व त्यांच्या कुटुंबियांची नेमकी नस पकडणारा मजकूर मनसेने रेल्वे भरतीसाठी तयार केलेल्या होर्डिग्जवर दिसतो. याबाबतीत शिवसेना खूपच मागे असून सध्या सेनेच्या प्रत्येक होर्डिगवर शिवसेनाप्रमुख, कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि युवानेते आदित्य ठाकरे यांचे छायाचित्र लावण्याचीच चढाओढ सुरू आहे. या छायाचित्रांच्या भाऊगर्दीत कामाचा उद्देशच हरवून जात असल्याची भावना सेनेच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केली.
मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकसह राज्यात पुढील वर्षी दहा महापालिकांच्या निवडणुका होत असून यासाठी तरुण व बेरोजगार तरुणांना आपल्याकडे वळविण्यासाठी सेना-मनसेत चढाओढ लागली असून ‘रेल्वे भरती’ ही यासाठी सुवर्णसंधी असल्यामुळे दोन्ही पक्षांनी मराठी तरुणांच्या भरतीसाठी जोरदार मोहीम हाती घेतली आहे. मात्र प्रसिद्धीतंत्रामध्ये मनसेने बाजी मारली असून काम करूनही प्रसिद्धीतंत्रात कमी पडत असल्यामुळे सेनेमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

2 comments:

  1. manse apale kam manapasun karit aahe. manse fakta marathi samajacha vichar maryadit na theveta to sapurna maharastatil samajhyacha(sarva "jati/dharm") vichar karava. kaaran manse la aanek dharmiyachey lok dilse kam kaenyas aatur aahet. ya bhartitun sampurn maharastateel berojgar lokanche bhale honar vachanyaraani mi berojgar aahe manun mazya pratikriya aahet ase nahi. mi sadhya jabla aahe. he fakta maze nave tar mazyasarkhya asankha muslim & etar dharamiy mulanche mat aahe @@AB@@

    ReplyDelete
  2. Ashpak said...
    manse apale kam manapasun karit aahe. manse fakta marathi samajacha vichar maryadit na theveta to sapurna maharastatil samajhyacha(sarva "jati/dharm") vichar karava. kaaran manse la aanek dharmiyachey lok dilse kam kaenyas aatur aahet. ya bhartitun sampurn maharastateel berojgar lokanche bhale honar vachanyaraani mi berojgar aahe manun mazya pratikriya aahet ase nahi. mi sadhya jabla aahe. he fakta maze nave tar mazyasarkhya asankha muslim & etar dharamiy mulanche mat aahe @@AB@@

    March 26, 2011 5:49 PM

    ReplyDelete