
प्रहार मधली ही बातमी वाचली आणि हसू आलं, म्हणे ट्रेन मधील गर्दी कमी झाली। हा जावई शोध ज्यानी कोणी लावला असेल त्याला विरार च्या ट्रेन मधे सकाळच्या वेळेला विरार ते चर्चगेट प्रवास करायला लावला पाहिजे. तुमचे काय मत आहे?
माझ्या मते हे केन्द्र आणि राज्य सरकार मुंबई मधील जीवनाआवाश्यक गोष्टी कडे लक्षच देत नाही. अरे किती दिवस ही माणसे मेंढरासारखी गर्दीतून प्रवास करतील? आमच्या सहानशीलते ला देखी अन्त आहे की नाही? पुढच्या विधानसभेत दिसेलच मुंबई चा दणका. काय? खरं बोललो की नाही? तुम्हीच सांगा ?
ही बातमी प्रहार ह्या वृत्त पत्रातून घेतली आहे (दिनांक ०२/१२/२००९)
No comments:
Post a Comment