Tuesday, December 20, 2011
आमदार प्रकाश भोईर ह्यांनी केली टोल रूपी जिझिया कराची विधानसभेत पोलखोल
आपल्याकडून वसूल होणारे हे पैसे सरकार दरबारी दाखवले जातात का हा मोठा गहन प्रश्न आहे? ९५ ते २००० साली बांधलेले उड्डाण पुलांचे पैसे अजून वसूल झाले नाही ह्यावर कोणी विश्वास ठेवेल का?? हे टोल सर्व सामान्य नागरिकांकरिता अन्याय कारक आहेत आणि त्याबद्दल मनसे चे आमदार श्री प्रकाश भोईर ह्यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न विचारून ह्या प्रश्नाला वाचा फोडल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन ......
Wednesday, December 7, 2011
दीदी-ताईंना पुढे करून पेडररोड रहिवाशांचा एजेंडा
डोंबिवली : लता दीदी आणि आशाताईंना पुढे करून पेडररोडचे रहिवाशी आपला एजेंडा राबवत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केलाय. लता दीदी आणि आशाताईंबदद्ल मला किती आदर आहे, हे मला कुणी शिकवण्याची गरज नसल्याचंही राज ठाकरेंनी म्हटलंय.
शिवसेनेने लतादीदी आणि आशाताई महाराष्ट्राची मानचिन्हं आहेत, यांच्यावर चिखलफेक नको, असं प्रसिद्धी पत्रक काढलं होतं, त्यावर राज ठाकरे बोलत होते.
राज ठाकरे म्हणाले, मी काल पेडररोड फ्लायओव्हर च्या संदर्भात पत्रकार परिषद घेतली होती, यामुळे कुणाला मध्ये पडायची गरज नव्हती.
पत्रकार परिषदेचा विषय हा काही लता मंगेशकर किंवा आशा भोसले यांचा नव्हता, असं राज ठाकरे यांनी आज डोंबिवलीत स्पष्ट केलंय.
शिवसेनेचं पत्रक हास्यास्पद
पत्रकार परिषदेत शिवसेनेचे पत्रक दाखवत राज ठाकरे म्हणाले, शिवसेनेनं आज हे पत्रक काढलंय. चॅनेल्सवरून मला कळलं, हे हास्यास्पद पत्रक आहे, याला आगापिछा नाही. स्टेडियमच्या बाहेर बॉल गेल्यासारखं आहे.
मुंबईतील पेडररोडवरून दिवसभरातून १ लाखाच्यावर गाड्या जातात. दहा लाख लोक ये-जा करतात. मग का तो पेडररोडचा फ्लायओव्हर का थांबवला जातो, हा माझा प्रश्न असल्याचं राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं.
ही काय मानचिन्हाची लक्षणं?
पत्रक वाचवून दाखवतांना राज ठाकरे म्हणाले, सचिन तेंडुलकर जर महाराष्ट्राचं मानचिन्ह आहे. सचिन जेव्हा नव्या घरात रहायला गेला, तेव्हा त्याच्याकडे महापालिकेचं नाहरकत प्रमाणपत्र नव्हतं, म्हणून त्याला महापालिकेने ५ लाखाचा दंड ठोठावला, मग ही काय मानचिन्हाची लक्षणं आहेत का? असा सवाल राज ठाकरेंनी केलाय.
वाढीव एफएसआय मागणे अनधिकृत?
सचिनच्या घराचं उदाहरण देत राज ठाकरे म्हणाले, सचिनने तेंडुलकरने नगरविकास मंत्रालयाला पत्र लिहून वाढीव एफएसआयची मागणी केली, मग हे अधिकृत आहे की अनधिकृत? अनधिकृतरित्या सचिन तेंडुलकरला एफएसआय द्यावा असं माझं म्हणणं होतं का असं राज यांनी म्हटलंय.
सचिनने राज्य सरकारकडेही एफएसआयसाठी परवानगी मागितल्यावर राज्य सरकारने सांगितले की, ही परवानगी तुम्हाला महापालिका देऊ शकते, असं उत्तर सचिनला मिळाल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलंय.
ही काय तेंडुलकर व्हर्सेस मंगेशकर मॅच आहे का?
ही काय तेंडुलकर व्हर्सेस मंगेशकर मॅच आहे का? असा सवाल करत पत्रकात, काही कशाचा थांगपत्ता नसल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलंय.
सचिनवर अनेकदा सामनातून चिखलफेक झालीय, सचिन खिशात हात घालत नाही, बॅटाविकतो, मग ही टीका हा काही महाराष्ट्राचा मान होता का? असा सवाल राज ठाकरेंनी केलाय.
पेडररोडचा फ्लाय ओव्हर व्हावा किंवा ना व्हावा? उद्धव ठाकरेंना सवाल
पेडररोडचा फ्लाय ओव्हर व्हावा किंवा ना व्हावा? असा सवाल उद्धव ठाकरेंना आहे. पेडर रोडचा फ्लाय ओव्हर व्हावा की होऊ नये, हे पत्रकात का नाही छापलं. भलतं सलतं काही तरी का छापावं, अशी टीका राज ठाकरेंनी केलीय.
यांना परिक्षेला बसवायला हवं होतं?
माझ्या परिक्षा संपलेल्या आहेत, पत्रक दाखवत राज ठाकरे म्हणाले, यांनाही मी परिक्षेला बसवलं असतं तर बरं झालं असतं. चूक झाली माझी असा त्रागाही राज ठाकरेंनी दाखवला.
फ्लाय ओव्हरसाठी जनसुनावणी नको?
पेडररोड फ्लायओव्हरच्या जनसुनावणीला राज ठाकरेंनी विरोध केलाय. पेडररोडच्या फ्लायओव्हरसाठी जनसुनावणी होते, मग मुंबईतल्या इतर फ्लायओव्हरसाठीही होईल. ठाणे, नाशिक, नागपूर आणि मग फ्लाय ओव्हरची कामं रखडतील आणि राज्याच्या विकासाला खिळं बसेल, म्हणून राज्य सरकारला विनंती आहे की, कृपया पेडररोडच्या फ्लायओव्हरसाठी जनसुनावणी घेऊ नका.
कुणी उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या लोकांना सरकारने झुकतं मार देऊन भेदभाव करू नये, मुंबईकरांना नव्हे तर बाहेरून येणाऱ्यांनाही हा पेडररोडवरचा फ्लायओव्हर महत्वाचा आहे.
मंगेशकरांसाठी कायद्याला बगल का?: राज ठाकरे
गानसम्राज्ञी लता मंगेशकर आणि त्यांच्या कुटुंबाने पेडर रोडवरील फ्लायओव्हरला विरोध केल्याने हा पूल कित्येक वर्षे रखडला होता. त्यामुळे मंगेशकरांसाठी कायद्याला बगल का देता असा सवाल राज ठाकरे यांनी सरकारला केला आहे.
पेडर रोडवरील फ्लायओव्हरसाठी नागरिकांशी चर्चा करता पण इतरत्र पूलांसाठी नागरिकांसोबत चर्चा का करत नाही असं राज म्हणाले.
सरकारने लता मंगेशकर यांच्या विरोधापुढे मान झुकवत पेडर रोडवरील पुलाचा प्रस्ताव मागे घेतला. त्याऐवजी हाजी अली जंक्शन आणि महालक्ष्मी इथल्या कॅडबरी जंक्शन इथे दोनफ्लायओव्हर बांधण्यात येणार असल्याची माहिती मुंबईचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी शनिवारी दिली होती.
या संदर्भात मनसेच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. पेडर रोडचा फ्लायओव्हर न झाल्यास मुंबईत कोणताही फ्लायओव्हर होऊ देणार नाही, असा इशाराही मनसेने दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी मात्र पेडर रोड फ्लायओव्हरसंदर्भात कोणताही अंतिम निर्णय झाला नसल्याचं सांगितलं आहे.
सरकारने हा विरोध लक्षात घेऊन नमती भूमिका घेतल्याने या मुद्द्यावर मनसे आक्रमक झाली आहे.
Thursday, November 24, 2011
राजकीय ‘परीक्षानीती’ची प्रचारतंत्रात सरशी!
महापालिका निवडणुकीच्या उमेदवारीसाठी लेखी परीक्षा घेण्याच्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेचे सर्व थरातून स्वागत होत असून सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष मनसेच्या परीक्षेकडे लागल्याने निवडणूक प्रचारतंत्राच्या पहिल्या परीक्षेत राज ठाकरे उत्तीर्ण झाले आहेत. मनसे उमेदवारांना परीक्षेसाठी देण्यात आलेल्या संदर्भ पुस्तकात महाराष्ट्र, महापालिका, पालिकेची कर्तव्ये, कामकाजाची पद्धत, आयुक्तांचे अधिकार, नगरसेवकांचे अधिकार यासह नागरी कामांसदर्भात उपयुक्त माहिती असल्याने ते संग्राह्य़ ठरणार आहे. मनसेच्या उमेदवारीसाठी इच्छुकांना पालिका कार्यपद्धतीची माहिती असावी या उद्देश्याने येत्या चार डिसेंबर रोजी पन्नास गुणांची ही परीक्षा घेण्यात येणार आहे.
यासाठी तयार केलेल्या संदर्भ पुस्तिकेत महाराष्ट्राच्या स्थापनेपासून राज्यातील जिल्हे, तालुके व खेडय़ांची माहिती, लोकसंख्या, मुंबई महापालिकेची माहिती यात पालिका कोणत्या कायद्यानुसार काम करते,महापालिकेचे प्रभाग, पालिकेतील वैधानिक समित्या, विशेष समित्या, पालिकेची अत्यावश्यक कर्तव्ये व स्वेच्छाधीन कर्तव्ये, वैधानिक समित्यांचे कामकाज, विविध समित्यांची रचना व कामे, महापौर,नगरसेवक व आयुक्ताचे अधिकार, पाणी पुरवठा, स्वच्छता, घनकचरा, अग्निशमन दल, आरोग्य, उद्याने व मैदाने, बाजार खाते आदी पालिकेच्या विविध विभागांची थोडक्यात माहिती या पुस्तिकेत देण्यात आली आहे. मुंबईचा पाणीपुरवठा व त्यासाठी पालिकेकडून आकारण्यात येणारे दर, मुंबईमध्ये दररोज निर्माण होणारा कचरा व त्याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिका नेमके काय करते, विविध योजनांची माहिती, आरोग्य व्यवस्था व रुग्णालयांची माहिती, पाणी टंचाई असल्यास, नळदुरुस्ती आदी कामांसाठी कशाप्रकारे व कोणाला पत्र लिहायचे याची माहिती देण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या मदतीने मुंबईत कोणत्या योजना चालू आहेत तसेच झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा उहापोह करण्यात आला आहे.
मनसेच्या या पुस्तिकेतील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे नगरसेवक अथवा लोकप्रतिनिधींनी आपल्या विभागातील प्रश्नांसदर्भात संवाद कसा साधायचा व तो साधताना कोण कोणत्या घटकांचा विचार करायचा याचे विस्तृत विवेचन. थोडक्यात एखाद्या समस्येची चिकिस्ता करण्यापासून त्यामागची प्रशासनाची भूमिका, नागरिकांना येणाऱ्या अडचणी व समस्येचे समाधान करताना विचारात घ्यायच्या गोष्टी यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. लोकप्रतिनिधींनी नेमके कसे वागावे याचेही मार्गदर्शन करण्यात आले आहे. आदर्श नगरसेवक बनण्यासाठी पालिका कायदा १८८८ समजून घ्या, विभागात अनधिकृत झोपडय़ा उभ्या राहत असतील तर तात्काळ त्याची तक्रार संबधित अधिकाऱ्यांकडे करा, पालिकेशी संबंधित तसेच अन्य महत्त्वाच्या अधिकाऱ्यांचे पत्ते व दूरध्वनी जवळ बाळगण्याचा आग्रह या पुस्तिकेत करण्यात आला आहे.
मनसेच्या स्थापनेपासून परप्रांतीचे लोंढे रोखण्याची भूमिका राज ठाकरे यांनी सातत्याने मांडली असून मुंबईत येणारे लोंढे रोखण्यासाठी कोणती काळजी घ्यावी याची विशेष माहिती या पुस्तिकेत देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ७४ व्या घटनादुरुस्तीसह पालिकेच्या प्रत्येक प्रभागातील नागरी कामांची माहितीही देण्यात आली असून ही पुस्तिका सर्वसामान्य नागरिकांसाठीही उपयुक्त ठरणारी आहे.
सगेसोयरे अस्वस्थ
मनसेच्या उमेदवारीसाठी नात्यागोत्यांचे राजकारण चालणार नाही, असे राज ठाकरे यांनी पक्षस्थापनेच्या वेळीच जाहीर केल्याने, आगामी महापालिका निवडणुकासाठी नातेवाईकांची मोर्चेबांधणी करणाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. आमदार शिशिर शिंदे यांची पत्नी निवडणूक लढविणार असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाल्याने, स्वत शिशिर शिंदे यांनी त्याचा इन्कार केला आहे. आपली पत्नी निवडणूक लढविणार नाही, असे त्यांनी लोकसत्ताशी बोलताना स्पष्ट केले.
Tuesday, November 22, 2011
पवारसाहेबांच्या कृपने मिळालेलं मंत्रिपद सांभाळा : राज ठाकरे
मुंबई : राज ठाकरे आणि अजित पवार यांच्यातील वाकयुद्ध सुरूच आहे. "अजित पवार यांना शरद पवारसाहेबांच्या कृपेने मंत्रिपद मिळालंय, नामदारकी मिळालीय, त्यांनी ती नीट सांभाळावी, नको त्या भानगडी कशासाठी?", असा सवाल राज ठाकरेंनी केलाय.
"पवार साहेबांचे शिक्षक बोललेच आहेत ना, पवार साहेब निवृत्त झाले तर राष्ट्रवादी कुणी सांभाळणार नाही". "दुसऱ्याकडे बोटं दाखवण्यापेक्षा याचा जास्त विचार करावा", अशा शब्दात राज ठाकरे यांनी अजित पवारांवर टीका केलीय.
ठाकरे-पवार क्रिकेट वॉर
टेस्ट क्रिकेटर सदू शिंदे हे माझे आजोबा होते, असं उत्तर अजित पवारांनी राज ठाकरेंना दिलं होतं. यावर उत्तर देतांना राज ठाकरे म्हणाले, मला वाटतं कुणाचेही वडिल आपले आजोबा कसे मानावेत? सदू शिंदे शरद पवारांचे ते सासरे.
हे अजित पवारांचे आजोबा कसे झाले? हे अजूनपर्यंत मला कळलं नाही. हे कुठची नाती बघतात? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
माझ्या चुलत-चुलत भावाची आई, तिची जी सख्खी बहिण होती, त्यांचे मिस्टर हे व्ही.शांताराम होते. मग मी काय 'प्रभात'वर हक्क सांगू का? असा सवाल राज ठाकरे यांनी केलाय.
दारासिंह ही यांचे आजोबा असतील?
कदाचित मला माहित नाही, दारासिंहपण यांचे आजोबा असतील. कारण हे कोणत्यातरी कुस्ती संघटनेचे पण अध्यक्ष आहेत म्हणे, अशी बोचरी टीका राज ठाकरे यांनी अजित पवारांवर केलीय.
राज ठाकरे पुढे बोलतांना म्हणाले, 'प्रश्न शेतीचा आहे, अजित पवार शेतकरी आहेत ना, या गोष्टींची सुरूवात त्यांनीच करायची, आम्ही विचारलंय का यांना?, हजारो शेतकरी आत्महत्या करताहेत. तुम्ही कधी करणार म्हणून..'
Thursday, November 17, 2011
आयत्या बिळावर नागोबा ....
कल्याणमधील ठाणकरपाडा येथील माता रमाबाई आंबेडकर उद्यानाची पाहणी करण्यासाठी काही क्षण आलेल्या शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यासमोरच आज संध्याकाळी उद्यानाच्या विकासाचे श्रेय घेण्यावरून मनसे सैनिक आणि शिवसैनिक समोरासमोर भिडले. दोन्ही गटांत झालेल्या बाचाबाची आणि धक्काबुक्कीत एका शिवसैनिकाने मनसेच्या नगरसेविका मीनाक्षी डोईफोडे यांना अर्वाच्य शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याने वातावरण तप्त झाले.
आधारवाडी येथील सीमेंट रस्त्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम उरकून उद्धव ठाकरे शिवसेनापुरस्कृत अपक्ष नगरसेवक मोहन उगले यांच्या ठाणकरपाडा प्रभागातील रमाबाई आंबेडकर उद्यानाची पाहणी करण्यासाठी आले; परंतु या उद्यानासाठी मनसेचे आमदार प्रकाश भोईर यांनी लाखो रुपयांचा निधी उभारला आहे. त्यांची कामे येथे सुरू आहेत. या उद्यानात ठाकरे येणार म्हणून मनसेचे जिल्हाध्यक्ष काका मांडले, सरचिटणीस इरफान शेख, विरोधी पक्षनेते मंदार हळबे, मनसे कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसैनिक मोठय़ा संख्येने उद्यानाच्या प्रवेशद्वारावर जमले होते.
गेल्या आठवडय़ात मोहन उगले यांनी उद्यानातील ध्यानधारणा केंद्राचे उद्घाटन केले होते. त्यामुळे शिवसैनिक आणि मनसे सैनिकांमध्ये धुसफूस सुरू होती. उद्यानाच्या ठिकाणी वातावरण तंग बनले होते. पोलीस बंदोबस्त येथे होता.
उद्धव ठाकरे येण्यापूर्वी आमदार एकनाथ शिंदे, महापौर वैजयंती गुजर, खासदार आनंद परांजपे, राजेंद्र देवळेकर हे उद्यानात प्रवेश करीत असताना शिवसैनिक मोठय़ा संख्येने घोषणाबाजी करीत उद्यानात घुसले. त्यापाठोपाठ मनसे कार्यकर्तेही घुसले. घोषणाबाजी सुरू झाली. उद्धव ठाकरे उद्यानाची पाहणी करीत असतानाच शिवसैनिक आणि मनसे सैनिक समोरासमोर भिडले. बाचाबाची, धक्काबुक्की झाली. या धक्काबुक्कीत एका शिवसैनिकाने मनसे नगरसेविका डोईफोडे यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. वातावरण अधिक चिघळू नये म्हणून उद्धव ठाकरे यांनी तेथून काढता पाय घेतला.
मनसेचे मंदार हळबे, इरफान शेख यांनी सांगितले, आमच्या नगरसेविकेला शिवसैनिकाने धक्काबुक्की करून तिला शिवीगाळ केली आहे. त्या शिवसैनिकाच्या विरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. सुनील जोशींचे प्रकरण घडले त्या वेळी उद्धव ठाकरे यांनी उगले हे अपक्ष नगरसेवक आहेत असे जाहीर केले होते. मग आज एका अपक्ष नगरसेवकाच्या मागे फरफटत उद्धव हे उद्यानाचे काम पूर्ण झाले नसताना का फरफटत आले, असा प्रश्न हळबे यांनी केला.
Friday, November 4, 2011
पेट्रोल दरवाढ : ममतांकडून पाठिंबा काढण्याचा इशारा
अमेरिकेत पेट्रोल साठी एका लिटर ला ४५ रुपये पडतात मग भारतात पेट्रोल एवढं महाग का ?? हा मोठा गहन प्रश्न आहे .........
तृणमूल काँग्रेसच्या संसदीय दलाच्या बैठकीत सदस्यांनी यूपीए सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. पण पंतप्रधान परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं म्हटलं आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी असंही म्हटलं की, आता युपीएमधून बाहेर पडल्यावर सरकार कोसळेल आणि आपल्याला तसं करायचं नाहीए म्हणून आपण पंतप्रधान कधी परतणार आहेत याची वाट पाहात असल्याचं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.
राज, आझमी यांची वक्तव्ये तपासणार - आर आर आबा ...
राजकीय स्वार्थासाठी भाषणबाजी करून समाजात फूट पाडणा-यांवर योग्य कारवाई केली जाईल, असे आश्वासन आर. आर. पाटील यांनी दिले. त्यासाठी पुढील दोन दिवसात अबू आझमी, निरुपम आणि राज ठाकरे या तिघांची भाषणे तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या तपासात कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाईचे आदेश देण्यात आहेत.
महापालिकेच्या निवडणूका समोर असल्याने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण आता चांगलेच तापू लागले आहे. अशावेळी प्रत्येक राजकीय पक्ष व्होटबँकेचे गणित समोर ठेऊनच भाषणबाजी करताना दिसत आहे. या आठवडाभरात छटपूजेच्या निमित्ताने जमलेल्या उत्तर भारतीयांसमोर मुंबई बंद करण्याची भाषा केली होती. तर अबू आझमी यांनी उत्तर भारतीयांविरोधात बोलणा-या एकएकाला बघून घेईन अशी भाषा केली होती. प्रत्युत्तरा दाखल राज ठाकरे यांनी ही भाषणबाजी बंद झाली नाही तर दंगली भडकतील, असा इशारा दिला होता. त्यामुळे राज्यातील वातावर गढूळ होण्यास सुरुवात झाली आहे.
... तर, महाराष्ट्रात दंगली पेटतील!
काँग्रेसचे खा. संजय निरुपम, मुंबई काँग्रेस अध्यक्ष कृपाशंकर सिंह तसेच समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांचा राज ठाकरे यांनी समाचार घेतला. या सर्व नेत्यांना मराठी नेत्यांनीच आश्रय दिला. निरुपम हा उद्धवच्या गळ्यातला ताईत होता. उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरूनच छटपूजा गिरगाव चौपाटीवर नेऊन तिचे स्वरूप मोठे करण्यात आले. कृपाशंकरच्या घरी उद्धव ठाकरे जातात आणि छटपूजेचे स्वागत करणारे शिवसेनेचे होर्डिंगजही लागतात, असा टोलाही लगावला.
उत्तर भारतीय नेत्यांनी वेड्यावाकड्या गोष्टी करून दाखवाव्यात, असे माझे त्यांना आव्हान आहे, मग ते कसे घराबाहेर पडतात ते मी पाहीन, असा इशारा त्यांनी दिला. माझ्याविरोधात आग ओकणाऱ्या हिंदी चॅनेल्सवर माझी करडी नजर आहे. मी आग ओकतो आणि हे नेते काय मध ओकतात का? माझ्या वाक्यांचा हिंदी चॅनेल्सवाल्यांनी विपर्यास केल्यास त्यांचे कॅमेरे महाराष्ट्रात फिरणार नाहीत, याचाही बंदोबस्त मी करेन, असे ते म्हणाले.
Sunday, October 23, 2011
राष्ट्रवादी चे घोषणा वाक्य , इंच इंच विकू - राज ठाकरे
Tuesday, October 4, 2011
रिक्षावाल्यांनो खबरदार, मनसेचा 'मीटर' पडला!
रिक्षावाल्यांच्या त्रासामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांची दुखरी नस राज यांनी मंगळवारी अचूक पकडली. रिक्षावाल्यांच्या प्रश्नावर मनसेची भूमिका मांडण्यासाठी त्यांनी कृष्णकुंज येथे पत्रकार परिषद बोलावली होती.
शरद राव सतत संपाद्वारे लोकांना वेठीस धरत आहे. कधी महापालिकेचा संप, कधी टॅक्सीचा संप, कधी बेस्टचा संप आणि आता रिक्षाचा संप. असा सतत लोकांना त्रास देत राहिलात तर शरद रावांना घरातूनही बाहेर पडणे अवघड होईल, असा आवाजही राज यांनी यावेळी दिला.
रिक्षावाल्यांच्या मागण्या योग्यही असतील , पण लोकांना वेठीस धरू नका. मीटरमधले फेरफार नको, इलेक्ट्रॉनिक मीटर सक्तीचे करा. जवळचे असो वा लांबचे कोणतेही भाडे नाकारू नका. हे सारे आमचे म्हणणे नाही, वाहतूक विभागाचे नियम आहेत. ते कायदे पाळले जावेत, अन्यथा कायदा हाती घेतला तर बोलू नका, अशी भूमिका त्यांनी मांडली.
स्थानिक-परप्रांतीय मुद्दा यातही स्पष्ट करत ते म्हणाले की, रिक्षा चालवणारे कोण आहेत ? ते अधिकृत आहेत की अनधिकृत ? याची तपासणी करा. मी खात्रीने सांगतो ही मुजोरी करणारे रिक्षावाले परप्रांतीय आहेत. म्हणून अबू आझमींसारखी लोक यांची बाजू उचलतात. खरं तर यात कोणतेही राजकारण करण्याचा भाग नाही. हा लोकांचा मुद्दा आहे, आणि लोकच काय ते ठरवतील.
मराठी आरटीओ अधिका-यांनीच वाटोळे केले
या प्रश्नाला जेवढे रिक्षावाले दोषी आहेत, तेवढेच आरटीओचे अधिकारीही जबाबदार आहेत. दुर्दैवाने ते मराठी आहेत. हेच अधिकारी चिरमिरी खाण्यासाठी या नियमांचा चुराडा करतात. त्यामुळे त्यांनाही मनसेचे कार्यकर्ते भेटतील, असे राज यांनी सांगितले.
Thursday, September 29, 2011
मुंबई पालिकेकडून रस्त्यांचं कंत्राट ब्लॅक लिस्टेड ठेकेदारांना
Thursday, 29 September 2011 18:11
ब्लॅक लिस्टेड ठेकेदारांना पुन्हा कंत्राट दिल्याच्या निषेधार्थ मनसेच्या १ तर काँग्रेसच्या ७ सदस्यांनी सभात्याग केलाय.
मुंबई महापालिकेत रस्त्यांची निकृष्ट कामं आणि त्यामुळे पडणाऱ्या खड्ड्यांवरून वाद सुरू असतांना, मुंबई महापालिकेने पुन्हा एकदा ब्लॅक लिस्टेड कंत्राटदारांना रस्त्याचं कंत्राट दिलंय.
रस्त्यांना फार कमी काळात खड्डे पडल्याने पुढील वर्षांचा निधी या वर्षासाठी वापरण्याची नामुष्की ओढवली आहे. हा प्रस्ताव मंजूर केल्याच्या निषेधार्थ मनसे आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रस्तावाची होळी केली आहे.
रेलकॉन, प्रकाश इंजिनिअर्स, महावीर इंजिनिअर्स, वलेजा इंजिनिअर्स, के.आर. इंजिनिअर्स यांना हे कंत्राट देण्यातस आलंय. या कंपन्यांना यापूर्वी ब्लॅक लिस्टेड करण्यात आल्या होत्या.
तरीही शिवसेनेने यांच्यावर मेहेरबान होऊन पुन्हा यांना रस्त्याचं कंत्राट दिल्याचा आरोप विरोधकांकडून होतोय.
Wednesday, September 28, 2011
फेसबुक वरील ग्रुप - मी वाचलेलं पुस्तक (झाडाझडती)
एकूणच ग्रामिण जीवनाचा, गावकीतल्या गुंतागुंतीच्या राजकारणाचा विश्वास पाटलांचा अभ्यास अचाट आहे. वरवर पाहता शांत एकसुरी आयुष्य जगणा-या ह्या एका गावावर धरणाचा नांगर फ़िरतो आणि गावच्या गाव देशोधडीला कसं लागतं त्याचं वर्णन ह्या कादंबरीत वाचायला मिळतं.
आपल्यासारख्या शहरी जीवनाला चटावलेल्या लोकांना धरण = वीज एवढंच गणित कळतं, अधिकाधीक वीज उत्पादनासाठी अधिकाधीक धरणं बांधायला हवीत अशी किमान माझी तरी अपेक्षा असायची. पण अशा धरणांखाली गाडल्या गेलेल्या गावांची, गावक-यांच्या स्वप्नांची मोजदाद करायला आपल्याला वेळ तरी कुठे असतो.
गावातलं वातावरण, तिथलं राजकारण तिथली शासनव्यवस्था आपल्याला आधी अनाकलनीय वाटल्या तरी कादंबरी अर्धी वाचुन होईपर्यंत आपल्या अंगवळणी पडतात. सर्वस्व पणाला लागलेल्या धरण विरोधी लढ्यातही आपलं, आपल्या जातीचं वेगळेपण शाबुत ठेवण्यासाठीची धडपड बघुन कीव करावीशी वाटली तरी त्या गोष्टी टाळता येण्यासारख्या नसतात.
पाटलांनी उभ्या केलेल्या प्रत्येक व्यक्तीरेखेला वेगळं अस्तित्व आहे, प्रत्येक व्यक्तीरेखा आपल्यासमोर वेगवेगळे प्रश्न उभे करते. देशाच्या, राज्याच्या भल्यासाठी शेतक-यांनी घरादाराची होळी करायची आणि राजकारण्यांनी तोंडाला पानं पुसायची हा प्रकार आता नवा राहीलेला नाही.
झाडाझडती जेव्हा पहिल्यांदा वाचलं तेव्हा लिहीलेल्या काही ओळी इथे द्यायचा मोह आवरत नाही
धराण
त्यांचं हुतया धराण
आमचं हुतया मराण
धरनाची ईज म्हनं राज्याला देनार
आमी मातुर घुबडागत अंधारात सडनार
जवा कोसळंल पाउस, धराण भरंल
मोडल्याल गाव पाक भिकेला लागंल
नेमाप्रमानं सरकारन जमीन दीली व्हती
पांढ-या कागदावर काळी शाय वतली व्हाती
आमदार खासदार येत्यात
ईकासाचं गाजार दाखीवत्यात
उर फ़ुटेस्तोवर शेतकरी
नव्या रानातलं दगुड फ़ोडत्यात
पुनर्वसनाच्या नावाखाली
आमास्नी आयुष्यातुन उठीवलं
सोन्यासारखी जमीन बुडवुन,
दगड धोंडं गळ्यात मारलं
गावतली पोरं तालुक्याला भीक मागत्यात
आमच्या आयाभनी लोकाची भांडी घासत्यात
सरकारचं डोळं फ़ुटल्यात आमच दिस फ़ीरल्यात
कुनाला काय बी दिसत न्हाय
ह्या आमच्या वांझोट्या जमीनीत
दगड धोंडयांशीवाय कायबी पीकत न्हाय
Wednesday, September 21, 2011
फटाके दिवाळीनंतर : राज
खडकवासला येथील मनसे आमदार रमेश वांजळे यांच्या निधनानंतर होणा-या पोटनिवडणुकीसंदर्भात मनसेची भूमिका मांडण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या टीकेसंदर्भात पत्रकारांनी छेडले असता त्यांनी थोडक्यात उत्तर दिलंय. काल शिवसेनेने पत्रक काढून राज ठाकरे यांना नावानीशी ‘ फुकट-राज ’, ‘ नमकहराम ’, ‘ बेईमान ’ अशी भाषा केली होती.
खडकवासल्यातील भूमिकेपेक्षा राज उद्धव यांना काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्याप्रमाणे आजच्या ‘ सामना ’ मध्ये जे काही छापून आलंय, त्यावर तुमचे मत काय असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर राज म्हणाले, की ‘ आत्ताच यावर काहीही बोलणार नाही. माझे एक वाक्य एवढे झोंबले तर निवडणुकीच्या वेळी काय होईल त्याचा तुम्हीच विचार करा ’.
आज जे पत्र आलंय ते मी सेफ डिपॉझिटमध्ये ठेवलंय. योग्य वेळी बाहेर काढेन. खरं तर मी अजून काहीच बाहेर काढलेले नाही. कदाचित त्यांना नरेंद्र मोदी किंमत देत नाहीत म्हणून काय त्रागा असावा, अशी कोपरखळीही त्यांनी उद्धव यांना मारली.
खडकवासल्यातून मनसेचा उमेदवार नाही
मनसेचे आमदार रमेश वांजळे काय होते, आमच्यासाठी त्यांचे स्थान काय होते हे आम्ही तुम्हाला सांगायची गरज नाही. पण आज वांजळे वहिनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवणार असे चाललंय. मी माझ्या परीने समजावायचा प्रयत्न केला. पण एकीकडे ‘ मी तुमच्या पक्षांचे मंगळसूत्र घातले आहे ’ असे बोलायचे आणि दुसरीकडे वेगळी चर्चा करायची हे मला मान्य नाही. अशा एक-दोन आमदारांनी आमचे काही अडणार नाही. पण जे काही चाललंय ते नैतिकतेला धरून नाही. म्हणूनच त्यांना वागायचे तसे वागो, आम्ही आमच्या रमेश वांजळेंना श्रद्धांजली म्हणून आम्ही खडकवासल्यातून उमेदवार देणार नाही.
Friday, September 16, 2011
रस्ते बांधकामाच्या ५६० कोटी रुपयांच्या निविदा तात्काळ रद्द करा
मुंबई, १५ सप्टेंबर / विशेष प्रतिनिधी
महापालिकेने नियम धाब्यावर बसवत तसेच कामात निष्काळजीपणा करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याऐवजी त्यांना मुंबईतील रस्त्यांची ५६० कोटी रुपयांची कंत्राटे बहाल करण्याची तयारी प्रशासनाने चालविली आहे. ‘मनसे’चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन या निविदा तात्काळ रद्द करण्याची आणि मुंबईकरांना चांगले रस्ते देण्याची मागणी केली. राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे शिवसेना अडचणीत आल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू झाली आहे.
पालिकेतील विरोधी पक्षनेते राजहंस सिंह यांनीही निविदा रद्द करण्याची मागणी केल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत रस्त्यांची निविदा मंजूर केली जाईल, असे शिवसेनेने जाहीर केले होते.
मुंबई शहरातील रस्त्यांवर दरवर्षी पावसाळ्यात पडणाऱ्या खडय़ांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. हे दुष्टचक्र संपण्याची गरज असल्याचे सांगत, उत्तम दर्जाचे रस्ते बांधू शकणाऱ्या व्यावसायिकांना काम देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. आमदार नितीन सरदेसाई, अतुल सरपोतदार आदी मनसेचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
गेल्या वीस वर्षांत पालिका चांगले रस्ते का बांधू शकली नाही, निविदेतील पालिकेने निश्चित केलेल्या दरापेक्षा पंचवीस टक्के कमी दराने निविदा भरणारे कंत्राटदार चांगले रस्ते कसे देणार? असा सवाल राज ठाकरे यांनी केला. खराब रस्ते बांधण्यासाठी कोटय़ावधी रुपये खर्च करायचे, नंतर त्यावर पडणाऱ्या खड्डे बुजविण्यासाठी कोटय़ावधी रुपयांची उधळण करायची, हे दुष्टचक्र आता थांबवा, असे आवाहन राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना केले. सुमार कुवतीच्या तसेच भ्रष्ट कंत्राटदारांना दरवर्षी पाचशे-हजार कोटींचे कंत्राट देण्याऐवजी संपूर्ण व्यावसायिक व या क्षेत्रातील तज्ज्ञ असलेल्या कोणत्याही कंपनीला हे कंत्राट द्यावे, कोणाला कंत्राट द्यायचे याचा निर्णय तुम्ही घ्या, पंरतु मुंबईकरांना आता तरी किमान चांगले रस्ते द्या, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली.
दरम्यान या संदर्भात राज ठाकरे यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेतली असून ते पालिका आयुक्तांशी याबाबत बोलणार आहेत. यापूर्वी कल्याण-डोंबिवली पालिका निवडणुकीच्या वेळीही खड्डय़ांच्या प्रश्नामुळे शिवसेनेला झटका बसला होता. ज्या कंत्राटदारांवर पालिकेने दंडात्मक कारवाई केली त्यांनाच ५६० कोटी रुपयांचे कंत्राट कसे दिले? असा सवालही त्यांनी केला.
Thursday, September 15, 2011
जलशुद्धीकरण प्रकल्पाची दुर्दशा - कल्याण / डोम्बिवली
कल्याणातील बारावे जलशुद्धीकरण केंद्राची मनसेचे आमदार प्रकाश भोईर यांनीअलिकडेच अचानक पाहणी केली . त्यावेळी त्यांना या केंद्राची दयनीय स्थिती आढळूनआली होती . त्याबाबत त्यांनी पालिका आयुक्त रामनाथ सोनवणे यांच्याकडे तक्रारकेल्यावर एक्झिक्युटीव्ह इंजिनीअर रविंद्र पुराणिक यांच्या अध्यक्षतेखाली समितीनेमून या केंद्राच्या स्थितीबाबतचा अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले होते .
या समितीचा अहवाल मंगळवारी महासभेत दाखल करण्यात आल्यावर तेथीलभयानक स्थिती स्पष्ट झाली . जलशुध्दीकरण केंद्रात १८ फिल्टर असले तरी त्यापैकी ३फिल्टर बंद असल्याचे आढळले . तसेच या फिल्टरमधील रेती २००१पासून बदललेलीनाही . पाण्याच्या प्रवाहाच्या मार्गात तर चक्क शेवाळ दिसून आल्याने या केंद्राच्याअस्वच्छतेबाबत कल्पना येते . २ फ्ॅलश मिक्सरपैकी १ नादुरुस्त होते . पाण्याचीगुणवत्ता तपासण्याच्या प्रयोगशाळेत पाणी गळती होते .
तसेच पाण्याच्या चाचणीचे नमुने कोकण भवन येथील प्रयोगशाळेत पाठवले जातात ,असा पालिकेचा दावा असला तरी प्रत्यक्षात तशी नोंद कोठेही आढळली नाही .याखेरीज या नोंदींची तपासणी पालिका अधिकाऱ्यांकडून केल्याचेही पुरावे दिसलेनसल्याचा ठपका पुराणिक समितीने ठेवला आहे . त्यामुळे पाण्याच्या गुणवत्तेकडेप्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर निष्कर्ष या अहवालात काढण्यात आला आहे .
या केंद्रात ८० कर्मचारी नेमणे बंधनकारक असताना प्रत्यक्षात ५६ कर्मचारीच कामकरत असल्याचे समितीचे म्हणणे आहे . तेथील कर्मचाऱ्यांना ठराविक शैक्षणिक पात्रताअसणे गरजेचे असले तरी तेथील कर्मचाऱ्यांकडे तशी पात्रता आढळली नसल्याचेयावेळी उघड झाले . तेथील कर्मचाऱ्यांना ओळखपत्र , गणवेश , गमबूट , हेल्मेट वहॅण्डग्लोज आदींपैकी काहीच कॉण्ट्रॅक्टर पुरवत नसल्याचाही ठपका अहवालात आहे .
अशा गंभीर प्रकारासाठी जबाबदार अधिकाऱ्यांना निलंबित करावे , अशी मागणीनगरसेवक उल्हास भोईर यांनी महासभेत केली . सर्वच नगरसेवकांनी त्यावरुनप्रशासनावर तोंडसुख घेतल्यावर महापौर वैजयंती गुजर यांनी जबाबदारअधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा आदेश प्रशासनाला दिला . दरम्यान रस्त्यांची दुर्दशा, डोंबिवलीतील स्वीमिंग पुलचे वादग्रस्त कॉण्ट्रॅक्ट , प्रिंटर बंद असल्याने कोट्यवधीरुपयांची बिले न पाठवणे व त्यापाठोपाठ जलशुध्दीकरण केंद्राची दारुण स्थिती अशासर्वच प्रकरणात विभागप्रमुख एक्झिक्युटीव्ह इंजिनीअर प्रमोद कुलकर्णी आहेत . परंतुते आयुक्त सोनवणे यांच्या खास मर्जीतील अधिकारी असल्याने त्यांच्यावर आयुक्तकारवाई करत नाहीत , असा आरोप पालिका वर्तुळात होऊ लागला आहे .
मराठी मत्सराच्या 'क्रिएटिव्हिटी'वर राज यांचा हल्ला
जाहिरात कंपन्यांमधील क्रिएटिव्ह मंडळींना उद्देशून राज ठाकरे यांनी एक पत्र लिहिले असून त्यात हा इशारा दिला आहे. टाटा डोकोमो कंपनीने त्यांच्या जाहिरातीमध्ये मराठी मोलकरीण मोबाइल फोन चोरतानाचे दृश्य दाखविले आहे. टाटा कंपनीला याविषयी विचारले असता, त्यांना याची काहीच कल्पना नव्हती. त्यांनी ताबडतोब जाहिरीत मागे घेतल्याचेही आम्हाला कळविले आहे. त्यामुळे माझा आक्षेप त्यांच्याविषयी नसून जाहिरात बनविणाऱ्या आणि इंग्रजाळलेल्या, मराठी माणसाचा द्वेष करणाऱ्या वर्गाला आहे. मी स्वत: जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून व्यंगचित्रकला शिकलो आहे.
जाहिराती या उत्पादन विकण्यासाठी असतात. स्थानिक जनतेच्या भावना दुखावून त्यांना अपमानित करण्यासाठी नसतात, असे राज यांनी या पत्रात म्हटले आहे. आंदोलनाची शस्त्रे आम्ही म्यान केलेली नाहीत आणि करणारही नाही. यापुढे लेखी वा तोंडी भाषा बोलली जाणार नाही. मराठी माणसाचा अपमान करणाऱ्या जाहिराती वा चित्रपट बनविणाऱ्यांशी माझे कार्यकर्ते क्रिएटिव्ह पद्धतीने व्यवहार करतील, असा इशाराही पत्राच्या शेवटी राज ठाकरे यांनी दिला आहे.
................................
विनोद आणि मत्सर यातील अंतर कळते
मराठी सोडून प्रामुख्याने हिंदी व इतर भाषांमधील चॅनेलवर ज्या मालिका दाखवतात किंवा चित्रपट निघतात त्यात मराठी माणसाचे अवमुल्यांकन करून त्याचे पात्र दाखविले जाते. विनोद आम्हालाही समजतो आणि जमतो. अनेक चित्रपटांत मराठी माणसाचे कॅरेक्टर विनोदाने दाखवले आहे. त्यावर आम्ही कधी आक्षेप घेतला नाही. मात्र विनोद आणि मत्सर यातले अंतर आम्हाला समजत नाही, असे समजून आपण महाराष्ट्रात राहू नका. हे यापुढे चालणार नाही.
Thursday, September 8, 2011
कल्याण - डोंबिवलीत अशुद्ध पाणी पुरवठा
Wednesday, September 7, 2011
सीटीपार्कच्या जागेवर आयटीपार्क?
कल्याण परिसर एकेकाळी राज्याच्या औद्योगिक नकाशावर ठळकपणे उमटला होता .पण जागेला आलेले सोन्याचे भाव व इतर राज्यांनी पोषक औद्योगिक धोरणस्वीकारल्याने निर्माण झालेली स्पर्धा यामुळे या भागातील उद्योजकांनी कंपन्या बंदकेल्या . त्यामुळे कल्याण पट्ट्यातील सुमारे २० कंपन्या १९९० ते २००० या दशकातबंद होऊन किमान २५ हजार कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली .
नोकऱ्या उपलब्ध नसल्याने या भागातील तरुणांना मुंबई किंवा पुणे गाठण्याशिवायअन्य पर्याय नाही . दररोज ये - जा करण्यात किमान २ ते ४ तासांचा अवधी जातअसल्याने त्याचा परिणाम कार्यक्षमतेवरही होतो . या परिसरात पुन्हा रोजगाराच्यासंधी निर्माण करायच्या असतील तर उद्योग स्थापन होणे आवश्यक आहे . हे ओळखूनकल्याण पश्चिमेचे आमदार प्रकाश भोईर यांनी बड्या कार्पोरेट कंपन्यांना त्यासाठीआवतण दिले .
या भागात उपलब्ध असलेले कुशल तंत्रज्ञ तसेच जागेचे तुलनेने कमी भाव , पाण्याचीमुबलकता आदी कारणामुळे कल्याण पट्ट्यात उद्योग सुरू करणे शक्य असल्याचे भोईरयांचे म्हणणे आहे . विशेष म्हणजे त्यांच्या आवाहनाला ३ बड्या कार्पोरेट कंपन्यांनीप्रतिसाद दिला असून आयटी पार्कसारखा प्रकल्प सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे .त्यावर होणारा कोट्यवधी रुपयांचा खर्च उचलण्याची त्यांची तयारी आहे .
पालिकेने या उद्योगांसाठी जागा दिली तर रोजगाराच्या संधी स्थानिक पातळीवरनिर्माण होतीलच ; शिवाय येथील अर्थव्यवस्थेलाच चालना मिळणार आहे . त्यामुळेपालिकेने गौरीपाडा परिसरातील सीटीपार्क प्रकल्पाची ताब्यात असलेली १६ एकरजागा आयटीपार्कसाठी द्यावी , अशी मागणी त्यांनी पालिका आयुक्त रामनाथ सोनवणेयांच्याकडे केली आहे . सीटीपार्क हा शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी प्रतिष्ठेचाकेलेला प्रकल्प असला तरी गेल्या ६ महिन्यात पालिका प्रशासन त्या प्रकल्पाची एकइंचही जागा ताब्यात घेऊ शकलेली नाही . तसेच प्रकल्पावर १०० कोटी रुपयांचा खर्चपालिकेला पुढील दशकभरात तरी झेपणारा नाही . त्यामुळे ही जागा आयटीपार्कसाठीद्यावी , असा त्यांचा आग्रह आहे .
दरम्यान , याबाबत महापौर वैजयंती गुजर व आयुक्त सोनवणे यांची संयुक्त भेटसोमवारी घेणार असल्याचे आमदार भोईर यांनी सांगितले . या बैठकीत नगररचनाविभागाचे अधिकारीही उपस्थित असतील . सीटीपार्कची जागा आयटीपार्कसाठीदेण्याची तयारी पालिका दाखवते की नाही , याबाबत या बैठकीतच निर्णय होईल .
Sunday, August 21, 2011
रेशनिंगचा गहू 'बालाजी' मिलमध्ये
५0 किलोच्या ४४0 गव्हाच्या गोण्या उतरविण्यात आल्या आहे.गोरगरिबांसाठी येणारा गहू गोरगरिबांना वाटप न करताच तो दलालांच्या आणि अधिकार्यांच्या संगनमताने विकला जात आहे. गरिबांच्या गव्हावर डल्ला मारून या गव्हाचे पीठ तयार करून हे पीठ चढय़ा दराने विकण्याचा धंदा अंबरनाथच्या बालाजी फ्लोअर मिलमध्ये सुरू आहे. यापूर्वीही मोठा गव्हाचा साठा याच मिलमध्ये सापडला होता.
या प्रकरणाला वर्ष होत नाही तोच आता पुन्हा या फ्लोअर मिलमध्ये रेशनिंगचा गहू सापडला आहे. बुधवारी रात्री मनसेचे नगरसेवक संदीप लकडे, स्वप्नील बागूल आणि शैलेश शिर्के यांनी हा प्रकार उघड केला आहे. भिवंडीच्या गोदामातून दोन ट्रक भरून गहू उल्हासनगर येथील ४0 फ या दुकानात येणार होता. मात्र, तो मिलमध्ये पाठविण्यात आला होता.
Friday, August 19, 2011
स्टेअरकेस प्रिमिअमची सवलत रद्द?
केडीएमसी लगतच्या अन्य महापालिकांमध्ये स्टेअरकेस प्रिमिअम अवघे ३५ टक्के इतकाआकारला जातो . परंतु केडीएमसीत तोच १०० टक्के इतका असल्याचे कारण देतबिल्डर संघटनांनी पालिकेकडे सातत्याने प्रिमिअम कमी करण्याची मागणी केली होती .परंतु या निर्णयामुळे पालिकेचे आर्थिक नुकसान होईल , असे कारण देत ती मान्यझाली नव्हती .
मात्र अचानक मागील आठवड्यात आयुक्त रामनाथ सोनवणे यांनी हा प्रिमिअम १००टक्क्यांवरुन ४० टक्क्यांवर आणला . आयुक्तांच्या या निर्णयामुळे केवळ बिल्डरलॉबीचा फायदा होणार असला तरी पालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होईल ,अशी भीती काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक जितेंद्र भोईर यांनी व्यक्त केली . तर मनसेचेनगरसेवक मंदार हळबे यांनी बिल्डरांच्या फायद्यासाठी आयुक्तांचा आटापिटा कशासाठी? असा सवाल करत प्रशासनाला धारेवर धरले . याप्रकरणात पालिकेत मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा संशय मनसेचे शहराध्यक्ष राजेश कदम यांनी व्यक्त केलाहोता .
या पार्श्वभूमीवर मनसेचे आमदार रमेश पाटील यांनी गुरुवारी मुंबईत राज ठाकरेयांची भेट घेउन याप्रकरणातील वस्तुस्थिती त्यांच्यासमोर मांडली . महापालिकेवरकोट्यवधी रुपयांचे कर्ज असतांना पालिकेचे आर्थिक नुकसान होणार असल्याचेसमजताच राज ठाकरे यांचा पारा चढला व त्यांनी आयुक्त रामनाथ सोनवणे यांनाफोन करुन हा निर्णय रद्द करण्याची सूचना केली . आमदार रमेश पाटील यांनी यावृत्ताला दुजोरा दिला .
दरम्यान , याबाबत आयुक्त सोनवणे यांना संपर्क साधला असता त्यांनी याप्रकरणातीलअर्थकारणाबद्दल मनसेच्या शिष्टमंडळाकडून तक्रारी आल्याचे मान्य केले . शुक्रवारीसंध्याकाळी नगररचना विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करुन योग्य तो निर्णय घेणारअसल्याचे ते म्हणाले . राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे मनसेकडून स्टेअरकेसप्रिमिअमच्या मुद्यावर होणारा संभाव्य टोकाचा विरोध पाहता आयुक्तांना हा निर्णयमागे घेण्याखेरीज पर्याय राहिला नसल्याची चर्चा आहे .
Tuesday, August 16, 2011
निषेध ........
Friday, August 12, 2011
'पंतप्रधान' मोदींना 'मनसे' पाठिंबा!
गुजरातच्या विकासाचं रहस्य जाणून घेण्यासाठी राज ठाकरे गेले दहा दिवस गुजरात दौ-यावर होते. त्यावेळी नरेंद्र मोदींच्या कामाचा झपाटा ‘ याचि डोळा ’ अनुभवल्यानं ते ‘ मोदी मॅजिक ’ वर एकदम फिदा होऊन गेलेत. नरेंद्र मोदींना भेटून गुजरात दौ-याची सांगता करताना राज यांनी मोदींवर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला.
नरेंद्र मोदींसारख्या प्रभावी आणि कार्यक्षम नेत्याची आज केंद्रात खरी गरज आहे. देशाच्या पंतप्रधानपदासाठी ते अत्यंत योग्य उमेदवार आहेत, अशी दाद राज यांनी दिली आहे. परंतु, गुजरातची घडी व्यवस्थित बसवल्यानंतरच त्यांनी केंद्रात जावं, असंही राज यांना वाटतंय. भविष्यात केंद्रामध्ये भाजपचं सरकार आलं, त्याचं नेतृत्त्व मोदी करणार असतील आणि त्यावेळी मनसेचे खासदार निवडून आले असतील तर आम्ही त्यांना पूर्ण पाठिंबा देऊ, अशी घोषणाही राज यांनी करून टाकली आहे.
‘ टार्गेट परप्रांतीय !’
परप्रांतीयांच्या मुद्द्यावरून गुजरातमधील पत्रकारांनी राज यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु राज त्यांना पुरून उरले. परप्रांतियांच्या विरोधात बोलणारा मी एकटा नाही. शीला दीक्षित, पी. चिदंबरम यांनीही परप्रातियांना लक्ष्य केलंय. आसाममध्ये तर बिहारी मजुराची हत्या करण्यात आली होती. असं असताना, फक्त माझ्यावरच टीका का केली जाते ?, असा प्रतिप्रश्न त्यांनी पत्रकारांना केला. परप्रातियांच्या लोंढ्यांमुळे महाराष्ट्राची काय अवस्था झाली आहे हे तुम्ही मुंबईत येऊन पाहा, तेव्हाच माझी भूमिका तुमच्या लक्षात येईल, असंही त्यांनी नमूद केलं.
मनसे महाराष्ट्रातच !
गुजरातच्या प्रेमात पडलेल्या राज ठाकरेंची मनसे इथे येऊन निवडणुका लढवणार का, या प्रश्नाचं थेट उत्तर राज यांनी दिलं. माझ्या पक्षाचं नाव महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे. त्यामुळे महाराष्ट्र हीच आमच्या पक्षाची सीमा आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
गुजरात दौरा अद्भुत आणि डोळे उघडणारा होता, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली. गुजरातमधले रस्ते आपल्याला सगळ्यात आवडल्याचंही त्यांनी आवर्जून सांगितलं. भविष्यात पुन्हा आपण इथे येऊन वेगवेगळ्या प्रकल्पांचा अभ्यास करण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला.
अण्णांना पाठिंबा
लोकपाल विधेयकाच्या मागणीसाठी १६ ऑगस्टपासून उपोषण करणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना आपला पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार राज यांनी केला. अण्णांच्या काही मागण्या एडिट होऊ शकतात, पण डिलिट होऊ शकत नाहीत, असं ते म्हणाले.
Thursday, August 11, 2011
आ. प्रकाश भोईर ह्यांचे कल्याण मधील प्रकल्प (फडके मैदान क्रीडासंकुल)
आ. प्रकाश भोईर ह्यांचे कल्याण मधील प्रकल्प (रमाबाई आंबेडकर उद्यान)
शिवसेनेला घोर लावणारे राजकारण!
.......................
मुंबई महापालिकेच्या निवडणुका सात-आठ महिन्यांवर आल्या असताना खड्ड्यांमुळे शिवसेनेच्या मार्गात बरेच खाचखळगे निर्माण झाले आहेत. रोज टीकेचा भडीमार चालला आहे. अब्रूचे पंचनामे चालू आहेत. महापालिकेच्या कारभाराचे धिंडवडे निघत असताना परवा तर धारावीजवळ आख्खा ट्रक आणि त्याच्या पाठोपाठ टेम्पो खड्ड्यात अक्षरश: उताणा झाला. दोन-तीन वर्षांपूर्वी महालक्ष्मीच्या सातरस्ता चौकात पसरलेल्या ट्रकची पुनरावृत्ती धारावीत पाहायला मिळाली. तेव्हा फाटलेल्या आकाशाला कुठे कुठे ठिगळ लावायचे या चिंतेने सेनानेते कावरेबावरे झाले आहेत. तशात नालेसफाईची सीआरडी चौकशी करण्याचे आश्वासन सरकारने विधिमंडळात दिले. त्यामुळे तर सेनेची आणखीच पंचाईत झाली. हीच शिवसेना अवघ्या काही महिन्यांपूवीर् वाघासारख्या डरकाळ्या फोडताना सरकारला कापरे भरत होते. मग तो जैतापूरच्या अणुऊर्जा प्रकल्पाचा प्रश्न असो की इतर कोणता. सेना दिवसेंदिवस आक्रमक होताना दिसत होती. पण त्याच सेनेला आता मुंबई महापालिकेतील गलथान कारभारामुळे हुडहुडी भरायला लागली आहे. ऐन मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर ही हुडहुडी महागात पडू शकते.
सेनेची अशी अवस्था झालेली असताना मनसेवाले रोज काही ना काही कुरापती काढत आहेत. तशात सेनेचे जानी दुष्मन राज ठाकरे सेनेच्याच सोयऱ्यांकडे गुजरातेत यथेच्छ पाहुणचार झोडत आहेत. 'विकासाचे मॉडेल' म्हणून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या गुजरातची पाहणी करण्यासाठी कुठल्यातरी मागासलेल्या नव्हे तर विकसित महाराष्ट्रातील 'ग्लॅमरस' नेता येतोय आणि आपल्याला तो 'रोल मॉडेल' म्हणून पाहतोय म्हटल्यानंतर मुख्यमंत्री नरेंद मोदी यांच्या अंगावर नक्कीच मूठभर मांस चढले तर नवल नाही! त्यामुळे मोदी यांनी राज यांना 'स्टेट गेस्ट'चा दर्जा देऊन त्यांच्या स्वागतासाठी लाल गालिचाही अंथरला. शाही पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी स्वत: जातीने उपस्थित राहिले. मग काय? त्यांचे ते पंचतारांकित आगतस्वागत. उभयतांनी केलेली परस्परांची कोडकौतुकं. त्याची रसभरित वर्णनं छायाचित्रांसह दिमाखात छापून येत आहेत. मागेपुढे अधिकाऱ्यांच्या ताफ्यात गॉगलधारी राज एकापाठोपाठ एक विकासकामांना भेटी देऊन माहिती घेत आहेत. मुक्तकंठाने मोदी आणि गुजरातचे कौतुक करत आहेत. त्यात पुन्हा गेल्या काही वर्षांतल्या राज्यर्कत्यांनी वाट लावली असली तरी अजून महाराष्ट्र पहिल्याच क्रमांकावर असल्याचा 'मराठी बाणा'ही न विसरता दाखवत आहेत. त्यामुळे मीडियाने त्यांची तोंडफाट स्तुती चालविली आहे. जाताना आठवणीने मीडियातील मराठी टक्का बरोबर नेलेला असावा. किंवा कदाचित छत्रपती शिवरायांच्या सुरतेच्या मोहिमेनंतर प्रथमच कुणी मराठी नेता गुजरातवर चाल करून जातोय, असा साक्षात्कार झाल्याने आख्खा मीडियाच त्यांच्यामागे धावत सुटला असेल.
राज यांना महाराष्ट्राला विकासाच्या शिखरावर न्यायचे आहे. त्याची ब्लू प्रिंट ते देणार आहेत. त्यासाठी त्यांनी थेट गुजरातकडे धाव घेतली. कदाचित् त्यांच्या मते इथे काहीच घडत नसावे. त्यामुळे महाराष्ट्रात काय आहे, हे पाहण्याची त्यांनी तसदी घेतली नसावी. देशाच्या उत्पादनापैकी एक तृतिआंश साखरेचे उत्पादन इथे होत असले तरी साखर कारखाने हे मुळी पैसे खाण्यासाठीच काढलेले आहेत. राज्यातल्या दोन जिल्ह्यातला कांदा देशभर आणि परदेशातही जातो. इथल्या माळावरची दाक्षे, डाळिंब, सीताफळे युरोपाच्या बाजारात जातात. कोकणातील हापूस जगभरातील आंब्यांचा शहेनशाह झाला आहे. टेबल ग्रेपऐवजी वाईन फायद्याची ठरते म्हणून वायनरी सुरू झाल्यात. पण गुजरातच्या वाळवंटात इराकच्या जगप्रसिद्ध 'हनी बॉल' खजुराचे आणि युरोपातल्या ऑलिव्हचे उत्पादन व्हायला लागले, याचे अप्रूप असू शकते. खरे म्हणजे, नितीशकुमारांनी बिहारमध्ये विकासाची अशीच घोडदौड चालविली आहे. पण राज यांना तिथे जाणे कठीण आहे. काही का असेना पण विकासाचा ध्यास घेऊन कुणी कुठे पाहणीसाठी जात असेल तर स्वागतच करायला हवे.
गुजरात दौऱ्यामुळे आपण भाषेच्या पलीकडे जाऊन विकासाला प्राधान्य देऊ पाहतो, असा एक संदेश त्यांनी महाराष्ट्रातील मतदारांनाही दिला आहे. त्यातून आपण सबंध राज्याच्या हिताचा विचार करतो, असे ते म्हणू शकतील. उद्या सत्तेवर आल्यानंतर ते काय वेगळे करणार, हा प्रश्नच आहे. पण आज सत्तेत नसल्यामुळे मोठ्यामोठ्या गोष्टी करता येतात. लोकही हुरळून जातात. केवळ भाषेचा विचार करणारा पक्ष आता विकासाचा विचार करायला लागला, याचेही अप्रूप वाटू शकते. अशा आशाळभूतांच्या दृष्टिकोनाचा लाभ मनसेला मिळू शकतो.
या दौऱ्याचे राजकीय परिणाम यथावकाश स्पष्ट होतील. परराज्यातील नेता गुजरातकडे विकसित राज्य म्हणून पाहतो. आपल्या राज्याचा तसाच विकास करू इच्छितो. यामुळे गुजराती भाषिकांचा अहंभाव सुखावला असणार. यातून मुंबई, महाराष्ट्रातील गुजराती भाषिकांची सहानुभूती राज आणि मनसेला मिळेल. भाषिक अस्मितेचे राजकारण करून उत्तर भारतीयांच्या विरोधात रान पेटवणारा नेता गुजरात आणि गुजराती समाजाला शत्रू तर सोडाच पण मित्र समजतो. यामुळे गुजराती भाषिकांना आनंदाचे भरते आले नसेल तरच आश्वर्य. मुंबई-महाराष्ट्रातील गुजराती समाज प्रामुख्याने भाजपबरोबर आणि युतीसोबत आहे. सेनेतून फुटून राज यांनी मनसे काढल्याने तसेच त्यांनी परप्रांतियांना लक्ष्य केल्याने हा समाज त्यांच्याकडे थोडा संशयानेच पाहात होता. पण तो संशयही आता दूर होईल. थोडक्यात, भाजपनंतर केवळ सेनेवर विश्वास ठेवणारा हा समाज मनसेशी संबंध ठेवू लागेल. कालांतराने उभयतांतील संबंध अधिक जिवंत होऊ शकतील. युतीची मोठी मतपेढी मराठी आणि गुजराथी भाषिकांमध्ये आहे. मनसेने मराठीत घुसखोरी करून आपला वाटा घेतला. आता ते गुजराती भाषिकांमध्येही घुसखोरी करू लागतील. उद्या मनसे आणि सेना यांच्या निवडणूक संघर्षात मनसेच्या उमेदवाराचे पारडे जड तुलेनेने जड असेल तर सेनेलाच मत दिले पाहिजे, असे दडपण गुजराथी समाजावर राहणार नाही. हा समाज व्यापारी वृत्तीचा असून आजवर त्याला जसे सेनेचे संरक्षण मिळाले तसे उद्या मनसेचे मिळू लागेल. मराठी आणि गुजराती समाजात स्वतंत्र मतपेढी तयार केल्यानंतर हिंदुत्वाची मतपेढी तेवढी मनसेपासून दूर असेल, असा त्याचा अर्थ आहे. अर्थात, राज व मनसे यांचे राजकारण धर्मनिरपेक्षतेचे नाही. हिंदुत्व जाहीर स्वीकारले नसले तरी त्यांचे कूळ त्याच प्रवाहातले आहे. त्यामुळे जेव्हा वेळ येईल तेव्हा ते जहाल हिंदुत्वाची भूमिकाही घेताना दिसतील. थोडक्यात, जिथे जिथे तुम्ही, तिथे आम्ही, अशी मनसेची पावलं पडत राहणार. आख्ख्या हिंदुत्वाच्या व्होटबँकेत ते सराईतपणे वावरणार. साहजिकच मनसेला कशाला बाजूला ठेवता, असे सेनेवरील दडपण वाढत जाणार.
भाजपमध्ये आजवर गडकरी हेच प्रामुख्याने मनसेला जवळ करणारे होते. आता मोदींची त्यात भर पडल्याने भाजपमध्ये मनसेचा पाठिंबा वाढणार. पण आजचा विचार केला तर पक्ष म्हणून भाजपमध्ये मनसेची 'अॅक्सेप्टिबिलिटी' वाढलीय हे निविर्वाद. राजकारणात अशी स्वीकारार्हता वाढणे, अन्य पक्ष व शक्तिशाली नेत्यांशी मैत्री होणे, हे भविष्यात लाभदायक असते. कारण वेळ येते तेव्हा राजकारणात नवी समीकरणे मांडता येतात. भाजपचा फायदा असा की, सेना आणि मनसे हे दोन्ही पर्याय त्यांच्यापुढे असणार. वेळ येईल तेव्हा कोणता पाठिंबा स्वीकारायचा हे ते ठरवू शकतील. दरम्यान पडद्यामागे समझोते करायला तर कसलीच अडचण नसेल. या सगळ्याचा परिणाम म्हणजे सेनेचा दबाव, दडपण आणि मित्रपक्षाशी सौदा करण्याची क्षमता कमी होणार. किमान आम्ही म्हणू तीच पूर्वदिशा, हे सेनेचे सध्याचे स्थान राहणार नाही, यात शंका नाही.
सेना, मनसे आणि भाजप यांची पावले उद्याच्या राजकारणात कशी आणि कोणत्या दिशेने पडणार, हे यातून स्पष्ट होते. पण राजनी गतिमान विकास हवा असेल तर आघाड्यांचे राजकारण हा त्यातला महत्त्वाचा अडसर असल्याचे म्हटले आहे. इतकेच नव्हे, तर आघाड्यांचे राजकारण अपरिहार्य आहे, ही मानसिकताच काढून टाकली पाहिजे, असे म्हटले आहे. गुजरातमध्ये मोदींचा शब्द चालतो, हे त्यांना दिसले असणार. महाराष्ट्रालाही विकासाच्या महामार्गावर भरधाव जायचे असेल तर मोदींप्रमाणे आपल्याकडे मतदारांनी सर्वंकष सत्ता सोपविली पाहिजे, असेही त्यांना सूचित करायचे असावे. राज यांना सध्या एकटेच जायचे आहे. राज्यातील दोन परस्परविरोधी आघाड्यांत त्यांना स्थान नाही. त्यामुळे ते आघाडीच्या राजकारणाच्या विरोधात हल्लाबोल करू शकतात. आघाड्यांच्या राजकारणामुळे महाराष्ट्र विकासाकडे न जाता मागासच राहील, अशी टीका करू शकतात. खरे म्हणजे, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना या सगळ्यांनाच स्वबळावर सर्र्वंकष सत्ता हवी आहे. पण ती मिळत नसल्याने नाइलाजाने त्यांना आघाडी आणि युतीचे राजकारण करावे लागते. भविष्यात मनसेलाही तेच करावे लागेल. पण सध्या ती संधी नसल्याने आघाडीच्या राजकारणावर तुटून पडणे हे राजकीयदृष्ट्या त्यांच्या फायद्याचे आहे. त्यातून खरोखरच आघाडीचे पर्व नष्ट करण्यात यश आले तर त्यांना युगपुरुषच म्हणावे लागेल. सेनेवाले खाचखळग्यात ठेचकाळत असताना मनसेने मात्र एका वेगळ्या पातळीवर दमदार पावले टाकत सेनावाल्यांचा घोर आणखी वाढवला. राजकारण चुकीचे की बरोबर, ही चर्चा अनेकदा निरर्थक ठरते. मात्र, कोण किती सफाईदार राजकारण करतो, यावर यशापयश अवलंबून असते, हे सेनानेत्यांनीही कधीतरी समजून घेतले पाहिजे.