Friday, November 4, 2011

पेट्रोल दरवाढ : ममतांकडून पाठिंबा काढण्याचा इशारा

चला ममता दीदी मुळे पेट्रोल दरवाढीतून सुटका होण्याची चिन्ह आहेत
अमेरिकेत पेट्रोल साठी एका लिटर ला ४५ रुपये पडतात मग भारतात पेट्रोल एवढं महाग का ?? हा मोठा गहन प्रश्न आहे .........

खालील बातमी स्टार माझा च्या सौजन्याने

नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेस प्रमुख ममता बॅनर्जी यांनी पेट्रोल दरवाढीचा विरोध केला असून, सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा इशारा दिला आहे. आपल्या मित्र पक्षांशी चर्चा न करता सरकारने ११ महिन्यात १२ वेळा पेट्रोलच्या किंमती वाढवणे आपल्याला मान्य नसल्याचं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.

तृणमूल काँग्रेसच्या संसदीय दलाच्या बैठकीत सदस्यांनी यूपीए सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. पण पंतप्रधान परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं म्हटलं आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी असंही म्हटलं की, आता युपीएमधून बाहेर पडल्यावर सरकार कोसळेल आणि आपल्याला तसं करायचं नाहीए म्हणून आपण पंतप्रधान कधी परतणार आहेत याची वाट पाहात असल्याचं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.

No comments:

Post a Comment