Sunday, August 21, 2011

रेशनिंगचा गहू 'बालाजी' मिलमध्ये

खालील बातमी लोकमत च्या सौजन्याने ...................



भिवंडी येथील सरकारी गोदामातील रेशनिंगचा गहू अंबरनाथच्या बालाजी फ्लोअर मिलमध्ये उतरविण्यात आला आहे. गरिबांसाठी असलेल्या गव्हावर डल्ला मारून पीठ विकणार्‍या बालाजी फ्लोअर मिलचे लायसन्स रद्द करण्याची मागणी गहू पकडून देणार्‍या मनसे कार्यकर्त्यांनी केली आहे.
५0 किलोच्या ४४0 गव्हाच्या गोण्या उतरविण्यात आल्या आहे.गोरगरिबांसाठी येणारा गहू गोरगरिबांना वाटप न करताच तो दलालांच्या आणि अधिकार्‍यांच्या संगनमताने विकला जात आहे. गरिबांच्या गव्हावर डल्ला मारून या गव्हाचे पीठ तयार करून हे पीठ चढय़ा दराने विकण्याचा धंदा अंबरनाथच्या बालाजी फ्लोअर मिलमध्ये सुरू आहे. यापूर्वीही मोठा गव्हाचा साठा याच मिलमध्ये सापडला होता.
या प्रकरणाला वर्ष होत नाही तोच आता पुन्हा या फ्लोअर मिलमध्ये रेशनिंगचा गहू सापडला आहे. बुधवारी रात्री मनसेचे नगरसेवक संदीप लकडे, स्वप्नील बागूल आणि शैलेश शिर्के यांनी हा प्रकार उघड केला आहे. भिवंडीच्या गोदामातून दोन ट्रक भरून गहू उल्हासनगर येथील ४0 फ या दुकानात येणार होता. मात्र, तो मिलमध्ये पाठविण्यात आला होता.

No comments:

Post a Comment