Friday, August 5, 2011

महाराष्ट्राचे ग्रह फिरले आहेत! - राज ठाकरे

खालील बातमी म टा च्या सौजन्याने .......



टाटांच्या ' नॅनो ' प्रकल्पाच्यापाठीशी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी उभेराहिले , त्यासाठी तातडीनेपरवानगी दिली , असे योग जुळूनयावे लागतात . व्यवसायउद्योगांसाठी महाराष्ट्रातही यापूर्वीअसेच योग जुळून आले होते ,परंतु आता नेमके कोणते ग्रहफिरलेत तेच कळत नाही , अशीमल्लिनाथी गुजरात दौऱ्यावरअसलेले महाराष्ट्र नवनिर्माणसेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी येथील ' नॅनो ' प्रकल्पास भेट दिल्यावर केली .

' नॅनो ' प्रकल्प महाराष्ट्रात आला नाही , याचे दु : वाटते आणि त्याचवेळी ' बरे झाले, टाटा महाराष्ट्राच्या भानगडीत पडले नाहीत , असेही वाटते . तेथे त्यांना पैसेहीखायला घालावे लागले असते आणि परवानगीही ताबडतोब मिळाली नसती ' असाटोला लगावत , ' आमच्याकडे मुख्यमंत्री भेटत नाहीत ही वस्तुस्थिती आहेच ', अशीपुस्ती राज यांनी जोडली .

गुजरातमध्ये अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने काम सुरू आहे . खासगी कंपन्यांप्रमाणे हेसरकार नियोजनबद्ध काम करीत आहे . राजकारणी आणि प्रशासन एकमेकांत मिसळूनराज्याच्या हिताचा विचार करत आहेत . इतरत्र यापेक्षा विरुद्ध चित्र दिसते .राज्यकर्त्यांची इच्छाशक्ती आणि त्यास प्रशासनाची साथ असल्यास राज्यात काय होऊशकते याचे गुजरात हे आदर्श उदाहरण ठरावे , असे राज म्हणाले .

गुजरात अभ्यास दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी , गुरुवारी राज यांनी साबरमती नदी विकासप्रकल्प , अहमदाबाद मधील ' जनमार्ग बीआरटीस ' आणि ' नॅनो ' प्रकल्पाची पाहणीकेली . तसेच साणंद तालुक्यातील वासणा गावास भेट देऊन सुरक्षित मातृत्वासाठीअसलेल्या चिरंजीवी योजनेचीही माहिती घेतली . अहमदाबाद मधील कांकरियातलावाच्या सुशोभिकरणाचे कामही त्यांनी पाहिले .

सीईओ नव्हे विश्वस्त !

मला महाराष्ट्रच प्रिय आहे ; पण गुजरात पुढे जात आहे हे वास्तवच आहे . गुजरातच्याविकासाचे सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे एखाद्याकंपनीच्या सीईओप्रमाणे नव्हे तर एखाद्या ट्रस्टच्या विश्वस्ताप्रमाणे काम करीत आहेत .हा मोठा फरक आहे . त्यास जनसहभागाची जोड आहेच , परंतु मुळात राज्यकर्त्यांनाहीहा आपला प्रदेश आहे , हे आपले राज्य आहे याची जाणीव आहे , असे निरीक्षण ठाकरेयांनी नोंदवले .

पुण्यात कुठे आहे कंट्रोल रुम ?

अहमदाबादमध्ये बीआरटीएस यशस्वी ठरली कारण त्याचे नियोजन त्या रीतीनेकरण्यात आले . केवळ रस्त्याच्या मध्यभागी बॅरिकेड्स टाकून , बसगाड्या खरेदी करूनउपयोग नाही . अहमदाबादप्रमाणे पुण्यात बीआरटीएसची कंट्रोल रूम कुठे आहे ? तेथेफक्त पैसे किती खाता येतील याचाच विचार दिसतो , अशी टिप्पणी राज यांनी केली .

गोदापार्क ते साबरमती

साबरमतीच्या तिरावर होत असलेले विकास प्रकल्पाचे काम पाहून ठाकरे यांना त्यांचेस्वप्न असलेल्या नाशिकमधील ' गोदा पार्क ' चे स्मरण झाले . त्याचवेळी या प्रकल्पाचेएम . डी . आणि अहमदाबाद पालिकेचे उपायुक्त कॅ . दिलीपकुमार महाजन यांनीसाबरमतीचे काम सुरू करण्यापूर्वी गोदा पार्कला भेट दिल्याचे सांगितले . आपण जेव्हाते काम करत होतो तेव्हा अनेकांना त्याचे गांभीर्य कळले नाही , कारण त्यात पैसेखायला वाव नव्हता . बरेच अडथळे आणले गेलेे . परंतु आता साबरमतीसाठी तेचकाम पाहिले याचा मला आनंद वाटतो , असे राज म्हणाले .

No comments:

Post a Comment