एखादा नेता दहा दिवस परदेशात फिरायला गेला, तर त्याची बातमी होते. मग एखादा नेता विकासाच्या चांगल्या गोष्टी पाहण्यासाठी शेजारच्या राज्यात आला तर त्याची सकारात्मक बातमी करण्याऐवजी त्यात राजकारण का पाहता? असा सवाल करत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी राजकीय विचारांची अस्पृश्यता सोडून राष्ट्रहित राजकारणापेक्षा जास्त महत्त्वाचे असल्याची भूमिका घेत मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या गुजरातभेटीचे समर्थन केले.
गुजरातमधील विकास-कामांच्या अभ्यासासाठी राज ठाकरे आणि त्यांची टीम गुजरात दौऱ्यावर असून त्याचा प्रारंभ बुधवारी झाला. सर्वप्रथम त्यांनी अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आश्रम आणि साबरमतीच्या गांधी आश्रमाला भेट दिली. प्रवीण दरेकर, मंगेश सांगळे, वसंत गिते आणि रमेश पाटील या चार आमदारांसह उदय निरगुडकर, राघव नरसाळे, जयराज साळगावकर, धनंजय मुंगळे, अतुल चांडक आदींचा राज यांच्या शिष्टमंडळात समावेश आहे.
शिष्टमंडळासाठी गुजरात सरकारच्या निरनिराळ्या विभागांनी केलेल्या कामाचे सादरीकरण दिवसभर करण्यात आल्यावर संध्याकाळी मुख्यमंत्री नरेंद मोदी यांनी शिष्टमंडळाची भेट घेतली. त्यावेळी राज व शमिर्ला ठाकरे यांनी त्यांना अश्वारूढ शिवाजी महाराजांचे शिल्प आणि शिवस्तुती भेट दिली. तर मोदींनी 'वाचे गुजरात' या अभियानाच्या परंपरेप्रमाणे त्यांना सामाजिक समरसता हे पुस्तक भेट दिले.
तुम्ही राज यांना गुजरातभेटीचे निमंत्रण दिले, इतरांना का नाही? या प्रश्नाच्या उत्तरात मोदी यांनी राज यांच्या गुजरातभेटीची पार्श्वभूमी विशद केली. राज यांना आपण प्रथमच भेटतो आहोत. यापूवीर् कधी भेटलो नव्हतो. त्यांचा एप्रिल-मेच्या सुमारास फोन आला. गुजरातला भेट द्यायची आहे, असे ते म्हणाले. मला वाटले ते कुटुंबासोबत येतील आणि गीरला सिंह बघायला जातील. पण त्यांचा विचार वेगळाच होता. गुजरात आणि महाराष्ट्राचा जन्म एकाच वेळी झाला, आता गुजरातने काय प्रगती केली हे पाहायचे असल्याची इच्छा राज यांनी व्यक्त केली, असे मोदी यांनी सांगितले. या भेटीपूवीर् राज यांची एक टीम आली त्यांनी कोणत्या विषयावर चर्चा करायची याची रूपरेषा ठरवली. अमूक बघा, तमूक बघा असे आम्ही त्यांना सांगितले नाही. गुजरातची प्रगती पाहण्यासाठी युनिसेफ, डब्ल्यूएचओ, स्वयंसेवी संस्था, इतर राज्यांचे अघिकारी येतात. सरदार सरोवर प्रकल्प, फोरेन्सिक लॅब, सौर प्रकल्पांचा अभ्यास करण्यासाठी येतात. तशीच त्यांची भेट आहे, असे मोदी म्हणाले.
राजकारणातही अभ्यासाची गरज असते. देश पूर्णपणे बुडाला आहे, आता त्याचे काही होऊ शकत नाही, यावर माझा विश्वास नाही. इच्छा असेल तर आपण सगळे बदलू शकतो. म्हणूनच राजकीय विचारांची अस्पृश्यता सोडून राजकारणापेक्षा राष्ट्रहिताचा विचार करायला हवा, असे मोदी म्हणाले.
..........................................
म्हणून बोलतो हिंदी
साबरमती आश्रमातून बाहेर पडण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांनी हिंदीतून उत्तरे दिली. त्याची जोरदार चर्चा वृत्तवाहिन्यांवर होत असल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर काहीशा वैतागलेल्या राज यांनी 'ही चर्चा तुम्हीच करताय, लोकांचा त्याच्याशी संबंध नाही. सकाळी बोलतानाच आपण महाराष्ट्राबाहेर असल्याने हिंदीतून बोलत असल्याचे स्पष्ट केले आहे. गुजराती येत असती तर त्याही भाषेत बोललो असतो', असे उत्तर त्यांनी दिले.
महाराष्ट्रच नंबर वन
गुजरातच्या विकासाविषयी ऐकले होते. प. बंगालमधील नॅनोचा प्रकल्प येथे आला तेव्हा रतन टाटांसारख्यांनीही मोदींची स्तुती केली होती. त्यामुळे नक्की काय घडते आहे ते पाहण्याची इच्छा होती. मोदींबद्द्ल आदर आणि सन्मान वाटतो. राज्याची प्रगती आणि इन्फ्रास्ट्रक्चर हे माझे पॅशन आहे. म्हणून गुजरातच्या अभ्यास दौऱ्यावर आलो आहे. त्यात राजकारण आणू नका, असे राज ठाकरे म्हणाले. उद्योग आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्याबाबतीत आजही महाराष्ट्रच नंबर वन आहे. परंतु भ्रष्टाचार आणि लोडशेडिंगसारख्या समस्या राज्याच्या प्रगतीच्या आड येत असल्याचेही ते म्हणाले.

No comments:
Post a Comment