Friday, September 16, 2011

रस्ते बांधकामाच्या ५६० कोटी रुपयांच्या निविदा तात्काळ रद्द करा

मुंबई आणि उपनगरातील रस्ते बांधकामाचे ठेके चांगल्या कंपनी कडे दिले पाहिजेत .... हे स्थानिक ठेकेदार २५ - ३० % बिलो जाऊन जर निविदा भारत असतील तर ते चांगले रस्ते कसे बांधणार? समझा एखाद्या रस्त्याचे महानगरपालिकेचे एस्टीमेट जर १ करोड रुपयाचे असेल आणि ठेकेदार जर हा रस्ता ७५ लाखात करत असेल तर त्या रस्त्याचा दर्जा कसा असेल ह्याची कल्पना करा? आता वेळ आली आहे की सर्व रस्त्यांची कामा एल एंड टी / ग्यामन अश्या प्रथितयश कंपन्यान कडे द्यावे .......

आपला

विनोद शिरसाठ




राज ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई, १५ सप्टेंबर / विशेष प्रतिनिधी

altमहापालिकेने नियम धाब्यावर बसवत तसेच कामात निष्काळजीपणा करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याऐवजी त्यांना मुंबईतील रस्त्यांची ५६० कोटी रुपयांची कंत्राटे बहाल करण्याची तयारी प्रशासनाने चालविली आहे. ‘मनसे’चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन या निविदा तात्काळ रद्द करण्याची आणि मुंबईकरांना चांगले रस्ते देण्याची मागणी केली. राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे शिवसेना अडचणीत आल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू झाली आहे.
पालिकेतील विरोधी पक्षनेते राजहंस सिंह यांनीही निविदा रद्द करण्याची मागणी केल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत रस्त्यांची निविदा मंजूर केली जाईल, असे शिवसेनेने जाहीर केले होते.
मुंबई शहरातील रस्त्यांवर दरवर्षी पावसाळ्यात पडणाऱ्या खडय़ांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. हे दुष्टचक्र संपण्याची गरज असल्याचे सांगत, उत्तम दर्जाचे रस्ते बांधू शकणाऱ्या व्यावसायिकांना काम देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. आमदार नितीन सरदेसाई, अतुल सरपोतदार आदी मनसेचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
गेल्या वीस वर्षांत पालिका चांगले रस्ते का बांधू शकली नाही, निविदेतील पालिकेने निश्चित केलेल्या दरापेक्षा पंचवीस टक्के कमी दराने निविदा भरणारे कंत्राटदार चांगले रस्ते कसे देणार? असा सवाल राज ठाकरे यांनी केला. खराब रस्ते बांधण्यासाठी कोटय़ावधी रुपये खर्च करायचे, नंतर त्यावर पडणाऱ्या खड्डे बुजविण्यासाठी कोटय़ावधी रुपयांची उधळण करायची, हे दुष्टचक्र आता थांबवा, असे आवाहन राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना केले. सुमार कुवतीच्या तसेच भ्रष्ट कंत्राटदारांना दरवर्षी पाचशे-हजार कोटींचे कंत्राट देण्याऐवजी संपूर्ण व्यावसायिक व या क्षेत्रातील तज्ज्ञ असलेल्या कोणत्याही कंपनीला हे कंत्राट द्यावे, कोणाला कंत्राट द्यायचे याचा निर्णय तुम्ही घ्या, पंरतु मुंबईकरांना आता तरी किमान चांगले रस्ते द्या, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली.
दरम्यान या संदर्भात राज ठाकरे यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेतली असून ते पालिका आयुक्तांशी याबाबत बोलणार आहेत. यापूर्वी कल्याण-डोंबिवली पालिका निवडणुकीच्या वेळीही खड्डय़ांच्या प्रश्नामुळे शिवसेनेला झटका बसला होता. ज्या कंत्राटदारांवर पालिकेने दंडात्मक कारवाई केली त्यांनाच ५६० कोटी रुपयांचे कंत्राट कसे दिले? असा सवालही त्यांनी केला.

No comments:

Post a Comment