जनाची नाही निदान मनाची तर .......
अख्या मुंबईत मलेरियाने थैमान घातलेले असताना , महापौर मात्र
आपले नातेवाईक आणि पक्ष-कार्यकर्ते अशा १२०० जणांच्या लवाजम्यासह तिरुपतीला रवाना झाल्या आहेत. महापौर सोमवारी परतणार असल्याचे वृत्त आहे. मलेरियाच्या विळख्यातून मुंबईची लवकरात लवकर सुटका होऊ दे अशी प्रार्थना आपण तिरुपतीकडे करणार असल्याचे श्रद्धा जाधव यांनी सांगितले. मात्र संपूर्ण शहर मलेरियाने त्रस्त असताना महापौरांनी तिरुपतीला जाणेकितपत योग्य आहे , असा सवाल उभा राहिला आहे. महापौर तिरुपतीच्या वाटेवर असताना शहरात आणखी २१६ जणांना मलेरियाची लागण झाली आहे. याबरोबरच सरकारी रुग्णालयातल्या मलेरियाग्रस्त रुग्णांची संख्या १ , १४६ इतकी झाली आहे. काल दोघांचा मलेरियाने मृत्यू झाल्याने मलेरियाने मृतांची संख्या १० वर जाऊन पोहचली आहे. मात्र आपला तिरुपतीचा दौरा सुनियोजित होता , दौरा रद्द करणे शक्य नव्हते असं जाधव यांनी सांगितले. मलेरियाला आळा घालण्यासाठी महापालिकेने योग्य उपाययोजना केल्या आहेत , पुढच्या आठवडयापर्यंत मलेरियाच्या रुग्णांमध्ये नक्कीच घट होईल असा विश्वास महापौरांनी व्यक्त केला आहे. मात्र महापालिकेच्या आरोग्य विभागाने जारी केलेली आकडेवारी मात्र विरोधाभास दर्शवते आहे. दरदिवशी सरकारी रुग्णांलयांमध्ये मलेरियाचे सरासरी २०० रुग्ण भरती होत आहेत. यामध्ये शहरातल्या ७० टक्के रुग्णांवर उपचार करणा-या खाजगी रुग्णालयातल्या रुग्णांची माहिती पालिकेकडे उपलब्ध नाही. शहरात झपाटयाने पसरत चाललेल्या मलेरियावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने उच्च आरोग्य अधिका-यांनाशहराच्या आरोग्य खात्याची सूत्रे सोपवली आहेत. |
No comments:
Post a Comment