Thursday, August 5, 2010

राज यांच्या हस्ते मुंबईची दशा प्रदर्शनाचे उद्घाटन







म टा च्या सौजन्याने


लोणार सरोवराच्या नावाखाली रस्त्यात पडलेल्या मोठा जलमय खड्डा म्हणजे लोणार सरोवर...रस्त्यातील सडलेला भाजीपाला व फुले म्हणजे 'व्हॅली ऑफ फ्लॉव्हर्स'...पावसाचे तुंबलेले पाणी म्हणजेच 'बॅकवॉटर'... मुंबईच्या या दशेचे चित्रदर्शन मांडतानाच त्यांना अत्यंत समर्पक उपमा देणाऱ्या 'मुंबई देशा' या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी केले.

पावसामुळे मुंबईच्या रस्त्यांवर कसे खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे, तसेच इतरत्र पडलेल्या घाणीमुळे मुंबई कशी गलिच्छ झाली आहे, हे छायाचित्रांच्या माध्यमातून दाखविणारे प्रदर्शन मनसे आमदार नितीन सरदेसाई तसेच विभागाध्यक्ष संदीप देशपांडे यांनी आयोजित केले होते. 'या छायाचित्रांतून मुंबईची दुर्दशा कशी झाले आहे हेच दिसत आहे. छायाचित्र एवढी बोलकी आहेत की मी वेगळे बोलण्याची गरज नाही', असे राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले. या प्रदर्शनाची दुसऱ्याशी तुलना करू नका, असेही ते यावेळी म्हणाले.

मुंबईतील बकालपणावर प्रकाश टाकण्यासाठी प्रदर्शनातील छायाचित्रांना आकर्षक 'कॅप्शन' देण्यात आल्या होत्या. मलेरियामुळे हॉस्पिटल्समध्ये पेशंट मोठ्या प्रमाणात भरती झाले असून त्याला 'गुरांचा दवाखाना' असे संबोधण्यात आले आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी पाण्याची डबकी तयार झाली असून त्याला 'महापालिका तरण तलाव योजना' असे म्हटले आहे. 'मलेरिया संवर्धन केंद' या विषयांतर्गत मच्छरची पैदास होणाऱ्या कचराकुंडी, गटारे यांची छायाचित्रे मांडण्यात आली आहेत.

काही खड्ड्यांचे उंचावरून छायाचित्रे काढण्यात आली असून त्याला 'हवाईचित्रण' असे नाव देण्यात आले आहे. प्रदर्शनाच्या शेवटी मुंबई महापालिकेच्या इमारतीचे छायाचित्र असून मुंबईमध्ये प्रेक्षणीय स्थळे निर्माण केल्याबद्दल महानगर पालिकेचे जाहीर आभार मानण्यात आले आहेत.

उपहासात्मक भाष्य करणा-या प्रदर्शनातील फोटोंचे एक पुस्तक देखिल तयार करण्यात आले आहे.

दरम्यान, मनसेच्या या उपक्रमावर टीका करताना शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे म्हणाले की, राज ठाकरे यांनी दुसरे पुस्तक काढून त्या पुस्तकाला शिवसेना द्वेषा असे नाव द्यावे.

5 comments:

  1. hi chitre paper madhye ka prasidha hot nahit, shivsenaa is responsible for all these things....

    ya sthitith rog pasaNAr nahi tar kaay hoNAr...

    ReplyDelete
  2. खरं आहे तुमचं,
    आज मुंबई , ठाणे आणि कल्याण सारख्या महानगरान मध्ये रस्ते खराब आहेत, गटार भरून वाहत आहेत, गटारांची झाकण तुटलेली आहेत, कचरा नीट उचलला जात नाही, सर्वत्र अस्वच्छता बोकाळली आहे ... आपण घरातून बाहेर पडलो कि वर दाखवल्या प्रमाणे हजारो दृश्य दृष्टीस पडतात मग ह्या सत्ताधाऱ्यांना काहीच करावं असं का वाटत नाही? महानगरपालिका वेळेवर कचरा का उचलत नाही? गटारंची झाकण का लावत नाही?? हे आपल्या आकलना पलीकडल्या गोष्टी आहेत..... एकंदर सत्ताधाऱ्यांचे लक्ष दुसरीकडे (पैसा) आहे हे मात्र खरं.... त्यांना आमच सोयरसुतक नाही ....

    ReplyDelete
  3. शिरसाट साहेब,
    आपण लीहिलेले सारेकाही खरे आहे.पण याला मुंबई महापालिकाच फक्त जबाबदार आहे का? राज्य शासनाचे काही कांम नाही का? शिवसेना आणि मनसे असेच भांडत राहिले तर त्याचा उपयोग काय?
    दत्तात्रय सुर्वे

    ReplyDelete
  4. for this condition each & every employees are responsible because they are not prompt& honest with their work only.

    ReplyDelete
  5. सुर्वे साहेब,
    प्रश्न भांडण्याचा नाही आहे, ह्या सर्व जबाबदाऱ्या महानगर पालिकेच्याच आहेत. राज्य शासन शहरातील प्राथमिक कामांकरिता जबादार नाही, त्या करताच तर नगरपालिका / महानगरपालिका अस्तित्वात आल्या आहेत. मुंबईत ज्या ठिकाणी एम एम आर डी ए च्या माध्यमातून काम होतं तेथील अस्वछातेकारिता ते जबाबदार आहेत पण इतर ठिकाणी महापालिकाच जबादार आहे. कल्याण - डोम्बिवली मधील अस्वच्छते करिता राज्य सरकार ला कसं काय जबादार ठरवणार? मग हे महापौर / नगरसेवक काय काम करणार? कालचीच बातमी बघा, मुंबई चे महापौर बालाजी ला गेल्या आहेत (त्या देखील तब्बल १२०० कार्यकर्त्यांना घेऊन !!!)

    ReplyDelete