अनधिकृत झोपड्यांमध्ये राहणा -या परप्रांतियांना एसआरएयोजनेखाली अधिकृत घरे बांधूनदिली जातात . परंतु वर्षानुवर्षेसरकारी सेवा बजावणा - याकर्मचा - यांना मात्र वा - यावरसोडून दिले जाते , अशा शब्दांतनाराजी व्यक्त करतानाचवांद्र्याच्या सरकारी वसाहतीचाभूखंड म्हणे काही बिल्डरना देऊनटाकला आहे . त्याठिकाणी कोणबिल्डर येतो तेच मी बघतो , असा दम मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भरला आहे .
वांद्रे येथील सरकारी वसाहतीच्या पुनर्विकासासाठीचे काम कोणतीही निविदा नमागवता डी . बी . रिअल्टर्स , आकृती आणि काकडे डेव्हलपर्स या तिघा बिल्डरनादेण्याचा निर्णय मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या सरकारने घेतला आहे . सरकारीकर्मचा - यांना याठिकाणी हक्काची घरे देण्याची मागणी धुडकावण्यात आल्याने यावसाहतीत राहणा - या सरकारी कर्मचा - यांचा या पुनर्विकासाला विरोध आहे . आतामनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतःच सरकारी कर्मचा - यांना पाठिंबा दिल्याने ,सरकार विरूद्ध राज असा संघर्ष पुन्हा चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत .
शिवडी मतदारसंघातील मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शनकरताना राज यांनी सरकारवर जोरदार टीका केली . सरकारी कर्मचारी इमानेइतबारेसरकारी सेवा करतात ; पण निवृत्त झाल्यावर हेच सरकार त्यांना घराबाहेर काढते ,परंतु अनधिकृत झोपडीवाल्यांना " एसआरए ' च्या योजनेत पक्की घरे देते . वांद्रे येथीलसरकारी कर्मचा - यांनी स्वतःहून तेथे घरे विकत घेण्याची तयारी दर्शविली असतानाचसरकारला त्यांची फिकीर नाही . कारण राज्यकर्ते व मराठी पुढारी बिल्डरांच्या मागेठामपणे उभे राहत आहेत . वांद्र्यात कोण बिल्डर येतो तेच मी आता पाहतो ... असासज्जड इशारा राज ठाकरे यांनी दिला .
महाराष्ट्रात परप्रांतियांचे विशेषतः उत्तर भारतीयांचे लोंढे वाढत असल्याबाबत त्यांनीपुन्हा एकदा चिंता व्यक्त केली . उत्तर प्रदेशातून निवडणूक लढवणारे पं . जवाहरलालनेहरू १५ वर्षे भारताचे पंतप्रधान होते . त्यानंतर इंदिरा गांधीही १५ वर्षे पंतप्रधानहोत्या . संजय गांधी , सोनिया गांधी , राहुल गांधी हे सगळेच उत्तर प्रदेशातून निवडूनआले . मग तरीही एवढ्या वर्षांत उत्तर प्रदेशचे भले का झाले नाही ? तेथील लोकआजही महाराष्ट्रात का येतात ? असा सवाल त्यांनी भाषणात केला .
शिवडी मतदारसंघातील मनसेचे आमदार बाळा नांदगावकर यांचेही यावेळी भाषणझाले . आजारपणामुळे गेले तीन महिने तुम्हाला वेळ देऊ शकलो नाही , त्याबद्दलत्यांनी दिलगिरी व्यक्त केली . यापुढे मी तुमच्यासाठी वेळ देणार असून , तुमच्यामनातील किंतु - परंतु काढून टाका , असे आवाहन नांदगावकर यांनी केले .
शिवडी मतदारसंघातील मनसेचे आमदार बाळा नांदगावकर यांचेही यावेळी भाषणझाले . आजारपणामुळे गेले तीन महिने तुम्हाला वेळ देऊ शकलो नाही , त्याबद्दलत्यांनी दिलगिरी व्यक्त केली . यापुढे मी तुमच्यासाठी वेळ देणार असून , तुमच्यामनातील किंतु - परंतु काढून टाका , असे आवाहन नांदगावकर यांनी केले .
No comments:
Post a Comment