Friday, August 6, 2010

आपल्या दुर्दशेला आपणच जबादार !!!

मुंबई, ठाणे आणि कल्याण सारख्या महानगरांमध्ये सध्या ची अवस्था फार वाईट आहे.

रस्ते खराब आहेत (खड्ड्यात रस्ते कि रस्त्यात खड्डे हे कळायला मार्ग नाही, कल्याण मधील रस्त्यांवर तर होडीतून प्रवास केल्यासारख वाटतं), पद पथाचा पत्ता नाही, गटार भरून वाहत आहेत, गटारांची झाकण मोडकळीस आलेली आहेत, काही ठिकाणी तर ती गायब झाली आहेत, कचरा वेळेवर उचलला जात नाही, कचरा पेटीच्या बाहेर ओसंडून वाहतो आहे, सर्वत्र दुर्गंधी आणि अस्वच्छता बोकाळली आहे.

आपण घरातून बाहेर पडल्यावर हि दृश्य सर्वत्र पाहतो, मग तेथील नगरसेवक / महापालिका अभियंता ह्यांना ह्या गोष्टी दिसत नाही काय? प्रत्येक विभागातील सत्ताधारी / विरोधी पक्षाचे विभागप्रमुख काय झोपा काढत आहेत काय? शहरात स्वच्छता राखणं हि पालिकेची / महानगरपालिकेची जबादारी आहे पण ते ती जबाबदारी पार पाडत नाही असच सध्या चित्र आहे ...

महा पालिका रस्ते दुरुस्त का करीत नाही, गटारांची झाकण का लावत नाही, कचरा नीट का उचलत नाही? ह्या सगळ्या गोष्टी आकलना पलीकडच्या आहेत. सत्ताधारी पक्ष काहीही म्हणो, मुंबई / ठाणे / कल्याणची दुर्दशा लोकां समोर आहे. आम्ही विरोधाला म्हणून विरोध करत नाही तर सत्य त्यांच्या समोर मांडतोय, मग त्याला राजकारणाचा संबंध का लावायचा? हे केवळ शिवसेना द्वेष आहे असं का म्हणायचं?? त्यापेक्षा तुमच्या नगरसेवकांना / विभागप्रमुखांना तुम्ही कामाला लावा ना. उद्या जर का महापालिका / पालिका तुमच्या हातून गेली तर परत तुम्ही आमच्याच नावाने ठणाणा करणार. ह्याला काही अर्थ आहे काय???

माझ्या मते ह्या सर्व दुर्दशेला आपण स्वतः देखील जबादार आहोत. आपण काम न करणाऱ्या नगरसेवकांना निवडून देतो, विभागात अस्वच्छता असेल तर आपण नगरसेवकाला किवां त्या विभागातील पालिका अधिकाऱ्याला कधी जाब विचारात नाही (बऱ्याच वेळेला आपल्या विभागातील पालिका अधिकारी कोण आहे ते देखील आपल्याला माहित नसते), मग परिस्थिती सुधारणार तरी कशी???





No comments:

Post a Comment