९६ ट्रक पकडले
मुंबई, २७ नोव्हेंबर / प्रतिनिधी
कन्नमवार नगरजवळील कांजूर डम्पिंग ग्राऊंडमध्ये गाळ आणि चिखल टाकणाऱ्या अॅन्थोनी वेस्ट मॅनेजमेन्ट कंपनीविरुद्ध मनसेने आंदोलन केले. नगरसेवक-आमदार मंगेश सांगळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी डम्पिंग ग्राऊंडमध्ये गाळ आणि चिखल टाकणारे ९६ ट्रक पकडून दिले.
आंदोलनात चार ट्रकची तोडफोड झाली असून चार कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणी अॅन्थोनी वेस्ट मॅनेजमेन्ट कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कांजूर डंपिंग ग्राऊंडमध्ये काँक्रीट, डेब्री टाकण्यात येते. परंतु अॅन्थोनी वेस्ट मॅनेजमेन्ट कंपनीकडून येथे गाळ आणि चिखल टाकण्यात येत असल्याने दरुगधी पसरली होती. तसेच रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली होती. परवाना नसतानाही ही कंपनी या डम्पिंग ग्राऊंडमध्ये गाळ आणि चिखल टाकत होती. त्यामुळे या कंपनीविरुद्ध विक्रोळी पोलीस ठाण्यात ४२० कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मानवी वस्ती नसलेल्या ठिकाणी डम्पिंग ग्राऊंड उभारावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले असतानाही महापालिकेने कन्नमवार नगराला खेटून कांजूर डम्पिंग ग्राऊंड उभारले आहे. त्यामुळे ते त्वरित बंद करावे, अन्यथा मनसे रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असे मंगेश सांगणे यांनी सांगितले.

No comments:
Post a Comment