वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, असं संत तुकाराम महाराजांनी १६ व्या शतकात सांगितलं होतं. पण उल्हासनगरमध्ये मात्र वृक्षरोपाणाच्याच नावाखाली हिरवा भ्रष्टाचार केल्याचे उघडकीस आले आहे.
गेल्या वर्षी महापालिकेने शहरात, ७८ लक्ष रुपये खर्च करून १०,००० वृक्ष लावण्याची मोहीम हाती घेतली होती, पण प्रत्यक्षात मात्र कमी झाडे लावून या मोहिमेचा पुरता फज्जा उडाला आहे. अर्धी अधिक झाडे सुकली असून काही झाडे लावलेल्या ठिकाणहूनच नाहीशी झाली आहेत. यात कळस म्हणजे सिमेंटचा रोडमध्ये वृक्षारोपण करून महापालिकेने आपल्या अक्क्लेचे दिवे पाजवळवलयाचे दिसत आहे.
उल्हासनगर हे १३ किलोमीटरचं शहर, महापालिकेने सुंदर व हरित शहर करण्यासाठी वृक्षारोपांचा कार्यक्रम हाती घेतला होता. यासाठी पालिकेने शहरातील दुभाजकामध्ये आणि परिसरात १०,००० झाडे लावली. यामध्ये पाम, शोभेची तसंच सावलीच्या झाडांचा समावेश होता. यासाठी थेट हैदराबादहून झाडे मागवण्यात आली. एका झाडला २२,०० रुपये मोजण्यात आले. पण परिसरात चौकशी केली असतात ही झाडे मुंबई ठाणे येथील कोणत्याही नर्सरी मध्ये ४०० ते ५०० रुपयांना मिळतात. पण ही झाडे लावताना कोणतीही काळजी न घेता चक्क सिमेंटमध्ये लावण्यात आली आहेत. त्यामुळे एवढी महागडी झाडे पाणी आणि जमीन न मिळाल्याने सुकून गेली आहेत. तर दुसरीकडे ज्यांच्या दुकान आणि घरासमोरही झाडे लावली त्यांनी ती अडचण होते म्हणून तोडून टाकली आहेत.
ही योजना राबवत असताना महापालिकने, आपल्या स्वतःच्या जेएनएनएमआरयू योजने अंतर्गत जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेतले आहेत यामुळे या कामात होणाऱ्या खोदकामात अनेक झाडे काढून टाकण्यात आली आहेत. त्यामुळे पैशाचा अपव्यय झाला असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
या बाबत नवीन आयुक्तांनी आपल्याकडे अनेक तक्रारी असल्याची कबुली दिली असून, याप्रकरणात आपण प्रशासकीय चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याचे सांगून याप्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असं सांगितले.
उल्हासनगर महापालिका यापूर्वीच विविध कारणांनी बदनाम असून आता झाडंदेखील भ्रष्टाचारामधून वाचलेली नाहीत हे यावरून सिद्ध होते
आयुक्त काय करणार आहेत?? मला वाटत नाही काही ऍक्शन घेतील.
ReplyDeleteखरं म्हणजे विरोधी पक्षाने हा मुद्दा उचलून धरला पाहिजे पण ते देखील ह्यात सामील झाले असतील ह्यात वाद नाही. विरोधी पक्षच आवाज उचलत नाही म्हटल्यावर आयुक्त अर्थपूर्ण व्यवहार करून गप्प बसतील. ह्या आयुक्तांच्या दर ३ वर्षांनी बदल्या होतात, ह्यांना खरं म्हणजे शहराशी काही देणं घेणं नसतं, त्यांचा एकाच उद्देश - पैसे कमावणे.
ReplyDelete