Thursday, July 29, 2010

१० दिवसांत १६२४ नवीन खड्डे

"खड्डेच खड्डे चोहीकडे" अशी सध्या सर्व रस्त्यांची अवस्था झाली आहे ....

कल्याणमधील रस्ते तर एखाद्या खेड्यातल्या रस्त्याला लाजवतील असे झाले आहेत ....... एवढ असून देखील शिवसेनेचे महापौर म्हणतात कि कल्याण - डोम्बिवली महानगरपालिकेने सामान्य जनते साठी असामान्य काम केले आहे ... खरं आहे आधी एवढे खड्डे थोडी पडत होते, ते तर आता पडायला लागले ............ ह्या नालायकांना बैलगाडीत बसवून ह्या खड्यांच्या रस्त्यावरून रपेट घातली पाहिजे .......

मुंबई बद्दल तर न बोललेलेच बरे .......काय, बरोबर ना?

खालील बातमी म टा च्या सौजन्याने

आधीच खड्डयांनी हाडे शेकून निघालेल्या मुंबईकरांचे संकट अधिकच वाढले आहे. नुकत्याच पडलेल्या पावसाने गेल्या दहा दिवसात १६२४ नवीन खड्ड्यांची भर पडली आहे.
मुंबईतील रस्त्यांची लांबी १९४० किलोमीटर आहे. यापैकी किमान ३५० किलोमीटरचे रस्ते अत्यंत खराब झाले आहेत. इतर रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेतच.
केवळ महामार्ग आणि महत्त्वाचे रस्तेच नव्हेत तर अनेक छोटे रस्ते आणि गल्ल्यांतही पाऊल आत जााईल इतके मोठे खड्डे पडले आहेत.
मुंबई महानगरपालिका आणि एमएमआरडीए या दोन्ही संस्थांच्या अखत्यारीतील रस्त्यांची ही अवस्था आहे. काही ठिकाणी तर सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यांना तडे गेले आहेत.
महापालिकेची के वळ खड्डे बुजवण्यासाठी ४० कोटी रूपयांची तरतुद आहे हे लक्षात घेता महापालिकेचा स्वत:च्या नवीन रस्ते बनवणाऱ्या यंत्रणेवर किती विश्वास आहे हे दिसते अशी उपहापूर्ण टीका महापालिकेच्याच निवृत्त अभियंत्याने केली आहे. तरीही ही रक्कम अपुरी आहे असे पालिका अधिकारी सांगत आहेत हे आश्चर्य आहे असेही या अभियंत्यांनी सांगितले.
आश्चर्य म्हणजे रस्ते खराब झाल्याबद्दल महापालिकेने केवळ पाच ठेकेदारांवर कारवाई केली ती फक्त ११,५०० रूपये दंड म्हणून वसुल करण्याची.

दरम्यान वाहतुक पोलिस या खराब रस्त्यांमुळे मेटाकुटीस आले आहेत. वाहतुकीची ठिकठिकाणी कोंडी होते आहे आणि पोलिस किती ठिकाणी ठेवायचे हे ज्येष्ठ अधिकाऱ्यांना कळेनासे झाले आहे.

केवळ रस्तेच नव्हेत तर बहुतेक फ्लायओव्हर्सवरही हेच चित्र आहे. नवीन बांधलेल्या फ्लायओव्हर्सवरही खड्डे पडले आहेत.



3 comments:

  1. पावसाचे पाणी जमीनीत झिरपून जमिनीचा भुजल साठा वाढावा म्हणुन रस्त्याला हे खड्डे पाडले जात असावेत. यालाच म्हणतात ' सामान्य जनते साठी असामान्य काम '

    ReplyDelete
  2. काही सांगता येत नाही ह्या लोकांचं तुमच्या म्हणण्या प्रमाणे रेन वाटर हार्वेस्टिंग आहे म्हणतील

    ReplyDelete
  3. डांबराचे रस्त्यांवरील थर उन्हाळ्यांत उन्हामुळे वितळतात आणि त्यावरून अवजड वाहने गेली की ते आपली जागा सोढतात. अशा रितीने पडलेले खड्डे मग पावसाळ्यांत ठळक होतात.

    ReplyDelete