Friday, July 16, 2010

२५ हजार स्टॉल्ससाठी राज पालिकेत

म टा च्या सौजन्याने ..........



मुंबईतील पदपथांवर २५ हजार स्टॉल उभारून ५०० कोटी रुपयांचे कर्ज अल्पदराने उपलब्ध करून मराठी तरुणांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा या हेतूने मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेने आखलेली योजना पालिकेला पटवून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे. आयुक्त स्वाधिन क्षत्रिय व महापौर श्रद्धा जाधव यांची गुरुवारी पालिका मुख्यालयात भेट घेऊन योजनेच्या अमलबजावणीसाठी विनंती केली.

एकूणच सर्वसामान्य मुंबईकरांना या स्टॉल्समुळे तोशीस पडणार नाही, असेच पदपथ या योजनेसाठी द्यावेत असे राज यांनी स्पष्ट केले. राज यांच्यासह बँकेचे अध्यक्ष व आमदार प्रवीण दरेकर, शिवाजीराव नलावडे, राजन शिरोडकर, मनसेचे गटनेते मंगेश सांगळे तसेच बँकेच्या कार्यकारिणीचे सदस्यांनी आयुक्तांची भेट घेतली. ही योजना मराठी तरुणांना रोजगार मिळवून देणारी आहे, त्यामुळे या योजनेकडे पक्षाच्या चष्म्यातून बघू नका, बँकेच्या संचालक मंडळावर सर्व पक्षाचे सदस्य असून बँकेने ही योजना तयार केली आहे, त्यामुळे पक्षभेद बाजूला ठेवा, असे आवाहन राज यांनी केले. स्वयंरोजगार योजनेच्या माध्यमातून सुमारे ५० हजार तरुण-तरुणींना रोजगार उपलब्ध होईल. स्टॉल उभारणीकरिता आवश्यक ते साहित्य व माकेर्टिंगची यंत्रणा उभारण्याची जबाबदारी स्वीकारण्याची तयारीही बँकेने ठेवली आहे. या स्टॉलच्या माध्यमातून कराच्या-भाड्याच्या स्वरूपात पालिकेला लाखो रूपयांचा महसूलही मिळू शकतो, अशी योजना आहे. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनाही योजनेची माहिती दिली आहे. योजनेचा अभ्यास करू, असे आयुक्त क्षत्रिय यांनी सांगितले.

त्यानंतर, राज थेट महापौर श्रद्धा जाधव यांच्या कार्यालयात आले. तिथे काय वार्तालाप होतो हे ऐकण्यासाठी सर्वांनी कान टवकारले होते. चर्चा आटोपल्यानंतर राज उभे राहिले. एक पॉझ घेतला. बाकी सर्व ठीक चालले आहे ना, अशी विचारणा त्यांनी महापौरांना केली. त्यावर उपस्थितांच्या चेह-यावर मिश्किल हास्य पसरले.

No comments:

Post a Comment