Thursday, January 7, 2010

‘मटा’नायक जनतेला समर्पितः राज


म टा च्या सौजन्याने

7 Jan 2010, 1912 hrs ईस्ट

मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
पक्षाच्या रुपाने मी मतदानाला सामोरे गेलो आहे, पण माझ्या बाबतीत मतदानाची ही पहिलीच वेळ आहे. महाराष्ट्राच्या जनतेने मला नायक बनवले, त्यामुळे मी जनतेचे आभार मानतो. पण कुठलाही पुरस्कार घेणार नसल्याचे मी यापूर्वीच ठरवत असल्याने ‘ मटा ’ नायक हा पुरस्कार मी पुन्हा जनतेला समर्पित करतो, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ‘ मटा नायक ’पुरस्कार प्रदान समारंभात सांगितले.
गेल्या सात वर्षांपासून ‘ महाराष्ट्र टाइम्स ’ तर्फे जनतेचा कौल घेऊन ‘ मटा ’ नायक ठरविण्यात येतो. यंदा एकूण मतदानाच्या ५५ टक्के मते मिळवून म्हणजे ४५ हजार मते मिळून राज ठाकरे यांनी निर्वीवाद पुरस्कारावर आपले नावं कोरले. यावेळी महाराष्ट्र टाइम्सचे संपादक अशोक पानवलकर यांनी पुष्पगुच्छ आणि ‘ मटा ’ नायकचे सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना, राज ठाकरे म्हणाले, कुठलाही पुरस्कार न घेण्याचे मी ठरवले आहे. पण हा पुरस्कार कोणत्याही संस्थेने दिला नसून जनतेने दिला आहे. त्यामुळे मी त्याचा स्वीकार करतो. परंतु, पुरस्कार स्वीकारून मी कुठेही समाधानाची पावती घेऊ इच्छित नाही. त्यामुळे हा पुरस्कार स्वीकारण्या पेक्षा मी तो जनतेलाच अर्पण करतो, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
पुरस्कार वितरणानंतर राज ठाकरे यांनी ‘ मटा ’ ऑनलाइनच्या ऑफिसला भेट दिली. मटा ऑनलाइनचे प्रमुख सुहास फडके यांनी राज ठाकरे यांचे स्वागत केले


मनसेच्या तोफेचे बार

म टा च्या सौजन्याने

7 Jan 2010, 0116 hrs IST
आशिष पाठक

विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बाजी मारत कल्याण पश्चिम व कल्याण ग्रामीण अशा दोन जागा अगदी सहज काबीज केल्या. त्यामुळे आता महापालिकेवर मनसेचा झेंडा फडकवायचाच या बुलंद इराद्याने मैदानात उतरलेल्या मनसैनिकांना थेट राज ठाकरे यांची जाहीर सभा होत असल्याने आणखी बळ मिळाले आहे. विशेष म्हणजे या सभेने मनसेच्या प्रचाराचा नारळ फुटणार असल्याने मनसैनिक जोमाने कामाला लागले आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या चौथ्या सार्वत्रिक निवडणुकीचे वेध लागत असताना, आयाराम गयारामच्या चचेर्ला सुरूवात झाली आहे. दीड महिन्यापूवीर् भाजपचे कल्याण मतदारसंघाचे माजी आमदार हरिश्चंद पाटील यांनी पक्षाचा राजीनामा दिला. त्यानंतर ते लगेचच समर्थकांसह दुसऱ्या कोणत्या तरी पक्षात प्रवेश करतील अशी अटकळ होती. पक्षाचे राष्ट्रीय नेते गोपीनाथ मुंडे यांचे खंदे समर्थक असलेल्या आमदारकीची उमेदवारी मिळवण्यात अपयश आले असले, तरी शहरातील राजकीय वाऱ्याची दिशा पाटील यांनी ओळखली आहे. यापुढील निवडणुकीत मनसे कल्याण-डोंबिवलीत जोरदार मुसंडी मारणार हे पाहून त्यांनी या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांच्यासोबत कल्याणचे जिल्हाध्यक्ष व ज्येष्ठ नगरसेवक दिनेश तावडे व अन्य काही महत्त्वाचे कार्यकतेर् होते. माजी आमदार पक्षात येत असल्याने त्यांना तातडीने पक्षात प्रवेश दिला जाण्याची अपेक्षा असताना प्रत्यक्षात तसे घडले नाही. प्रवेश देताना राज ठाकरे यांनी डोंबिवलीत यावे आणि जाहीरपणे प्रवेश द्यावा अशी गळ या कार्यर्कत्यांकडून घालण्यात आली. त्यामुळे प्रवेश रखडला. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी नुकतीच आटोपल्याने राज ठाकरे यांनी कोठेही जाहीर सभा न घेण्याचे ठरवले. जानेवारी महिन्यात ते राज्याच्या दैाऱ्यावर निघाले असून, फेब्रुवारी महिन्यात पहिल्या आठवड्यात डोंबिवलीत जाहीर सभा घेणार आहेत. त्यामुळे या सभेत भाजपमधून येणाऱ्यांना मनसेत प्रवेश दिला जाईल अशी शक्यता आहे. डोंबिवलीत रवींद चव्हाण यांनी मनसेचे कडवे आव्हान मोडून काढले असले, तरी त्यांना भाजपच्या छुप्या विरोधाला तोंड द्यावे लागले. भाजपच्या विचारसरणीवर दृढ विश्वास असणाऱ्या सामान्य डोंबिवलीकरांमुळे ते विधानसभेवर निवडून येऊ शकले. परंतु, महापालिका निवडणुकीत पुन्हा याची पुनरावृत्ती होऊ शकेल याची खात्री कोणीच देऊ शकत नाही. डोंबिवलीत भाजपची लोकप्रियता घसरणीला लागली आहे हे निविर्वाद सत्य आहे. पक्षाचे नगरसेवक खाजगीत उघडपणे त्याची कबुलीही देतात. एकमेकांचे पाय खेचण्यात या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या मनोवृत्तीमुळे कार्यकतेर् मात्र सैरभैर आहेत. त्यांना निश्चित अशी दिशा देऊ शकणारा एकही नेता नाही. एकीकडे भाजपची प्रकृती खालावत असताना मनसे मात्र तगडा पक्ष म्हणून उदयाला येत आहे. त्यात दोन आमदार प्रचारात उतरणार असल्याचा फायदा मनसैनिकांना मिळेलच. मागील निवडणुकीच्या निकालावर नजर फिरवली तरी हे सहज लक्षात येते की डोंबिवलीकरांनी वर्षांनुवर्ष राजकारणात असणाऱ्या बड्या नेत्यांऐवजी तरुण चेहऱ्यांना निवडून दिले. त्यामुळे यंदाही तेच घडणार हे स्पष्ट आहे. भाजपसारखीच परिस्थिती शिवसेनेची आहे. सेनेचे डोंबिवलीतील नगरसेवक राजेश चूडनाईक यांनी मनसेत प्रवेश करण्याचे आधीच जाहीर केले आहे. ते राज ठाकरे यांच्या सभेत शिवसेनेला सोडचिठ्ठी देतील. त्यांच्यासह डोंबिवलीतील सेनेचे २ नगरसेवक मनसेच्या संपर्कात आहेत. महापालिका निवडणूक नऊ महिन्यांवर आली असताना राजीनामा देऊन पोटनिवडणूक लढवण्याऐवजी कागदावर सेनेतच पण मनाने मनसेत राहणे ते पसंत करतील हे उघड आहे. खिंडार फक्त डोंबिवलीतच नाही तर कल्याण, अंबरनाथ व उल्हासनगरातही पडू शकते. कल्याणात प्रकाश भोईर यांच्यासारखा फारसा परिचित नसलेला पण धडाडीचा कार्यकर्ता सहज आमदार झाला. भोईर यांच्या यशामुळे इतर पक्षांचे कार्यकतेर् मनसेकडे आकषिर्त झाले असून या पक्षाच्या लाटेवर स्वार होत आपण नगरसेवक होऊ शकतो असे त्यांना वाटू लागले आहे. त्यामुळे कार्यकतेर् मोठ्या प्रमाणावर मनसेत प्रवेश करतीलच शिवाय कल्याणातील काही नगरसेवकही मनसेच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत. केडीएमसीच्या निवडणुकीआधी अंबरनाथ नगरपरिषदेची निवडणूक होत आहे. त्यासाठीची आचारसंहिता कदाचित फेबुवारी महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात जारी होईल. हातात फारसा वेळ नसल्याने मनसेचा झेंडा हातात घेण्यासाठी इच्छुक असलेले नगरसेवक डोंबिवलीतील सभेत काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकांनी २००९ मध्ये बरीच धामधूम होती. २०१० मध्ये नवी मुंबई व कल्याण डोंबिवली या महापालिका आणि अंबरनाथ व बदलापूर या नगरपरिषदांच्या निवडणूका होत आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे या मनसेच्या तोफेच्या बारांमुळे येथील राजकीय वातावरण खऱ्या अर्थाने तापू लागणार हे निश्चित.

Wednesday, January 6, 2010

‘झेंडा’वर मनसेचा आक्षेप, तरीही फडकणार!

मित्रानो, आत्ताच म टा मधे ही बातमी वाचली आणि लगेचच ब्लॉग वर टाका वीशी वाटली। अवधूत गुप्ते ची शिवसेने शी असलेली ज़वळीक सगळ्याना ठाउकच आहे आणि आम्हाला नाही वाटत की तो मनसे ला ह्या चित्रपटातुन काही न्याय देइल । राज साहेबानी सांगितल्या प्रमाने जर त्यांच्या वर टिका करून कोणी मराठी दिग्दर्शकाचा चित्रपट चालत असेल तर ठीक आहे आणि आम्हाला त्यावर आक्षेप नाही कारण प्रेक्षकच ठरवतील कोणाचा झेंडा खाद्यां वर घ्यायचा । काय बरोबर की नाही ?
विनोद शिरसाठ


मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
ठाकरे घराण्याच्या राजकारणावर भाष्य करणारा आणि त्यांच्या व्यक्तीरेखांशी साम्य असणारा अवधूत गुप्तेचा ‘ झेंडा ’ या चित्रपटातील दोन दृश्यांबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्षेप घेतला आहे. अवधूतच्या या चित्रपटाचे खास स्क्रिनिंग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी करण्यात आले होते. त्यावेळी मनसेच्या नेत्यांनी ‘ झेंडा ’ चे रंग तपासले. त्यात मनसेसाठी यातील काही रंग भडक असल्याचे त्यांच्या लक्षात आले. ‘ झेंडा ’ ला क्लीन चिट मिळण्यासाठी मुंबईच्या फेमस थिएटरमध्ये बुधवारी शो आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मनसेचे चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर, सरचिटणीस शालिनी ठाकरे, संदीप देशपांडे, गजानन राणे, शशांक नागणेकर, गिरीष धारकर उपस्थित होते. चित्रपट पाहिल्यानंतर खोपकर यांनी राज ठाकरे यांच्याशी संपर्क साधला. त्यावर माझी बदनामी करून जर मराठी दिग्दर्शकाचा चित्रपट चालत असेल तर मला आनंदच आहे, असे राज ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले. केवळ आक्षेप नोंदवून चित्रपट प्रदर्शनाला हिरवा कंदील दाखवला. मनसेने ज्या दोन सीन बद्दल आक्षेप घेतला आहे, त्यातील एका सीनमध्ये राज ठाकरेंच्या व्यक्तिरेखेशी साधर्म्य असलेला कलाकार गड्याला आपल्या कपातील उरलेला चहा देतो. तसेच दुस-या सीनमध्ये इफ्तार पार्टीत जाऊन तो कलाकार टोपी घातलो तसेच हुक्का पितो. हे दोन्ही चुकीचे सीन्स दाखवून राज ठाकरेंची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. हा चित्रपट एकांगी आहे, एका पक्षाला झुकते माप दिले आहे, असे अमेय खोपकर यांनी सांगितले. राज ठाकरेंच्या रुपाने महाराष्ट्राला महानायक मिळालेला आहे. महाराष्ट्र टाइम्सच्या सर्वेत हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे एखादा चित्रपट राज ठाकरेंची प्रतिमा मलिन करू शकत नाही, असेही खोपकर यांनी स्पष्ट केले. या संदर्भातील आक्षेप आम्ही अवधूत गुप्ते याच्याकडे नोंदविला आहे. त्यांनी पुढील कारवाई करायची आहे. चित्रपटाचे प्रिन्ट सर्व थिएटरमध्ये पोहचले असल्याने राज ठाकरे मराठी माणसाला नुकसान होवू नये असे कोणतेही काम न करण्याचे आदेश दिले आहेत, असेही खोपकर यांनी सांगितले.

रणजीमध्ये मुंबई अंतिम फेरीत

Wednesday, January 06, 2010 AT 05:54 AM (IST)

मुंबई - मुंबई आणि दिल्ली यांच्यात ब्रॅबोर्न स्टेडिअमवर सुरु असलेल्या रणजी स्पर्धेतील उपांत्य सामन्यात पहिल्या डावाच्या अधिक्‍यावर विजय मिळवित मुंबई संघाने अंतिम फेरीत स्थान मिळविले.मुंबईने पहिल्या डावात अभिषेक नायरच्या दिडशतकाच्या जोरावर पाचशे धावांचा डोंगर उभारला होता. यापुढे दिल्लीचा डाव रमेश पोवारने मिळविलेल्या पाच बळींमुळे अवघ्या २११ धावांत आटोपला. यामुळे मुंबईने पहिल्या डावात २८९ धावांची आघाडी मिळविली. दुसऱ्या डावात मुंबईला मोठी धावसंख्या उभारता आली नाही व त्यांच्या डाव १८७ धावांत संपुष्टात आला. यामुळे दिल्लीला विजयासाठी ४७६ धावांचे कठीण आव्हान होते. आज शेवटच्या दिवशी दिल्लीने ४ गडी गमावत १६० धावा करत सामना अनिर्णित राखला. मात्र, पहिल्या डावाच्या अधिक्‍यावर मुंबईने अंतिम फेरीत स्थान मिळविले

कल्याण मधील ओसाड गणेश घाट .......

मित्रानो,
कल्याण मधील गणेश घाट म्हणजे आपण निवडून दिलेले लोक प्रतिनिधी आपल्या सुख सोयींची कशी वाट लावतात त्याचा एक उत्कृष्ट नमूना आहे। सादर करीत आहे तुमच्या साठी म टा मधील गणेश घाटावरील बातमी ... वाचा आणि पेटून उठा .... काय? आणि हो, काळ्या तलावाचे सुशोभिकरनाचे काय चालले आहे? सांगावे ...
विनोद शिरसाठ

- म. टा. प्रतिनिधी
कल्याण शहराला विस्तीर्ण खाडीकिनारा लाभलेला असला तरी या किनाऱ्यालगत चौपाटी विकसित करण्यात पालिकेला अपयश आले आहे. त्यातच येथील दुर्गाडी गणेशघाटाची अवस्थाही ओसाड वाळवंटासारखी झाली आहे. तुटलेली खेळणी, बसण्यासाठी पुरेशी व्यवस्था नाही, पिण्याचे पाणी व प्रसाधनगृहाची वानवा असलेला दुर्गाडी गणेशघाट आता फेरीवाल्यांच्या विळख्यात सापडला आहे. त्यामुळे रमणीय गणेशघाट साकारून उत्तम दर्जाचे पर्यटनस्थळ बनवण्याच्या घोषणेचे काय झाले, अशी विचारणा विरोधी पक्षनेते सचिन पोटे यांनी केली आहे. कल्याण शहरात मनोरंजनांच्या साधनांची कमतरता असताना केडीएमसीने उद्याने आणि मैदानांचाही बळी घेण्याचे सत्र सुरू केले आहे. त्यातच खाडीकिनारी असलेला गणेशघाटही ओसाड असल्याने कल्याणकरांनी चार घटका मौजमजा करण्यासाठी जायचे कोठे, असा प्रश्न निर्माण होतो. वास्तविक मागील महापालिका निवडणुकीआधी पत्रकार परिषदेत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी महापालिकेत सेना-भाजपची सत्ता आली तर दुर्गाडी गणेशघाट रमणीय पर्यटनस्थळ म्हणून विकसित केला जाईल, असे आश्वासन दिले होते. या परिसराचे सध्याचे स्वरूप पाहता या आश्वासनाप्रमाणे काहीच झाल्याचे दिसत नाही. सोमवारी पालिकेतील विरोधी पक्षनेते सचिन पोटे यांनी गणेशघाट परिसराची पत्रकारांसोबत पाहणी केली. लहान मुलांना खेळता यावे, यासाठी तिथे बसवण्यात आलेली चार-दोन खेळणीही तुटली आहेत. तसेच, मुलांना खेळताना दुखापत होऊ नये यासाठी तिथे वाळू असावी लागते. पण वाळू तर सोडाच, तेथील पृष्ठभाग ओबडधोबड झाला असल्याने मुलांना दुखापत होण्याचे प्रमाण वाढले आहे. गणेशघाटावर कारंजे बसवण्यासाठी जागा सोडण्यात आली असली तरी कारंजे उभारण्यास केव्हा मुहूर्त सापडणार, हे अद्याप स्पष्ट नाही. तसेच, सुरक्षेसाठी बसवण्यात आलेला कठडा काही ठिकाणी तुटल्यामुळे धोका निर्माण झाला आहे. शेजारीच असलेल्या कचऱ्याच्या डोंगरातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे गणेशघाटावर येणाऱ्या लोकांना धड बसता येत नाही. या परिसरात कोठेही साधी पिण्याच्या पाण्याची सोय नाही. लहान मुले व ज्येष्ठांसाठी प्रसाधनगृहाची सोय नसल्याने त्यांची कुचंबणा होत आहे. अशा निसर्गत: सुंदर परिसराला आणखी शोभा येईल, असे दिवे बसवण्याऐवजी एरवी रस्त्यांवर दिसणारेच सरळधोपट दिवे बसवून पालिका मोकळी झाली आहे. हद्द म्हणजे तिथे होणाऱ्या बोटिंगसाठी पालिकेची परवानगी घेण्यात आलेली नाही, शिवाय बोटिंग करताना एखादा अपघात झाला. तर रहिवाशांचा जीव वाचवण्यासाठी सुरक्षा यंत्रणा अस्तित्वात नाही. तरीही महापालिकेने याची दखल घेतलेली नाही. हे सगळे कमी आहे की काय, म्हणून फेरीवाल्यांनी या परिसराला विळखा घातला आहे. या दूरवस्थेकडे सचिन पोटे यांनी लक्ष वेधले आहे. पालिकेने या परिसराचे सुशोभिकरण करण्यासह शिव आरमार स्मारकाचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली. फेरीवाल्यांच्या हैदोसामुळे या परिसराला बकालपणा आला असून येत्या १० दिवसांत येथील फेरीवाले हटवण्यात आले नाहीत तर युथ काँगेसचे कार्यकतेर् रस्त्यावर उतरून फेरीवाले हटवतील, असा इशारा त्यांनी पालिका आयुक्तांना दिला आहे.

भिवंडीत 'फूड माफियां'चे रॅकेट!

- म. टा. प्रतिनिधी
मॉलमधील 'एक्सपायरी डेट' उलटलेला माल कवडीमोलाने विकत घेऊन तो खुल्या बाजारात बिनबोभाटपणे विकणारे रॅकेट मनसेच्या कार्यर्कत्यांनी उघडकीस आणले आहे. भिवंडी येथील एका गोदामामध्ये हा माल ठेवल्याची खबर लागल्यानंतर मनसेच्या कार्यर्कत्यांनी तिथे छापा टाकला. सुरुवातीला नारपोली पोलिसांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करून मनसेच्याच कार्यर्कत्यांवर खंडणीचे गुन्हे दाखल केले. परंतु, मनसेच्या वरिष्ठ नेत्यांनी दबाव आणल्यानंतर ही वादग्रस्त गोदामे सिल करण्यात आली आहेत. दापोड्यातील मे. युनिव्हर्सल प्रोजेक्ट्स ओधोकृपा या गोदामामध्ये मुदत संपलेल्या मालाची विक्री होत असल्याची माहिती मनसेचे कार्यकतेर् उदय पाटील, सचिन शेट्टी, किरण शेट्टी आणि मधुकर भोईर यांना मिळाली होती. त्या गोदामावर नारपोली पोलिसांनी छापा टाकून कारवाई करावी, अशी मागणी या कार्यर्कत्यांनी केली होती. परंतु, पोलिसांनी कारवाईस नकार दिल्यानंतर या कार्यर्कत्यांनीच त्या गोदामावर छापा टाकला. तिथे सॉस, चॉकलेट, ज्युस, लोणचे, पीठ, रवा, इडलीचे पीठ, साबण, शॅम्पू, दुधाची उत्पादने अशा खाण्यापिण्याच्या वस्तूंसह अन्य उत्पादानांचा प्रचंड मोठा साठा होता. हा सर्व माल 'एक्स्पायरी डेट' उलटलेला असल्याचे मनसेच्या नेत्यांचे म्हणणे आहे. हा प्रकार आमच्या अखत्यारीत येत नसल्याचे नारपोली पोलिस स्टेशनचे अधिकारी विलास सानप यांनी सांगितल्यानंतर तहसिलदार कार्यालयातील पुरवठा विभागाचे अधिकारी कारेकरे यांच्याकडे तक्रार करण्यात आली. परंतु, त्यांनीही अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे तक्रार करण्याची सूचना केली. या वादग्रस्त गोदामाचा मालक राजेश चंदकांत ठक्कर आणि नीलेश चंदकांत ठक्कर यांना वाचविण्यासाठी पोलीस जीवाचा अटापिटा करत होते, असा आरोप मनसेचे नेते राजन राजे यांनी केला आहे. त्याशिवाय नारपोली पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या या मनसेच्या चार पदाधिकाऱ्यांनाच खंडणीच्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्नही पोलिसांनी केला. परंतु, हे प्रकरण नारपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील असतानाही या चार पदाधिकाऱ्यांना शांतीनगर पोलीस स्टेशनात बसवून ठेवण्यात आले होते. 'यावेळी पोलिसांनी आम्हाला धक्काबुक्की करून मोबाइल जप्त केले', असा आरोपही सचिन शेट्टी यांनी केला आहे. या प्रकारामुळे संतापलेल्या मनसेच्या कार्यर्कत्यांनी पोलिसांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला. त्यानंतर या वादग्रस्त गोदामावरील कारवाई सुरू झाली आहे. या गोदामाला सील ठोकण्यात आले आहे. 'पोलिसांकडे आमचे हप्ते बांधलेले आहेत. त्यामुळे आमच्यावर कुणीही कारवाई करू शकत नाही, असे बिनधोकपणे सांगणाऱ्या ठक्कर बंधू यांनी मला मारण्याची धमकीही दिली', असे या प्रकरणाच्या पंचनाम्यातील साक्षीदार आणि मनसेचे पदाधिकारी विक्रांत कणिर्क यांनी सांगितले. तशी लेखी तक्रारही कणिर्क यांनी केली आहे. मुदत उलटलेला माल पुन्हा बाजारात विकून लोकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे. पोलिसांच्या संगनमताने हा सर्व प्रकार सुरू असून त्यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असल्याचे मनसेच्या नेत्यांचे म्हणणे आहे. 'या प्रकरणातील दोषींवर कारवाई झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही', असा इशारा राजन राजे यांनी दिली आहे.

Tuesday, January 5, 2010

गूगल ची मोबाइल अप्लिकेशन

मित्रानो, मागच्या आठवड्यात गोव्याला गेलो होतो आणि जाताना ड्राइविंग साठी माझ्या मोबाइल फ़ोन वर गूगल चे मँप डाउन लोड केले होते। मी तसा गूगल माप अमेरिकेत ड्राइव करताना नेहमी वापरतो पण भारतात त्याचा काही उपयोग होइल का याबाबत शंका होती आणि नेहमी प्रमाणे गूगल ने नाव ठेवण्यास जागा ठेवली नाही। अतिशय सुन्दर अशी ही युटीलीटी भारतात देखिल मस्त पणे रस्ता दाखवत होती आणि मला जागा शोधायला जरा देखिल त्रास झाला नाही। म्हणून म्हटलं तुमच्या सोबत शेयर करावे हे मोबाइल अप्लिकेशन। तुम्ही मोबाइल साठी गूगल मँप डाउन लोड करू शकता http://www.google.co.in/mobile/blackberry/maps.html ह्या संकेत स्थळा वरून। गूगल मँप मधे बऱ्याच सुविधा आहेत ज्या मुळे तुम्ही तुमचं स्थान बघू शकता , कुठे जायचं आहे त्या ठिकानाचे डायरेक्शन बघू शकता आणि बरच काही .... वापरून तर बघा, मग कळेल आपोआप। पण हो, त्याकरता मात्र स्मार्ट फ़ोन असनं आवश्यक आहे ज्यामधे GPRS ची सुविधा असेल असा।

विनोद शिरसाठ