मी बाळासाहेबांच्या अंगाखांद्यांवर खेळलो हे मी अमान्य करीत नाही. परंतु, उद्धव ठाकरे यांच्या निवडीला आता ८-९ वर्षे झाली आहेत. त्यामुळे तोच विषय पुन्हा पुन्हा उगळून काही मिळणार नाही. माझे लक्ष कोणावर टीका करणं नसून कल्याण डोंबिवलीत झालेल्या बजबजपुरीवर केंद्रीत असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज स्पष्ट केले.
बाळासाहेबांबद्दल मला आदर आहे, माझ्या काय भावना आहे त्या मी वेळोवेळी सांगितल्या आहेत. त्यामुळे पुन्हा पुन्हा सांगण्याची मला गरज वाटत नाही. डोंबिवलीच्या सभेत बाळासाहेबांच्या विषयावर १५ मिनिटे बोललो आणि कल्याण डोंबिवलीच्या विकासासंदर्भात अधिक बोललो. परंतु, प्रसारमाध्यामांनी दुस-या दिवशी ठाकरे विरुध्द ठाकरे, ठाकरे वॉर असे चित्र रंगविले. मला त्यात रस नाही. कल्याण डोंबिवलीत झालेली बजबजपुरी दूर करायची, असल्याने त्यावरच मी लक्ष केंद्रीत केले आहे, असल्याचे त्यांनी आपल्या पक्षाचा ‘ वचकनामा ’ प्रकाशित करताना सांगितले.
डोंबिवलीत झालेल्या सभेत मी शिवसेनेतील काही व्यक्तींनाच करवंटे आणि वरवंटे म्हटलो होतो. सर्व शिवसैनिकांना उद्देशून बोललो नव्हतो. शिवसैनिकांबद्दल एवढचे वाटत होते तर माय नेम इज खान प्रकरणात शिवसैनिकांना बडवल्यानंतर बाळासाहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी जाहिरात का घेतली. कारण ती जाहिरात आली नव्हती मागितली होती. जाहिरात आली असल्यास ती नाकारण्याचा अधिकार तुम्हाला नाही, असे म्हणून आपल्या ठाकरे शैली त्यांनी शिवसेनेच्या धोरणांचा पुन्हा एकदा समाचार घेतला.
विधानसभा निवडणुकीत मराठी माणसाने पाठीत खंजीर खुपसला असे म्हणत होता तुम्ही, तर पुन्हा मराठी माणसाकडे मत मागायला का आलात, असा सवालही राज ठाकरे यांनी यावेळी केला.
महाबळेश्वर येथे झालेल्या शिवसेनेच्या अधिवेशनाची चित्रफित दाखवून काय होणार आहे. ती काय अॅडल्ट फिल्म आहे का ? जे झालं ते झालं. मी बोललो तर बोललो. त्यात वेगळे काय दाखवणार आहेत, ते. समजा मी हा निर्णय घेतला. तर तो योग्य की अयोग्य हे ठरविण्याचे अधिकार पक्षाचे मालक म्हणून तुम्हांला आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कल्याण-डोंबिवलीकरांनी माझ्याकडे सत्ता द्यायची असल्यास ती पूर्ण द्यावी, अर्धवट सत्ता देऊ नये.,अशा सत्तेला काही अर्थही नसतो. काही चुकलं तर त्याला सर्वस्वी मला जबाबदार धरा, असेही त्यांनी सांगितले.
कल्याण डोंबिवलीत जर मनसेची सत्ता आली तर १५ दिवसातून ३-४ दिवस येथे थांबून विकास कसा केला जातो हे दाखवून देईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

No comments:
Post a Comment