म टा च्या सौजन्याने ................................
म. टा. प्रतिनिधी
कल्याण-डोंबिवली महापालिकेत मनसेचा महापौर निवडून आणायचाच, या इराद्याने राज ठाकरे यांनी बुधवारी डोंबिवलीत येऊन उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. या वेळी सर्वच्या सर्व जागा लढविण्याची शक्यता व्यक्त करतानाच १० ऑक्टोबरला मनसेच्या उमेदवारांची यादी जाहीर होईल, असे राज ठाकरे यांनी सांगितले. मात्र मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या अहवालात कल्याणमधील १५ तर डोंबिवलीतील १७ जागांवर पक्षाचे उमेदवार विजयी ठरू शकतात, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
बुधवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास राज ठाकरे यांचे डोंबिवलीत आगमन झाले. वाटेत शिळफाटा रोडवर ठिकठिकाणी मनसैनिकांनी फटाक्यांच्या आतषबाजीत व जल्लोषात त्यांचे स्वागत केले. नियोजित कार्यक्रमापेक्षा उशीर झाल्याने ठाकरे यांनी थेट ठाकुर हॉल गाठला व मुलाखतींना सुरुवात झाली. अडीच वाजेपर्यंत चाललेल्या पहिल्या सत्रात कल्याण-डोंबिवलीतील १६ तर साडेचार वाजता सुरू झालेल्या दुपारच्या सत्रात आणखी १७ वॉर्डातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. निवडणूक लढण्याची संधी कमीच असली तरी ठाकरे यांना मुलाखतीच्या निमित्ताने प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळाल्याने इच्छुकांमध्ये उत्साह संचारल्याचे दिसून आले. तीन दिवसांच्या दौऱ्यात राज ठाकरे कल्याण-डोंबिवलीतील मान्यवरांच्या भेटी घेणार असल्याचे समजल्याने काही नागरिकांनी त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलाखतींमध्ये व्यस्त असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही. परंतु सत्तरी उलटलेल्या तीन महिलांनी ठाकरे यांची भेट मिळवलीच. डोंबिवलीतील रस्त्यांना पडलेले खड्डे, फेरीवाल्यांचा हैदोस व वाहतूककोंडीबाबत त्यांनी ठाकरे यांच्याकडे तक्रार केल्याचे समजते. ................. ' राज'प्रश्नांनी इच्छुकांची भंबेरी पक्षातल्या अन्य एखाद्या कार्यर्कत्याला उमेदवारी मिळाली तर तुमची भूमिका काय राहील? असा अनपेक्षित आणि टोकदार प्रश्न ठाकरे यांनी काही इच्छुकांना विचारला. मनसेला असलेली अनुकूल परिस्थिती आणि निवडणुकीत तिकीट मिळवण्यासाठी जोरदार चुरस असताना या प्रश्नाने इच्छुक उमेदवारांची भंबेरी उडवली. पक्षात कधीपासून सक्रिय तसेच, पक्षवाढीसाठी दिलेले योगदान असे महत्त्वाचे प्रश्न मुलाखतीत विचारण्यात आल्याचे समजते. ................ विजयाची संधी असलेले वॉर्ड कल्याण गांधारे बारावे मांडा टिटवाळा एनआरसी कॉलनी मोहोने राममंदिर बेतुरकर पाडा ठाणकरपाडा आधारवाडी काळा तलाव चिखलेबाग चिकणघर कणिर्क रोड कचोरे डोंबिवली बावनचाळ राजू नगर देवीचा पाडा मोठागाव ठाकुलीर् कोपरगाव नवागांव म्हात्रे नगर आयरे मढवी शाळा डोंबिवली जिमखाना पाथलीर् गोग्रासवाडी अंबिका नगर आनंदनगर एकतानगर संगीतावाडी सुनीलनगर |
No comments:
Post a Comment