काय चाललाय काय कल्याण डोम्बिवली मध्ये? आता तर सुशिक्षित लोकं देखील मत देण्याकरिता अश्या मागण्या करत असतील (माझ्या माहिती प्रमाणे करतात ) तर आपल्या शहराच दिवाळं निघणार नाही तर काय होणार?
25 Oct 2010, 0339 hrs IST
विश्वास पुरोहित
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वसामान्य मतदारांना आकषिर्त करण्यासाठी मोबाइल, पैसे आदींचे वाटप चाळी आणि झोपडपट्ट्यांमध्ये चोरीछुपे सुरू आहे. मात्र, शहरातील सुशिक्षित मतदाराचा कल पैसे घेण्याकडे नसला तरी उमेदवारांकडून सोसायट्यांमध्ये 'पेव्हर ब्लॉक' किंवा लाद्या बसविण्याची मागणी करताना हे मतदार दिसत आहेत.
'सोसायटीच्या आवारात पेव्हर ब्लॉक बसवून द्या, नाही तर लाद्या तरी लावा', अशी मागणी डोंबिवली पश्चिमेच्या एका सोसायटीतील रहिवाशांनी उमेदवारांना केली होती. या सोसायटीचा परिसर मोठा असल्याने त्या उमेवाराने पेव्हर ब्लॉक बसविण्यास असमर्थता दर्शवली. मात्र दुसऱ्या उमेदवाराने ही अट मान्य केली. त्यामुळे आम्ही आता तुम्हालाच मत देणार असे आश्वासन या सोसायटीतल्या मतदारांनी या उमेदवाराला दिल्याचे समजते.
नगरसेवकाचा निधी हा खासगी कामांमध्ये वापरता येत नाही, असा नियम आहे. समोरचा उमेदवाराचा खिसा जड असेल तर तो अशा अटी मान्य करतो. पण सर्वसामान्य उमेदवाराची अशा प्रकारात कुचंबणा होत आहे. सुशिक्षित म्हणवणाऱ्या सोसायट्यांमधून अशा मागण्या वाढल्याचे उमेवारही खासगीत मान्य करतात. तर एरवी जनतेला लुबाडणारे लोकप्रतिनिधी पुन्हा आमच्या दारात कधीही येणार नाही. त्यामुळे त्यांच्याकडून आता कामे करून घेतली तर त्यात गैर काय, असा सवालही अनेक जण उपस्थित करत आहेत.
कल्याण-डोंबिवलीत खड्डेमय रस्तेे, आरोग्य सुविधांचा अभाव, अपुरी मैदाने, प्रदूषण अशा समस्यांच्या विळखात मतदार सापडला आहे. अद्याप एकाही उमेवाराने अशा समस्यांवर तोंड उघडले नाही आणि मतदारही या समस्यांऐवजी खासगी सागण्या मान्य करून घेत आहेत. शहराची दुरवस्था झाली तरी चालेल पण सोसायटी मात्र चांगली व्हायला हवी, असा मतदारांचा दृष्टिकोन झाला आहे.
वर्षभराची केबल मोफत
उमेदवार केबल चालक असेल तर त्याच्याकडून सहा महिन्याचे किंवा वर्षभरचे प्रक्षेपण मोफत घेऊन त्याला पाठिंबा देण्याची तयारी मतदार करीत आहेत. काही सोसायट्यांनी तर त्यांचे रखडलेले 'कन्व्हेअन्स डीड' देखील उमेवारांच्या पैशांतून करून घेण्याचे ठरविले आहे.

कल्याण डोंबीवली प्रमाणे आमच्या कोल्हापुरात सुध्धा अपार्टमेन्ट मधील लोक सोसायटीचे रंगकाम, दुरुस्ती,डाग डुगुजी ई मागण्या करीत आहेत.
ReplyDeleteकारण त्यांना माहीत आहे की हे नगर्सेवक काय लायकीचे आहेत.
हे असेच चालणार राजकारण्याकडे शहराचे व्यवस्थापन दिले की अशा गोष्टी
घडणारच.