Friday, April 15, 2011

महालक्ष्मीची 'मनसे' पूजा

खालील लेख लोकमत च्या सौजन्याने ......



कोल्हापूर, दि. १४ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे निमित्त साधत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी शेकडो वर्षांची परंपरा मोडत, आज थेट करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला. याचा आनंद जयघोष करत लाडू वाटून आणि फटाके वाजवत व्यक्त करण्यात आला.आ. कदम व अॅड. स्वाती शिदे यांनी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करून देवीची पूजा केली. साडी-चोळी व ओटी भरली. त्यांनी गाभाऱ्यात प्रवेश करताच कार्यकर्त्यांनी मनसेच्या आणि शिवछत्रपतींच्या नावाचा जयघोष केला. तसेच मंदिर परिसरात लाडू वाटून आणि फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

आज तातडीची बैठक
करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिराच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश देण्यासंदर्भात पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार उद्या (शुक्रवार) जिल्हाधिकाऱ्यांनी श्रीपूजक पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक आयोजित केली आहे

गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांचे आवाहन
महालक्ष्मी मंदिराच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेशासंदर्भात गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी लक्ष घातले असून, याविषयी सर्वमान्य तोडगा निघण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. या प्रश्नावर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे व जिल्हा प्रशासनाने हा प्रश्न सामंजस्याने सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

श्रीपूजकाचा आत्मदहनाचा इशारा
आ. कदम यांना महालक्ष्मीच्या गाभाऱ्यात प्रवेश करताना श्रीपूजकांनी सोवळे नेसून प्रवेश करण्याची विनंती केली. आमदारांना अडविल्यामुळे सोबतच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध होत असल्याचे समजून गोंधळ घालत ढकला-ढकली केली. हा गोंधळ अधिकच वाढल्याने आम्ही आत्मदहन करू, असा इशारा श्रीपूजक नितीन मुनिश्वर यांनी दिला. सांगलीचे माजी आमदार नितीन शिदे यांनी, आम्हीही हिदू आहोत. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश मिळाला नाही तर आम्हीही आत्मदहन करू, असा प्रतिइशारा दिला. यामुळे तणाव अधिकच वाढला.

No comments:

Post a Comment