Wednesday, September 22, 2010

कल्याण-डोंबिवलीत ३८३ कोटींच्या विकासकामांना मंजुरी

म टा च्या सौजन्याने ..........................

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील विकासकामांसाठी राज्य सरकारने ३८३ कोटी रूपये मंजूर केले असून, उड्डाणपूल, रस्ते, पाणी पुरवठा आणि हॉस्पिटल या विकासकामांसाठी आणखी २९९ कोटी मंजूर करण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. कल्याण पश्चिम येथे ५७ कोटी रूपये, तर कल्याण पूर्व येथे १० कोटी रुपये खर्च करुन स्कायवॉक, कल्याण डोंबिवली येथे दोन ठिकाणी भाडेतत्वावरील ३६ हजार घरांचा प्रकल्प, एमएमआरडीएमार्फत ८५ कोटी रुपये खर्च करून तीन ठिकाणी ३ हजार ४०१ घरांचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. ४० हजार कुटुंबांना परवडणारी घरे मिळतील.

निर्मल अभियानामार्फत ६८ कोटी रुपये खर्च करुन सार्वजनिक शौचालये उभारली जातील. संपूर्ण निधी राज्य सरकार देणार आहे. ४० कोटी रूपये खर्च करून उड्डाण पूल, निवाळी येथे ६२ कोटी खर्च करुन विकास केंद, ५५ कोटी रूपये खर्च करुन हॉस्पिटल बांधले जाणार आहेत. राजणोली नाका येथे ३२ कोटी, माणकोली नाका येथे ३० कोटी, मुंब्रा येथे ३० कोटी आणि शिळफाटा येथे ३५ कोटी रुपये खर्च करुन चार उड्डाणपूल, अंबरनाथ ते कल्याण या रस्त्यासाठीही १५ कोटी खर्च होतील. यांव्यतिरिक्त २९९ कोटींची कामे मंजूर करण्यात येतील.

2 comments:

  1. Yatale khare kiti paise kamasathi vaparnyat yetil ha motha gahan prashn ahe

    ReplyDelete
  2. Jithe adhich pani ani vijechi samasya aste, asha thikani tyvar aadhi todga na kadhata nav navin gharache prkalp rabvane mhanje mhatarya bailala ghungurane sajavane

    ReplyDelete