रात्री साधारणता ८.३० ची वेळ, आमदार साहेबांच्या ऑफिस मधून फोने आला कि रात्री साडे अकरा ला लालबाग च्या राज्याच्या दर्शनाला जायचेय. लगेच फोनाफोनी झाली आणि निवडक दहा – बारा कार्यकर्ते जमले. साहेब बाहेर मीटिंग ला गेले होते म्हणून साडे बाराच्या दरम्यान आम्ही सगळे निघालो. सायन सर्कल ला पोहोचल्यावर असं वाटतच नव्हतं कि रात्रीचे २ वाजलेत. जिकडे बघावे तिकडे लोकच लोकं... लहान, थोर, तरुण, तरुणी ... कोणालाही वेळेचं भान नव्हतं.
मनसे चिन्ह असलेल्या आमदारांची गाडी बघून लोकांच्या नजरा उछुक्तेने आमच्या गाड्यांकडे वळत होत्या. कोणीतरी ओरडलं ... “अरे बघ मनसे च्या आमदारांची गाडी चाललीय”. त्या नजरा बघून जाणवलं कि लोकांच्या किती अपेक्षा आहेत मनसे आणि राज साहेबांकडून, मन भरून आलं पण आपसूक त्या अपेक्षांचे दडपण डोक्यावर जाणवू लागलं. एका गोष्टीची जाणीव झाली कि, हि मराठी जनता मोठ्या अपेक्षेने आमच्या पक्षाकडे पाहते आणि आम्हाला त्यांच्या कसोटीला उतरावच लागेल, दुसरा कोणताही पर्याय आमच्या समोर नाही.
वी आय पी गाडी असल्याकारणाने आम्हाला आतपर्यंत प्रवेश मिळाला. गाड्या पटकन पार्क करून आम्ही निघालो बाप्पाच्या दर्शनाला. तेथील बरेच कार्यकर्ते मनसे चे होते आणि वी आय पी सोबत असल्याकारणाने पटकन प्रवेश मिळाला. थोड्या वेळातच आम्ही सर्व जन बाप्पाच्या समोर होतो. ती अतिभव्य मूर्ती जणू खरी असल्याचाच भास होत होता, आपसूक सर्वांचे मस्तक बाप्पाच्या चरणी लीन झाले.
मी बऱ्याच वर्षानंतर लालबाग ला गेलो, माटुंग्याला कॉलेज मध्ये असताना आमचा एक मित्र लालबाग ला राहत होता तेव्हा त्यांनी आम्हाला गणपती ला नेलं होतं. त्यावेळेस आम्ही गेलो आणि लगेच दर्शन झालं आता मात्र चित्र पूर्ण वेगळं आहे. नवसाची रांग बघून तर मला चक्करच आली, वीस तास लोकं रांगेत होते हे ऐकून तर डोकं गरगरायला लागलं. बाप्पा पण मनातल्या मनात भक्ताना म्हणत असेल कि नको बाबा एवढे कष्ट घेऊ. असो थोडं विषयांतर झालं.
बाप्पाचा दर्शन घेऊन सर्वजण दिग्मूढ झाले होते, कोणाच्या तोंडातून थोडावेळ शब्दच निघत नव्हता, मला वाटतं तो त्या वातावरणाचा परिणाम असावा. बाप्पाचं दर्शन घेऊन आम्ही कॉटन ग्रीन च्या राजाचे दर्शन घेतले व गाड्या सिद्धिविनायकाच्या काकड आरती साठी रवाना झाल्या.
बर आहे तुमच...माझा एक मित्र दोन-तीन दिवसाआधी जाउन आला.सुमारे पाच तास रांगेत होता म्ह्णाला...असो, गणपती बापा मोरया...
ReplyDeleteखरं म्हणजे इतर लोकं रांगेत असताना आपल्याया अशी वागणूक मिळणे मला आवडत नाही पण नाईलाज होता .....
ReplyDelete